Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51
बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो त्यामुळेच मेन कोर्समधे
हो त्यामुळेच मेन कोर्समधे फक्त बिर्याणी ठेवलीय.
>>>>
पण आमच्याकडे मुलं बिर्याणीवर ताव मारतात (त्यांना नंतर भुक लागते) हे पण खरं. जेवण नीट हवंच नाही तर त्रास होतो. मुली जनरली स्टार्ट्र्स मधेच फुल होतात
अरेरे!
अरेरे!
काय ही श्रावणात चरचा !!
जाऊ द्या हो !!!
जाऊ द्या हो !!!
तुम्ही पण श्रावण पाळत असल्यास खयाली बिर्याणी (पुलाव) पकवा
20 जणांसाठी झुणका करायचा आहे.
20 जणांसाठी झुणका करायचा आहे. बेसन किती घ्यावे?
१०० लोकांसाठी (एकदाच वाढायची
१०० लोकांसाठी (एकदाच वाढायची )साबुदाणा खिचडी करायची झाल्यास किती साबुदाणा, दाण्याचे कूट , आणि तूप लागेल याचा कोणी अंदाज देऊ शकेल का ?
मध्यम आकाराचे साधारण माणशी १ असा बटाट्याचा अंदाज आहे
अंजली, एकदाच वाढ असली तरी
अंजली, एकदाच वाढ असली तरी किती देणार? वाटीचा आकार?
1 वाटी साबुदाणा घेतला व बाकीचे साहित्य दाकु बटाटा वै घालून 4 जणांना पुरेल... म्हणजे 25 वाट्या सादा हवा.
सादा जास्त भिजवला व उरला तरी तो टिकतो, सा व करता येईल, पापड्या घालता येतील.... अजून बरच काही.. हाकानाका
वाटीचा आकार?>> साधारण आमटीची
वाटीचा आकार?>> साधारण आमटीची मोठी वाटी शीग भरभरून किंवा २ आमटीचे डाव भरून (स्टॉल वर विकण्यासाठी करायची आहे )
अंदाजाची ऐशी तैशी होतेय असं वाटलं तर मग हा मेनू कटाप करणार
फक्त 1 वाटी साबुदाणा घेऊन त्यात ४ जणांची खिचडी जरा कमी पडेल असं वाटतंय. :विचारात पडलेली बाहुली: दीड वाटी घ्यावी कि काय .. ?!
सादा तसाही जादा च भिजव्हायला लागेल .. आयत्या वेळी लागला तर पंचाईत नको..तो उरला तर उरला ..
बरं .. आता दाण्याचं कूट आणि तुपाचा काय अंदाज ? सादा च्या निम्याने तरी दाकू हवंच ना ?
एक किलो साबुदाणा + माणशी एक
एक किलो साबुदाणा + माणशी एक बटाटा = 8 लोकांना पुरेल.
Average 13kg sabudana for 100 people
अंदाजाची ऐशी तैशी होतेय असं
अंदाजाची ऐशी तैशी होतेय असं वाटलं तर मग हा मेनू कटाप करणार>>>>> अग साखि सारखा दुसरा कुठलाही पदार्थ नाही लार्ज स्केलवर करण्यासाठी. दाकु, बटाटे उकडून ठेवायचे. तूपही टिकतच. अस धरुन चाललेय की हप्यात करशील. .... म्हणजे अंदाज येईलच... दुसरा हप्त्यात ॲडजस्ट करायचं.... पहिली दाकुकमीवाली पुणेरी केली म्हणायची .... जास्तवाली वर्हाडी... बटाटेजास्त कोल्हापुरी .... कोकणी ....सामान उरलंच तर हळदीकुंकू उरकून टाक ...
4-5kg शेंगदाणा कूट घ्या.
4-5kg शेंगदाणा कूट घ्या. जास्तीची टीप.. भिजवलेला साबुदाणा, शेंगदाणा कूट, मीठ, साखर, शिजवलेल्या बटाट्याच्या फोडी, चालत असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट असं सगळा मिक्स करून ठेवून द्या. मिरची वापरणार असाल तर मात्र फोडणीत घालावी लागेल.
आता फक्त तूप जिऱ्याची फोडणी करून हे मिश्रण टाका लागेल तसा. 3-4 batch करा. म्हणजे गरम गरम वाढता येईल आणि पातेल्यात हलवायला हि सोपे जाईल. तूप 2-3kg घेऊन ठेवा. लागेल असं घाला.
