चंद्रयोग
ज्योतिषशास्त्रात लग्नाला तनुस्थान असे म्हणतात या स्थानी उपस्थित अथवा दृष्टी टाकणारे ग्रह त्यांच्या गुणधर्मानुसार लग्नावर प्रभाव टाकतात.
मन आणि शरीर कारक चंद्र याला सुद्धा लग्नाचा दर्जा प्राप्त असल्यामुळे चंद्रसोबत इतर ग्रहांचे योग व्यक्तीचे जातकाचे शारीरिक मानसिक स्वरूप ठरवतात.
चंद्राचे इतर ग्रहां सोबतचे अनेक योग होतात त्यांपैकी दोन योग हे महत्वाचे मानले जातात
युती योग आणि प्रतियुती योग , या दोन योगांची जवळपास सारखी फळे मिळतात.
चंद्रयोगाची फळे अभ्यासताना लग्न स्थानी होणारे ग्रहयोग ही पहावे लागतात. लग्न स्थान आणि चंद्र यांसोबत असणाऱ्या ग्रहांची एकत्रित फळे अभ्यासावी लागतात. तसेच ही युती कोणत्या राशीत व कोणत्या स्थानी होते हे पण पहावे लागते.
चंद्र गुरु युती योग- मनाला सकारात्मकता आणि शरीराला मजबुती देणारा हा योग आहे, हा योग असणाऱ्या व्यक्तीं नेहमी प्रसन्न असतात, संवाद कौशल्य उत्तम असते. गुरु या योगात चंद्रा सोबत असल्याने चांगलं वाईट ठरवण्याची उत्तम योग्यता देतो , समजदार वृत्ती असते, आलेल्या अडचणीवर सहज मार्ग काढतात, अध्ययन करण्याची आवड असल्याने विविध क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करतात. या व्यक्ती समाजात उत्तम प्रतिष्ठा राखून असतात.
धनु, मीन आणि कर्क राशीत हा योग खासकरून उत्तम फळे देतो ,मजबूत व उंच शरीरयष्टी असते उठावदार व्यक्तिमत्व असते. वृषभ आणि तुळ राशीत ही युती असता शरीरात चरबी चे प्रमाण जास्त असते, लठ्ठपणा येतो गुरूची प्रभावी फळे या राशींमध्ये मिळत नाहीत. मिथुन राशीत बुद्धाच्या चंचल वृत्तीमुळे या योगाची अतिशय प्रतिकूल फळे मिळतात .
चंद्र मंगळ योग- आक्रमक मंगळ चांद्रसोबत या योगात असल्याने या व्यक्ती कठोर मनाच्या, हट्टी असतात , मनोधैर्य उत्तम असते . आवाज मोठा व बोलणे आक्रमक असते ,सतत कार्यक्षम व स्थिर न बसण्याच्या वृत्तीमळे यांना कधी धनाची कमी भासत नाही. सतत धुमसत राहणे व प्रत्येक कृती तीव्र प्रतिक्रिया देऊन करणे यामुळे या व्यक्तींना अपघात , शरीराला जखमा इजा होणे या गोष्टींना नेहमी सामोरे जावे लागते, 1,2,7,8 या स्थानी ही युती असल्यास लहानसहान अपघात नित्याचे असतात. गुरु , शुक्र असे शुभ ग्रह या योगात असल्यास रागावर नियंत्रण असते.
मेष , सिंह, वृश्चिक, मकर राशीत या योगाची अतिशय प्रभावी फळे मिळतात मिथुन आणि कन्या राशीत हा योग असणाऱ्या व्यक्ती टवाळखोर मस्करी करणारे आढळतात.
चंद्र शनि युती- पीडाकारक आणि संथ शनि या योगात चंद्रासोबत असल्याने मनावर नकारात्मकता हावी असते , हा योग असणाऱ्या बहुतेक व्यक्ती या वर्णाने काळ्या सावळ्या असतात, आळशी वृत्ती असते, विचारात संथपणा असतो असं असल तरी हा योग काही चांगली फळे ही देतो , या व्यक्ती जास्त भावनिक नसतात त्यामुळं हा योग एकप्रकारचा कोडगेपणा देतो, समोर काही घडलं की काहीही प्रतिक्रिया न देणे, लगेच व्यक्त न होणे यामुळं या व्यक्ती अहंकारी वाटू शकतात, हा योग व्यक्तीला अंतर्मुख बनवतो तसेच उदास वृत्तीमळे पारमार्थिक ज्ञान प्राप्त होते तसेच ध्यानधारणा , गुप्तविद्या अशा गूढ विषयांमध्ये रुची निर्माण होते.
