खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG20200307140805.jpg
Homemade tender coconut icecream

फणस मुंबईत मिळाला काय?
——
उपवसाचे ताट बघुन आजी आठवली.
अगदी खास कोकणातलेच १०-१२ पदार्थ बनवायची,
गोड वरीचा भात खास आजोबांसाठी, वरीचा तिखट सांजा, खोबर्‍याची आमटी उकडलेल्या आठळा घालून, गोड रताळ्याचा कीस चुन घालुन, राजगीरा गुळ लाडु, राजगीर्याचे घावणं, आंब्याचे रायतं, फणसाचे-वरीची उकडलेली सांदणं, आठळा भाजलेल्या.
आजी सांगे, १९४०-१९५० काळात विशेष नसतच बटाटे कोकणात तेव्हा आणि शेंगदाणे कमीच खात; मुंबईत ये-जा वाढली तेव्हा मग साबुदाणा, बटाटा वगैरे प्रकार व्हायला लागले...
ह्यातले , ती फक्त २-३ पदार्थ्च खायची, आम्हा मुलांची मजा.

धन्यवाद स्वस्ति, इथे दिलेल्या रेसिपी ने फ्रेश कोकोनट क्रीम वापरून बनवला आहे. No artificial ingredients. ज्यांना आवडत नाही ते पण आवडीने खाणार

फळ विक्रेत्याला सांगितलं कि मला मलई वाला शहाळे दे. दोन घेतले, मी एक, नवऱ्याने एक असे पाणी पिलो आणि मलई काढता यावी म्हणून दोन भाग करून आणले. ते मलई काढूनहि देतात. परंतु आम्ही घरी येऊन काढली. आणि मिक्सर ला थोडं फिरवून घेतला

IMG_20200307_132506_LL.jpg
फोटो त करपल्यासारखे वताताहेतपण करपले नाहीत.

करपलेले असते तरी चालले असते... मासे कसेही केव्हाही..
गरे मस्त होते मोठाले.. आणि ते आप्पेही छान.. माझ्या फार आवडीचे.. बाहेरचे विकत हवे तसे मिळत नाहीत. घरचेच हवेत

किल्ली,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तो केक,गरे,आप्पे सारे अफलातून आहेत.आप्पे,केक रेसिपी येऊ द्या.

अरेरे एक दिवसाने हुकला. तसेही बायका वय कमी सांगतात. ( मला मार खायची इच्छा नाही. नाहीतर आजचा बेत हाच ठरेल)
तुम्हाला १\४ वय सांगायची संधी हुकली.

Pages