चंद्रयोग
ज्योतिषशास्त्रात लग्नाला तनुस्थान असे म्हणतात या स्थानी उपस्थित अथवा दृष्टी टाकणारे ग्रह त्यांच्या गुणधर्मानुसार लग्नावर प्रभाव टाकतात.
मन आणि शरीर कारक चंद्र याला सुद्धा लग्नाचा दर्जा प्राप्त असल्यामुळे चंद्रसोबत इतर ग्रहांचे योग व्यक्तीचे जातकाचे शारीरिक मानसिक स्वरूप ठरवतात.
चंद्राचे इतर ग्रहां सोबतचे अनेक योग होतात त्यांपैकी दोन योग हे महत्वाचे मानले जातात
युती योग आणि प्रतियुती योग , या दोन योगांची जवळपास सारखी फळे मिळतात.
चंद्रयोगाची फळे अभ्यासताना लग्न स्थानी होणारे ग्रहयोग ही पहावे लागतात. लग्न स्थान आणि चंद्र यांसोबत असणाऱ्या ग्रहांची एकत्रित फळे अभ्यासावी लागतात. तसेच ही युती कोणत्या राशीत व कोणत्या स्थानी होते हे पण पहावे लागते.
चंद्र गुरु युती योग- मनाला सकारात्मकता आणि शरीराला मजबुती देणारा हा योग आहे, हा योग असणाऱ्या व्यक्तीं नेहमी प्रसन्न असतात, संवाद कौशल्य उत्तम असते. गुरु या योगात चंद्रा सोबत असल्याने चांगलं वाईट ठरवण्याची उत्तम योग्यता देतो , समजदार वृत्ती असते, आलेल्या अडचणीवर सहज मार्ग काढतात, अध्ययन करण्याची आवड असल्याने विविध क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करतात. या व्यक्ती समाजात उत्तम प्रतिष्ठा राखून असतात.
धनु, मीन आणि कर्क राशीत हा योग खासकरून उत्तम फळे देतो ,मजबूत व उंच शरीरयष्टी असते उठावदार व्यक्तिमत्व असते. वृषभ आणि तुळ राशीत ही युती असता शरीरात चरबी चे प्रमाण जास्त असते, लठ्ठपणा येतो गुरूची प्रभावी फळे या राशींमध्ये मिळत नाहीत. मिथुन राशीत बुद्धाच्या चंचल वृत्तीमुळे या योगाची अतिशय प्रतिकूल फळे मिळतात .
चंद्र मंगळ योग- आक्रमक मंगळ चांद्रसोबत या योगात असल्याने या व्यक्ती कठोर मनाच्या, हट्टी असतात , मनोधैर्य उत्तम असते . आवाज मोठा व बोलणे आक्रमक असते ,सतत कार्यक्षम व स्थिर न बसण्याच्या वृत्तीमळे यांना कधी धनाची कमी भासत नाही. सतत धुमसत राहणे व प्रत्येक कृती तीव्र प्रतिक्रिया देऊन करणे यामुळे या व्यक्तींना अपघात , शरीराला जखमा इजा होणे या गोष्टींना नेहमी सामोरे जावे लागते, 1,2,7,8 या स्थानी ही युती असल्यास लहानसहान अपघात नित्याचे असतात. गुरु , शुक्र असे शुभ ग्रह या योगात असल्यास रागावर नियंत्रण असते.
मेष , सिंह, वृश्चिक, मकर राशीत या योगाची अतिशय प्रभावी फळे मिळतात मिथुन आणि कन्या राशीत हा योग असणाऱ्या व्यक्ती टवाळखोर मस्करी करणारे आढळतात.
चंद्र शनि युती- पीडाकारक आणि संथ शनि या योगात चंद्रासोबत असल्याने मनावर नकारात्मकता हावी असते , हा योग असणाऱ्या बहुतेक व्यक्ती या वर्णाने काळ्या सावळ्या असतात, आळशी वृत्ती असते, विचारात संथपणा असतो असं असल तरी हा योग काही चांगली फळे ही देतो , या व्यक्ती जास्त भावनिक नसतात त्यामुळं हा योग एकप्रकारचा कोडगेपणा देतो, समोर काही घडलं की काहीही प्रतिक्रिया न देणे, लगेच व्यक्त न होणे यामुळं या व्यक्ती अहंकारी वाटू शकतात, हा योग व्यक्तीला अंतर्मुख बनवतो तसेच उदास वृत्तीमळे पारमार्थिक ज्ञान प्राप्त होते तसेच ध्यानधारणा , गुप्तविद्या अशा गूढ विषयांमध्ये रुची निर्माण होते.