चंद्र सूर्य युती- सूर्य ग्रह या योगात चंद्रसोबत असल्याने उग्र मुद्रा असते, तेजस्वी चेहरा असतो हा योग असलेल्या व्यक्ती करारी असतात बोलणे अधिकारवाणीचे असते , धारदार भारदस्त आवाज असतो या व्यक्तींकडे मनाची स्थिरता अधिक असल्यामुळे विषयभोगाकडे ओढा कमी असतो, अभिमानी वृत्तीमुळे इतरांशी लगेच जमवून घेणे यांना जमत नाही या व्यक्तीना चंचल स्वभाव , विनाकारण बडबड करणे असल्या स्वभावाची चीड असते. मेष , सिंह, वृश्चिक , धनु राशीत ही युती असल्यास दमदार व्यक्तिमत्व देतो.
चंद्र शुक्र युती- सौंदर्यकारक शुक्र ग्रह या योगात चांद्रासोबत असल्याने व्यक्ती आकर्षक स्वभावाच्या असतात , ह्या व्यक्ती सतत हसतमुख उत्साही असतात ,हा योग असणाऱ्या व्यक्ती गौर्वरणीय आणि सुंदर असतात , चेहरा रेखीव व मोहक असतो, आवाज काहीसा कोमल असतो, जीवनातील सगळी सुख भोगण्याकडे कल असतो , या व्यक्तींचे सौंदर्य शंभर जणांमधून उठून दिसणारे असते , वृषभ , तुळ , कर्क या राशीत ही युती असता व्यक्ती अतिशय गौर्वरणीय आणि सुंदर असते , स्त्रियांना खासकरून हा योग उत्तम लाभतो.
चंद्र बुध युती - बुध ग्रह या योगात चंद्रा सोबत असल्याने या व्यक्तीचे बोलणे चतुरस्र असते ,चौकस वृत्ती असते, बोलण्यात हजरजबाबी पणा असतो, हा योग असणाऱ्या व्यक्तीची निरीक्षण शक्ती उत्तम असते त्यामुळं दुसऱ्यांच्या सवयी , बोलण्याच्या लकबी लक्षात ठेऊन त्यांच्या नकला करण यांची आवड असते , बऱ्याच कॉमेडियन व्यक्तीच्या कुंडलीत हा योग आढळतो. मिथुन आणि कन्या राशीत या योगाची प्रभावी फळे मिळतात.
चंद्र राहू युती- पापी आणि दुःख पिडाकरक राहू या योगात चंद्रा सोबत असल्याने मन आणि शरीरावर अतिशय प्रतिकूल परिणाम करतो हा योग असणाऱ्या व्यक्तीचे शरीर अक्रसल्यासारखे असते, मनाचे सत्व नष्ट झाल्यामुळे दीनवाणी मुद्रा असते , मानसिक विकार असतात , आवाज ओढून काढल्यासारखा बारीक असतो. पक्षाघात यासारखे आजार होऊ शकतात.
चंद्र केतू युती - कर्कश अनियंत्रित केतू या युतीत चंद्रा सोबत असल्याने हा व्यक्ती एक प्रकारच्या भ्रमात कृती करत असतात , बुद्धीला एक प्रकारची बधिरता येते , हा योग मनाची जाणीव दक्षता नष्ट करत असल्यामुळं मानसिक व शाीरिक व्याधी नित्याच्या असतात काही व्यक्तींच्या बाबतीत फिट येणे यासारखे प्रकार घडतात.
पाच वर्षांनी वाटतेय. एक अंदाज
पाच वर्षांनी वाटतेय. एक अंदाज.
व्यवसाय कमिशन एजन्सी - द्रवरूप पदार्थ, औषधे किंवा रंग रसायनं. करावा. हळूहळू पण दीर्घकाल रिटन. विमा एजन्सीचाही विचार करा.
((मन्युफ्याक्चरिंग/ट्रेडिंग नको.
सरकारदरबारी उच्चपदस्थ उपयोगी पडतील, कुठे मोठा लाभ होईल हे विचार सोडणे. ))
धन्यवाद काका, विपू केली आहे, प्लीज बघा.
ज्योतिषशास्त्र विकसित होताना
ज्योतिषशास्त्र विकसित होताना ध्रुव व त्याला धरून इतर ताऱ्यांची जी स्थिती होती ती ध्रुवच बदलल्यामुळे आज नाही. याचा आजच्या कथनावर किती परिणाम होतो?