<<<अग साखि सारखा दुसरा
<<<अग साखि सारखा दुसरा कुठलाही पदार्थ नाही लार्ज स्केलवर करण्यासाठी>>>
खरंय.
मी वर सांगितलं तसं केला तर मिश्रण उरला तरी फ्रिज मध्ये राहिलं 2 दिवस, उकडलेला बटाटा नाही घातला तर अजून जास्त टिकेल.
मंजूताई आणि ShitalKrishna
मंजूताई आणि ShitalKrishna धन्यवाद _/\_
शिवाय हळदी कुंकू हि मिळेल ..
@ मंजूताई आयडिया भारीच आहे "आमचे येथे सगळ्या प्रकारच्या खिच'ड्या' मिळतील"
धरुन चाललेय की हप्यात करशील>> होय तर!! माझ्याकडे खूप मोठ्ठी भांडी नाहीत कमीतकमी ६ ते १० हप्त्यात करावी लागेल
@ShitalKrishna १३ kg sabudana आणि ५ मग दाकू कस्स्सला दणदणीत अंदाज सांगितलाय .. भारीच !!
१३ kg सादा भले १० kg लागणार असेल तरी मग हा मेनू कटाप करावा लागेल . कारण त्याच दिवशी मला पावा सकट बटाटेवडे करायचेत
खिचडी आदल्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी द्यायची आहे मावे मध्ये गरम करून सर्व्ह करायची.
मग आता खिचडी रद्द करून जिलबी(कारण हि आदल्या दिवशी करून ठेवता येईल ) किंवा दुसरं कायतरी करावं लागणार ...
दोघीना धन्यवाद परत एकदा .. काय ठरतंय त्याप्रमाणे सांगते
अनमोल स्वयंपाक - सिंधूताई
अनमोल स्वयंपाक - सिंधूताई साठे - या पुस्तकात २५ माणसांसाठी १२ वाट्या साबुदाणा आणि ६ वाट्या दाण्याचं कूट असा अंदाज लिहिला आहे.
मुंबैतल्या केटरिंग कॉलेजच्या मुख्याध्यापिका थंगम फिलिप यांच्या मॉडर्न कूकरी पुस्तकात शंभर माणसांसाठी २.५ किलो साबुदाणा, १.२ किलो शेंगदाणे, बारा लिंबे, १५०-२०० ग्रॅम साखर २.५ किलो बटाटे, पाउण लिटर तेल असे दिलेले आहे.
मेधा धन्यवाद !!
मेधा धन्यवाद !!
२५ माणसांसाठी १२ वाट्या साबुदाणा म्हणजे पर वाटी २ सर्विंग
शंभर माणसांसाठी २.५ किलो साबुदाणा फारच कमी वाटतंय ..
पण म्हणजे एकंदरीत सगळं बघता ५ ते ८ किलो सादा नक्कीच लागेल आणि त्याच्या जवळपास निम्याने दाकू आणि किमान १ ते डिड किलो तूप आणि माणशी एक बटाटा
इव्हेंट ला अजून वेळ आहे . जर केली खिचडी तर इथे फायनल प्रमाण सांगते .. नाही केली तर जे काय करेन त्याचे प्रमाण सांगते
स्टॉल वर विकण्यासाठी करायची
स्टॉल वर विकण्यासाठी करायची आहे -- 100 पेक्षाकमी प्लेट भरल्या तर पेनल्टी आहे का ?
1 वाटी साबुदाणा घेतला व बाकीचे साहित्य दाकु बटाटा वै घालून 4 जणांना पुरेल.. --- हे प्रमाण बरोबर आहे.
तुम्ही घरात ह्या प्रमाणाची trial घ्या. शिजवल्यावर ज्या वाटीने वाढणार त्याने अंदाज घ्या म्हणजे तुम्हाला पुरण्याचा कॉन्फिडन्स येईल.
धन्यवाद राजसी
धन्यवाद राजसी
1 वाटी साबुदाणा घेतला व बाकीचे साहित्य दाकु बटाटा वै घालून 4 जणांना पुरेल.. --- हे प्रमाण बरोबर आहे.>> ओह अच्छा !!
