ज्योतिष चंद्रयोग

Submitted by y2j on 13 November, 2019 - 03:46

चंद्रयोग
ज्योतिषशास्त्रात लग्नाला तनुस्थान असे म्हणतात या स्थानी उपस्थित अथवा दृष्टी टाकणारे ग्रह त्यांच्या गुणधर्मानुसार लग्नावर प्रभाव टाकतात.
मन आणि शरीर कारक चंद्र याला सुद्धा लग्नाचा दर्जा प्राप्त असल्यामुळे चंद्रसोबत इतर ग्रहांचे योग व्यक्तीचे जातकाचे शारीरिक मानसिक स्वरूप ठरवतात.
चंद्राचे इतर ग्रहां सोबतचे अनेक योग होतात त्यांपैकी दोन योग हे महत्वाचे मानले जातात
युती योग आणि प्रतियुती योग , या दोन योगांची जवळपास सारखी फळे मिळतात.
चंद्रयोगाची फळे अभ्यासताना लग्न स्थानी होणारे ग्रहयोग ही पहावे लागतात. लग्न स्थान आणि चंद्र यांसोबत असणाऱ्या ग्रहांची एकत्रित फळे अभ्यासावी लागतात. तसेच ही युती कोणत्या राशीत व कोणत्या स्थानी होते हे पण पहावे लागते.

