चंद्रयोग
ज्योतिषशास्त्रात लग्नाला तनुस्थान असे म्हणतात या स्थानी उपस्थित अथवा दृष्टी टाकणारे ग्रह त्यांच्या गुणधर्मानुसार लग्नावर प्रभाव टाकतात.
मन आणि शरीर कारक चंद्र याला सुद्धा लग्नाचा दर्जा प्राप्त असल्यामुळे चंद्रसोबत इतर ग्रहांचे योग व्यक्तीचे जातकाचे शारीरिक मानसिक स्वरूप ठरवतात.
चंद्राचे इतर ग्रहां सोबतचे अनेक योग होतात त्यांपैकी दोन योग हे महत्वाचे मानले जातात
युती योग आणि प्रतियुती योग , या दोन योगांची जवळपास सारखी फळे मिळतात.
चंद्रयोगाची फळे अभ्यासताना लग्न स्थानी होणारे ग्रहयोग ही पहावे लागतात. लग्न स्थान आणि चंद्र यांसोबत असणाऱ्या ग्रहांची एकत्रित फळे अभ्यासावी लागतात. तसेच ही युती कोणत्या राशीत व कोणत्या स्थानी होते हे पण पहावे लागते.
चंद्र गुरु युती योग- मनाला सकारात्मकता आणि शरीराला मजबुती देणारा हा योग आहे, हा योग असणाऱ्या व्यक्तीं नेहमी प्रसन्न असतात, संवाद कौशल्य उत्तम असते. गुरु या योगात चंद्रा सोबत असल्याने चांगलं वाईट ठरवण्याची उत्तम योग्यता देतो , समजदार वृत्ती असते, आलेल्या अडचणीवर सहज मार्ग काढतात, अध्ययन करण्याची आवड असल्याने विविध क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करतात. या व्यक्ती समाजात उत्तम प्रतिष्ठा राखून असतात.
धनु, मीन आणि कर्क राशीत हा योग खासकरून उत्तम फळे देतो ,मजबूत व उंच शरीरयष्टी असते उठावदार व्यक्तिमत्व असते. वृषभ आणि तुळ राशीत ही युती असता शरीरात चरबी चे प्रमाण जास्त असते, लठ्ठपणा येतो गुरूची प्रभावी फळे या राशींमध्ये मिळत नाहीत. मिथुन राशीत बुद्धाच्या चंचल वृत्तीमुळे या योगाची अतिशय प्रतिकूल फळे मिळतात .
चंद्र मंगळ योग- आक्रमक मंगळ चांद्रसोबत या योगात असल्याने या व्यक्ती कठोर मनाच्या, हट्टी असतात , मनोधैर्य उत्तम असते . आवाज मोठा व बोलणे आक्रमक असते ,सतत कार्यक्षम व स्थिर न बसण्याच्या वृत्तीमळे यांना कधी धनाची कमी भासत नाही. सतत धुमसत राहणे व प्रत्येक कृती तीव्र प्रतिक्रिया देऊन करणे यामुळे या व्यक्तींना अपघात , शरीराला जखमा इजा होणे या गोष्टींना नेहमी सामोरे जावे लागते, 1,2,7,8 या स्थानी ही युती असल्यास लहानसहान अपघात नित्याचे असतात. गुरु , शुक्र असे शुभ ग्रह या योगात असल्यास रागावर नियंत्रण असते.
मेष , सिंह, वृश्चिक, मकर राशीत या योगाची अतिशय प्रभावी फळे मिळतात मिथुन आणि कन्या राशीत हा योग असणाऱ्या व्यक्ती टवाळखोर मस्करी करणारे आढळतात.
