चंद्रयोग
ज्योतिषशास्त्रात लग्नाला तनुस्थान असे म्हणतात या स्थानी उपस्थित अथवा दृष्टी टाकणारे ग्रह त्यांच्या गुणधर्मानुसार लग्नावर प्रभाव टाकतात.
मन आणि शरीर कारक चंद्र याला सुद्धा लग्नाचा दर्जा प्राप्त असल्यामुळे चंद्रसोबत इतर ग्रहांचे योग व्यक्तीचे जातकाचे शारीरिक मानसिक स्वरूप ठरवतात.
चंद्राचे इतर ग्रहां सोबतचे अनेक योग होतात त्यांपैकी दोन योग हे महत्वाचे मानले जातात
युती योग आणि प्रतियुती योग , या दोन योगांची जवळपास सारखी फळे मिळतात.
चंद्रयोगाची फळे अभ्यासताना लग्न स्थानी होणारे ग्रहयोग ही पहावे लागतात. लग्न स्थान आणि चंद्र यांसोबत असणाऱ्या ग्रहांची एकत्रित फळे अभ्यासावी लागतात. तसेच ही युती कोणत्या राशीत व कोणत्या स्थानी होते हे पण पहावे लागते.
चंद्र गुरु युती योग- मनाला सकारात्मकता आणि शरीराला मजबुती देणारा हा योग आहे, हा योग असणाऱ्या व्यक्तीं नेहमी प्रसन्न असतात, संवाद कौशल्य उत्तम असते. गुरु या योगात चंद्रा सोबत असल्याने चांगलं वाईट ठरवण्याची उत्तम योग्यता देतो , समजदार वृत्ती असते, आलेल्या अडचणीवर सहज मार्ग काढतात, अध्ययन करण्याची आवड असल्याने विविध क्षेत्रातील ज्ञान प्राप्त करतात. या व्यक्ती समाजात उत्तम प्रतिष्ठा राखून असतात.
धनु, मीन आणि कर्क राशीत हा योग खासकरून उत्तम फळे देतो ,मजबूत व उंच शरीरयष्टी असते उठावदार व्यक्तिमत्व असते. वृषभ आणि तुळ राशीत ही युती असता शरीरात चरबी चे प्रमाण जास्त असते, लठ्ठपणा येतो गुरूची प्रभावी फळे या राशींमध्ये मिळत नाहीत. मिथुन राशीत बुद्धाच्या चंचल वृत्तीमुळे या योगाची अतिशय प्रतिकूल फळे मिळतात .
चंद्र मंगळ योग- आक्रमक मंगळ चांद्रसोबत या योगात असल्याने या व्यक्ती कठोर मनाच्या, हट्टी असतात , मनोधैर्य उत्तम असते . आवाज मोठा व बोलणे आक्रमक असते ,सतत कार्यक्षम व स्थिर न बसण्याच्या वृत्तीमळे यांना कधी धनाची कमी भासत नाही. सतत धुमसत राहणे व प्रत्येक कृती तीव्र प्रतिक्रिया देऊन करणे यामुळे या व्यक्तींना अपघात , शरीराला जखमा इजा होणे या गोष्टींना नेहमी सामोरे जावे लागते, 1,2,7,8 या स्थानी ही युती असल्यास लहानसहान अपघात नित्याचे असतात. गुरु , शुक्र असे शुभ ग्रह या योगात असल्यास रागावर नियंत्रण असते.
मेष , सिंह, वृश्चिक, मकर राशीत या योगाची अतिशय प्रभावी फळे मिळतात मिथुन आणि कन्या राशीत हा योग असणाऱ्या व्यक्ती टवाळखोर मस्करी करणारे आढळतात.
चंद्र शनि युती- पीडाकारक आणि संथ शनि या योगात चंद्रासोबत असल्याने मनावर नकारात्मकता हावी असते , हा योग असणाऱ्या बहुतेक व्यक्ती या वर्णाने काळ्या सावळ्या असतात, आळशी वृत्ती असते, विचारात संथपणा असतो असं असल तरी हा योग काही चांगली फळे ही देतो , या व्यक्ती जास्त भावनिक नसतात त्यामुळं हा योग एकप्रकारचा कोडगेपणा देतो, समोर काही घडलं की काहीही प्रतिक्रिया न देणे, लगेच व्यक्त न होणे यामुळं या व्यक्ती अहंकारी वाटू शकतात, हा योग व्यक्तीला अंतर्मुख बनवतो तसेच उदास वृत्तीमळे पारमार्थिक ज्ञान प्राप्त होते तसेच ध्यानधारणा , गुप्तविद्या अशा गूढ विषयांमध्ये रुची निर्माण होते.