नेमका प्रश्न.
ध्रुव बदलत बदलत साडेसव्वीस हजार वर्षांनी पुन्हा तोच येतो. यामुळे उत्तर /दक्षिण गोलार्धातले ऋतू बदलतात. आता हे सर्व फक्त पृथ्वी आणि सूर्यापुरतेच मर्यादित. यामध्ये चंद्रालाही आणले की जगाच्या ( पृथ्वीच्या) निरनिराळ्या ठिकाणाहून सूर्यग्रहण , कधी, कसे दिसेल हे अचूक येते. ही सायन पद्धत.
पण हीच पद्धत म्हणा किंवा चौकट किंवा रेफ्रन्स म्हणा इतर ग्रहांसाठी लागू ( extension )केल्यास दर अडीच हजार वर्षांनी ग्रह कुठे आहेत हे सांगताना एकेका राशिचा फरक पडेल. पण पण पण सायन पद्धतीवाले ती चौकटही फिरवतात!! मग नक्की काय झाले किंवा होईल? ते पाहण्यास आपले आयुष्य थोडे आहे. वृश्चिकेचा शुक्र कागदोपत्री वृश्चिकेत पण आकाशात तसा विंचवाच्या कैचीत दिसणार नाही.
निरयन पद्धतीत सर्व ग्रह ,सूर्य अतीदूरच्या ताऱ्यांच्या संदर्भांत/चौकटीवर सांगण्याची प्रथा ठेवली आहे. आणि हे अंतर इतके प्रचंड आहे की "शुक्र वृश्चिक राशीत" म्हटल्यावर तो हजारो वर्षांनीही आकाशात रात्री वृश्चिक तारकासमुहातच दिसेल. ही निरयन पद्धत. पण पण पण ही पद्धत फक्त सूर्य चंद्रास लावल्यास ( extension ) ऋतू आणि ग्रहणे चुकतात.
हे थोडे फार सोपे करून सांगण्याचा प्रयत्न केलाय.
ठीक आहे. सायन पद्धत कळली पण
ठीक आहे. सायन पद्धत कळली पण निरयन कळली नाही.
आकाशात रात्री जे तारकासमुह
आकाशात रात्री जे तारकासमुह दिसतात तिथे तो ग्रह दिसतो. काही ठळक आहेत. वृषभ राशीत मंगळ म्हणजे खुप दुरवर कृत्तिका, रोहिणी आणि मृगाचे ठळक तारे आहेत तिथे जवळ मंगळ दिसेल. ( हातात सूर्य घेतलेला फोटो काढतो तेव्हा आपण जवळ असतो, सूर्य दूर असतो परंतू फोटोत मात्र हातात सूर्य धरला असा भास निर्माण होतो. मग आपण वळून दुसऱ्या हातारतही सूर्य घेतला असा फोटो काढता येतो. म्हणजे आपला अक्ष फिरला तरी सूर्य आपल्या जवळ दिसतो. तसं) तसंच पृथ्वीचा अक्ष दुसऱ्या ध्रुवाकडे वळला तरी मंगळ वृषभेतल्या तार्यांजवळच दिसेल. निरयन कुंडलीत ग्रह कुंडलीत दाखवले जातील तसेच ते अडीच/पाच//साडेसात हजार वर्षांनीही आकाशात आपल्या पुढच्या पिढ्यांना तिथेच दिसतील. ( पण त्यांना ज्योतिषाची आवड हवी आणि आकाश असले पाहिजे.)
शरदकाका, साधनाताई धन्यवाद.
शरदकाका, साधनाताई धन्यवाद.
नविन माहिती मिळाली.
Srd तुम्ही लिहिले ते थोडेसे
Srd तुम्ही लिहिले ते थोडेसे कठीण असले तरी लक्षात आले. नक्षत्रे अर्थात दूर असल्यामुळे ध्रुवबदलामुळे त्यांच्या आपल्याला दिसणाऱ्या स्थानात थोडा फरक पडला तरी आपण त्यांना एकत्रित ओळखत/बघत असल्यामुळे त्यांच्या तुलनेत ग्रहस्थानाचा विचार करता काही फरक पडणार नाही.
सायनमध्ये सुर्यावरून कसे बघतात.