चंद्र शनि युती- पीडाकारक आणि संथ शनि या योगात चंद्रासोबत असल्याने मनावर नकारात्मकता हावी असते , हा योग असणाऱ्या बहुतेक व्यक्ती या वर्णाने काळ्या सावळ्या असतात, आळशी वृत्ती असते, विचारात संथपणा असतो असं असल तरी हा योग काही चांगली फळे ही देतो , या व्यक्ती जास्त भावनिक नसतात त्यामुळं हा योग एकप्रकारचा कोडगेपणा देतो, समोर काही घडलं की काहीही प्रतिक्रिया न देणे, लगेच व्यक्त न होणे यामुळं या व्यक्ती अहंकारी वाटू शकतात, हा योग व्यक्तीला अंतर्मुख बनवतो तसेच उदास वृत्तीमळे पारमार्थिक ज्ञान प्राप्त होते तसेच ध्यानधारणा , गुप्तविद्या अशा गूढ विषयांमध्ये रुची निर्माण होते.
चंद्र सूर्य युती- सूर्य ग्रह या योगात चंद्रसोबत असल्याने उग्र मुद्रा असते, तेजस्वी चेहरा असतो हा योग असलेल्या व्यक्ती करारी असतात बोलणे अधिकारवाणीचे असते , धारदार भारदस्त आवाज असतो या व्यक्तींकडे मनाची स्थिरता अधिक असल्यामुळे विषयभोगाकडे ओढा कमी असतो, अभिमानी वृत्तीमुळे इतरांशी लगेच जमवून घेणे यांना जमत नाही या व्यक्तीना चंचल स्वभाव , विनाकारण बडबड करणे असल्या स्वभावाची चीड असते. मेष , सिंह, वृश्चिक , धनु राशीत ही युती असल्यास दमदार व्यक्तिमत्व देतो.
चंद्र शुक्र युती- सौंदर्यकारक शुक्र ग्रह या योगात चांद्रासोबत असल्याने व्यक्ती आकर्षक स्वभावाच्या असतात , ह्या व्यक्ती सतत हसतमुख उत्साही असतात ,हा योग असणाऱ्या व्यक्ती गौर्वरणीय आणि सुंदर असतात , चेहरा रेखीव व मोहक असतो, आवाज काहीसा कोमल असतो, जीवनातील सगळी सुख भोगण्याकडे कल असतो , या व्यक्तींचे सौंदर्य शंभर जणांमधून उठून दिसणारे असते , वृषभ , तुळ , कर्क या राशीत ही युती असता व्यक्ती अतिशय गौर्वरणीय आणि सुंदर असते , स्त्रियांना खासकरून हा योग उत्तम लाभतो.
चंद्र बुध युती - बुध ग्रह या योगात चंद्रा सोबत असल्याने या व्यक्तीचे बोलणे चतुरस्र असते ,चौकस वृत्ती असते, बोलण्यात हजरजबाबी पणा असतो, हा योग असणाऱ्या व्यक्तीची निरीक्षण शक्ती उत्तम असते त्यामुळं दुसऱ्यांच्या सवयी , बोलण्याच्या लकबी लक्षात ठेऊन त्यांच्या नकला करण यांची आवड असते , बऱ्याच कॉमेडियन व्यक्तीच्या कुंडलीत हा योग आढळतो. मिथुन आणि कन्या राशीत या योगाची प्रभावी फळे मिळतात.
चंद्र राहू युती- पापी आणि दुःख पिडाकरक राहू या योगात चंद्रा सोबत असल्याने मन आणि शरीरावर अतिशय प्रतिकूल परिणाम करतो हा योग असणाऱ्या व्यक्तीचे शरीर अक्रसल्यासारखे असते, मनाचे सत्व नष्ट झाल्यामुळे दीनवाणी मुद्रा असते , मानसिक विकार असतात , आवाज ओढून काढल्यासारखा बारीक असतो. पक्षाघात यासारखे आजार होऊ शकतात.
