चंद्रयोग
ज्योतिषशास्त्रात लग्नाला तनुस्थान असे म्हणतात या स्थानी उपस्थित अथवा दृष्टी टाकणारे ग्रह त्यांच्या गुणधर्मानुसार लग्नावर प्रभाव टाकतात.
मन आणि शरीर कारक चंद्र याला सुद्धा लग्नाचा दर्जा प्राप्त असल्यामुळे चंद्रसोबत इतर ग्रहांचे योग व्यक्तीचे जातकाचे शारीरिक मानसिक स्वरूप ठरवतात.
चंद्राचे इतर ग्रहां सोबतचे अनेक योग होतात त्यांपैकी दोन योग हे महत्वाचे मानले जातात
युती योग आणि प्रतियुती योग , या दोन योगांची जवळपास सारखी फळे मिळतात.
चंद्रयोगाची फळे अभ्यासताना लग्न स्थानी होणारे ग्रहयोग ही पहावे लागतात. लग्न स्थान आणि चंद्र यांसोबत असणाऱ्या ग्रहांची एकत्रित फळे अभ्यासावी लागतात. तसेच ही युती कोणत्या राशीत व कोणत्या स्थानी होते हे पण पहावे लागते.
चंद्र गुरु युती योग- मनाला सकारात्मकता आणि शरीराला मजबुती देणारा हा योग आहे, हा योग असणाऱ्या व्यक्तीं नेहमी प्रसन्न असतात, संवाद कौशल्य उत्तम असते. गुरु या योगात चंद्रा सोबत असल्याने चांगलं वाईट ठरवण्याची उत्तम योग्यता देतो , समजदार वृत्ती असते, आलेल्या अडचणीवर सहज मार्ग काढतात, अध्ययन करण्याची आवड असल्याने विविध क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करतात. या व्यक्ती समाजात उत्तम प्रतिष्ठा राखून असतात.
धनु, मीन आणि कर्क राशीत हा योग खासकरून उत्तम फळे देतो ,मजबूत व उंच शरीरयष्टी असते उठावदार व्यक्तिमत्व असते. वृषभ आणि तुळ राशीत ही युती असता शरीरात चरबी चे प्रमाण जास्त असते, लठ्ठपणा येतो गुरूची प्रभावी फळे या राशींमध्ये मिळत नाहीत. मिथुन राशीत बुद्धाच्या चंचल वृत्तीमुळे या योगाची अतिशय प्रतिकूल फळे मिळतात .
चंद्र मंगळ योग- आक्रमक मंगळ चांद्रसोबत या योगात असल्याने या व्यक्ती कठोर मनाच्या, हट्टी असतात , मनोधैर्य उत्तम असते . आवाज मोठा व बोलणे आक्रमक असते ,सतत कार्यक्षम व स्थिर न बसण्याच्या वृत्तीमळे यांना कधी धनाची कमी भासत नाही. सतत धुमसत राहणे व प्रत्येक कृती तीव्र प्रतिक्रिया देऊन करणे यामुळे या व्यक्तींना अपघात , शरीराला जखमा इजा होणे या गोष्टींना नेहमी सामोरे जावे लागते, 1,2,7,8 या स्थानी ही युती असल्यास लहानसहान अपघात नित्याचे असतात. गुरु , शुक्र असे शुभ ग्रह या योगात असल्यास रागावर नियंत्रण असते.
मेष , सिंह, वृश्चिक, मकर राशीत या योगाची अतिशय प्रभावी फळे मिळतात मिथुन आणि कन्या राशीत हा योग असणाऱ्या व्यक्ती टवाळखोर मस्करी करणारे आढळतात.
