आम्ही बरेच वर्ष आकाश कंदील घरी करायचो . पारंपरिक कंदील च आवडतो आमच्या घरी सगळयांना. पण अलीकडे काही वर्षे मात्र वेळे अभावी विकतच आणतो. विकत चे कंदील दिवसेंदिवस खूपच बटबटीत होत चाललेत हे जाणवत होतं पण तरी ही बाजारातून रेडिमेड कंदिलच येतो घरी.
ह्या वर्षी मुलांनी कंदील घरीच करायचा घाट घातला. बाजारातून तयार कंदीला ऐवजी कंदीलाचे कागद घरी आले. मी खळ केली. तरुण मुलांना खळ माहीत नसेल कदाचित तर सांगते . खळ म्हणजे कणीक पाण्यात शिजवून केलेली घट्ट पेस्ट. कणकेतल्या ग्लुटेन मुळे ही कागद चिकटवण्याच काम झकास करते. सांगाडा होताच घरी. पूर्वानुभव ही होता गाठीशी. घरातले सगळेच उत्साहाने पुढे आले कंदील करायला. मी ही त्या करंज्या करायचा घाट पुढे ढकलून ह्या करंज्या ( वरच्या आणि खालच्या पट्टीला जे सजावटी साठी लावलं आहे त्या कंदिलाच्या करंज्या,☺ ) करायला सरसावले. ☺ गप्पा मारत, मागे कसा कंदील करायचो त्या आठवणींना उजाळा देत कंदील कधी झाला ते कळलं ही नाही. अक्षरशः चोवीस तासात कंदील तयार होऊन गॅलरीत टांगला ही गेला.
खूप मस्त वाटतंय आणि कौतुक भरली नजर सारखी तिकडेच वळतेय. दिवाळी संपली की कंदील काढला जाईल पण ह्या कंदील in making च्या आठवणी मनात कायम राहतील आणि मनाला उभारी ही देतील.
हा फोटो.
मी केलेला आकाशकंदील कसा केला,
मी केलेला आकाशकंदील कसा केला, त्याची लिंक
https://www.k4craft.com/craft-tutorials-old-newspapers-magazines/
कोणाला करावासा वाटला तर संदर्भासाठी देते आहे.
हा असा पारंपरिक कंदिल खूप गोड
हा असा पारंपरिक कंदिल खूप गोड दिसतो. बहुतेक वेळा तो स्वतः केलेला असतो, त्यामुळे आण खीनच गोड दिसतो. माझे एक मामा असा कंदि ल घरी करत अशी आठवण आई दर दिवाळीला हटकून का ढते. आता माझी मामेबहीण करते. दोन वर्षांपासून मामेभावाने (दुसर्या मामांच्या मुलाने) असा काड्यांचा कंदिल घरी करायला सुरुवात केली आहे. सांगाडा जपून ठेवून दरवर्षी कागद नवीन.
मी शाळेत शिकलेला कार्डपेपरचा १९ वर्तुळांचा कंदिल बनवतो.
सर्व प्रतिसादकांचे आभार.
सर्व प्रतिसादकांचे आभार.
स्वस्ति , मस्त दिसतोय कंदील . ह्या वर्षीचा ही पहायला उत्सुक आहे.
माधव मस्त पोस्ट. सगळ्या टिप्स छान.
अनया लिंक दिलीस छान केलंस. पण त्यावर तुझा कंदील दिसत नाहीये. की माझंच पहायला काही चुकतंय ?
भरत , छान आठवणी. तुमच्या कंदिलाचा ही फोटो दाखवा असेल तर.
मस्तंय कंदील
मस्तंय कंदील
लहानपणी द. मुंवईच्या चाळींत दादरावर बसून रात्ररात्रभर जागून पोरांसोबत सर्व बिल्डींगच्या रहिवश्यांसाठी सेम क्ंदील बनवायचो त्याची आठवण झाली.
मला स्वत:ला सातवीत असताना शिवसेना शाखेच्या कंदील स्पर्धेचे बक्षीसही होते. कागदाच्या असंख्य होड्या बनवून त्या गोलाकार जोडून अननसाच्या आकाराचा कंदील बनवला होता. कल्पना वडिलांनी सांगितलेली.
