ज्योतिष चंद्रयोग

Submitted by y2j on 13 November, 2019 - 03:46

चंद्रयोग
ज्योतिषशास्त्रात लग्नाला तनुस्थान असे म्हणतात या स्थानी उपस्थित अथवा दृष्टी टाकणारे ग्रह त्यांच्या गुणधर्मानुसार लग्नावर प्रभाव टाकतात.
मन आणि शरीर कारक चंद्र याला सुद्धा लग्नाचा दर्जा प्राप्त असल्यामुळे चंद्रसोबत इतर ग्रहांचे योग व्यक्तीचे जातकाचे शारीरिक मानसिक स्वरूप ठरवतात.
चंद्राचे इतर ग्रहां सोबतचे अनेक योग होतात त्यांपैकी दोन योग हे महत्वाचे मानले जातात
युती योग आणि प्रतियुती योग , या दोन योगांची जवळपास सारखी फळे मिळतात.
चंद्रयोगाची फळे अभ्यासताना लग्न स्थानी होणारे ग्रहयोग ही पहावे लागतात. लग्न स्थान आणि चंद्र यांसोबत असणाऱ्या ग्रहांची एकत्रित फळे अभ्यासावी लागतात. तसेच ही युती कोणत्या राशीत व कोणत्या स्थानी होते हे पण पहावे लागते.

