खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गरे, आईसक्रिम बघून उन्हाळ्याची सुट्टीच आठवली.
आप्पे मस्त जाळीदार हलके झालेत. योग्य जागी पाकृ लिहा प्लीज!

माझं अतिशय आवडते फळ आहे कलिंगड. छान चौकोनी फोडी केल्या आहेत पण बिया का नाही काढल्या. मी तर कापतानाच बरंच खाऊन टाकते विशेतः अर्धं कापल्यावर जो टेंगुळ आल्यासारखा लाल जाळीदार भाग राहतो तो :स्लर्प:

IMG-20200309-WA0019.jpg

आजचा बेत: पोळी, दोडक्याची भाजी, वरण, कटाची आमटी, ती छोटीशी पुरणपोळी, भात आणि पालक भजी , एवढुसं पुरण
(भजी फोटोत नाहीयेत)

Wow.. yummy.. slurp..
I love bhel more than anything in this world

Killitai Sukrunde mazi aai karayachi.... Puranpoliche puran ghenun te Maida or Besan chya batter madhe dip karun talayche.......

ह्या श्रवुबैंना, तात्काळ प्रभावाने ह्या बाफावर यायला बंदी घालण्यात यावी ही लंब्र इनंती हाय !!!!!!! (थोडा वेळ व्हाट्सप, टिक्टॉक, इंस्टाग्राम वगैरेंना पण द्या काय ते उगाच खायचे पदार्थ दाखवुन इतरांना अस दुपारी छळायच ते पण हॉटेल बंद असताना...छ्या.....

आणी हो यांच्यामुळे बाकीचे शर्यत लावल्याप्रमाणे नवनवीन पदार्थ बनवुन फोटो टाकत आहेत..... सरळ सरळ बिघडतेय जनता.

Pages