आजही रात्री एकदा का फटाक्यांची आतिष्बाजी संपून वातावरणात एक शांतता आली की घरातल्या सर्व लाईट्स बंद करून फक्त कंदील चालू ठेऊन त्या प्रकशातच घर उजळवून खिडकीच्या कट्ट्यावर बसून चकली खात गप्पा मारायची मजा काही औरच. दिवाळीचा खरा फिल मला ईथेच येतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिवाळी संपलीय
पण कंदील मात्र तुळशीच्या लग्नापर्यंत. मग त्या पावसाची ऐशीतैशी...
खुपच सुंदर, जुन्या आठवणी
खुपच सुंदर, जुन्या आठवणी जाग्या झाल्या. माहेरी सहा कंदील करायचो. खळ वगैरे वाचून अगदी परत कंदील करावा असं वाटलं. माझे वडिल अजूनही करतात.(वय ८६ वर्ष) त्यांच्या कडे ह्यातला आता एकच सांगाडा उरलाय (सहा कंदीलांपैकी) . ते पुण्यात असतात. मी या वर्षी दिवाळीसाठी पुण्यात नाही आले. खुप miss करते मी ह्या गोष्टी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्यांचे कंदील छान झाले आहेत.
मी म्हटलं तो हा शाळेत शिकलेला
मी म्हटलं तो हा शाळेत शिकलेला कंदिल.![kandil.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u27927/kandil.jpg)
मी कॉलेजात असताना जेव्हा बनवला तेव्हा माझा बघून सोसायटीतल्या बहुतेक मुलांनी असाच कंदिल बनवला होता. रादर आम्ही घोळक्याने एकेका घरी जाऊन कंदिल बनवत होतो.
कृती
https://www.maayboli.com/node/19693
छानच लेख ! आकाश कन्दिलही
छानच लेख ! आकाश कन्दिलही सुन्दर झालेत सगळेच, ममोच्या लेखाने वडिलाच्या अनेक आठवणि जाग्रुत झाल्या, आकाश कन्दिल बनवणे त्याना मनापासुनच आवडायचे, त्यामूले दरवर्शी दिवाळिच्या साफसफाईत आकाश कन्दिलचा सान्गाडा खाली उतरवला जायचा मग त्याला रफ पेपरने घासुन आधिचे पेपरचे तुकडे वैगरे काढुन स्वच्छ केले जायचे, माझे वडिल जिलेटिन पेपर वापरायचे त्याने सगळ्या गॅलरिभर कधि कधि तर समोरच्या बिल्डिन्ग वर पण मस्त रगित प्रकाश पसरायचा, आकाश कदिल वसुबारसाला लागलाच पाहिजे असा त्याचा दन्डकच होता.
![B41D9301-94DF-47BA-8851-6502ABDA771D.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u170/B41D9301-94DF-47BA-8851-6502ABDA771D.jpeg)
![D8AA1746-6EA6-4BDB-AEF1-C95EF4227DC2.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u170/D8AA1746-6EA6-4BDB-AEF1-C95EF4227DC2.jpeg)
![93250F53-B82A-4EDA-A825-5D135FA19F00.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u170/93250F53-B82A-4EDA-A825-5D135FA19F00.jpeg)
लहानपणी " आप्पा! दरवर्शी तोच काय कन्दिल लावता आपण तो नविन निघालाय तसा थर्माकोलचा आणू यात की" अशी भुणभुणही करुन व्हायची.
एका वर्शी तो सान्गाडाच जरा एक दोन ठिकाणि तुटला मग त्यावर्शी करज्याचा आकाशकन्दिल बनवला , एका वर्शी ते इकडे येणार त्यादरम्यान दिवाळी येणार होती मग सगळ्या यादित त्याना म्हटल आकाशकन्दिल बनवुन आणाल का ?म्हटल्यावर त्याची कळी जाम खुलली म्हटले प्रवासात खराब होइल त्यापेक्षा सगळे पेपर वैगरे घेवुन येतो आपण तिकडेच बनवु, त्याना जो -अॅन मधुन ग्लु, दात्याची सिझर अस सगळ आणून दिल, लेकही तेव्हा दुसरी -तिसरीत असेल , दोघानी मिळुन एक मोठा आणी भरपुर छोटे छोटे कदिल केले , काही तिच्या मैत्रीणिना दिले.
मीही दरवर्शी घरिच कन्दिल बनवते आकाश कदिल बनुन तो वार्यावर डुलला की लेकीने आपला वारसा पुढे नेलाय अस त्याना वरुन वाटत असेल का? माहित नाही मला तरी दिवाळी त्याशिवाय अपुरी वाटते.