चंद्र शनि युती- पीडाकारक आणि संथ शनि या योगात चंद्रासोबत असल्याने मनावर नकारात्मकता हावी असते , हा योग असणाऱ्या बहुतेक व्यक्ती या वर्णाने काळ्या सावळ्या असतात, आळशी वृत्ती असते, विचारात संथपणा असतो असं असल तरी हा योग काही चांगली फळे ही देतो , या व्यक्ती जास्त भावनिक नसतात त्यामुळं हा योग एकप्रकारचा कोडगेपणा देतो, समोर काही घडलं की काहीही प्रतिक्रिया न देणे, लगेच व्यक्त न होणे यामुळं या व्यक्ती अहंकारी वाटू शकतात, हा योग व्यक्तीला अंतर्मुख बनवतो तसेच उदास वृत्तीमळे पारमार्थिक ज्ञान प्राप्त होते तसेच ध्यानधारणा , गुप्तविद्या अशा गूढ विषयांमध्ये रुची निर्माण होते.
चंद्र सूर्य युती- सूर्य ग्रह या योगात चंद्रसोबत असल्याने उग्र मुद्रा असते, तेजस्वी चेहरा असतो हा योग असलेल्या व्यक्ती करारी असतात बोलणे अधिकारवाणीचे असते , धारदार भारदस्त आवाज असतो या व्यक्तींकडे मनाची स्थिरता अधिक असल्यामुळे विषयभोगाकडे ओढा कमी असतो, अभिमानी वृत्तीमुळे इतरांशी लगेच जमवून घेणे यांना जमत नाही या व्यक्तीना चंचल स्वभाव , विनाकारण बडबड करणे असल्या स्वभावाची चीड असते. मेष , सिंह, वृश्चिक , धनु राशीत ही युती असल्यास दमदार व्यक्तिमत्व देतो.
चंद्र शुक्र युती- सौंदर्यकारक शुक्र ग्रह या योगात चांद्रासोबत असल्याने व्यक्ती आकर्षक स्वभावाच्या असतात , ह्या व्यक्ती सतत हसतमुख उत्साही असतात ,हा योग असणाऱ्या व्यक्ती गौर्वरणीय आणि सुंदर असतात , चेहरा रेखीव व मोहक असतो, आवाज काहीसा कोमल असतो, जीवनातील सगळी सुख भोगण्याकडे कल असतो , या व्यक्तींचे सौंदर्य शंभर जणांमधून उठून दिसणारे असते , वृषभ , तुळ , कर्क या राशीत ही युती असता व्यक्ती अतिशय गौर्वरणीय आणि सुंदर असते , स्त्रियांना खासकरून हा योग उत्तम लाभतो.
चंद्र बुध युती - बुध ग्रह या योगात चंद्रा सोबत असल्याने या व्यक्तीचे बोलणे चतुरस्र असते ,चौकस वृत्ती असते, बोलण्यात हजरजबाबी पणा असतो, हा योग असणाऱ्या व्यक्तीची निरीक्षण शक्ती उत्तम असते त्यामुळं दुसऱ्यांच्या सवयी , बोलण्याच्या लकबी लक्षात ठेऊन त्यांच्या नकला करण यांची आवड असते , बऱ्याच कॉमेडियन व्यक्तीच्या कुंडलीत हा योग आढळतो. मिथुन आणि कन्या राशीत या योगाची प्रभावी फळे मिळतात.
चंद्र राहू युती- पापी आणि दुःख पिडाकरक राहू या योगात चंद्रा सोबत असल्याने मन आणि शरीरावर अतिशय प्रतिकूल परिणाम करतो हा योग असणाऱ्या व्यक्तीचे शरीर अक्रसल्यासारखे असते, मनाचे सत्व नष्ट झाल्यामुळे दीनवाणी मुद्रा असते , मानसिक विकार असतात , आवाज ओढून काढल्यासारखा बारीक असतो. पक्षाघात यासारखे आजार होऊ शकतात.
चंद्र केतू युती - कर्कश अनियंत्रित केतू या युतीत चंद्रा सोबत असल्याने हा व्यक्ती एक प्रकारच्या भ्रमात कृती करत असतात , बुद्धीला एक प्रकारची बधिरता येते , हा योग मनाची जाणीव दक्षता नष्ट करत असल्यामुळं मानसिक व शाीरिक व्याधी नित्याच्या असतात काही व्यक्तींच्या बाबतीत फिट येणे यासारखे प्रकार घडतात.