चंद्र सूर्य युती- सूर्य ग्रह या योगात चंद्रसोबत असल्याने उग्र मुद्रा असते, तेजस्वी चेहरा असतो हा योग असलेल्या व्यक्ती करारी असतात बोलणे अधिकारवाणीचे असते , धारदार भारदस्त आवाज असतो या व्यक्तींकडे मनाची स्थिरता अधिक असल्यामुळे विषयभोगाकडे ओढा कमी असतो, अभिमानी वृत्तीमुळे इतरांशी लगेच जमवून घेणे यांना जमत नाही या व्यक्तीना चंचल स्वभाव , विनाकारण बडबड करणे असल्या स्वभावाची चीड असते. मेष , सिंह, वृश्चिक , धनु राशीत ही युती असल्यास दमदार व्यक्तिमत्व देतो.
चंद्र शुक्र युती- सौंदर्यकारक शुक्र ग्रह या योगात चांद्रासोबत असल्याने व्यक्ती आकर्षक स्वभावाच्या असतात , ह्या व्यक्ती सतत हसतमुख उत्साही असतात ,हा योग असणाऱ्या व्यक्ती गौर्वरणीय आणि सुंदर असतात , चेहरा रेखीव व मोहक असतो, आवाज काहीसा कोमल असतो, जीवनातील सगळी सुख भोगण्याकडे कल असतो , या व्यक्तींचे सौंदर्य शंभर जणांमधून उठून दिसणारे असते , वृषभ , तुळ , कर्क या राशीत ही युती असता व्यक्ती अतिशय गौर्वरणीय आणि सुंदर असते , स्त्रियांना खासकरून हा योग उत्तम लाभतो.
चंद्र बुध युती - बुध ग्रह या योगात चंद्रा सोबत असल्याने या व्यक्तीचे बोलणे चतुरस्र असते ,चौकस वृत्ती असते, बोलण्यात हजरजबाबी पणा असतो, हा योग असणाऱ्या व्यक्तीची निरीक्षण शक्ती उत्तम असते त्यामुळं दुसऱ्यांच्या सवयी , बोलण्याच्या लकबी लक्षात ठेऊन त्यांच्या नकला करण यांची आवड असते , बऱ्याच कॉमेडियन व्यक्तीच्या कुंडलीत हा योग आढळतो. मिथुन आणि कन्या राशीत या योगाची प्रभावी फळे मिळतात.
चंद्र राहू युती- पापी आणि दुःख पिडाकरक राहू या योगात चंद्रा सोबत असल्याने मन आणि शरीरावर अतिशय प्रतिकूल परिणाम करतो हा योग असणाऱ्या व्यक्तीचे शरीर अक्रसल्यासारखे असते, मनाचे सत्व नष्ट झाल्यामुळे दीनवाणी मुद्रा असते , मानसिक विकार असतात , आवाज ओढून काढल्यासारखा बारीक असतो. पक्षाघात यासारखे आजार होऊ शकतात.
चंद्र केतू युती - कर्कश अनियंत्रित केतू या युतीत चंद्रा सोबत असल्याने हा व्यक्ती एक प्रकारच्या भ्रमात कृती करत असतात , बुद्धीला एक प्रकारची बधिरता येते , हा योग मनाची जाणीव दक्षता नष्ट करत असल्यामुळं मानसिक व शाीरिक व्याधी नित्याच्या असतात काही व्यक्तींच्या बाबतीत फिट येणे यासारखे प्रकार घडतात.