चंद्र सूर्य युती- सूर्य ग्रह या योगात चंद्रसोबत असल्याने उग्र मुद्रा असते, तेजस्वी चेहरा असतो हा योग असलेल्या व्यक्ती करारी असतात बोलणे अधिकारवाणीचे असते , धारदार भारदस्त आवाज असतो या व्यक्तींकडे मनाची स्थिरता अधिक असल्यामुळे विषयभोगाकडे ओढा कमी असतो, अभिमानी वृत्तीमुळे इतरांशी लगेच जमवून घेणे यांना जमत नाही या व्यक्तीना चंचल स्वभाव , विनाकारण बडबड करणे असल्या स्वभावाची चीड असते. मेष , सिंह, वृश्चिक , धनु राशीत ही युती असल्यास दमदार व्यक्तिमत्व देतो.
चंद्र शुक्र युती- सौंदर्यकारक शुक्र ग्रह या योगात चांद्रासोबत असल्याने व्यक्ती आकर्षक स्वभावाच्या असतात , ह्या व्यक्ती सतत हसतमुख उत्साही असतात ,हा योग असणाऱ्या व्यक्ती गौर्वरणीय आणि सुंदर असतात , चेहरा रेखीव व मोहक असतो, आवाज काहीसा कोमल असतो, जीवनातील सगळी सुख भोगण्याकडे कल असतो , या व्यक्तींचे सौंदर्य शंभर जणांमधून उठून दिसणारे असते , वृषभ , तुळ , कर्क या राशीत ही युती असता व्यक्ती अतिशय गौर्वरणीय आणि सुंदर असते , स्त्रियांना खासकरून हा योग उत्तम लाभतो.
चंद्र बुध युती - बुध ग्रह या योगात चंद्रा सोबत असल्याने या व्यक्तीचे बोलणे चतुरस्र असते ,चौकस वृत्ती असते, बोलण्यात हजरजबाबी पणा असतो, हा योग असणाऱ्या व्यक्तीची निरीक्षण शक्ती उत्तम असते त्यामुळं दुसऱ्यांच्या सवयी , बोलण्याच्या लकबी लक्षात ठेऊन त्यांच्या नकला करण यांची आवड असते , बऱ्याच कॉमेडियन व्यक्तीच्या कुंडलीत हा योग आढळतो. मिथुन आणि कन्या राशीत या योगाची प्रभावी फळे मिळतात.
चंद्र राहू युती- पापी आणि दुःख पिडाकरक राहू या योगात चंद्रा सोबत असल्याने मन आणि शरीरावर अतिशय प्रतिकूल परिणाम करतो हा योग असणाऱ्या व्यक्तीचे शरीर अक्रसल्यासारखे असते, मनाचे सत्व नष्ट झाल्यामुळे दीनवाणी मुद्रा असते , मानसिक विकार असतात , आवाज ओढून काढल्यासारखा बारीक असतो. पक्षाघात यासारखे आजार होऊ शकतात.
चंद्र केतू युती - कर्कश अनियंत्रित केतू या युतीत चंद्रा सोबत असल्याने हा व्यक्ती एक प्रकारच्या भ्रमात कृती करत असतात , बुद्धीला एक प्रकारची बधिरता येते , हा योग मनाची जाणीव दक्षता नष्ट करत असल्यामुळं मानसिक व शाीरिक व्याधी नित्याच्या असतात काही व्यक्तींच्या बाबतीत फिट येणे यासारखे प्रकार घडतात.
@ निल्सन
@ निल्सन
मी धोंडोपंत आपट्यांना कंसल्ट केलं होतं. तेव्हा ते विदाउट रेफरन्स पण कंसल्टेशन द्यायचे.
मी माझ्या आजारपण बद्दल विचारले होते
पण त्यांनी सांगितलेले खरं झालं नाही.
त्यांनी सांगितलं होतं 2017 मध्ये सगळं बर होईल पण माझा मूळ आजार कमी व्हायला 2018 ऑक्टोबर उजाडला.
अजूनही मी पूर्णपणे बरी आहे असं म्हणू शकतं नाही 60% आजार बरा झाला आहे.
असो
या पत्रिकेबाबत काय निरीक्षण
या पत्रिकेबाबत काय निरीक्षण आहे?