100 पेक्षाकमी प्लेट भरल्या तर पेनल्टी आहे का ? >> छे ! जेवढ्या प्लेट विकणार तेवढा फायदा
अंदाजे ३०० लोक येणार ... २ पदार्थ ठेवायचेत पैकी एकावर आमची जास्त भिस्त आहे ... साखि एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधी केली नाही म्हणून अंदाज
पाहिजे होता
तुम्ही घरात ह्या प्रमाणाची trial घ्या>> हो ना तेच करायचं आता ! घरी कैक वेळा केली खिचडी पण जळ्ळ .. १ वाटी वगैरे प्रमाण घ्यायची बुद्धी झाली नाही .. सगळा अंदाजपंचे कारभार
अंकु,
अंकु,
आमच्या इथले एक्सपर्टने सांगितलेले प्रमाण:
5 किलो सादा
4 किलो शें दा.....(तिने 5 किलोच सांगितले,पण मला जास्त वाटले.)
3 किलो बटाटे,1 किलो मिरची.
3 किलो तूप/तेल.
<<@ShitalKrishna १३ kg
<<@ShitalKrishna १३ kg sabudana आणि ५ मग दाकू कस्स्सला दणदणीत अंदाज सांगितलाय .. भारीच !!>>
ह्या अंदाजाने केला तर दुसरं काही करायला नको, पोटभरीचा होता.
<<<एकदाच वाढायची>>> हे सुटला डोळ्यातून.
6-7kg साबू बस होईल मग.
Best way म्हणजे एक वाटीची
Best way म्हणजे एक वाटीची करून बघा. करताना दाकू , बटाटे सगळं नीट मापून घ्या. तुमच्या serve करण्याच्या मापाने किती जण होतात एक वाटी साबुदाण्याच्या खिचडीत ते बघा म्हणजे मोठया प्रमाणावर करणं अगदीच easy होईल.
ओ ते मीठाचं पण ध्यानात घ्या
ओ ते मीठाचं पण ध्यानात घ्या बरं नाहीतर नंतर मीठ किती मीठ किती अस व्हायचं ??????? (कारण मीठावर कोणी बोलतच नाही इथे)
देवकी , मनीमोहोर .. आणि
देवकी , मनीमोहोर .. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद _/\_
त्याची खिचडी करायची म्हटल्यावर माझा उर च दडपला .

)
@ShitalKrishna
<<<एकदाच वाढायची>>> हे सुटला डोळ्यातून>> ओके .. कारण १३ किलो सादा मी अजून कधी एकत्र पाहिलेला हि नाही
आता बराचसा अंदाज आलाय मला .. पण इकडे थोडा बदल मला सुचवण्यात आलाय ..
मी लास्ट इयर बटाटेवडे आणि पाव केलेले ते सगळ्यांना खूप आवडले सो यावर्षीही तूच वडा पाव कर असं मागे लागलेत ..
पण वडापाव (खूप करायचे असल्यामुळे ) आणि शिवाय खिचडी असं मला जमणार नाही ..
म्हणजे जमेल.. पण दुसऱ्या दिवशी स्टॉल वर काम पण असणारे .. (मदतीला बाकी लोक असणार आहेत अर्थात )
सो वडापाव सोबत जिलबी किंवा गुजा ठेवावा असा विचार चालू आहे .. (जसं आपल्याकडे १५ ऑगस्ट / २६ जाने . ला मिळतं
आणि खिचडी माझी दुसरी एक मैत्रीण करेल .. तिला नक्कीच याचा फायदा होईल ..
इव्हेंट झाला (इव्हेंट मार्च मधे आहे )कि मी इथे लगेच प्रमाण लिहेन ..
मीठ किती मीठ किती अस व्हायचं>
मीठ किती मीठ किती अस व्हायचं>>
मुद्यात पॉईंट आहे 
३०० ग्राम सादा साठी अर्धा चमचा मीठ .. कारण इथे शेंगदाणे खारवलेले मिळतात सो कुटात आधीच मीठ असतंय ..