भयानकच योग आहेत काही.
भयानकच योग आहेत काही.
माझ्या लग्नघरात शनी, चंद्र,
माझ्या लग्नघरात शनी, चंद्र, मंगळ, राहू , शुक्र अशी युती आहे आणि तुमचे एकबी फळ माझ्याशी जुळत नाही. तुम्ही या युतीच फळ सांगणार का ?
( वर तुम्ही लिहिलेली फळे पुस्तकी नसून तुम्ही स्वतः अनुभवलेली आहेत हे गृहीत धरून )
म्हणून मी वर म्हटल की लग्न
म्हणून मी वर म्हटल की लग्न आणि चंद्र यांसोबत असणाऱ्या ग्रहां चा एकत्रित परिणाम विचारात घ्यावा लागतो
तुमची जन्मतारीख समजू शकते का
तुमची जन्मतारीख समजू शकते का कधी हा योग झाला हे मला बघायच आहे की तुम्ही नुसत्याच पुड्या सोडताय
अरे, इतका छान चन्द्राच्या
अरे, इतका छान चन्द्राच्या युतीचा फलादेश सांगता तुम्ही अनुभवाचा(पुस्तकाचा नाही) मग जन्मवेळेची काय गरज असणार तुम्हाला? तरी तुमच्या इच्छेचा मान ठेऊन पत्रिका डकवतो.
असेही आपल्या सारख्या
असेही आपल्या सारख्या दैवज्ञाला नुसत्या पत्रिकेवरून हि वेळ शोधता येईलच पंचांग पाहून
1.तुमचा स्वभाव आक्रमक आहे
1.तुमचा स्वभाव आक्रमक आहे
2. तुम्हाला एक बहिण आहे
3. तुमचे लहानपणाासूनच बरेच प्रेम आणि 'संबंध' राहिली आहेत
मग कशी वाटली फळ :))
तुमचे लहानपणाासूनच बरेच प्रेम
तुमचे लहानपणाासूनच बरेच प्रेम आणि 'संबंध' राहिली आहेत>>>>>> लग्नातल्या शुक्र्+ मंगळ+ राहु युतीवरुन म्हणताय काय? प्रत्येक वेळेस असे नसतेच की शुक्र मंगळ एकत्र असतील तर प्रकरणे होतातच. काही वेळेस तो वन वे ट्रॅफिक अस्सु शकतो. पण यात राहु घुसल्यामुळे सांगता येत नाही. कारण राहु परधर्मीय वा परजातीय आकर्षण दाखवतो. किंवा पुढे जाऊन तसा प्रेम विवाह होऊ शकतो.अंदाज बर का.
फार भावुक न होणारे, सावध
फार भावुक न होणारे, सावध राहणार.
पत्रिकाच समोर असताना ,ढोबळ
पत्रिकाच समोर असताना ,ढोबळ आणि त्रोटक प्रेडिक्शन न देता जो कोणी अगदी ३-४ युनिक घटना कोणत्या काळात घडल्या हे मेल करून मला कळवेल त्याला मी विवाह आणि मृत्युची वेळ शोधण्याची पद्धत पाठवून देईल रिप्लाय म्हणून त्या बरोबर असतील तर.
रश्मी जी दशा बघून सांगितले
रश्मी जी दशा बघून सांगितले
जिद्द जी माझे प्रेडिक्शन
जिद्द जी माझे प्रेडिक्शन बरोबर आहे की नाही ते सांगा, आणि मृत्यची वेळ तुम्ही कशी सांगणार तुमचा अभ्यास आहे का ज्योतिष शास्त्राचा
मृत्युची वेळ (वय) सांगणारे
मृत्युची वेळ (वय) सांगणारे काही ज्योतिषी असतात.
स्वभाव विशेष यापेक्षा संपत्ती
स्वभाव विशेष यापेक्षा संपत्ती जाणू इच्छिणारे अधिक असतील.
