ज्योतिष चंद्रयोग

Submitted by y2j on 13 November, 2019 - 03:46

चंद्रयोग
ज्योतिषशास्त्रात लग्नाला तनुस्थान असे म्हणतात या स्थानी उपस्थित अथवा दृष्टी टाकणारे ग्रह त्यांच्या गुणधर्मानुसार लग्नावर प्रभाव टाकतात.
मन आणि शरीर कारक चंद्र याला सुद्धा लग्नाचा दर्जा प्राप्त असल्यामुळे चंद्रसोबत इतर ग्रहांचे योग व्यक्तीचे जातकाचे शारीरिक मानसिक स्वरूप ठरवतात.
चंद्राचे इतर ग्रहां सोबतचे अनेक योग होतात त्यांपैकी दोन योग हे महत्वाचे मानले जातात
युती योग आणि प्रतियुती योग , या दोन योगांची जवळपास सारखी फळे मिळतात.
चंद्रयोगाची फळे अभ्यासताना लग्न स्थानी होणारे ग्रहयोग ही पहावे लागतात. लग्न स्थान आणि चंद्र यांसोबत असणाऱ्या ग्रहांची एकत्रित फळे अभ्यासावी लागतात. तसेच ही युती कोणत्या राशीत व कोणत्या स्थानी होते हे पण पहावे लागते.