चंद्र केतू युती - कर्कश अनियंत्रित केतू या युतीत चंद्रा सोबत असल्याने हा व्यक्ती एक प्रकारच्या भ्रमात कृती करत असतात , बुद्धीला एक प्रकारची बधिरता येते , हा योग मनाची जाणीव दक्षता नष्ट करत असल्यामुळं मानसिक व शाीरिक व्याधी नित्याच्या असतात काही व्यक्तींच्या बाबतीत फिट येणे यासारखे प्रकार घडतात.
<<< शेवटी राहू दशा ज्यांना
<<< शेवटी राहू दशा ज्यांना सुरू व्हायची असेल त्यांनी आपली आर्थिक तजवीज करून ठेवावी, >>>
हे सांगायला ज्योतिषी कशाला पाहिजे आणि त्या राहूला कशाला वेठीस धरायचे? मी तर म्हणतो आर्थिक तजवीज नेहमीच असावी, कधी गरज पडेल सांगू शकत नाही.
काही कल्पना नाही ब्लॉग का बंद
काही कल्पना नाही ब्लॉग का बंद केला ते
@ srd ,@y2j मला
@ srd ,@y2j मला प्रामुख्याने आरोग्यविषयक आणि ईतर सुद्धा साधारण (जनरल)माहिती देऊ शकत असाल तर हवी आहे.
मी तर म्हणतो आर्थिक तजवीज
मी तर म्हणतो आर्थिक तजवीज नेहमीच असावी, कधी गरज पडेल सांगू शकत नाही. - उपाशीबोका.
मान्य. ती करण्याची क्षमता नसणे, केलेली चुकणे, किंवा करताकरता काळ जातो आणि उपभोगाच्या वेळी हातपाय धड नसतात हे पाहिलं जातं.
येणार येणार वाटणारी मालमत्ता अचानक गायब होते. केलेल्या प्रॉपर्टीत जावक अधिक आवक कमी हा एक प्रकार.
आरोग्यविषयक आणि ईतर सुद्धा
आरोग्यविषयक आणि ईतर सुद्धा साधारण (जनरल)माहिती देऊ शकत असाल तर हवी आहे.
Submitted by Cuty on
खोकला/सर्दी , स्थूलपणा?
निष्ठा पक्की?
वक्तृत्व, लोकांपुढे यायला आवडते?
---
हाताखालचे लोकांपासून सावध किंवा लक्ष ठेवणे.
Srd बरोबर आहे.
Srd बरोबर आहे.
मुले , पती जवळच्या नात्यांबाबत काही सांगू शकाल काय?(पती-31 मे 1980, ठिकाण-बारामती,जन्मवेळ माहीत नाही)
किंवा नजिकच्या भविष्यात एखादी खास गोष्ट (चांगली/वाईट) असेल तर सांगा.(विपू केली तरी चालेल.)
मला उत्तर द्याल का?
मला उत्तर द्याल का?
नजिकच्या भविष्यात एखादी खास
नजिकच्या भविष्यात एखादी खास गोष्ट -cuty.
त्यासाठी गोचरी पाहणारे ज्योतिषी असतात. कोणती घटना केव्हा होणार सांगू शकतात.
पती - देवाचं करणारा, कुलदैवत वगैरे करणारा?
सस्मित, कशाबद्दल विचारणार?
सस्मित, कशाबद्दल विचारणार?
Srd बरोबर आहे . मात्र मला
Srd बरोबर आहे . मात्र मला मुले,पती आणि इतर जवळचे नातेसंबंध कसे असतील किंवा पुढे कसे राहतील हे जाणून घ्यायचे आहे.
जन्मतारीख २२.६. १९९९ ,जन्मवेळ
मोती नेहमी चांदीमध्ये धारण करण्यामागचे कारण व क्वचीत सोन्यामध्ये धारण करण्याचे कारण काय असते.
सस्मित, कशाबद्दल विचारणार?>>>
सस्मित, कशाबद्दल विचारणार?>>>> जनरल आढावा.
१४ डिसेंबर १९८२
सकाळी ६:४०
मुंबई
जनरल आढावा.