धन्यवाद अंजू...फार कंटाळा
धन्यवाद अंजू...फार कंटाळा आलाय...दिशाहीन धडपडीचा.... मी काही तोडगे करणार नाही...विश्वास नाही...अशात तर कशाचाच काही वाटत नाही...चमत्काराची वाट बघणं पण थांबवल...पत्रिका पण पहिल्यांदाच दाखवत आहे...मुलगी खूप गोड़ आणि हुषार आहे... दोन आयुष्य वाया गेले..
धन्यवाद srd
आदिश्री धीर सोडू नका. मुलीला
आदिश्री धीर सोडू नका. मुलीला तुमच्या धीराची गरज आहे. तुम्हीच हात पाय गाळले तर कसे होणार? देवाचे करा. मनाला उभारी मिळते आणि हे नक्की लक्षात घ्या ज्यांच्यावरती संकटांचे पहाड कोसळतात त्यांची वाईट कर्मबीजे पटापट जळत असतात. भविष्य उज्ज्वलच आहे कारण तुम्ही आत्ता कर्ज भरभर फेडून टाकताय.
कर्मबीजे जाळण्याचा अजुन एक उपाय 'राम नाम'. 'रं' अग्नीतत्वाचे बीज आहे. कर्मबीजे सूक्ष्म असतात त्यांना जाळायला सूक्ष्मातीलच उपाय हवा. असो!!
तुमच्याकरता प्रार्थना करेन. कधीही विपू करत जा.
अजय जी तुमच्या मित्राच्या
अजय जी तुमच्या मित्राच्या कुंडलीत अध्यात्मिक योग चांगलाच आहे घरापासून दूर भाग्योदय दिसतोय, ज्या ठिकाणी सतत प्रवास करावा लागतो असे कार्यक्षेत्र निवडल्यास उत्तम, लॉटरी ,शेअर्स गुंतवणूक, या क्षेत्रात फायदा दिसतोय नशीब अजमावून बघायला हरकत नाही, काही वर्षांनी येणाऱ्या राहू दशेत परिस्थती आणखीन बिकट होईल असे दिसते
आदिश्री, a big hug....अजून
आदिश्री, a big hug....अजून काहीच करू शकत नाही...
धन्यवाद srd ,गंमत म्हणजे
धन्यवाद srd ,गंमत म्हणजे बोकलत यांच्या कुंडलीतील चंद्र- बुध योग अखंड मायबोली ला छळत आहे
कर्म हे कारण देखील आहे आणि
कर्म हे कारण देखील आहे आणि कार्य देखील. चालू काळात आपण करत असलेले कर्म हे बऱ्याच अंशी कार्य आहे जे पुढे संचित बनून देणाऱ्या फलात कारण म्हणून प्रामुख्याने असते. हा कार्यकारण भाव सृष्टीतील इतर सर्व गोष्टींप्रमाणे देशील नाशवंत आहे. म्हणजेच कर्मफळाच्या प्रमुख कारणाला योग्य पद्धतीने विरोध केला तर कर्मबीज जळण्यास किंवा संचित कर्माचे गाठोडे कमी होण्यास किंवा मिळणाऱ्या निकालाची तीव्रता कमी करण्यास मदत होते. काहीच केले नाही तर कर्माचा ऱ्हास भोगून होतो.
आता संचित कर्माचे गाठोडे किती जड आहे यावरून त्यावरच्या केलेल्या उपायात फरक दिसतो. अनेकदा संचित कर्म जाळण्यासाठी योग्य उपाय सापडला आणि केला तर फरक दिसतो. अनेकदा अनेक उपाय करूनही फरक दिसत नाही कारण गाठोडे खूप जड असते पण त्याचा अर्थ असा नाही कि फरक पडत नसतो...फक्त तो जाणवत नसतो इतकेच. म्हणून काही उपाय जसे की नामस्मरण, उपासना सतत करत राहावी. अनेकदा दीर्घकालीन उपायांनी फरक पडतो. समजा कर्मामुळे एखादा रोग १० वर्षे त्रास देणार असेल आणि आपण २-३ महिने उपाय करून कंटाळून सोडून दिले तर केलेल्या उपायांनी कदाचित तो रोग ६-७ वर्षच त्रास देईल. जर उपाय सुरु ठेवले असते तर कदाचित वर्षभरात रोगमुक्तही होता आले असते. केलेला उपाय बरोबर आहे की नाही हे मात्र कळणे फार कठीण. जर दैवी शक्ती मागे असेल तर योग्य ते संकेत मिळत असतात. आपण फक्त जागृत असायला हवे.