चंद्र गुरु युती योग- मनाला सकारात्मकता आणि शरीराला मजबुती देणारा हा योग आहे, हा योग असणाऱ्या व्यक्तीं नेहमी प्रसन्न असतात, संवाद कौशल्य उत्तम असते. गुरु या योगात चंद्रा सोबत असल्याने चांगलं वाईट ठरवण्याची उत्तम योग्यता देतो , समजदार वृत्ती असते, आलेल्या अडचणीवर सहज मार्ग काढतात, अध्ययन करण्याची आवड असल्याने विविध क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करतात. या व्यक्ती समाजात उत्तम प्रतिष्ठा राखून असतात.
धनु, मीन आणि कर्क राशीत हा योग खासकरून उत्तम फळे देतो ,मजबूत व उंच शरीरयष्टी असते उठावदार व्यक्तिमत्व असते. वृषभ आणि तुळ राशीत ही युती असता शरीरात चरबी चे प्रमाण जास्त असते, लठ्ठपणा येतो गुरूची प्रभावी फळे या राशींमध्ये मिळत नाहीत. मिथुन राशीत बुद्धाच्या चंचल वृत्तीमुळे या योगाची अतिशय प्रतिकूल फळे मिळतात .
चंद्र मंगळ योग- आक्रमक मंगळ चांद्रसोबत या योगात असल्याने या व्यक्ती कठोर मनाच्या, हट्टी असतात , मनोधैर्य उत्तम असते . आवाज मोठा व बोलणे आक्रमक असते ,सतत कार्यक्षम व स्थिर न बसण्याच्या वृत्तीमळे यांना कधी धनाची कमी भासत नाही. सतत धुमसत राहणे व प्रत्येक कृती तीव्र प्रतिक्रिया देऊन करणे यामुळे या व्यक्तींना अपघात , शरीराला जखमा इजा होणे या गोष्टींना नेहमी सामोरे जावे लागते, 1,2,7,8 या स्थानी ही युती असल्यास लहानसहान अपघात नित्याचे असतात. गुरु , शुक्र असे शुभ ग्रह या योगात असल्यास रागावर नियंत्रण असते.
मेष , सिंह, वृश्चिक, मकर राशीत या योगाची अतिशय प्रभावी फळे मिळतात मिथुन आणि कन्या राशीत हा योग असणाऱ्या व्यक्ती टवाळखोर मस्करी करणारे आढळतात.
चंद्र शनि युती- पीडाकारक आणि संथ शनि या योगात चंद्रासोबत असल्याने मनावर नकारात्मकता हावी असते , हा योग असणाऱ्या बहुतेक व्यक्ती या वर्णाने काळ्या सावळ्या असतात, आळशी वृत्ती असते, विचारात संथपणा असतो असं असल तरी हा योग काही चांगली फळे ही देतो , या व्यक्ती जास्त भावनिक नसतात त्यामुळं हा योग एकप्रकारचा कोडगेपणा देतो, समोर काही घडलं की काहीही प्रतिक्रिया न देणे, लगेच व्यक्त न होणे यामुळं या व्यक्ती अहंकारी वाटू शकतात, हा योग व्यक्तीला अंतर्मुख बनवतो तसेच उदास वृत्तीमळे पारमार्थिक ज्ञान प्राप्त होते तसेच ध्यानधारणा , गुप्तविद्या अशा गूढ विषयांमध्ये रुची निर्माण होते.
चंद्र सूर्य युती- सूर्य ग्रह या योगात चंद्रसोबत असल्याने उग्र मुद्रा असते, तेजस्वी चेहरा असतो हा योग असलेल्या व्यक्ती करारी असतात बोलणे अधिकारवाणीचे असते , धारदार भारदस्त आवाज असतो या व्यक्तींकडे मनाची स्थिरता अधिक असल्यामुळे विषयभोगाकडे ओढा कमी असतो, अभिमानी वृत्तीमुळे इतरांशी लगेच जमवून घेणे यांना जमत नाही या व्यक्तीना चंचल स्वभाव , विनाकारण बडबड करणे असल्या स्वभावाची चीड असते. मेष , सिंह, वृश्चिक , धनु राशीत ही युती असल्यास दमदार व्यक्तिमत्व देतो.
चंद्र शुक्र युती- सौंदर्यकारक शुक्र ग्रह या योगात चांद्रासोबत असल्याने व्यक्ती आकर्षक स्वभावाच्या असतात , ह्या व्यक्ती सतत हसतमुख उत्साही असतात ,हा योग असणाऱ्या व्यक्ती गौर्वरणीय आणि सुंदर असतात , चेहरा रेखीव व मोहक असतो, आवाज काहीसा कोमल असतो, जीवनातील सगळी सुख भोगण्याकडे कल असतो , या व्यक्तींचे सौंदर्य शंभर जणांमधून उठून दिसणारे असते , वृषभ , तुळ , कर्क या राशीत ही युती असता व्यक्ती अतिशय गौर्वरणीय आणि सुंदर असते , स्त्रियांना खासकरून हा योग उत्तम लाभतो.
चंद्र बुध युती - बुध ग्रह या योगात चंद्रा सोबत असल्याने या व्यक्तीचे बोलणे चतुरस्र असते ,चौकस वृत्ती असते, बोलण्यात हजरजबाबी पणा असतो, हा योग असणाऱ्या व्यक्तीची निरीक्षण शक्ती उत्तम असते त्यामुळं दुसऱ्यांच्या सवयी , बोलण्याच्या लकबी लक्षात ठेऊन त्यांच्या नकला करण यांची आवड असते , बऱ्याच कॉमेडियन व्यक्तीच्या कुंडलीत हा योग आढळतो. मिथुन आणि कन्या राशीत या योगाची प्रभावी फळे मिळतात.
चंद्र राहू युती- पापी आणि दुःख पिडाकरक राहू या योगात चंद्रा सोबत असल्याने मन आणि शरीरावर अतिशय प्रतिकूल परिणाम करतो हा योग असणाऱ्या व्यक्तीचे शरीर अक्रसल्यासारखे असते, मनाचे सत्व नष्ट झाल्यामुळे दीनवाणी मुद्रा असते , मानसिक विकार असतात , आवाज ओढून काढल्यासारखा बारीक असतो. पक्षाघात यासारखे आजार होऊ शकतात.
चंद्र केतू युती - कर्कश अनियंत्रित केतू या युतीत चंद्रा सोबत असल्याने हा व्यक्ती एक प्रकारच्या भ्रमात कृती करत असतात , बुद्धीला एक प्रकारची बधिरता येते , हा योग मनाची जाणीव दक्षता नष्ट करत असल्यामुळं मानसिक व शाीरिक व्याधी नित्याच्या असतात काही व्यक्तींच्या बाबतीत फिट येणे यासारखे प्रकार घडतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही द्वितीय स्थानी शुक्र राहू युती याची माहिती विचारली ती मी दिली तर आता लग्नावर शनि नी दृष्टी टाकून तुमची सुंदरता कमी केली याला मी काय करणार :))