चंद्र गुरु युती योग- मनाला सकारात्मकता आणि शरीराला मजबुती देणारा हा योग आहे, हा योग असणाऱ्या व्यक्तीं नेहमी प्रसन्न असतात, संवाद कौशल्य उत्तम असते. गुरु या योगात चंद्रा सोबत असल्याने चांगलं वाईट ठरवण्याची उत्तम योग्यता देतो , समजदार वृत्ती असते, आलेल्या अडचणीवर सहज मार्ग काढतात, अध्ययन करण्याची आवड असल्याने विविध क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करतात. या व्यक्ती समाजात उत्तम प्रतिष्ठा राखून असतात.
धनु, मीन आणि कर्क राशीत हा योग खासकरून उत्तम फळे देतो ,मजबूत व उंच शरीरयष्टी असते उठावदार व्यक्तिमत्व असते. वृषभ आणि तुळ राशीत ही युती असता शरीरात चरबी चे प्रमाण जास्त असते, लठ्ठपणा येतो गुरूची प्रभावी फळे या राशींमध्ये मिळत नाहीत. मिथुन राशीत बुद्धाच्या चंचल वृत्तीमुळे या योगाची अतिशय प्रतिकूल फळे मिळतात .
चंद्र मंगळ योग- आक्रमक मंगळ चांद्रसोबत या योगात असल्याने या व्यक्ती कठोर मनाच्या, हट्टी असतात , मनोधैर्य उत्तम असते . आवाज मोठा व बोलणे आक्रमक असते ,सतत कार्यक्षम व स्थिर न बसण्याच्या वृत्तीमळे यांना कधी धनाची कमी भासत नाही. सतत धुमसत राहणे व प्रत्येक कृती तीव्र प्रतिक्रिया देऊन करणे यामुळे या व्यक्तींना अपघात , शरीराला जखमा इजा होणे या गोष्टींना नेहमी सामोरे जावे लागते, 1,2,7,8 या स्थानी ही युती असल्यास लहानसहान अपघात नित्याचे असतात. गुरु , शुक्र असे शुभ ग्रह या योगात असल्यास रागावर नियंत्रण असते.
मेष , सिंह, वृश्चिक, मकर राशीत या योगाची अतिशय प्रभावी फळे मिळतात मिथुन आणि कन्या राशीत हा योग असणाऱ्या व्यक्ती टवाळखोर मस्करी करणारे आढळतात.
चंद्र शनि युती- पीडाकारक आणि संथ शनि या योगात चंद्रासोबत असल्याने मनावर नकारात्मकता हावी असते , हा योग असणाऱ्या बहुतेक व्यक्ती या वर्णाने काळ्या सावळ्या असतात, आळशी वृत्ती असते, विचारात संथपणा असतो असं असल तरी हा योग काही चांगली फळे ही देतो , या व्यक्ती जास्त भावनिक नसतात त्यामुळं हा योग एकप्रकारचा कोडगेपणा देतो, समोर काही घडलं की काहीही प्रतिक्रिया न देणे, लगेच व्यक्त न होणे यामुळं या व्यक्ती अहंकारी वाटू शकतात, हा योग व्यक्तीला अंतर्मुख बनवतो तसेच उदास वृत्तीमळे पारमार्थिक ज्ञान प्राप्त होते तसेच ध्यानधारणा , गुप्तविद्या अशा गूढ विषयांमध्ये रुची निर्माण होते.
चंद्र सूर्य युती- सूर्य ग्रह या योगात चंद्रसोबत असल्याने उग्र मुद्रा असते, तेजस्वी चेहरा असतो हा योग असलेल्या व्यक्ती करारी असतात बोलणे अधिकारवाणीचे असते , धारदार भारदस्त आवाज असतो या व्यक्तींकडे मनाची स्थिरता अधिक असल्यामुळे विषयभोगाकडे ओढा कमी असतो, अभिमानी वृत्तीमुळे इतरांशी लगेच जमवून घेणे यांना जमत नाही या व्यक्तीना चंचल स्वभाव , विनाकारण बडबड करणे असल्या स्वभावाची चीड असते. मेष , सिंह, वृश्चिक , धनु राशीत ही युती असल्यास दमदार व्यक्तिमत्व देतो.
चंद्र शुक्र युती- सौंदर्यकारक शुक्र ग्रह या योगात चांद्रासोबत असल्याने व्यक्ती आकर्षक स्वभावाच्या असतात , ह्या व्यक्ती सतत हसतमुख उत्साही असतात ,हा योग असणाऱ्या व्यक्ती गौर्वरणीय आणि सुंदर असतात , चेहरा रेखीव व मोहक असतो, आवाज काहीसा कोमल असतो, जीवनातील सगळी सुख भोगण्याकडे कल असतो , या व्यक्तींचे सौंदर्य शंभर जणांमधून उठून दिसणारे असते , वृषभ , तुळ , कर्क या राशीत ही युती असता व्यक्ती अतिशय गौर्वरणीय आणि सुंदर असते , स्त्रियांना खासकरून हा योग उत्तम लाभतो.
चंद्र बुध युती - बुध ग्रह या योगात चंद्रा सोबत असल्याने या व्यक्तीचे बोलणे चतुरस्र असते ,चौकस वृत्ती असते, बोलण्यात हजरजबाबी पणा असतो, हा योग असणाऱ्या व्यक्तीची निरीक्षण शक्ती उत्तम असते त्यामुळं दुसऱ्यांच्या सवयी , बोलण्याच्या लकबी लक्षात ठेऊन त्यांच्या नकला करण यांची आवड असते , बऱ्याच कॉमेडियन व्यक्तीच्या कुंडलीत हा योग आढळतो. मिथुन आणि कन्या राशीत या योगाची प्रभावी फळे मिळतात.
चंद्र राहू युती- पापी आणि दुःख पिडाकरक राहू या योगात चंद्रा सोबत असल्याने मन आणि शरीरावर अतिशय प्रतिकूल परिणाम करतो हा योग असणाऱ्या व्यक्तीचे शरीर अक्रसल्यासारखे असते, मनाचे सत्व नष्ट झाल्यामुळे दीनवाणी मुद्रा असते , मानसिक विकार असतात , आवाज ओढून काढल्यासारखा बारीक असतो. पक्षाघात यासारखे आजार होऊ शकतात.
चंद्र केतू युती - कर्कश अनियंत्रित केतू या युतीत चंद्रा सोबत असल्याने हा व्यक्ती एक प्रकारच्या भ्रमात कृती करत असतात , बुद्धीला एक प्रकारची बधिरता येते , हा योग मनाची जाणीव दक्षता नष्ट करत असल्यामुळं मानसिक व शाीरिक व्याधी नित्याच्या असतात काही व्यक्तींच्या बाबतीत फिट येणे यासारखे प्रकार घडतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेव्हाच का नाही अक्कल आली, पण मीही त्यांना हेच समजावते की पर्याय नसतो, जे आहे ते होतेच>>>> ते भोगणेप्राक्तनात होतेच ,त्यामुळे त्या त्यावेळी सुचले नाही.