हे मागच्या १-२ वर्षातले कन्दिल, शेवटचा या वर्शीचा
भरत, तुमच्या कंदिलासारखा
भरत, तुमच्या कंदिलासारखा कंदिल आम्हीही बनवला होता एका वर्षी. फक्त गुलाबी रंग वापरला. चांगला दिसतो.
हेमाताई तुम्ही व तुमच कुटुंब
हेमाताई तुम्ही व तुमच कुटुंब फार हौशी आहे. असेच रहा कायम.
प्राजक्तासारखा कंदिल
प्राजक्तासारखा कंदिल गेल्यावर्षी बनवलेला.
भरत, फोटोतुन नीट आयडीया येत नाहीये कंदिलाची.
गूगलला काय विचारु?
सस्मित, कृतीची लिंक दिली आहे.
सस्मित, कृतीची लिंक दिली आहे.
भरत मस्त कंदील.
भरत मस्त कंदील.
प्राजक्ता बाबा फार उत्साही दिसतायेत, सलाम त्यांना, सर्व कंदील मस्तच. ते करंजी कंदील आहेत तसेच बहीण करते, जरा लहान करते. कधी कधी भाची अगदी छोटे छोटे कंदील स्वतः करते, करंजी नसलेले पण मधल्या भागाला बाहेरुन छान सजवते, बहीण मदत करते. ती आईला पण मदत करते, पण आम्हाला मीच कंदील केलाय सांगते
, हौशी आहे पण तीही बहीणीसारखी. मला हे सर्व आयतं करुन मिळतं.
आमच्या कडे renovation च काम
आमच्या कडे renovation च काम सुरू असल्यामुळे खिडकीकडे कंदिल लावता आला नाही.
![IMG_20191102_182743.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u61673/IMG_20191102_182743.jpg)
![IMG_20191102_184420.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u61673/IMG_20191102_184420.jpg)
म्हणून रूमच्या बाहेर लावला..
Background ignore करा...
मस्तच आहे कंदील.
मस्तच आहे कंदील.
प्राजक्ता बाबा फार उत्साही
प्राजक्ता बाबा फार उत्साही दिसतायेत, सलाम त्यांना, >> हो फार ऊत्साहि होते ते!
ओहह, ते मधलं वाक्य missed
ओहह, ते मधलं वाक्य missed झालेलं, आत्ता नीट वाचलं. आपली माणसे असतात आपल्याबरोबर नेहेमी, दूर गेली तरी.
सर्वाना धन्यवाद
सगळे प्रतिसाद , जोडल्या गेलेल्या आठवणी आणि फोटो ह्यामुळे धाग्याची शोभा वाढली आहे. त्यासाठी सर्वाना मनापासून धन्यवाद.
ऋ मस्त लिहिलं आहेस.
आजही रात्री एकदा का फटाक्यांची आतिष्बाजी संपून वातावरणात एक शांतता आली की घरातल्या सर्व लाईट्स बंद करून फक्त कंदील चालू ठेऊन त्या प्रकशातच घर उजळवून खिडकीच्या कट्ट्यावर बसून चकली खात गप्पा मारायची मजा काही औरच. दिवाळीचा खरा फिल मला ईथेच येतो Happy >> मी पण अगदी हेच करते.
माझे वडिल अजूनही करतात.(वय ८६ वर्ष) @ धनुडी ग्रेट आहेत वडील .
भरत कंदील मस्तच झालाय. मी पण करून बघायचं म्हणतेय तसा कंदिल.
हेमाताई तुम्ही व तुमच कुटुंब फार हौशी आहे. असेच रहा कायम. @ जागू धन्यवाद .तुझ्या सारख्या उत्साही ,हौशी मुलीने हे लिहीलय म्हणून जास्त छान वाटतंय.
प्राजक्ती खूप छान आठवण. तुमचे ही वडील किती उत्साही आणि हौशी होते एवढया वयात ही. शेवटचं वाक्य अगदी टचिंग. तुमचे कंदिल ही खूप छान झालेत.
_k_ तुमचा ही कंदिल मस्त झालाय.