>>>> तुम्ही द्वितीय स्थानी शुक्र राहू युती याची माहिती विचारली ती मी दिली तर आता लग्नावर शनि नी दृष्टी टाकून तुमची सुंदरता कमी केली याला मी काय करणार :))>>>>> शनिने लग्नावर???? मी तर शनिचा उल्लेखही केलेला नाही.
_______________
जिद्दूंचं म्हणताय का?

तुमचंच चाललय समो मी वर लेखात म्हतले आहे की चंद्र आणि लग्न यावर असणारे ग्रह यांचा एकत्रित परिणाम पहावा लागतो आता तुमच्या कुंडलीत शरीर स्थान म्हणजेच लग्नस्थान यावर शनि दृष्टी आहे की नाही मी यावर ज्योतिष आणि शरीर या लेखात सविस्तर लिहिले आहे

हायला कुठून बुद्धी फिरली आणि इथं आलो. माझी पत्रिका आणि तिचे इव्हेंट घाला खड्यात आणि जे खरे ज्योतिषप्रेमी अभ्यासक असतील त्यांनी वर नमूद पद्धती माहित नसेल तर माहिती झाली याचा आनंद मानून अभ्यास करा आणि कोणाला काही त्यात जेन्युइन अडचण आली तर मला मेल करा. हा माझा बऱ्याच छंदांपैकी एक छन्द असून थिओरिटिकल शंकांचं स्वागत असेल आणि माझ्या कुवतीनुसार मी मदत करेल. कोणी जुने अभ्यासक असतील तर त्यांच्याकडून सायन- निरयन वाद, चलित, जैमिनी, अष्टकवर्ग, राशी-नवंसा सोडून इतर वर्ग, विविध दशा, सर्वोतोभद्रचक्र असल्या गोष्टींवर चर्चा करायला नक्की आवडेल.
इथं चॅलेंज वगैर सुरु झाल्याने अलविदा

Untitled_0.jpg
ही माझी कुंडली आहे, दिवस खूपच वाईट चाललेत, कशातच यश नाही. ज्योतिषांकडे दाखवली कि बोलतात चांगली आहे कुंडली. कोणीतरी सांगा काय आहे नक्की कुंडलीत.

काय मस्त कुंडली आहे.. बोकलत तुमच्या कुंडलीत शक्ती-युक्ती योग आहे..तुमचा हा जन्म साधा जन्म नसून एक अवतार आहे.. ह्यापूर्वीच्या जन्मात तुम्ही आफ्रिकेच्या घाना च्या घन्या जंगलातले एक सिद्ध पुरुष होता.
तुम्ही भूत-पिशाच ह्यांचा नायनाट केला होतात.. त्या देशातले लोक तुम्हाला खूप मानीत असे.. एकदा अशाच एका मोहिमेवर असताना हाडळीचा मुका घेताना तुम्हाला हाडळीच्या आशिकने पाहिलं आणि त्याने तुम्हाला श्राप दिला आणि त्या शापामुळे तुमचा मुर्त्यु झाला... उशाप म्हणून ह्या जन्मात तुम्हाला आफ्रिकेच्या जंगलात जाऊन शनिवारी पूर्णेमेच्या दिवशी त्याच हाडळीला खणा - नारळाची ओटी भरून हळद कुंकू वाहून आणि तसेच हाडळीच्या आशिकला टॉवेल टोपी, शर्टपीस, विड्याचे पान, सिगारेट आणि एक गावठी खंबा देऊन त्याचा यथायोग्य मान राखावा लागेल आणि मगच तुम्हाला मागच्या जन्माचं सगळं आठवेल सगळ्या सिद्धी पुन्हा आठवतील आणि तुम्हा पुन्हा सिद्ध पुरुष व्हाल..