निल्सन सुहास गोखले हे देखील
निल्सन सुहास गोखले हे देखील धोंडोपत यांच्या तोडीचे ज्योतिषी आहेत, त्यांच्याशी सहज संपर्क साधू शकता
ठोकला कुंडली वरुन काही सांगता
ठोकला कुंडली वरुन काही सांगता येणार नाही, अंदाजे कुंडली वरुन दशेत नक्षत्रात बराच फरक पडतो सगळ गणित बिघडत त्यामुळं अचूक जनमवेळ तारीख असेल तरच पोस्ट करा
निल्सन सुहास गोखले हे देखील
निल्सन सुहास गोखले हे देखील धोंडोपत यांच्या तोडीचे ज्योतिषी आहेत, त्यांच्याशी सहज संपर्क साधू शकता >>>>> त्यांचा पत्ता आणि फोन नंबर देऊ शकाल का?
http://blog.suhasjyotish.com/
http://blog.suhasjyotish.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%...
त्यांच्या या वेबाईटवर जाऊन
त्यांच्या या वेबाईटवर जाऊन तुम्हाला नाव आणि नंबर मेल चा फॉर्म भरावा लागतो त्यानंतर ते तुम्हाला स्वतः हून संपर्क साधतात
Submitted by swwapnil ,
Submitted by swwapnil ,
ठोकळा कुंडलीवरून. २१ किंवा ४८ वय.
हेकट/लहरी स्वभाव. पार्टनरशी पटेल का सांगता येत नाही. एका कोणत्या दैवतावर ठाम श्रद्धा ठेवून. जिथे बारीक किचकट चिकाटी लागते ते काम करेल. किंवा रेवन्यु,, मोजमाप खातं. मिळून मिसळून वागणार.
Srd मला तरी हा मिळून मिसळून
Srd मला तरी हा मिळून मिसळून वागणारा वाटत नाही, अनेक लोकांब रबर शत्रुत्व राखणारा वाटतो या व्यक्तीचे बरेच म्याटर असावेत
>>>>> युरेनस हा मंगळासारखा
>>>>> युरेनस हा मंगळासारखा ग्रह आहे!
केतू इथे पण राहू धनस्थानात जातो ना!
शुक्र अष्टमात चमकतो. रवि षष्ठात असल्यास सूर्य मावळल्यावर पश्चिमेला शुक्र ठळकपणे चमकतो।
पुन्हा एखादा ग्रह अमुक ठिकाणी वाईट असं कुठे वाचलं की लगेच माझा तिथे नाही ना? हे शोधून काळजी वाढणे सुरू होते.>>>> धन्यवाद शरदजी
हं.
हं.
ठोकळा कुंडलीवरून. २१ किंवा ४८
ठोकळा कुंडलीवरून. २१ किंवा ४८ वय.
हेकट/लहरी स्वभाव. पार्टनरशी पटेल का सांगता येत नाही. एका कोणत्या दैवतावर ठाम श्रद्धा ठेवून. जिथे बारीक किचकट चिकाटी लागते ते काम करेल. किंवा रेवन्यु,, मोजमाप खातं. मिळून मिसळून वागणार
>>>>>>>>>>
प्रतिसादाबद्दल धन्यवाद Srd
हेकट/लहरी स्वभाव ✓(yes I am introvert person)
जिथे बारीक किचकट चिकाटी लागते ते काम करेल. किंवा रेवन्यु ✓(working in software development and share trading)
Srd मला तरी हा मिळून मिसळून
Srd मला तरी हा मिळून मिसळून वागणारा वाटत नाही, अनेक लोकांब रबर शत्रुत्व राखणारा वाटतो या व्यक्तीचे बरेच म्याटर असावेत
>>>>>>>>>>
प्रतिसादाबद्दल धन्यवाद y2j
सुदैवाने म्याटर अजून तरी नाही (कशासंबंधित असू शकतील?)
नाही म्हणताय सुदैव म्हणायचे,
नाही म्हणताय सुदैव म्हणायचे, मला तरी कुंडली बघून शत्रू /विरोधी सोबत वादावादी प्रत्यक्षच म्हणायचं तर मारामारी किंवा कोर्ट कचेरी संबंधित काही योग दिसले म्हणून सांगितले, तसे काही नसल्यास उत्तमच.