मी इथे/विपुत मिळाल्या रेफरन्सप्रमाणे धोंडोपंत आपटे, सुहास गुरुजी व अभय गोडसे यांना संपर्क केला परंतू भावाची अचूक जन्मवेळ ठाऊक नसल्यामुळे कोणीच मार्गदर्शनास तयार नाही. मला काहीच कळत नाहीये मी काय करू.
आई आणि वहिनी कुठे कुठे 'बघायला' जात असतात त्यांना सगळेजण तो व्यवस्थित आहे पण मानसिक स्थिती ठिक नाही म्हणून फिरतोय व त्याला घरी येण्याचे उमजत नाही असे सांगतात. परंतू दोन दिवसांपूर्वी एका बाईने त्यांना असे सांगितले की (ती एका आरशात बघून सांगते) तो दक्षिणेस असून एका झाडाखाली बसलेला आहे व कुणी काय देईल ते खात आहे. यावर मी आईला समजावले आहे तरीपण आता स्वतःला नाही समजावू शकत. खरचं तो काय करत असेल, काय खात असेल या गोष्टींचे खूप टेंन्शन येत आहे, जसे जसे दिवस वाढत आहेत तसे तसे टेंन्शनपण वाढत चाललयं.
आम्ही सगळेतरी कामाला असल्यामुळे वेळ जातो पण आई दिवसभर एकटी सतत त्याचाच विचार करत बसते. दुपारी एकटी जेवत पण नाही. काय करायचे काहीच समजत नाहीये.

एक उत्सुकता म्हणून ग्रहांचे फल काय जाणण्यासाठी -
१) omganesh dot com >>
२) >> janma kundali
Fill the Form . dob, place, time and with email. Email is not checked./ Verified. Submit.
Next conform the details and submit.
Next tick the boxes
Planetary position
Planetary analysis
Varsha phal. 2020
And submit.

It takes 10 seconds. Free.

निल्सन एकदा तुमच्या आजीच्या म्हणजेच आईच्या माहेरी शोध घेऊन बघा, किंवा जिथे पाण्याचे ठिकाण आहे जसे धरण किंवा तलाव अशा ठिकाणी , बाकी पोलीस काय म्हणत आहेत

<<< बाकी पोलीस काय म्हणत आहेत >>>
जगात इतके दर्दी ज्योतिषी असताना पोलिसांना काय विचारत बसायचे? ते म्हणणार तपास चालू आहे, अजून काय सांगणार ते.

असे नाहीये की आम्ही फक्त ज्योतिषी किंवा बाबा महाराज यांच्या मागे लागलोय. एका बाजूला पोलिसांचा पाठपुरावा सुरुच आहे. पण नेहमीप्रमाणे त्यांचे तपास सुरू आहे हेच म्हणणे आहे. तरीही आम्ही त्यांना cc tv footage चेक करायला लावले. भावाचे accounts तपासले. पोलिसांची साईट आहे ज्यावर missing, unclaimed, unidentified bodies ची लिस्ट येते ती चेक करायला लावली. आता तर मी स्वतः ती साइट रोज चेक करते. इतर ज्या शक्यता आहेत त्या पडताळून बघत आहोत. पण कुठून कोणताही क्ल्यू मिळत नाहीये.
कुठूनतरी काहीतरी क्ल्यू मिळावा यासाठी इतरही पर्याय बघत आहे.

असे नाहीये की आम्ही फक्त ज्योतिषी किंवा बाबा महाराज यांच्या मागे लागलोय. एका बाजूला पोलिसांचा पाठपुरावा सुरुच आहे. पण नेहमीप्रमाणे त्यांचे तपास सुरू आहे हेच म्हणणे आहे. तरीही आम्ही त्यांना cc tv footage चेक करायला लावले. भावाचे accounts तपासले. पोलिसांची साईट आहे ज्यावर missing, unclaimed, unidentified bodies ची लिस्ट येते ती चेक करायला लावली. आता तर मी स्वतः ती साइट रोज चेक करते. इतर ज्या शक्यता आहेत त्या पडताळून बघत आहोत. पण कुठून कोणताही क्ल्यू मिळत नाहीये.
कुठूनतरी काहीतरी क्ल्यू मिळावा यासाठी इतरही पर्याय बघत आहे.

निलसन, काहीही क्लु मिळत नाही म्हणजे भाऊ सुखरूप आहे. आता तो कुठे आहे, त्याची मानसिक स्थिती कशी आहे वगैरे बाबींवर त्याचे परतून येणे अवलंबून आहे. प्रार्थना करणे आपल्या हातात आहे.

२६ मार्च १९७६
रात्री १०.५५
सोलापूर

याबद्दल काही सांगू शकाल?