मी कंदिल घरी केलाय हे बघून " काय उगाचच कामं वाढवतेय ही ! बाजारातून आयता आणायचा आणि मोकळं व्हायचं . त्या बिचाऱ्यांना तरी दोन पैसे मिळू द्यायचे" वैगेरे प्रतिक्रिया आल्या होत्या. पण खरंच सांगते हा स्वतः केलेला कंदिल बघताना मिळणारा आनन्द अवर्णनीय आहे. हल्ली वेळ नसतो हे ही खरे आहे पण घरातले सगळे लागले करायला तर जास्त वेळ नाही लागतं.
तुमचे कंदिल पाहून माझ्या सारखे कंदिल घरी करणारे आणखी बरेच जण आहेत म्हणून छान ही वाटतंय.
सर्वाना धन्यवाद
सर्वाना धन्यवाद
बरंच काही लिहिलं होतं ते save होतच नव्हतं error येत होती. दोन स्मायली होत्या वरच्या पोस्ट मध्ये त्यामुळे error येत होती. त्या काढल्यावर पोस्ट save झाली.
सुंदर कंदील सर्वांचे.
सुंदर कंदील सर्वांचे.
@ _K_
कंदीलाच्या सांगाड्याखालची माऊ तुमची का? खूप गोड आहे.
खुपच सुंदर, जुन्या आठवणी
खुपच सुंदर, जुन्या आठवणी जाग्या झाल्या. माहेरी सहा कंदील करायचो. खळ वगैरे वाचून अगदी परत कंदील करावा असं वाटलं. माझे वडिल अजूनही करतात.(वय ८६ वर्ष) >>> ग्रेट बाबा.
माझे वडिल अजूनही करतात.(वय ८६
माझे वडिल अजूनही करतात.(वय ८६ वर्ष) @ धनुडी ग्रेट आहेत वडील . >>>>>धन्यवाद ममो, अन्जू, बाबांना सांगेन, त्यांच्या सारखे कंदील करणारे आपल्या माबोवर आहेत. मी माबोचं सतत गुणगान करत असते घरीदारी ऑफिसात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी केलेले छोटे छोटे कंदील पूर्वी इथे पोस्ट केले होते, लिंक देते
Https://www.maayboli.com/node/39278
@वर्षा
@वर्षा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्याकडे सध्या ४ माऊ आहेत.
दसर्याच्या दिवशी एका पिल्लाला डोंबिवली मधील एका चांगल्या कुटुंबाने adopt केलं.
यांना adopter मिळत नाही तोपर्यंत आम्ही सांभाळत आहोत
@_K_ ओक्के.
@_K_![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओक्के.
धनूडी तुमची लिंक ओपन होत नाही
धनूडी तुमची लिंक ओपन होत नाही आहे
https://maayboli.com/node
https://maayboli.com/node/39278 मला तर येतेय ओपन करता, (मी हे सगळं टाईप करतेय, लिंक डायरेक्ट कशी द्यायची तेच जमत नाहीये. )
ते पान सार्वजनिक करा.
ते पान सार्वजनिक करा.
मला झाली ओपन धनुडी ची लिंक.
मला झाली ओपन धनुडी ची लिंक. मस्त आहेत कंदिल, रांगोळ्या आणि पणत्या. तिथे ही लिहिलं आहे मी.
मला अनया ने दिलेली ओपन होत नाहीये. तो कसा केलाय हे बघायची उत्सुकता आहे खरं तर.
भरत यांची तर निवडक दहा त ठेवलेय . वेळ मिळाला की दिवाळी नसली तरी ट्रायल घेणार आहे.
मनी मोहोर सुरेख. आकाशकंदिल
मनी मोहोर सुरेख. आकाशकंदिल आणि पतंग घरी भारतात असताना करण हा एक मोठा प्रोग्रॅम असायचा. यावेळी आईने चांदणीचा आकाशकंदिल पाठविलाय. एकदम जुन्या पद्धतीचा .
प्राजक्ता , कित्ती सुरेख आठवण लिहिलयसं तुझ्या 'आप्पांची'. कंदिलाचा वारसा ही कल्पनाच किती हृदय आहे.
समगळ्यांचे कंदिल छान आहेत.
धनुडी, अनया दोघींची लिंक ओपन
धनुडी, अनया दोघींची लिंक ओपन होत नाहीये.
मी बघते लिंक का उघडत नाही ते.
मी बघते लिंक का उघडत नाही ते. नाहीच जमलं तर मी एक 'चकली(!)' करून फोटो इथे डकवते.
Pages