अंदाज किती घ्यावा?

Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51

बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रे माझ्या एका पाभा च्या अंदाज प्रश्नाला केवढे हे फाटे ... Lol. >>>>>. सगळ्या 5 डझन पोस्ट्सचा सारांश एवढाच की पाभा मध्ये पोषणमूल्य शोधत उगीच वांगी, बिटरूट आणि गाजर ढकलू नयेत. पाभा खावी तर चविष्ठ नाही तर सलाड बोअल घेऊन बसावा Wink

पावभाजीत फक्त , बटाटा, टोमॅटो, मटार, कांदा , (सिमला मिर्ची हवी असेल तर) एवढेच पदार्थ घालावेत. (कांदा मी फक्त वरूनच घालते. ) हेच अंतिम सत्य. Happy
स्ट्रीट फुड मध्ये पोषण मुल्य शोधु नयेत. ती आनंद,समाधानासाठी असतात. पाणिपुरी खाल्ल्यावर एक तास मेडीटेशन केल्यावरच तेज , अध्यात्मीक समाधान मिळत . डोळे भरून येतात. चेहरा लाल होवुन तेजपुंज दिसु लागतो हे तुम्हालाही माहित असेलच. Wink

. पाभा खावी तर चविष्ठ नाही तर सलाड बोअल घेऊन बसावा Wink ... Lol
अजून एका लेखात वाक्य वाचलं... पाभा हे स्ट्रीट फूड आहे त्यामुळे ते झटपट बनणं अपेक्षित आहे. उगाच वाटणं, घाटणं करत वेळ घालवू नये. Wink

>>पाभा हे स्ट्रीट फूड आहे त्यामुळे ते झटपट बनणं अपेक्षित आहे.
माझं कुठलही स्ट्रीट फूड आजवर झटपट बनलेलं नाही. वडापाव, सामोसे, कचोर्‍या... पीठ मळा, सारण करा, शेपमध्ये लाटा, भरा, तळा, चटण्या करा... लॉट ऑफ वर्क! मला आवडतं करायला, पण झटपट अजिबात बनत नाही, अ‍ॅट लीस्ट माझं तरी.

कुठचंही स्ट्रिट फूड पटकन होत नाही करुन. साधी भेळ जरी करायची म्हटली तरी चिराचिरी केवढी. वरुन चटण्याही करा. आता नंतर त्या सगळ्या बोल्सचा पसारा आवरा.

त्या लेख लिहिणार्‍या बाईला झापूया... Wink

बादवे, इथे लिहिनच माझा अंदाज पावभाजीचा आणि खिरीचा, शनिवारी करेन तेव्हा.
सगळ्यांना धन्यवाद... Happy

इथल्या पोस्टी वाचून काल घरी आल्यावर स्वीगी वर पावभाजी ऑर्ड र केली. बरोबर व्हेज कटलेट पण ऑर्डर केले ते हार्ट शेप्ड होते. फेब मूड इज ऑन. मज्जा नु लैफ.

काल दुपारी गुरुवार म्हणून कँटिन मध्ये खीर होती. पातळ पर लीटर पाच शेवया असतील. पूर्वीचा आण्णा मस्त गुलाब जामु न ठेवायचा!!!
पण ह्याची बटाट भाजी मस्त असते. तेव्हा इथल्या पोस्टी आठवल्या. हैद्राबादला असताना बांबिनो व्हर्मिसेली एकदम फेमस होती अजूनही मी एक पाकीट ऑर्डर करते. उपमा करते शेवईचा. खीर गेली दहा अकरा वर्शे केली नाही. तिथे पातळ लांब अश्या तुपावर भाजलेल्या शेवया मिलतात रमजान काळात हारीने उंच लावलेल्या असतात मार्केटात. शीर कुर्मा खातात. हाही फक्त गोड व चारोळ्या असलेला अस्तो हे मा वै म.
तमीळ पब्लिक सेमिया पायसम खाते आवडीने.

खीर न आव डणे समजू शकते मी. मला पण पुरण पोळी, गूळ पोळी आजिबात आवडत नाही. एक चतकोर अ‍ॅट द मोस्ट खाउ शकते. त्यात फेसबुक वर अंगत पंगत सारखे गृप आहेत प्रत्येक सीझनचे गोड/ तिखट पदार्थ निदान चाळीस पन्नास मेंबरं तरी करून फोटो टाकतात. बरोबर तितकेच स्वीट क्युट पोस्ट. कारण रिडिस्कवरींग महा. क्वीझीन. असे नावातच आहे. हे मला जाम पीळ वाट्ते. एक बनव णार मग बाकीचे पन्नास
लाइक करणार मग काही लोक साखार वापरलीतर कणीक वापरलीतर तूप का दूध असल्या भंपक कमेंटी लिहीतात. आत हलव्याचा सीझन गूल पोळी चा संपला. त्या आधी १ ते १४ जानेवारी सुट्टीला आलेली थोर वयाची मुले परत चालली म्हणून टिपे गाळत बन्वलेली स्ट्रेंज लोणची. ओल्या आम्बे हळदीचे लोनचे साठ तरी लोकांनी पोस्टले. दिवाळी फराळाचे तर विचारूच नका. आता होळी आली म्हणजे पुपो फोटो चा मारा होईल. बचाउ बचाउ.