Srd सहमत आहे मीही मृत्यू वेळ
Srd सहमत आहे मीही मृत्यू वेळ या विषयावर काही पद्धती ठरवल्या आहेत पण जिद्द यांना या शास्त्राला नाव ठेवताना नेहमी पाहिले आहे म्हणून म्हटले
पण जिद्द यांना या शास्त्राला
पण जिद्द यांना या शास्त्राला नाव ठेवताना नेहमी पाहिले आहे म्हणून म्हटले>>>> माझ्या कमेंट्स व्यवस्थित वाचल्या तर मी शास्त्राला नाव ठेवतो कि दुसरं काय आणि का सुचवतो हे ध्यानात येईल
ज्या दिवशी कोणी खऱ्या ज्योतिषात घुसून एखाद्या टॉपिकवर चर्चा सुरु सुरु करेल त्या दिवशी माझा प्रतिसाद वेगळा असेल. इथं मला पत्रिका वगैरे देण्याचं कारण नव्हतं पण आपणाला असा योग् असेल हेच नव्हतं पटत म्हणून द्यावी लागली. बाकी कोणी मला अपेक्षित अचूक प्रेडिक्शन देऊ शकला तर त्याला मी वर नमूद केल्याप्रमाणे काही आडकाठी न बाळगता पद्धतशीर अनेक उदाहरणांसह समजावून देईल. मी pdf बनवून फोल्डर तयार ठेवलाय
मग तुम्हीं मायबोली वर एखादा
मग तुम्हीं मायबोली वर एखादा लेख लिहुन समजौन द्या की , बर ते जाऊ दे मी तुम्हाला एक कुंडली देतो तुम्हीं फक्त इतकच संगायच की जातका बरोबर कोणती दुर्घटना घडली व कधी घड़ली
मृत्युची वेळ (वय) सांगणारे
मृत्युची वेळ (वय) सांगणारे काही ज्योतिषी असतात. >>>>> असे असेल तर माझा भाऊ सोमवारी सूसाइड नोट लिहून घरातून निघून गेला आहे. त्याच्याबद्दल कोणी काही सांगू शकेल का?
राहू-चंद्र युती आहे २ र्या
राहू-चंद्र युती आहे २ र्या घरात व आठव्या घरात बरोब्बर अपोझिट केतु शुक्र युती.
काय फलादेश असेल?
व्यक्ति सुंदर गौरवर्णीय असेल,
व्यक्ति सुंदर गौरवर्णीय असेल, नाजुक आवाज
तुम्ही परत इगोला लावून घेताय.
तुम्ही परत इगोला लावून घेताय. तुमच्या मागच्या धाग्यावर तुम्ही मेदनीय ज्योतिषावर काहीतरी लिहलं होत तेव्हा मी तुम्हाला सायन-निरायण काय वापरता हे विचारलं होतं (ही गंभीरच कमेंट होती) त्याला मात्र तुम्ही उत्तर दिल नाही आणि वरती पंचयुतीच फळ विचारलं तर मात्र राग आला. बाकी अनोळखी चार्ट वरती ब्लाइंड प्रेडिक्शन द्यायला मी ज्योतिषी नाही आणि एवढे करुस्तोवर मी अनिस वाल्यांचे आव्हान नाही का स्वीकारणार ?
on a serious note - इथं प्रत्येकाला तोंड देण्यापेक्षा " प्रवीर पद्धती" गुगलून पहा . जे काय सापडलं ते वाचा . ती निम्मीच आहे नेटवर कारण त्या गृहस्तांनी ( वर स्वतःच नावही दिलं या पद्दतीला ) ती ज्या पुस्तकातून ती उचलली त्या पुस्तकाचा पूर्णभाग त्यांनी अभ्यासला नाही बहुतेक. ते पुस्तक आजही पुणे नगर वाचन मंदिर मध्ये आहे.
तुम्हीं ज्योतिषी नाहित तर वर
तुम्हीं ज्योतिषी नाहित तर वर मघाशी मृत्यचे अचूक भाकित कसे करू शकता कमाल आहे तुमची की तिही पुडी सोडलित .