दोन उदाहरणे देतो. एकदा एक भक्त गोंदवलेकर महाराजांच्या कडे आला आणि म्हणाला तुम्ही सांगितले त्याप्रमाणे मी गेली अनेक वर्षे रामनामाचा जप करत आलोय आणि माझा १३ कोटी रामनामाचा जप पूर्ण झाला परंतु तुम्ही म्हणाला तसे १३ कोटी जपानंतरसुद्धा रामाचे दर्शन झाले नाही. तेंव्हा महाराज म्हणाले मध्ये तुझा मुलगा संकटात होता तेंव्हा तू रामाला संकटातून बाहेर काढण्यासाठी कळवळून प्रार्थना केली होतीस ना? भक्त हो म्हणाला. तसेच तुझी बायको खूप आजारी होती तेंव्हा ती लवकर बरी होऊ दे म्हणून देखील तू रामाला साकडे घातलेलेस ना? तेंव्हा त्यालाही भक्त हो म्हणाला. महाराज म्हणाले, तुझ्या प्रार्थनेने आणि साकडे घालण्यामुळे रामाने त्यांच्यावरील संकट सोडवले परंतु यामध्ये त्यांचे कर्म जाळायला तुझे पुण्य खर्ची पडले (गोष्टीमधला आकडा नक्की आठवत नाही परंतु महाराज ६ कोटी म्हणाले होते बहुतेक).
सांगायचा मुद्दा हा की अनेकदा कर्मभोगाचे भोगायचे गाठोडे फार मोठे असेल तर ते सोडवण्यासाठी उपायदेखील दीर्घकालीन असू शकतात. परंतु अनेकदा आपले प्रयत्न किंवा वेळ किंवा दोन्ही अपुरे पडतात.
दुसरी घडलेली घटना आहे. तूनळी वर विडिओ पाहिला त्यात सांगितलेली. एकदा एका आचार्यांनी गायत्रीचे २० पुरश्चरण केले (गायत्रीचा एक पुरश्चरण म्हणजे २४ लाख वेळा गायत्री मंत्रजप) तरीही त्यांना हवे तसे फळ मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी एका मोठ्या आचार्यांच्या सांगण्यावरून भैरव साधना केली. त्यांच्या साधनेने भैरव प्रसन्न झाले आणि वर मागायला सांगितले. परंतु भैरव समोर आले नव्हते. त्या आचार्यांनी त्या भैरवाला समोर येण्याची विनंती केली तेंव्हा भैरव म्हणाले की गायत्रीतपाने आपल्याभोवती जे तेजोवलय आहे त्यासमोर येण्यास मी असमर्थ आहे. आचार्यांना एकदम जाणीव झाली की गायत्री तपाचे पुण्य चांगलेच जमा झाले आहे आणि सुरुवातीला बरेचसे पुण्य काही पूर्वीचे कर्मबंधन कापण्यात गेले आणि आपण फक्त अज्ञानाने बाहेरून फरक न वाटल्याने साधना अपुरी सोडली. नंतर त्या आचार्यांनी पुन्हा साधना केली आणि २४ पुरश्चरणानंतर त्यांना गायत्री देवीचे दर्शन झाले.
थोडक्यात काय तर साधना, नामस्मरण, तप हे व्यर्थ जात नाही. काही ना काही फायदा जरूर होतो. फक्त करत राहावे एवढेच. बाकी या सगळ्यावर विश्वास नसल्यास सरळ दुर्लक्ष करावे....तसेही कर्म भोगून संपतेच...फक्त योग्य निर्णय दिशादर्शक नक्कीच ठरू शकतो.
माझा कर्मसिद्धांतावरती
माझा कर्मसिद्धांतावरती विश्वास आहे.
कोहंसोहं +१००१
__________________
चतुराननें कुश्चितकर्माच्या ओळी । लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी ॥
पुसोनि चरणा तळी पदसुमने क्षाळी । मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥
धन्यवाद y2j.
धन्यवाद y2j.