निल्सन, खरंच आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा! >>> मम.

काही हरकत नाही निल्सन या सर्वांबरोबर ज्योतिषाचा आधार घ्यायला, मार्गदर्शन घ्यायला.

हो देवकी...मी सहमत आहे.....निल्सन आमच्या सदिच्छा आहेत... आईची तगमग समजू शकते...भाऊ सापडेल ....

@Submitted by ॲमी on 8 December,

चंचल, कडक वागण्याने लोक चिडतात. धार्मिक ज्ञान तरीही नास्तिक.
परदेश प्रवास.
पब्लिकेशन्स/ पेपर/चानेल्स संबंधी कामकाज.
भाड्याचे /स्वत:चे घर, घराजवळ बाग.
ताप/रक्तविकार.
मुलांशी वितुष्ट. प्रॉपर्टी वाद.
????

> धार्मिक ज्ञान तरीही नास्तिक.
परदेश प्रवास.
पब्लिकेशन्स/ पेपर/चानेल्स संबंधी कामकाज.
भाड्याचे /स्वत:चे घर, घराजवळ बाग.
ताप/रक्तविकार. > यापैकी काहीही बरोबर नाही.

मुलांबद्दल तुम्ही लिहलंय पण इतर जवळच्या नातेवाईकांशी कसे नाते असेल? पालक, भावंड, जोडीदार?
आर्थिक स्थिती कशी असेल?

निल्सन, मी तुला प्रश्न कुंडली बद्दल सांगीतले होते ते केलेस का? प्रश्न कुंडलीसाठी पत्रिका लागत नाही, तर प्रश्न विचारणारा / विचारणारी व्यक्ती ज्योतिष्य सांगणार्‍याच्या समोर उपस्थित असली पाहीजे.

इथे बघ मायबोलीवरच आहेत एक ज्योतिष्यी.
https://www.maayboli.com/user/55004

प्रश्न कुंडलीबद्दल मलापण माहीत आहे. प्रश्न विचारणारा आमच्या समोर बसून आमची कुंडली मांडायचा. पण त्याला प्रश्न कुंडली म्हणतात ते माहीत न्हवते, आम्ही त्याला viva म्हणायचो.

@ रश्मी
मी गोडसे, सुहासजी यांना मेल केला होता त्यामध्ये प्रश्नकुंडलीबद्द्ल पण विचारले होते परंतु ते मदता नाही करु शकणार म्हणाले. आपटे गुरुजी फोनवर ऐकून घ्यायलाच तयार नाहीत ते रेफरन्सशिवाय सांगणार नाही म्हणतात.
पशुपत यांना संपर्क करुन बघते.
सर्वांना शुभेच्छेसाठी धन्यवाद!

१४ डिसेंबर १९८२
सकाळी ६:४०
मुंबई
याबद्दल काही सांगु शकाल का?

निल्सन, तुमचं आणि तुमच्या आईचं दु:ख समजु शकते. आईला आधार द्या.
तुमचा भाऊ परत यावा यासाठी मी प्रार्थना करेन. सदिच्छा.
भाऊ परत येईल.

7 जून 1982,
वेळ- पहाटे 3.18 मि.
जन्मस्थळ-सातारा
काही सांगू शकाल याबद्दल?

कोणत्या विषयाच्या प्रश्नाचे उत्तर सध्या शोधताय हे लिहा.
---------------
@निल्सन, स्वामी लोक अशा प्रश्नांची उत्तरे देतात. मागे एकदा लिहिलं आहेच की माटुंग्याच्या शंकर मठात येणारे शंकराचार्य.
पुरी पिठाचे स्वामी उज्जैनला येणार आहेत ही बातमी होती रविवारी. तीन दिवस हरसिद्धी मठात आहेत. पण त्यांचा कार्यक्रम कळला नाही.

मी धोंडोपंत आपटे यांच्या ब्लॉग चा नियमित वाचक होतो ब्लॉग बंद करण्या पूर्वीच्या शेवटच्या काही दिवसात त्यांनी म्हटले होते की त्यांना राहू महादशा सुरू होत आहे, आर्थिक अडचणी येत आहेत , वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत असेही त्यांनी म्हटले, शेवटी राहू दशा ज्यांना सुरू व्हायची असेल त्यांनी आपली आर्थिक तजवीज करून ठेवावी, भलत्या सलत्या भानगडीत पडू नये असा सल्लाही त्यांनी दिला.

Pages