जनरल आढावा.?
by सस्मित
-
अधिकाराच्या जागेवर आहे का? किंवा सधन आहे. (साशंक आहे.) किंवा समाजात दबदबा ठेवेल.
शेजारी आणि भावंड - एक घाव दोन तुकडे संबंध?
परंपरा पाळणार.
पैशाची मदत करेल.
भाषा येतात?
>>>एकदा अशाच एका मोहिमेवर
>>>एकदा अशाच एका मोहिमेवर असताना हाडळीचा मुका घेताना तुम्हाला हाडळीच्या आशिकने पाहिलं आणि त्याने तुम्हाला श्राप दिला आणि त्या शापामुळे तुमचा मुर्त्यु झाला... उशाप म्हणून ह्या जन्मात तुम्हाला आफ्रिकेच्या जंगलात जाऊन शनिवारी पूर्णेमेच्या दिवशी त्याच हाडळीला खणा - नारळाची ओटी भरून हळद कुंकू वाहून आणि तसेच हाडळीच्या आशिकला टॉवेल टोपी, शर्टपीस, विड्याचे पान, सिगारेट आणि एक गावठी खंबा देऊन त्याचा यथायोग्य मान राखावा लागेल आणि मगच तुम्हाला मागच्या जन्माचं सगळं आठवेल सगळ्या सिद्धी पुन्हा आठवतील आणि तुम्हा पुन्हा सिद्ध पुरुष व्हाल>>>>
अर्रsssss
अज्जूबाबा जिभेला काय हाड हाय का नाय भो
गंमत म्हणजे आमच्या हाडळीनं व्हॉट्स्सप्प करून येथील गंमत निदर्शनास आणून दिली.
जाणकार लोकहो हाडळीच्या आशिकाची पत्रिका बघाल का? डकवायला मला..
जन्मतारीख 21/09/78 वेळ रात्री
जन्मतारीख 21/09/78 वेळ रात्री 12.50 (20 तारखेच्या रात्री 12.50) मुंबई
मेष रास
काही सांगू शकाल का प्लीज...
व्यवसायामध्ये स्थिरता कधी येइल..
अधिकाराच्या जागेवर आहे का?
अधिकाराच्या जागेवर आहे का? किंवा सधन आहे. (साशंक आहे.) किंवा समाजात दबदबा ठेवेल.>>>>> नाही.
शेजारी आणि भावंड - एक घाव दोन तुकडे संबंध?>>>नाही. भावंडांसाठी बर्यापैकी खरंतर जास्तच भावनिक.
परंपरा पाळणार.>> नो वे
पैशाची मदत करेल.>>>>>>>>> नाही
भाषा येतात?>>>>>>>>>>> कुठल्या? फक्त ३
काहीच जुळलं नाही.
हाडळीचा आशिक, तुम्हाला धनाचा
हाडळीचा आशिक, तुम्हाला धनाचा हांडा तुमची हडळ नक्की देणार.
Submitted by Aasmi
Submitted by Aasmi ,व्यवसायामध्ये स्थिरता कधी येइल..
पाच वर्षांनी वाटतेय. एक अंदाज.
व्यवसाय कमिशन एजन्सी - द्रवरूप पदार्थ, औषधे किंवा रंग रसायनं. करावा. हळूहळू पण दीर्घकाल रिटन. विमा एजन्सीचाही विचार करा.
((मन्युफ्याक्चरिंग/ट्रेडिंग नको.
सरकारदरबारी उच्चपदस्थ उपयोगी पडतील, कुठे मोठा लाभ होईल हे विचार सोडणे. ))
हाडळीचा आशिक, तुम्हाला धनाचा
हाडळीचा आशिक, तुम्हाला धनाचा हांडा तुमची हडळ नक्की देणार.>>>>
मला कुणी सांगेन का, कुंडलीवरनं जन्मतारीख काढता येते का ?
हाडळीचा आशिक,
हाडळीचा आशिक,
तुमचे प्रश्न/प्रतिसाद कळले नाहीत. किंवा रोख कळला नाही.
