खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Zampi... khanaryachi majja.. aple kam double. aadhi ti pane shodhun ana. clean kara. mag tyache box banva... tyapekha idli simple.. pan khanaryacha najret anand disla. ki kelelya kamache samadhan milte.

काळ्या वाटाण्याचं सांबार कसं करतात ते कुणाला माहित आहे का..? ......आमच्याकडे दोन प्रकारे करतात.
१. कांदा न घालता....१ वाटी काळे वाटाणे(रात्रभर भिजवलेले) कुकरमधून शिज्वून घेणे.पाव वाटी ओले आणि पाव वाटी सुके खोबरे,१ लवंग्,दालचिनी,४ मिरी,अर्धा चमचा धणे,,नखभर दगडफूल(नसले तरी चालते,असल्यास स्वाद अधिक चांगला येतो.) चिमटीभर जिरे,बडीशेप्,मालवणी मसाला(नसल्यास ४-५ सुक्या लालमिरच्या),चिंच/ सोलं(कोकमं)
सुके खोबरे भाजून घ्यावे.कढईत चमचाभर तेल घालून प्रथम लवंग, दालचिनी,मिरी घातल्यावर इतर सुके मसाले घालावे.त्यात ओले खोबरे घालावे.हलका तपकिरी रंग आल्यावर गॅस बंद करावा. थंड झाल्यावर हे सर्व, पाणी घालून वाटवे.त्यात चिंच घालावी.मा.मसालाही वाटणात घालावा.मिरच्या घेतल्यास थेंबभर तेलात तळसून घ्याव्या. आता उकडलेल्या वाटाण्यांमधेमीठ हळद घालावी.५ मिनिटांनी वरील वाटण त्यात घालावेनौकळी येऊ द्यावी.वरून मोहरी,कढीलिंबाची फोडणी द्यावी.
२. वरील वाटण तसेच करायचे पण १ छोटासा कांदा उभा चिरून तोही तळसवून घ्यायचा अणि वाटणात वाटायचा.वाटण गंधासार्खे गुळगुळीत झाले पाहिजे.
वाटाण्याचे दबदबीत.का२.नंबरचे वाटण करावे.थोड्या तेलात बारीक चिरलेला कांदा घालून त्यात हे वाटण परतावे.

मग त्यात शिजलेले का.वा.घालून मीठ घालावे.जरा जाडसरच ठेवावे.
कावा आवडत नाहीत.पण इतरांना आवडत असल्याने कावाचे दबदबीत केले जाते.

छान दिसत आहे खोट्ट.

नंदिनी यांनी खोट्ट ची सविस्तर पाककृती दिलीय. मी कधी बनवले नाही व खाल्ले नाहीत
https://www.maayboli.com/node/31195>>>>++१११हेचलिहायला आले होते, फोटो बघूनच कळलं आणि नंदिनीचे खोट्टे आठवले

सोपे सांबारे
काळे वाटाणे कूकर मध्ये शिजवून घ्यावे
तेलात राई जीरे हींग आणि चिरलेला कांदा यांची फोड़णी करून घ्यायची
आता मालवणी मसाला / किवा तत्सम कोणताही मसाला घालून त्यात अजुन थोड़ा गरम मसाला add करावा.
चिरलेले टोमेटो टाकून अगदी तेल सूटेपर्यंत हे परतून घ्यायचे.
आता उकडलेले काळे वाटाणे घालून परत 2 मीन परतून घ्या.
कांदा खोबर्याचे वाटण टाकून पाणी add करा.
मीठ व हवा असल्यास किंचित गुळ घालून भाजी आमटी किवा साम्बार शिजवा.
कोथिम्बीर घाला

नवीन Submitted by अनिश्का. on 2 March, 2020 - 16:08>>>>माझी आई अशीच बनवते (minus tomatoes). तिच्या लहानपणी मालवणातल्या खेड्यात टोमेटो नसत. आंबटपणासाठी कोकम, कैरी (ताजी किंवा सुकवलेल्या फोडी) किंवा चिंच. मुंबई त येऊन ती टोमेटो वापरायला लागली.

एक टीप , काळ्या वाटण्याचं सांबार मिळून येण्यासाठी
शिजलेले थोडे काळे वाटाणे मिक्सर मध्ये घालून जरा सरबरीत वाटून घ्यावेत. इतर वाटाणा बरोबर ते ही थोडे परतावे . मग उरलेले वाटाणे जरुरी प्रमाणे पाणी वैगेरे घालून सांबाराला चांगली उकळी काढावी.

खोट्टे आणि ढोकळा दोन्ही मस्त दिस्तत्यात

खोट्टो इडली! नॉस्टॅल्जिक बाहुली
माटुंगा महेश्वरी सर्कलजवळचं आनंदभवन किंवा इडली हाऊस यासाठी बेस्ट.

खोट्टे मस्तच!
बॅटर सेमच असत का? ईडली आणि खोट्टे दोन्हींच..

MAnchurian balls, त्यासोबत gravy आली होती, ट्रिपल शेजवान rice..
पेल्यामध्ये sprite
सगळं शाकाहारी आहे।

हाहा
माझा प्रश्र्न आणि किल्लीचे उत्तर एकाचवेळी आले.

पोस्ट लेट नसते, खाने के लिए टाईम नही होता.

माझ्या बायकोला मी बकरी म्हणतो. ती प्रत्येक पदार्थात कोथिंबीर टाकते.
समस्त बायका कोथिंबीर प्रिय आणि नवरे कोथिंबीर हेटर्स असतात का?

काढू का काढू धागा: Biggrin

किल्ली दोन्ही मेनू भारीयेत.
बोकलत मटण थाळी "कसलं सुरमाट दिसतय"
श्रवू फोटो भारी. diabetes मध्ये ज्वारी? बाजरी खातात.

Pages