खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील फोटोमध्ये फोडणी घातलेली नाही.

साहित्य: कुळीथाचे पीठ 2 वाटी, कणीक अर्धी वाटी, बेसन 2चमचे, हिरवी मिरची 2, लसूण पाकळ्या 15, छोटा कांदा चिरलेला, हिंग तिखट हळद मीठ चवीनुसार, परतण्यासाठी तेल मोहरी.

कृती: सर्व पीठे व साहित्य मळून घेणे. त्याचे चित्राप्रमाणे लांबट उंडे बनवून स्टीमर मधे वाफवणे १५ मिनिटे. थंड झाल्यावर फोडणी देऊन खायला तयार.

माहितीचा अन कृती चा स्त्रोत. : रा रा मातोश्री.

मी कुळथाचं पिठलं सोडून कधी काही केलं नव्हतं. पाफांची रेसिपी सोपी आणि हेल्दी पण आहे .नक्की करून बघेन.रेसिपीबद्दल धन्यवाद.

काय लाळगाळू फोटो आहेत! माझ्याकडचे देशातून आणलेले कुळीथ पीठ नेमके संपले. Sad
पाफा, एकदम सोपी आणि हेल्दी रेसीपी! धन्यवाद.

कुळीद पीठ फेस्टीव्हल कंटिन्यू...
आताचीच ताजी ताजी कुळीद पीठ घालून सिमला मिर्चीची भाजी ...
गरमागरम तांदळाच्या भाकरया आपापल्या घरून घेऊन या आणि बसा माझ्याबरोबर..

हे भाजीत पण घालतात? मला नवीन शोध आहे.
>>>>
सिमला मिर्चीची बेसन पीठ वाली भाजी क्धी खाल्ली नाही का? बेसनाऐवजी कुळीथपीठ घालायचे.
बायको फ्रॉम सातारा बेसनपीठ घालून करते. आई फ्रॉम कणकवली कुळीथ पीठ घालते.

असो, आताच जेवण ऊरक्ले. सर्दी झाली असल्याने सोबत दही घेणे टाळले. पण फ्रीजमध्ये आधीच कापून ठेवलेल्या थंडगार काकडी स्लाईस घ्यायचा मोह आवरला नाही Happy

अवांतर - मागचा खाऊ पोरांचा आहे. एकाचा हात पोहोचू नये व दुसरीच्या सहज नजरेस पडू नये म्हणून असे गॅसच्या बाजूला ओवनच्या मागे अडगळीत ठेवले असते.

होय भोपळी मिर्चीची पीठ पेरुन केलेली भाजी, दह्याबरोबर मस्त लागते. मी सहसा कोरडी करते व किंचीत लागू देते. मस्त खमंग होते.

सिमला मिर्चीची बेसन पीठ वाली भाजी क्धी खाल्ली नाही का? 
>>> ऑल टाईम फेव्हरेट भाजी आहे माझी.

पिठ लावून भाजी करायला घाट आणि कोकण हा फरक नक्कीच असेल.

काळ्या वाटाण्याचं सांबार कसं करतात ते कुणाला माहित आहे का..? माबोवर एखादा धागा आहे का जिथं वाचुन मी ते सांबार करुन बघु शकेन..?? गेल्या महिन्यात राखेचा२ मधे काळ्या वाटाण्याचं सांबार आणि वडे केलेले. ते पाहुन मला ते खावसं वाटलं म्हणुन परवा डी-मार्ट मधुन बायको नको म्हणत असतानाही अर्धा किलो काळे वाटाणे घेतले आहेत. आता ते करण्याची आणि खाऊ घालण्याची जबाबदारी माझ्यावर आली... काही मदत मिळाली तर बरं Uhoh

काळ्या वटाण्याचे सांबार कसे करतात माहित नाही पण त्याची ऊसळ अन कढण अत्यंत प्रिय. अगदी तोंपासु.
श्रावणात जेव्हा मटण नाही खाऊ शकत तेव्हा हे काळे वटाणे अन अख्खा मसुर खाल्ले कि जरा तरी बरे वाटते Proud

तेच ते.. सांबर म्हणजेच कढण असावं.. राखेचा२ मधे तसं म्हणत असतिल. पण सांगा ना तुम्ही त्या कढण आणि उसळीची कृती नाहितर त्या काळ्या वाटाण्यावरुन मला जन्मभर ऐकुन घ्यावे लागेल Uhoh

Pages