----
कुंडलीवरून जन्मतारीख काढणे ज्योतिषी प्रश्न नसून साधा गणिती प्रश्न आहे. त्याचे उत्तर पंचांगांतून कोणीही शोधू शकते.
-–------–
शिवाय दिलेले फलवर्णन हे कोणीही चार ज्योतिष पुस्तके वाचलेला सांगू शकतो इतके ढोबळ अंदाज आहेत. थोडे फार पटले तर तर त्याचा उपयोग होईल एवढेच.
एक विनोदी उत्तर -
एक विनोदी उत्तर -
समजा हडळ म्हणाली "धनाचा हंडा देईन पण एका अटीवर. तुम्ही माझ्यासंगं इथेच रानात राहायचं."
- रानात धनाचा उपयोगच काय?
शरदकाका माझ्या प्रतिसादांत
शरदकाका माझ्या प्रतिसादांत कुठला 'रोख' वा 'खाचाखोचा' खरोखर नाहीयेत.
अगदी सरळ शंका विचारलीय की कुंडलीवरनं जन्मतारीख काढता येते का..
ज्योतिष, कुंडली आणि पंचांग यांच्यातलं मला काहीही कळत नाही. पण कुंडलीवरनं स्वत:बद्दल जाणून घ्यायची इच्छा/उत्सुकता मात्र आहे.
एक विनोदी उत्तर -
एक विनोदी उत्तर -
समजा हडळ म्हणाली "धनाचा हंडा देईन पण एका अटीवर. तुम्ही माझ्यासंगं इथेच रानात राहायचं."
- रानात धनाचा उपयोगच काय?>>>
हा तर हाडळकुळाचा घरजावई होण्याचा योग
अगदी सरळ शंका विचारलीय की
अगदी सरळ शंका विचारलीय की कुंडलीवरनं जन्मतारीख काढता येते का..
ती पद्धत अशी - शनि ,युरेनस हे फार हळू फिरणारे ग्रह आहेत त्याचा उपयोग करून शोधाशोध दिशा मिळते.
-शनि अठ्ठावीस वर्षांनी त्याच राशीत म्हणजे त्याच आकड्याचा कुंडलीत दिसतो. कुंडलीतल्या शनिची रास पाहून मागे केव्हा त्या राशीत होता तिथे पोहोचायचं. पुन्हा त्या अडीच वर्षांच्या काळात युरेनस जमत नसेल तर आणखी अठ्ठावीस वर्षं मागे जायचं. एकदा ती अडीच वर्षं सापडली की गुरु,मंगळ असे जमवत नेमका महिना, तिथी रवि,चंद्रावरून शोधायची. रविच्या स्थानावरून दिवसा/रात्री केव्हाच्या दोन तासांत जन्म झाला हे समजते. सर्व ग्रह त्यात्या राशीचे सापडतील. चंद्राचे अंश लिहिले असतील तर अचूक वेळ आणि तीच कुंडली नक्की होते.
--------
हडळीचा आशिक, वर srd नी
हडळीचा आशिक, वर srd नी लिहिलेय तशा पद्धती वापरून रामायणातील वेळ ओळखायचे प्रयत्न झालेले आहेत. रामायणात काही ठिकाणीं अमुक वेळेस आकाशात कोणते ग्रह तारे दिसत होते याची वर्णने आहेत. त्यावरून प्रयत्न झाले. आता हे खरेच अचूक ठरले का याची मला माहिती नाही.
रस असेल तर खालील लिंक वाचा. मी पूर्ण वाचली नाही अजून.
http://www.shivashram.tripod.com/id14.html
@साधना,
@साधना,
जातकाच्या आयुष्यात साधारण पणे शनि तीनदा ( २८ गुणिले तीन = ८४) फिरतो आणि ही पद्धत पुरेशी आहे. ७५ पुढे भविष्य असं नसतंच.