विवाहस्थानी मीनेचा चंद्र असेल
विवाहस्थानी मीनेचा चंद्र असेल तर कस फळ मिळत?
कोसो धन्यवाद.
कोसो धन्यवाद.
@ me_rucha ,
@ me_rucha ,
वाईट नाही. मित्र मैत्रिणीच्या ओळखीत ,समारंभात वगैरे लग्न ठरू शकते.
पण लग्नजीवन पाहायचे झाल्यास ( तुमच्या कुंडलीकरता) गुरु कुठे हे पाहावे लागेल.
धन्यवाद सामो आणि साधना....y2j
धन्यवाद सामो आणि साधना....y2j रश्मी जिद्दु सांगता का बघून ....
शरद काका, लग्न अरेंज मॅरेज
शरद काका, लग्न अरेंज मॅरेज झालेलं आहे. गुरु पाचव्या स्थानी आहे. हो हे माझ्याच बाबतीत विचारतीये.
आदीश्री तुमच्या कुंडलीत बरेच
आदीश्री तुमच्या कुंडलीत बरेच कुयोग आहेत इथे सांगून काही उपयोग नाही 10 वर्षांनी जरा बरी परिस्थिती येईल असे दिसतेय, बाकी कोसो आणि सामो यांनी मार्गदर्शन केले आहेच.
कुंडलीत बरेच कुयोग
कुंडलीत बरेच कुयोग
-
-
ज्योतिष शिकताना हे समोर येतात आणि सुयोग खरे नाही ठरले, लोकांनी तुम्हाला कळत नाही म्हटलं तरी चालतं.
परंतू कुयोग मात्र दुर्दैवाने खरे का ठरतात?
मला एक प्रश्न पडतो की अशा जातकांनी नक्की काय करायचे? आपल्याकडे उत्तर नाही व हताशपणा पाहवत नाही. मग अगोदर हे समजून मला काय मिळाले? शिवाय काही अवांछित घटना पुढे कधीतरी घडणार आहेत पण आता जातक आनंदी आहे. सर्व काही छान आहे. त्यास "पुढचे कठीण आहे" सांगून दुखवायचं, चिंतेत टाकायचं का हा विचार सतावतो.
वाटतं ज्योतिष न समजलेलंच बरं.
-------
करिअर/नोकरी/शिक्षण/परदेश गमन यातली गती पाहणं आणि ज्योतिषविषयक सल्ला हा थोडा ठीक वाटतो. त्याचा उपयोग जातकास नक्कीच होतो.
Srd सहमत पण आपण काय करू शकतो,
Srd सहमत पण आपण काय करू शकतो, आदी यांचा अजून बराच वाईट काळ जायचा आहे त्याची कल्पना द्यायला हवी, शेवटी नशिबाचे भोग हे त्यांनाच भोगून संपवावे लागतील, कामधंदा सांभाळून मधल्या मधल्या वेळात दैवतांची नियमित उपासना करणारे काही लोक पाहतो, आदी यांच्यासाठी ही हाच मार्ग आहे.
Srd, हा प्रश्न सगळ्याच
Srd, हा प्रश्न सगळ्याच ज्योतिषांना सतावत असेल.
माझ्या ओळखीत एका मुलीने गेल्याच आठवड्यात आपली जीवनयात्रा संपवली. तिच्या कुंडलीत बरेच कुयोग होते हे सगळे ज्योतिषी सांगत होते, तिची फसगत होणार हे भाकीत होते, अमुक एका काळापर्यंत तिचे लग्न करू नका वगैरे सल्ले मिळत होते. ज्योतिषी यापेक्षा अजून किती स्पष्ट बोलणार? आता घटना घडून गेल्यावर सगळे सांगायला लागले की मृत्यूयोग टळणे अशक्य होते. घरातले ते ऐकून स्वतःचे सांत्वन करून घेतात की तिची आयुष्याची दोरी तितकीच होती, तेवढाच सहवास होता. घडणारे दिसत असूनही ते आधीच सांगून उद्याचे मरण आजच मरायला लावणे यासाठी ज्योतिष विद्या जन्माला आली नाही असे मला वाटते.