निरयन ग्रहांसाठी संदर्भ चौकट
निरयन ग्रहांसाठी संदर्भ चौकट ही अतीदूरवरच्या तारकासमुहांची आहे आणि त्यातले तारे /समूह हे एका दीर्घवर्तुळात पसरलेले आहेत. ते एकमेकांपासून किमी वगैरे अंतरात न धरता तीस तीस अंशाच्या बारा भागात वाटले आहेत. हे झाले.
आता सायनकडे, त्याच्या संदर्भाकडे जाऊ. सूर्य संपात बिंदूपाशी ( दोन असतात, वसंत संपातवर) आला की तिथून अयनवृत्तावर पूर्वेकडे तीस तीस अंशांवर मेष, वृषभ राशी मानायच्या. यावरती आहेत असे वाटणारे ग्रह त्या राशीत. अयनवृत्त आहे तिथेच आहे पण राशीभाग पुढेपुढे सरकतात. म्हणजे ग्रह त्या राशीभागात असले तरी त्यांचा अतीदूरच्या ताऱ्यांशी संबंध नाही. मोठ्या वर्तुळाच्या आतले छोटे वर्तुळ.
____________________________________
ज्योतिष दोन भागांवर आधारित आहे.
अ) जन्मकाळी ग्रह आकाशात कुठे आहे हे लिहून त्यास कुंडली/planetary chart संबोधणे.
ब) काही ठोकताळे, समजुती (assumptions) यावर आयुष्याची भाकितं करणे.
--------–----------------------
(अ) भागातच सायन/निरयन दोन प्रकार झाले.
(ब) भागातला सत्तर टक्के भाग खाल्डिअन ( असिरिअन) लोकांनी मांडला आहे*#. सध्याच्या इराक आणि इराणमधला भाग व त्यातले लोक . ते भारतात आणले ग्रिकांनी. त्यात चंद्राची रास आणि शनिची साडेसाती जोडून आताचे भारतीय पारंपरिक ज्योतिष तयार झाले.
त्या सत्तर टक्के भागास रविची रास जोडून ( you are born under this star) सध्याचे पाश्चिमात्य ज्योतिष झाले.
*# - Time-Life book seriesमध्ये "TIME" पुस्तकात एक शिल्पाचा फोटो दिला आहे. राशी आणि ग्रहांसाठी चिन्हे आणि कोणत्या राशिंचा स्वामी कोणता ग्रह हे दाखवणारे अर्धवर्तुळाकार शिल्प.
y2j, चंद्रा वर लिहीलेत तसे
y2j, चंद्रा वर लिहीलेत तसे इतर ग्रहांवर पण लिहा की.
जन्म सकाळी १०.२२,कृष्ण
जन्म सकाळी १०.२२,कृष्ण द्वितीया, १९८८
@srd, आपण या पत्रिकेबाबत स्वभाव, व्यवसाय वगैरे काही गोष्टी सांगाल का?
महिना राहिलाय.
महिना राहिलाय.
अरेच्चा. डिसेंबर महिन्यात.
अरेच्चा. डिसेंबर महिन्यात.
जन्मस्थान मुंबई/कोकण/?
जन्मस्थान मुंबई/कोकण/?
ते धरून
हळवा स्वभाव? शांत पण निग्रही.
खासगी शिक्षणक्षेत्र/ मनोरंजनाच्या ठिकाणी?
डॉक्युमेंटस व्यवस्थित पाहणे,सही करणे. निर्णय चुकू शकतात.
छोटे मोठे प्रवासाची आवड.
धन्यवाद @srd. शांत तेवढं लागू
धन्यवाद @srd. शांत तेवढं लागू होत नाही सध्या तरी. पण बाकी तुम्ही बरोबर बोललात. ठिकाण मुंबई.
संपर्कातून मेल केली तर चालेल का.
करा.
करा.
रश्मी चंद्राचे इतर
रश्मी चंद्राचे इतर ग्रहांबरोवर जसे प्रकृती, स्वरूप दर्शविणारे परिणामकारक योग होतात तसे योग इतर ग्रहांचे आपसात क्वचितच पाहायला मिळतात, पुढे या विषयावर लिहीनच.
@ प्राचीन ,
@ प्राचीन ,
फक्त मायबोली मेल नोटिफिकेशन मिळाले. मेल सापडत नाही.
ठीक आहे. शरद जी. पुन्हा एकदा
ठीक आहे. शरद जी. पुन्हा एकदा प्रयत्न करून बघेन.
खूप माहितीपूर्ण लेख आणि
खूप माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसाद देखील.
Pages