हल्के घ्या... Happy

बोकलत , तुमची ही कुंडली खरी असेल तर ( म्हणजे तुम्ही तुमचीच खरी पत्रिका टाकली असेल तर )......

तुमची वृश्चीक रास असुन तुमची साडेसाती २४ जानेवारी २०२० ला संपेल. चांगले दिवस सुरु होतील. रास वृश्चीक व मालक मंगळ असल्याने तुम्ही निडर साहसी, कष्टाळु आहात. दशमात म्हणजे कर्म स्थानात ( नोकरी व्यवसाय १० व्या स्थानावरुन बघतात ) मंगळ, मकर या शत्रु राशीत असला तरी उच्चीचा आहे. त्यामुळे निश्चीतच प्रगती होईल. तृतियातला शुक्र लिखाणाची आवड दाखवतो. तुमचे हस्ताक्षर नक्कीच सुरेख असले पाहीजे.

लग्नी मेष राशीत ( १ आकड्यात , ज्याला पत्रिकेचे पहिले स्थान म्हणतात ) गुरु रवी चांगले आहेत. थोडा तापट स्वभाव दिसतोय. २ र्‍या स्थानातला बुध विनोदी लिखाण दर्शवतो. पैसा मिळेल. कारण धन ( २ रे स्थान धन व कुटूम्बाचे आहे ) स्थानात बुध, चंद्र, ग्रु किंवा शुक्र असे शुभ ग्रह असावेत .

९ व्या स्थानात शनी+ हर्षल + नेपच्युन ची तिकडी आहे. शनी उशिरा भाग्योदय दाखवतो, पण चांगले होईल. तुम्हाला गुढ स्वप्ने पडतात का? तुमची नोकरी वायु दल किंवा पाण्याशी संबंधीत आहे का?

पंचमात ला केतू धार्मिक आवड दाखवतो.

तुम्ही शिव आणी मारुती उपासना करा.

माझा एक मित्र आहे त्याची हि कुंडली सध्या खूप प्रॉब्लेम मध्ये आहे.
इथे खूप जाणकार आहेत त्याला तुमच मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल.

bhushan kundali.PNG

@अजय चव्हाण Lol Lol
@रश्मी.. ही माझी खरी कुंडली आहे. तुमचे बरेचसे ठोकताळे बरोबर आहेत. चांगलाच अभ्यास दिसतोय तुमचा.
तुमचे हस्ताक्षर नक्कीच सुरेख असले पाहीजे.>>>>>+11111111
तृतियातला शुक्र लिखाणाची आवड दाखवतो.>>>>+11111111(अपवाद फक्त परीक्षेत पेपर लिहिताना)
थोडा तापट स्वभाव दिसतोय.>>>>>+111111111
तुम्हाला गुढ स्वप्ने पडतात का?>>>> +11111111( हो पडतात गूढ स्वप्न)
तुमची नोकरी वायु दल किंवा पाण्याशी संबंधीत आहे का>>>>> नाही, माझी नोकरी मुख्यत्वे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल क्षेत्रातील आहे.
@srd जरा सविस्तर सांगा ना.

लोकहिताचे बोलण्यात तळमळ असते. म्हणजे मनापासून बोलतात. पण फटकळ स्वभावामुळे लोकांचा विश्वास मिळवणे अवघड जाते. पण ज्यांचा विश्वास बसतो ते लोक जिद्दु यांना कधी सोडत नाहीत.

पत्रिका न पाहता असाच केलेला एक प्रयत्न.
Happy
कृहघ्या.