चंद्र गुरु युती योग- मनाला सकारात्मकता आणि शरीराला मजबुती देणारा हा योग आहे, हा योग असणाऱ्या व्यक्तीं नेहमी प्रसन्न असतात, संवाद कौशल्य उत्तम असते. गुरु या योगात चंद्रा सोबत असल्याने चांगलं वाईट ठरवण्याची उत्तम योग्यता देतो , समजदार वृत्ती असते, आलेल्या अडचणीवर सहज मार्ग काढतात, अध्ययन करण्याची आवड असल्याने विविध क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करतात. या व्यक्ती समाजात उत्तम प्रतिष्ठा राखून असतात.
धनु, मीन आणि कर्क राशीत हा योग खासकरून उत्तम फळे देतो ,मजबूत व उंच शरीरयष्टी असते उठावदार व्यक्तिमत्व असते. वृषभ आणि तुळ राशीत ही युती असता शरीरात चरबी चे प्रमाण जास्त असते, लठ्ठपणा येतो गुरूची प्रभावी फळे या राशींमध्ये मिळत नाहीत. मिथुन राशीत बुद्धाच्या चंचल वृत्तीमुळे या योगाची अतिशय प्रतिकूल फळे मिळतात .
चंद्र मंगळ योग- आक्रमक मंगळ चांद्रसोबत या योगात असल्याने या व्यक्ती कठोर मनाच्या, हट्टी असतात , मनोधैर्य उत्तम असते . आवाज मोठा व बोलणे आक्रमक असते ,सतत कार्यक्षम व स्थिर न बसण्याच्या वृत्तीमळे यांना कधी धनाची कमी भासत नाही. सतत धुमसत राहणे व प्रत्येक कृती तीव्र प्रतिक्रिया देऊन करणे यामुळे या व्यक्तींना अपघात , शरीराला जखमा इजा होणे या गोष्टींना नेहमी सामोरे जावे लागते, 1,2,7,8 या स्थानी ही युती असल्यास लहानसहान अपघात नित्याचे असतात. गुरु , शुक्र असे शुभ ग्रह या योगात असल्यास रागावर नियंत्रण असते.
मेष , सिंह, वृश्चिक, मकर राशीत या योगाची अतिशय प्रभावी फळे मिळतात मिथुन आणि कन्या राशीत हा योग असणाऱ्या व्यक्ती टवाळखोर मस्करी करणारे आढळतात.
चंद्र शनि युती- पीडाकारक आणि संथ शनि या योगात चंद्रासोबत असल्याने मनावर नकारात्मकता हावी असते , हा योग असणाऱ्या बहुतेक व्यक्ती या वर्णाने काळ्या सावळ्या असतात, आळशी वृत्ती असते, विचारात संथपणा असतो असं असल तरी हा योग काही चांगली फळे ही देतो , या व्यक्ती जास्त भावनिक नसतात त्यामुळं हा योग एकप्रकारचा कोडगेपणा देतो, समोर काही घडलं की काहीही प्रतिक्रिया न देणे, लगेच व्यक्त न होणे यामुळं या व्यक्ती अहंकारी वाटू शकतात, हा योग व्यक्तीला अंतर्मुख बनवतो तसेच उदास वृत्तीमळे पारमार्थिक ज्ञान प्राप्त होते तसेच ध्यानधारणा , गुप्तविद्या अशा गूढ विषयांमध्ये रुची निर्माण होते.
चंद्र सूर्य युती- सूर्य ग्रह या योगात चंद्रसोबत असल्याने उग्र मुद्रा असते, तेजस्वी चेहरा असतो हा योग असलेल्या व्यक्ती करारी असतात बोलणे अधिकारवाणीचे असते , धारदार भारदस्त आवाज असतो या व्यक्तींकडे मनाची स्थिरता अधिक असल्यामुळे विषयभोगाकडे ओढा कमी असतो, अभिमानी वृत्तीमुळे इतरांशी लगेच जमवून घेणे यांना जमत नाही या व्यक्तीना चंचल स्वभाव , विनाकारण बडबड करणे असल्या स्वभावाची चीड असते. मेष , सिंह, वृश्चिक , धनु राशीत ही युती असल्यास दमदार व्यक्तिमत्व देतो.
चंद्र शुक्र युती- सौंदर्यकारक शुक्र ग्रह या योगात चांद्रासोबत असल्याने व्यक्ती आकर्षक स्वभावाच्या असतात , ह्या व्यक्ती सतत हसतमुख उत्साही असतात ,हा योग असणाऱ्या व्यक्ती गौर्वरणीय आणि सुंदर असतात , चेहरा रेखीव व मोहक असतो, आवाज काहीसा कोमल असतो, जीवनातील सगळी सुख भोगण्याकडे कल असतो , या व्यक्तींचे सौंदर्य शंभर जणांमधून उठून दिसणारे असते , वृषभ , तुळ , कर्क या राशीत ही युती असता व्यक्ती अतिशय गौर्वरणीय आणि सुंदर असते , स्त्रियांना खासकरून हा योग उत्तम लाभतो.
चंद्र बुध युती - बुध ग्रह या योगात चंद्रा सोबत असल्याने या व्यक्तीचे बोलणे चतुरस्र असते ,चौकस वृत्ती असते, बोलण्यात हजरजबाबी पणा असतो, हा योग असणाऱ्या व्यक्तीची निरीक्षण शक्ती उत्तम असते त्यामुळं दुसऱ्यांच्या सवयी , बोलण्याच्या लकबी लक्षात ठेऊन त्यांच्या नकला करण यांची आवड असते , बऱ्याच कॉमेडियन व्यक्तीच्या कुंडलीत हा योग आढळतो. मिथुन आणि कन्या राशीत या योगाची प्रभावी फळे मिळतात.
चंद्र राहू युती- पापी आणि दुःख पिडाकरक राहू या योगात चंद्रा सोबत असल्याने मन आणि शरीरावर अतिशय प्रतिकूल परिणाम करतो हा योग असणाऱ्या व्यक्तीचे शरीर अक्रसल्यासारखे असते, मनाचे सत्व नष्ट झाल्यामुळे दीनवाणी मुद्रा असते , मानसिक विकार असतात , आवाज ओढून काढल्यासारखा बारीक असतो. पक्षाघात यासारखे आजार होऊ शकतात.
चंद्र केतू युती - कर्कश अनियंत्रित केतू या युतीत चंद्रा सोबत असल्याने हा व्यक्ती एक प्रकारच्या भ्रमात कृती करत असतात , बुद्धीला एक प्रकारची बधिरता येते , हा योग मनाची जाणीव दक्षता नष्ट करत असल्यामुळं मानसिक व शाीरिक व्याधी नित्याच्या असतात काही व्यक्तींच्या बाबतीत फिट येणे यासारखे प्रकार घडतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> षडाष्टक योग कसा बनतो व त्याचे परिणाम काय होतात>>>>>>
कर्क व कुंभ राशीचा षडाष्टक योग असतो. मला तरी कुंभ व्यक्ती म्हणजे चक्क ट्रॉमा होतो. २ अनुभव आहेत. म्हणजे ती व्यक्ती वाईट असते असा अजिबात नाही बरं का. पण असे प्रसंग येतात की आमचं जमत नाही, बेबनाव होतात, आम्ही एकमेकांना समजू शकत नाही. खरं तर दोन्ही वेळा ट्रॉमा (मृत्युमय वेदना) च अनुभवल्या आहेत. असो.
मग त्यामानाने, तूळ (स्क्वेअर विथ कर्क) परवडले. आमचंही पटत नाही पण त्या नात्यात एक ग्रोथ असते, ना तेरा ना मेरा तिसरीच दिशा घेउन, त्या दिशेने खूप प्रगती होते.