चंद्रयोग आणि ज्योतिष धागा आहे
चंद्रयोग आणि ज्योतिष धागा आहे म्हणजे खरंतर सुख आणि स्वभाव आणि लोकप्रियता या तीन गोष्टींचा चंद्रावरून विचार होतो. मन आणि आई हेसुद्धा. तसेच स्त्री नातेवाईक - बहिणी, मावशा , मैत्रीणी वगैरे.
प्रेम विवाह तसेच वाणीवृत्ती(किराणा दुकान) .
@शारदकाका
@शारदकाका
मला सांगा ना.
माझ्या विवाहस्थानात. मीनेचा चंद्र आहे आणि गुरु पाचव्या घरात आहे. मकरेचा.
काय फळ मिळतं?
y2j, शरदजी, मुलीच्या
y2j, शरदजी, मुलीच्या कुंडलीमध्ये राहू-चंद्र (२ र्या घरात, कर्क राशीत) बरोब्बर केतू-शुक्र यांच्या विरोधात आहेत. मुलीच्या भावविश्वात, आईचे (चंद्र) नक्की काय महत्व/उणेपण आहे.
पाश्चिमात्य देशात, कोणतीही
पाश्चिमात्य देशात, कोणतीही महत्वाची घटना घडली की ज्योतिष ग्रुपमध्ये 'फ्रॉम ज्योतिष पॉन्ट ऑफ व्ह्यु' त्याचे पडसाद उमटतात. तसे मला भारतिय ग्रुपमध्ये आढळले नाही. कदाचित तितकेसे वाचन नसेल.
उदा - प्रियांका रेड्डीची केस. गुरू सध्या मकरेत, जस्ट नीचीचा होउ घतलेला आहे (झालेला आहे). गुरु म्हणजे श्रद्धा, (Jupiter is a planet of faith, showing a glimpse into our beliefs
ही लावलेली संगती कितपत बरोबर आहे?
अजुनही अनेक कंगोरे असतील. पण माझे तेवढे ज्ञान नाही.
____________
vulcanus - He became a symbol of revolution, rebellion, independence, shock and new invention. हा लहानसा ग्रहं तूळ (न्यायाची रास) मध्ये आहे. मला हे सापडले नाही की किती दिवस/महीने vulcanus एका राशीतून भ्रमण करतो.
गुरू धनु राशीत (स्वराशीत)
गुरू धनु राशीत (स्वराशीत) आहे ना सध्या????????
https://www.jessicaadams.com
https://www.jessicaadams.com/astrology/current-planetary-positions/
Jupiter 00° Capricorn 52′ 3
नीचीचा होउ घातलाय.
अर्थात एग्झॅक्ट काही एका अंशावर ग्रह नीचीचा असतो. त्यामुळे अजुन एग्झॅक्ट नसेलही.
by me_rucha , गुरु मकरेत आणि
by me_rucha , गुरु मकरेत आणि नीच म्हणून लगेच काही वाईट फले मिळत नसतात. कारण अकरा महिने सर्वांना तोच गुरु असतो.
नोकरीच्या ठिकाणचे मोठे घर आहे का? सासू चांगली आहे.
>>>>>>>गुरु मकरेत आणि नीच
>>>>>>>गुरु मकरेत आणि नीच म्हणून लगेच काही वाईट फले मिळत नसतात. कारण अकरा महिने सर्वांना तोच गुरु असतो.>>>> + १,५००
शिवाय मकर ही शनिची सॉलिड, स्टेबल अतिशय व्यवहारी शहाणी रास आहे. गुरुही ते गुण मॅग्निफाय करत असावा.
पाश्चिमात्य देशात, कोणतीही
पाश्चिमात्य देशात, कोणतीही महत्वाची घटना घडली की ज्योतिष ग्रुपमध्ये 'फ्रॉम ज्योतिष पॉन्ट ऑफ व्ह्यु' त्याचे पडसाद उमटतात.
- b. v. Bangalore यांचे astrology मासीक निघायचे. आता चालू आहे का माहिती नाही. त्यात पास्ट झालेल्या घटनांची चर्चा करायचे नाहीत.
वाईट घटनांतून जेव्हा कुटुंबालाच त्रास होणार असतो तेव्हा ते जोड योग असतात. आईवडलांच्या कुंडलीतही न्यून दाखवत असणार.
----------------------
गुरु म्हणजे श्रद्धा, (Jupiter is a planet of faith, showing a glimpse into our beliefs
हो. सपोर्टिंग प्लानिट. पुट्स इट्स वेट बिहाइन्ड समथिंग. आणि देव देव करणारे.
