खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आवडते कोथिंबीर. तिने फोटो छान येतात. तिच्या वड्याही छान बनतात. पोहे असले तर खोबरे कोथिंबिरीचा एक लेयर असा द्यायचा की अखण्ड पोहे झाक ले गेले पाहिजे

कोथिंबीर मी पण सगळीकडे टाकते, नवऱ्याला कच्ची आवडत नाही. मला कोशिंबीर मध्ये भरपूर कोथिंबीर घालून खायला आवडते. नवरा खात नाही ती कोशिंबीर.
मी आता आठवड्यची आलंलसूण paste करताना भरपूर कोथिंबीर घालून paste करते.

मला आवडते कोथिंबीर. तिने फोटो छान येतात. तिच्या वड्याही छान बनतात. पोहे असले तर खोबरे कोथिंबिरीचा एक लेयर असा द्यायचा की अखण्ड पोहे झाक ले गेले पाहिजे

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 March, 2020 - 22:10
>>>
फोटो साठी मला पण आवडते. खाण्यासाठी नाही.

आयुष्य हे चुलीवरचे कांदेपोहे असेल तर कोथिंबीर ही बायकोसारखी आहे. तिची साथ हवीच.

बायकांनी हे वाचताना बायकोच्या जागी नवरा आणि कोथिंबीरच्या जागी कडीपत्ता टाकले तर चालेल. खाण्यापूर्वी तो बाजूला सारला जातो हा निव्वळ योगायोग !

वाह
क्या तत्वज्ञान है !

रच्याकने
मी कढीपत्ता बारीक करून पदार्थात घालते, कुणी काढू नये म्हणून Proud

Yummy

पालक ची पाने आहेत न?
आई नेहमी करते हा प्रकार Happy

try kartey marathi type karaycha. pan jamat nahi ahe. officemadhun R & D nahi karta yet.

समस्त बायका कोथिंबीर प्रिय आणि नवरे कोथिंबीर हेटर्स असतात का? >>> नाही आमच्या कडे ऊलटे आहे. त्याला कोथिंबीर आवडते अन मला नाही. अगदी पोह्यावर पेरायला पण नाही.

diabetes मध्ये ज्वारी? बाजरी खातात. >>> डायबेटीझ, थॉयरॉईड मध्ये ज्वारी, बाजरी नाचणी खायचा सल्ला देतात डॉक. अन गहु / तांदुळ टाळायला सांगतात

श्रवु,
तुम्हि मस्तच पदार्थ बनवत असता..

IMG-20200304-WA0021.jpg

Lunch

@किल्ली
कचोरीचे नुसते फोटो कसले टाकते, रेसिपी लिहायचं घे की मनावर.

कॉलीफ्लॉवरचीच भाजी आहे ना ती? कसली छान मसालेदार व हवा तेवढाच रस्सा असलेली दिसतेय. चव आपोआप रेंगाळू लागली जीभेवरती.

कॉलीफ्लॉवरचीच भाजी आहे ना ती?-- हो Happy धन्स Happy
वेळ मिळाला की लिहिते रेसिपी किट्टू Proud
सध्या रमाबाई नावाच्या आमच्या बॉस आहेत, त्यांनी बरीच कामं लावलीयेत, उसंत मिळत नाही

Lunch

Pages