तुम्ही चिडू नका आणि ती प्रवीर
ज्योतिषी अभ्यासक आणि ज्योतिषी फरक असतो . तुम्ही चिडू नका आणि ती प्रवीर पद्धती समजून घ्या . मी इथंच आहे
तुम्ही माझ्या प्रश्नांची
तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तर देत नाहीत टाळत आहात ठीक आहेबाकी प्रविर प्रकरण काय आहे हे बघायला मला आवडेल हा
हे बघा तुम्ही अचूक इव्हेंट
हे बघा तुम्ही अचूक इव्हेंट सांगाल तर मी काही बोलेल ना. बहीणच बरोबर आहे पण आक्रमक स्वभाव - लफडी वगैरे जनरल झालं हे . ती सर्वाचेच असतात आताच्या काळात . वर तुम्हला एवढी मोठी हिंट दिली तरी तुमच तेच. लागेल तेवढा वेळ घेऊन त्याचा अभ्यास करा आणि मग आपण बोलूच कि
लफडी जनरल नाही हजार जणाच्या
लफडी जनरल नाही हजार जणाच्या कुंडलीत हा मंगल शुक्र राहू असे योग असतात म्हणून त्यांची लफडी नसतात त्याला वेगळे सूत्र वापरले आहे आणि तुम्ही माझे चॅलेंज कधी स्विकारणार आहात
तुम्ही अचूक वेळ स्थान सांगत
तुम्ही अचूक वेळ स्थान सांगत नाही त्याला मी काय करणार नवमाश कुंडली भावचलीत काही आहे की नाही
प्राविर प्रकरण मला शोधूनही
प्राविर प्रकरण मला शोधूनही कोठे सापडलं नाही नेटवर आता तुमीच सांगा काय प्रकरण आहे ते
y2j माझ्या मुलीच्या कुंडलीतील
y2j माझ्या मुलीच्या कुंडलीतील ग्हंस्थान/योग सांगीतला मी. ती गौर्वर्णिय व सुंदर नाही. आवाजही नाजूक नाही.
भयंकर कमांडींग आणि मनस्वी आहे. मॅनिप्युलेट (चांगल्या तर्हेने करते), आम्ही तिला मीन म्हणतो लाडाने. कुठुन मीन (इंग्रजी) गुणसूत्रे आलीयेत देव जाणे असे विनोद करतो.
ती भयंकर पॉवरप्ले माहीत असणारी आहे. थोडक्यात टफ!!
______________________________
माझ्या २ र्या घरात कर्क चंद्र आहे. माझा आवाज नाजूक आहे.
मी का स्वीकारू चॅलेंज ? मी
मी का स्वीकारू चॅलेंज ? मी काय म्हटलं मला २-४ घडलेल्या घटना आणि त्याची वेळ सांगेल त्याला मी वर नमूद घटना कशा काढायच्या ते सांगेल. याची साधी गणिती आकडेमोड आहे ज्यातून दोन-तीन तारखा मिळतात ज्या आपण तात्कालिक वेळेनुसार बाकीच्या बाद करून एक उरलेली ठेवायची जी बहुदा अचूक असते जन्मवेळ अचूक असेल तर. हे सर्व त्या प्रवीरवल्यामुळे नेटवर अभ्यासकांत चर्चा होऊन डिटेल उपलब्ध आहे. जे उपलब्ध नाही ते मी देईलच. मी अस म्हटलंय का कुठे मला चार्ट द्या आणि मग मी पटापट सांगतो सगळं. तुम्ही स्वतः थोडा वेळ देऊन अभ्यास केला तर तुम्हालाच ते काढता नाही येणार का? विनाकारण तुमचं मनाला लावून घेऊन मी का तासंतास आकडेमोड करू ? या गोष्टी एवढ्या फुलप्रूफ असत्या तर आता पर्यंत अनिसच आव्हान घेतलंच असत कि एखाद्याने. दहा चार्ट मागे २-३ फेल होणारच या ना त्या कारणाने. तुम्ही आता थोडाफार ते वाचून याल हि अपेक्षा
Pages