पण दीर्घकालासाठी पद्धत उपयोगाची नाही.
संपातबिंदु मागे जातो आणि अक्षाचे परिवलन यामुळे आताच्या मीन राशीतला बिंदू वृषभेत होता, ध्रुव तारा मृग राशीत होता याची गणिते करून लोकमान्य टिळकांनी मंडाले तुरुंगात The Orion हा ग्रंथ लिहिला आहे. रामायणाचा काळ नक्की केला.
परंतू हा इंग्रजीतला ग्रंथ वाचला जात नाही.
(( टिळकांनी पुढे सायन -स अयन ग्रह पद्धतीच योग्य असे धरून टिळक पंचांग काढले. त्यामध्ये ग्रहणकाल बरोबर येत असे. ज्योतिषी लोकांनी विशेषत: भारतीय ज्योतिषींनी ते उचलले नाही. त्यांना निरयन ग्रहच लागतात. मग निरयन ग्रह देणेही सुरू झाले.
सर्व माहिती विश्वकोशात आहेच. 'तारा' , 'पंचांग' यामध्ये सापडेल.))
७५ पुढे भविष्य असं नसतंच. >>>
७५ पुढे भविष्य असं नसतंच. >>>>>>> नाही पटलं. मग ७५ वर्षांनंतर जे काय होतंय त्याला पूर्वाश्रमीचे भोगच म्हणायचे का?
म्हणजे भविष्यकाळ. कर्तृत्व
म्हणजे भविष्यकाळ. कर्तृत्व संपलेलं असतं. बरेच अर्थ निघू शकतात पण एकूण विचार काय?
Srd, माझा astronomy व
Srd, माझा astronomy व astrology दोघांचाही अभ्यास नाही तुम्ही देत असलेली माहिती खरेच इंटरेस्टिंग आहे (मराठीत काय म्हणू? रसदार आहे म्हटले पण रुचत नाही)
2000 वर्षांपूर्वी वेगळा तारा आपला ध्रुव होता, सध्या वेगळा आहे व अजून 2000 वर्षांनी वेगळा असणारे, तेव्हा कुठला तारा आपल्या अक्षअसमोर येणार हे शास्त्रज्ञांनी आजच हेरून ठेवलेय हे माहिती आहे.
माझा ज्योतिषाचा अभ्यास नाही पण निरीक्षणांती माझे एक मत आहे की ज्योतिषांनी ताऱ्यांचा उपयोग प्लेस होल्डर म्हणून केला असावा. म्हणजे जन्मवेळी आकाशात अशी स्थिती असेल तर आयुष्यात अमुक घटना घडतील वगैरे. म्हणजेच शनी अमुक ठिकाणी असला तर अमुक घडते वगैरे. यात घडवणारा प्रत्यक्ष तो दूर असलेला शनी नसून ज्योतिषांनी त्या प्रकारच्या रचनेत जसे घडते तसे नामानिधान केले. म्हणजे बुद्धिबळात राजा, वजीर, हत्ती काही नियम लावून मागेपूढे हलवून खेळ होतो तसा. प्रत्यक्ष जिवंत राजा, घोडा, वजीर त्या नियमांप्रमाणे चालत नाहीत. असे काहीसे.
मला असे वाटते, तुम्ही अभ्यास केलाय, तुमचे काय मत आहे?
ज्योतिषशास्त्र विकसित होताना ध्रुव व त्याला धरून इतर ताऱ्यांची जी स्थिती होती ती ध्रुवच बदलल्यामुळे आज नाही. याचा आजच्या कथनावर किती परिणाम होतो?
मुंबई मराठी
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या गिरगाव/दादर/ठाणे शाखेत ओरायन मिळू शकेल. आमच्या डोंबिवली नपा वाचनालयात मिळाले होते. त्याअगोदर सतरा वर्षांपूर्वी वाचायला नेल्याचा शिक्का होता.
विश्वकोश मात्र तिथेच पाहता येतात.
Pages