३ -४ मोठ्या साइझचे इंस्टंट
३ -४ मोठ्या साइझचे इंस्टंट पॉट मिळाले तर खिचडी करणे, गरम ठेवणे आणि सर्व्ह करणे सोपे पडेल असे वाटतेय. भिजलेला साबुदाणा, दाण्याचं कूट, चिरलेली मिरची, मीठ या सर्वाचे एका इं पॉ मधे मावतील असे पॅक्स करायचे. एका वेळी दोन इंपॉ मधे करायची खिचडी आणि सर्व्ह करायला घ्यायची . जशी संपत येईल तसे दुसर्या दोन इंपॉ मधे चालू करायची . तुम्हाला शुभेच्छा . छान होऊ दे कार्यक्रम
धन्यवाद मेधा ! आयडिया चांगली
धन्यवाद मेधा ! आयडिया चांगली होती .. पण इंस्टंट पॉट अजून इथे इतके बोकाळले नाहीये .. माझ्या ओळखीच्यांना विचारल्यावर मुळात इंस्टंट पॉट काय हे सांगण्यापासून ते मला ते कश्या करता हवे आहे पर्यंत सांगावे लागले
मग शिवाय त्यांनी मला तू झुणका भाकरी ठेचा , सुरळीची वडी, कोथिंबीर वडी, मोदक कर असलं काय काय सुचवलं .. 
आता १००+ भाकऱ्या कोण थापणार आणि मोदक कोण वळणार !! .. उग्गाच कैच्याकै !!
आपण बनवायच्या गोष्टी पहिला येईल त्याला अलॉट होणार असल्याने आणि मला वडापाव हातचा सोडायचा नसल्याने
वडापाव आणि जिलबी हा मेनू मी फायनल केला आहे ..
खिचडी मी दुसऱ्या एकीच्या पातेल्यात म्हणजे गळ्यात घातलीये .. आता बघूया कसा अंदाज पुरतोय ते
200 लोकांसाठी मसालेभात करायचा
200 लोकांसाठी मसालेभात करायचा आहे.. किती तांदूळ घ्यावा लागेल? Main item मसालेभात आहे, सॅलड जिलेबी असेल बरोबर
फक्त तोंडली घालणार का अजून पण
फक्त तोंडली घालणार का अजून पण काही? आमटीच्या एका वाटीचा भात दोघांना पुरेल, फक्त तोंडली असतील तर.
200 लोकांसाठी मसालेभात करायचा
200 लोकांसाठी मसालेभात करायचा आहे.>>>>> अरे बापरे! साधा भात करायचा असेल तरी अंदाज येणार नाही.दंडवत!
माझ्यामते 15 ते 18 किलो
200 माणसांना मसाले भात घरी करायचा म्हणजे भलतंच शिवधनुष्य आहे. पण पावभाजी वरून सांगते पेलशील बाई तू लीलया हे.
माझ्यामते 15 ते 18 किलो तांदूळ लागतील.
धन्यवाद मनीमोहोर.
धन्यवाद मनीमोहोर.
शेजारी एकजण expire झाले जानेवारी मध्ये, त्यांच्याकडे मी साधा भात(पावभाजीसाठी घेतला ते पातेलं भरून) आणि वाटण घालून मुगाची आमटी(4लिटर) दिली होती.. कार्याच्या दिवशी त्यांच्याकडील पाहुणी म्हणाली कि तुमचा केटरिंग चा व्यवसाय आहे का, नाही बोलल्यावर म्हणाली compliment म्हणून घ्या.

<<<पण पावभाजी वरून सांगते पेलशील बाई तू लीलया हे.>>>
actually society मधील senior citizen चा 61st birthday आहे.

सोसायटी मधील बायका आहेत पुढाकार घ्यायला. मी पण आहेच. मला अंदाज विचारला मी 10 माणसांना 1.5kg तांदूळ आणि 1.5kg भाज्या अश्या अंदाजाने 30kg तांदूळ आणि 30kg भाज्या असं सांगितलं आहे. 25 फेब्रुवारी ला वाढदिवस आहे..
पण यजमानीण बाई चिक्कू आहेत बघू आता कसं होतं ते. अजून एकजणीने 12.5kg तांदूळ आणि 5kg भाज्या असं सांगितलं आहे (ती घरगुती ऑर्डर्स घेते ), ते पण 250 लोकांसाठी, तिझ ऐकतील वाटत. माझा नवरा म्हणाला आपल्याला घरी स्वयंपाक कर
पण यजमानीण बाई चिक्कू आहेत
पण यजमानीण बाई चिक्कू आहेत बघू आता कसं होतं ते. >> अहो ते रिटायर्ड किंवा फिक्स्द इनकम वर असतील. पगार नाही एफडी वरील इंट्रे स्ट वगैरे तर इतका खर्च करणे खरेच अवघ ड आहे. आजकाल पेन्शन पण मिळत नाही काही लोकांना. वाढदिवसाला विश करा. त्यांना आनंदी ठेवा. हे दोनशे लोकांना जेवण वगैरे खर्चिक प्र्करण आहे.
Pages