@साधना , नाही अजून नाही आला तसेच काहीच क्लू मिळत नाहिये. उद्या आठवडा होईल. तो सुखरूप असावा हिच प्रार्थना करतोय

@y2j, आम्हा चार भावंडांमध्ये फक्त मोठ्या बहिणीचा जन्म दवाखान्यात झाल्यामुळे तिची जन्मवेळ माहित आहे. बाकी आम्ही तिघेही घरीच झाल्यामुळे जन्मवेळ अंदाजपंचे आहे म्हणून कधी कुंडली काढली नाही तसेच कधी पत्रिकेची गरजही लागली नाही.
भावाचा जन्म १७/०४/१९८२
वार - शनिवार
वेळ - अंदाजे दुपारी १२ च्या आसपास
जन्मस्थान - विंधणे, जिल्हा - रायगड

निल्सन याला दुसरा उपाय हा पण आहे की जो व्यवस्थीतच भविष्य बघतो, म्हणजे जो चांगला ज्योतिष्यी म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच्याकडे प्रत्यक्ष जावे. भावाची कुंडली नसली तरी हरकत नाही. तू ( तुला अरे तुरे करतेय त्याबद्दल सॉरी ) जेव्हा त्याच्याकडे / तिच्याकडे ( स्त्री ज्योतिष्यी असेल तर ) गेल्यानंतर त्यांना प्रश्न कुंडली मांडण्यास सांगावी. म्हणजे जेव्हा तू भावाबद्दल जेव्हा प्रश्न विचारशील त्याच वेळेस जोतिष्यी तुझ्या प्रश्नावरुन पत्रिका बनवतात. यात प्रश्न विचारणार्‍याने तिथे प्रत्यक्ष हजर असणे महत्वाचे असते कारण प्रश्न विचारणार्‍याच्या मनस्थितीवर सारी पत्रिका अवलंबुन असते.

मी एवढे उलगडुन सांगु शकत नाही, ज्योतिष्यी सांगतील. जर आधी गेली असशील तरी परत एकदा जाऊन ये. यात फार पैसे घालवु नकोस. पण प्रश्न कुंडली खरच महत्वाची असते.

तुम्ही दिलेली जन्मवेळ बरोबर आहे ना या कुंडलिनुसार तुमचा भाऊ विवाहसंबंध बिघडल्यामुळे किंवा प्रेमप्रकरण यामुळे घर सोडून गेला असावा, त्याच्या कुंडलीत आत्महत्या करण्याचे चे काही योग दिसत नाहीत त्याने जवळचा मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडे आश्रय घेतला असावा, पुढील दोन तीन महिन्यात घरवापसी ची शक्यता दिसते.

>>>>>>>> त्याच्या कुंडलीत आत्महत्या करण्याचे चे काही योग दिसत नाहीत त्याने जवळचा मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडे आश्रय घेतला असावा, पुढील दोन तीन महिन्यात घरवापसी ची शक्यता दिसते.>>>>>>>
y2j आपल्या तोंडात साखर पडो. व आपण म्हणता तसेच होवो Sad

y2j ,
'पुढील दोन तीन महिन्यात घरवापसी ची शक्यता दिसते' असे दिलासादायक सांगणे चांगले असले तरी 'आधी तत्परतेने पोलिसांकडे जा' सांगणे तुमची नैतिक जबाबदारी बनते.

सात दिवस झालेत या गोष्टीला तुम्हाला काय वाटतं hyzen त्यांचे कुटुंबीय मायबोली वरचे ज्योतिष काय म्हणतायत याची वाट बघत निवांत बसले असतील

ते काय करतात किंवा त्यांनी काय केले ती त्यांची जबाबदारी आहे तुम्ही काय करावे ही तुमची जबाबदारी आहे.
तुम्ही ज्योतिष विषयक सल्ला जोवर दिला नव्हता तोवर तुमची काही जबाबदारी नव्हती. तुम्ही आता तो दिल्याने ती आपोआप तुमची नैतिक जबाबदारी बनली आहे.
बघा पटतय का.

Pages