> आई वडल्याम्च्या कुंडलीतही
> आई वडल्याम्च्या कुंडलीतही न्युन दाखवत असणार<<<
हे पाहिलय. राहु व केतुची पोझीशन पहावी त्याकरता आणि ते स्थान(मातृ व पितृ स्थान) अस पाहिलय.
सध्या परदेशात vulcanus बद्दल
सध्या परदेशात vulcanus बद्दल विचार चालू आहे का?
नाही सहज वाचनात आले.
नाही सहज वाचनात आले. पहील्यांदाच वाचले.
माझी पत्रिका बनवणाऱ्या
माझी पत्रिका बनवणाऱ्या ज्योतिष्यानेही आईवडिलांना माझ्या बाबतीत धोक्याचा इशारा देऊन काय करायला हवे हे सांगितले होते, पण योग्य वेळी तेही विसरले >>>>>>>>>> साधना, माझे हेच म्हणणे आहे.जे नशिबात आहे ते घडायचे चुकत नाही,अशावेळी ज्योतिष कशाला पहायचे? अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.माझ्या घरगुती बाबतीत काही गोष्टी घडून गेल्यावरती काही काळाने पत्रिकेतील इशारे वाचनात आले होते.त्यामुळे तर माझे मत अधिक दृढ झाले.
आदिश्री,
शक्य असेल तर यापुढे कधीही पत्रिका दाखवू नका.यापेक्षा आजचा दिवस चांगला गेला म्हणा आणि तशी वाटचाल करा.सांगायला सोपे असले तरी मीही काही बिकट परिस्थितीतून बरीच वर्षे जात आहे.त्यामुळे हा विचार मला स्वतःला बरा वाटतोय.
@ देवकी, बरोबर आहे. पण आशेचा
@ देवकी, बरोबर आहे. पण आशेचा किरण कुठे दिसतो का पाहिले जाते.
--------------------------
रोजची कुंडली आणि ग्रहस्थितीसाठी
नई दुनिया इपेपर >> उज्जैन पेपर>> आठव्या पानावर जा.
लिंक-
https://naiduniaepaper.jagran.com/mpaper.aspx
देवकी, सहमत. मी माझ्यासाठी
देवकी, सहमत. मी माझ्यासाठी पत्रिका बघणे सोडून दिलेय. पण मनुष्य आशावादी आहे ना, त्यामुळे जवळच्यासाठी बघते.
माझ्या मावशीच्या पहिल्या मुलीला लग्नानंतर खूप त्रास झाला. सासरी सगळे चांगलेच आहे पण नवऱ्याला त्वचेचा आजार होता जो त्यांनी तेव्हा सांगितला नाही. नंतर तो प्रचंड वाढला तेव्हा कळले. त्या भानगडीत दोन्ही घरांची भांडणेही खूप झाली. पण दोन्हीकडे शहाणे लोक असल्याने प्रकरण कोर्टात न जाता मिटले. पण यात मुलीला खूप त्रास झाला, तिचे स्वतःकडे खूप दुर्लक्ष झाले. नवरा बरा झाला तेव्हा ही आजारी पडली, इतकी की कमरेखालील भाग लुळा पडला. आता ती बरी आहे पण अंगात ताकद नाही. नवरा बायको दोघेही सुखाने नांदताहेत, सासरी हिची खूप काळजीही घेतात पण उभारीची 15 वर्षे फुकट गेली, मुलबाळ काही झाले नाही. हे नुकसान भरून येणारे नाही. हा त्रास सुरू होता तेव्हा ज्योतिषाकडे गेले असता तो म्हणाला अमुक कालपर्यंत संसारसुख नाही यांच्या नशिबी. तेव्हा यांना कळले की नुसते 36 गुण जुळून चालत नाही, ते कोणाचेही जुळतात. पत्रिकेत सुखी संसार आहे का बघायला हवे. पुढच्या दोन्ही मुलांची लग्ने हे सगळे जुळवून केली, उशिरा झाली पण दोन्ही मुले सांसारिक सुखात आहेत. ह्यांना चुटपुट लागते, तेव्हाच का नाही अक्कल आली, पण मीही त्यांना हेच समजावते की पर्याय नसतो, जे आहे ते होतेच
साधना अगदी कळीचा मुद्दा आहे
साधना अगदी कळीचा मुद्दा आहे हा. कशाला रिस्क घ्या हा विचार शेवटी केला जातो
Pages