जन्मतारीख २२.६.१९९९, जन्मवेळ
जन्मतारीख २२.६.१९९९, जन्मवेळ दुपारी १२.१० वा. विवाह योगाविषयी काय सांगाल
y2j,
y2j,
खालील पत्रिकेनुसार व्यवसाय करणे कितपत अनुकूल आहे? तसेच ह्या पत्रिकेबद्दल तुमचे काही विशेष निरीक्षण आहे का?
या व्यक्तीने शिकवायची नोकरी
या व्यक्तीने शिकवायची नोकरी आपली धरावी. मोठ्या लोकांच्या ओळखी आहेत. त्याला स्वत:ला कसली आवड आहे त्याचा व्यवसाय करायचा असेल. धरसोड.
एक श्टोरी.
एक श्टोरी.
मी दहावीत,भाऊ आठवीत, एकजण आमच्या घरी आलेला. दिसायला यथातथाच. मृत्ययोग सांगतो असे कळले. भावाने उत्सुकता दाखवली.
"अरे ,काय वेडा आहेस का? मी बघ काय अवस्था करून घेतली आहे या विद्येच्या नादी लागून."
धन्यवाद y2j...तुम्ही वेळ
धन्यवाद y2j...तुम्ही वेळ काढून पाहिले. ..निराशाजनक आहे पण इतक्या वर्षात सवय झाली आहे. ...ध्यान व जप कित्येक वर्षे करते आहे. ....पण अजून दहा वर्षांनी सुद्धा "जरा बरी" म्हणजे सगळे आयुष्य पणाला लागले आहे याचे वाईट वाटते. .....कशाची शिक्षा मिळत आहे हे सुद्धा कळायचा मार्ग नाही. ...आत्मविश्वास गेला आहे. ..आयुष्यावरचा विश्वास पण उडालाय. ...सकारात्मक असते most of the time....पण प्रश्न खूप आहेत. ...ध्यानात खूप प्रगती होत आहे. ..खूप गूढ अनुभव येत आहेत. ..पण संसारात फार अपयशी आहे. ...याचे गणित जुळता जुळत नाही. .....
"ध्यानात खूप प्रगती होत आहे.
"ध्यानात खूप प्रगती होत आहे. ..खूप गूढ अनुभव येत आहेत-----> ध्यानात खूप प्रगती होत आहे हे चांगले आहे. y2j तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतीलच. परन्तु मी म्हणेन की संसारातील यशापयशाबद्दल शक्य तेवढे स्थितप्रज्ञ राहण्याचा प्रयत्न करावा आणि सर्व लक्ष्य ध्यानात प्रगती कशी होईल याकडे लावावे (सांगणे सोप्पे आहे पण करणे महा कठीण याची कल्पना आहे). शेवटी संसार हा अल्पकाळचा आहे परंतु पुण्याची शिदोरी आणि योगमार्गातील प्रगती अनेक जन्मे साथ देते. आत्ताची परिस्थिती चांगली नसल्यास नकोश्या कर्माचा एक मोठा वाटा कमी होतोय आणि धर्मकार्य (उपासना, ध्यान, योग्य इत्यादी) त्यामुळे भविष्य सुखकर असेल याची हमी बाळगावी. कृष्णाने गीतेत म्हणलेच आहे- स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् (गीता २:४०)
मुलीच्या कुंडलीत आठव्या घरात,
मुलीच्या कुंडलीत आठव्या घरात, बरेच ग्रह आहेत (के, शु, यु व ने) त्यामुळे काळजी वाटते म्हणुन एका मैत्रिणीला कुंडली पहायला सांगीतली होती तर तिला वाटले की मी, मुलीची अफेअर्स होतील म्हणुन काळजी करते आहे. पण तसे नव्हते. मला आठवे घर हे मृत्युस्थान असल्यामुळे, अल्पायुष्य किंवा गंडांतर याबद्दल माहीती हवी होती
असो. मीच तिला मोघम विचारले होते त्यामुळे तिला कसे कळणार मला काय भीती वाटत होती ते.
___________
कोणाला या ग्रहस्थितीबद्दल, काही माहीत असल्यास जरुर लिहा.
आत्मविश्वास गेला आहे. .