>>>>> नाही पटत Uhoh>>>>
व्हाय? y2j पण षडाष्टक योग वाईटच म्हणतात ना?

तुम्ही दिलेली जन्मवेळ बरोबर आहे ना या कुंडलिनुसार तुमचा भाऊ विवाहसंबंध बिघडल्यामुळे किंवा प्रेमप्रकरण यामुळे घर सोडून गेला असावा, >>> त्याने चिठ्ठीत कर्जाचे कारण लिहिले आहे.

त्याच्या कुंडलीत आत्महत्या करण्याचे चे काही योग दिसत नाहीत त्याने जवळचा मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडे आश्रय घेतला असावा, पुढील दोन तीन महिन्यात घरवापसी ची शक्यता दिसते. >>> असेच होऊ दे रे देवा!

@ रश्मी
गेल्या सात दिवसात काय काय केले आणि कुठे कुठे गेलो याची गणती नाही. भाऊ परत यावा म्हणून कोण काय सांगेल ते सगळे उपाय केले, ज्याचा काही उपयोग झाला नाही. आता चांगला ज्योतिषी कुठे शोधू?

@हाब
सगळ्यात पहिले पोलिस कम्लेंटच केली. तसेच रोज पाठपुरावाही सुरूच आहे. सोबत इतरही गोष्टी सुरु आहेत. हाॕस्पिटल्स, रेल्वे स्टेशन सगळीकडे शोध घेतला. अजून बर्याच प्रॕक्टिकल गोष्टी सुरु आहेत.

इथे y2j बिनधास्त सांगा.
चांडाळ योग? (गुरु-राहू युती)
पण तो योग एकप्रकारे, राहूचे दुष्परीणाम अतिशय कमी करतो.

Screenshot_2019-11-18-23-45-26-777_com.ojassoft.astrosage.png

याबद्दल काय अंदाज? माझ्या आयुष्यात इतक्यातच काही बदल झालेत, आणि काही होणार आहेत. ओळखा पाहू!

Y2j सर..

माझ्या मित्राच्या कुंडलीविषयी सांगा जरा..
खुप डिप्रेस आहे सध्या..म्हणजे त्याचा संघर्ष संपतच नाहीये...खचला आहे तोंड देता देता.

विपू केलेला आहे.
पण त्या योगाला काही नाव तर असेल. ते तरी सांगा इथे.
बाकी अगदी जगा वेगळे अशुभ माझ्याबरोबर काही घटलेले आठवत नाही

निल्सन धीर धर. तुमची जी कुलदेवता असेल तिला साकडे घाल. घातलं असशील तर उत्तमच आहे. कारण जशी आपली आई, तशी कुलदेवता कुटुंबाची आई आहे. दादरला धोंडोपंत आपटे चांगले ज्योतिष्यी आहेत. त्यांचा पत्ता काढ. ते नक्षत्र गणितावरुन अचूक उत्तरे देतात.

नाहीतर डोंबिवली मध्ये म. दा . भट किंवा व. दा . भट हे एक नावाजलेले ज्योतिष्यी आहेत. ठाण्यात सुनील गोंधळेकर होते, पण ते नुकतेच गेले. मी ज्योतिश्य्याला विचारा का सांगतेय तर नक्षत्रावरुन माहिती अचूक समजते. आणी समजा तुझ्या भावाला घरी यावेसे वाटत आहे, पण वर दिलेल्या कारणामुळे ( चिठ्ठीत कर्जाचे कारण ) त्याच्याजवळ पैसा उरला नसेल, किंवा तो अजून काही टेन्शन मध्ये असेल तर त्याच्याशी तुम्ही संपर्क साधु शकाल.

मी आशा करते की तो सुखरुप असेल व लवकरच घरी येईल.

नाहीतर डोंबिवली मध्ये म. दा . भट किंवा व. दा . भट हे एक नावाजलेले ज्योतिष्यी आहेत.>>>> म.दा गेले. व.दा आहेत पण ते पुणे स्थित. डोंबिवली त आहेत ते श्री श्री भट

@ y2j , आपले भविष्य अचूक आहे. त्या मंगळ ग्रहदशेत, माझ्यावर खरच गंडांतर आले होते. फक्त नवर्‍याच्या आधारावर, सेवेवर मी त्यातून वाचले.

Pages