आत्मविश्वास गेला आहे. ..आयुष्यावरचा विश्वास पण उडालाय. ...सकारात्मक असते most of the time....पण प्रश्न खूप आहेत. ...ध्यानात खूप प्रगती होत आहे. >>> ह्यातलं ध्यानात प्रगती सोडून बरीच मी आहे. ध्यान वगैरे मला नाही जमत. ग्रेट आहात तुम्ही.
फक्त माझ्यासाठी प्लस पॉइंट हा की माझी भावंडं जवळ आहेत आणि हेल्पफुल आहेत. आम्हा दोघांना कुठल्याही प्रकारची मदत त्यांच्याकडून मिळू शकते. सासरची जवळची लोकंपण हेल्पफुल आहेत, फक्त लांब आहेत जरा. ह्या सर्वांत थोडी मानसिक उभारी मिळते. प्रत्यक्ष फार क्वचित मदत घेतो आम्ही पण ते पाठीशी आहेत हे मानसिक समाधान मिळतं.
तुम्ही धीर सोडू नका, आपण स्ट्राँग आणि सकारात्मक रहायचं. कोलमडलो तरी परत उठायचं. लवकर नीट सर्व होऊदे सकारात्मक तुमच्याबाबतीत, हीच प्रार्थना. ध्यानातच कधीतरी तुमची तुम्हाला उत्तरं मिळतील आणि योग्य मार्ग सापडेल.
१२ व्या घरातील शनि खडतर असतो
१२ व्या घरातील शनि खडतर असतो बहुधा, @कुंपणावरती.
१२ व्या घरातील शनि खडतर असतो
१२ व्या घरातील शनि खडतर असतो बहुधा,
_ भावनाविवश न होता खर्च करणाऱ्या शनिला योग्य स्थान आहे.
-----------
>>आठव्या घरात, बरेच ग्रह आहेत (के, शु, यु व ने) >>
युरेनस हा मंगळासारखा ग्रह आहे!
केतू इथे पण राहू धनस्थानात जातो ना!
शुक्र अष्टमात चमकतो. रवि षष्ठात असल्यास सूर्य मावळल्यावर पश्चिमेला शुक्र ठळकपणे चमकतो।
पुन्हा एखादा ग्रह अमुक ठिकाणी वाईट असं कुठे वाचलं की लगेच माझा तिथे नाही ना? हे शोधून काळजी वाढणे सुरू होते.
या व्यक्तीने शिकवायची नोकरी
या व्यक्तीने शिकवायची नोकरी आपली धरावी. मोठ्या लोकांच्या ओळखी आहेत. त्याला स्वत:ला कसली आवड आहे त्याचा व्यवसाय करायचा असेल. धरसोड.
नवीन Submitted by Srd on 2 December, 2019 - 19:35 >> धन्यवाद, Srd
ही माझीच पत्रिका आहे. मला शिकवायला आवडते म्हणून क्लासेस सुरू केले आहेत. धरसोडवृत्ती नोकरीमध्ये तरी जाणवली नाही पण काय करत होते ते आवडत नव्हते.
खर्च करताना बर्यापैकी विचार करून केला जातो.
१२ व्या घरातील शनि खडतर असतो बहुधा, @कुंपणावरती.
नवीन Submitted by सामो on 4 December, 2019 - 05:18
>> नुसता शनी नाही तर मंगळ पण आहे. शनी-मंगळ युती ज्या स्थानात असते त्या स्थानाची फळे बिघडतात असे ऐकले आहे.
केवळ ज्योतिषाचा सल्ला असं
केवळ ज्योतिषाचा सल्ला असं म्हणत नाही पण दुसरे कोणीही नातेवाईक/डॅाक्टर यांचा सल्ला घ्यावासा वाटून संभाव्य धोके टाळले जाण्याचं कारण म्हणजे कुंडलीतला गुरु चांगला असणे.
पण सल्ला मिळाल्यानंतर तसाच निर्णय घेताना ते कुणाला सांगायचे टाळायचे असते. व्यर्थ वाद टळतो.
@रश्मी,
@रश्मी,
मी माबोची जुनी पाने चाळून त्यातून धोंडोपंत आपटे गुरूजींचा नंबर मिळवून त्यांना कॉल केला होता पण ते रेफरन्सशिवाय भेटत नाहीत असे म्हणाले.
Pages