तब्येतीत रहायचं असेल तर पहिलं काम म्हणजे स्विगी उतरवायचं. फूड चॅनेल्सच्या पैशात हेल्थ चॅनेल्स घ्यायची. फेबूची फूड पेजेस डिसलाईक करायची . जगन्नाथ दिक्षीत किंवा सूप सॅलड गृप मधे सामिल व्हायचं म्हणजे मग ह्या त्रासांपासून सुटका होईल.

हा हा अमा Lol
फूडपोर्न फोटो आवडतात बरं का मला. फक्त फोटो बघून स्क्रोल डाऊन करायचं. चर्चा वाचत बसायची नाही.

मी दीक्षित ग्रुपमध्ये आहे. फुडपोर्न भयंकर आवडते. आता दीक्षित ग्रुपमध्ये असल्यामुळे खूप नियंत्रण ठेवले जातेय. पण फुडपोर्न बघितल्यावर तोंडाला जे भयंकर पाणी सुटतं त्यामुळे काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? म्हणजे तोंडाला पाणी सुटल्यामुळे इन्सुलिन सेक्रेशन वगैरे???

नाहितर मेलं काही खाल्ले तर नाहीच पण नुसत्या कल्पनेमुळे डाएटचा इस्कोट झाला असे व्हायचे. इस्कोट व्हायचाच असेल तर तो निदान खाऊनतरी होउदे....

25 ते 30 लोकांची पावभाजी
दीड किलो बटाटे
पाव किलो सिमला मिरची
अर्धा किलो टोमॅटो
पाऊण किलो कांदे
एक लहान एव्हरेस्ट मसाला
लहान बटर पॅक
अर्धा किलो फ्लॉवर
अर्धा किलो मटार

हा माझा अंदाज...पावभाजी बेस्ट होते....फक्त भाजी उकडताना त्यातून सिमला बाई वगळून टाकाव्या आणि त्या कांदा आणि टॉमेटो सोबत परतून घ्यायच्या...
लाल मिरची पावडर आणि पाभा मसाला च घालायचा.(नो घरका मसाला )
बटर जास्त च घ्यायचं.
आणि सर्वात शेवटी एक लहान चमचा टोमॅटो। केचप घालायचं( हे च सिक्रेट आहे )
हॉटेल सारखी पाभा रेडी

एकदाची पाभा /खीर करून जीव भांड्यात पडला आहे. Proud

>> मध्यम आकाराचे 12-15 बटाटे. पाऊण की फ्लाॅवर, 5-6 टो. , 7-8 कां, दोन वाट्या मटार, 4 सि. मि. कमी पडू नये एवढेच बघायचं. उरली तरी संपतेच.>>>>>> हा मेधाचा अंदाज बरोबर वाटला.

मी १५ बाहेरचे आणि २-३ वर (सगळ्यांची मिळून लहान मुलं ई.) असं धरून वर दिलेल्या प्रमाणानुसार १७-१८ लोकांसाठी (माणशी १ बटाटा मिडिअम, ७-८ टॉमेटो, १ मिडियम गड्डा कॉलीफ्लॉवर, ५-६ सिमला मिरची, ८ कांदे, मुठ्भर बीन्स आणि गाजर, १ वाटी मटार (तेवढेच होते घरात) असे घालून पाभा केली. पण आयत्या वेळी ५-६ बायका आल्या नाही त्यामुळे बरीच शिल्लक राहिली.

खीर ५ वाट्यांची केली ती पण पायरेक्स चा सगळ्यात मोठ्ठा गोल बाऊल भरून झाली होती. ती अर्ध्यापेक्षा जास्त संपली. Happy

थोडे चिप्स पण ठेवले होते.

एकदाची पाभा /खीर करून जीव भांड्यात पडला आहे.>> Lol

गच्याळ शेवया आणि पाभातल्या वांगे यांनी धागा पेटवला Happy
माझी वहिनी तर कडधान्यांची पाभा करते. आता ईथून मला पळावे लागेल Proud
ती खायचा माझा कधी योग आला नाही त्यामुळे कशी लागते माहित नाही.

कडधान्याची पावभाजी खाण्यापेक्षा.....आधी एक वाटी उसळ खायला घालावी व नंतर भेसळ विरहीत पावभाजी खायला द्यावी.

कलावंताचे स्वातंत्र्य>>> पाव हे पाव असतात. त्याबरोबर कुठलीही अगदी दोडक्याची ही भाजी खाल्ली की झाली ना पाव भाजी.

पाव हे पाव असतात. त्याबरोबर कुठलीही अगदी दोडक्याची ही भाजी खाल्ली की झाली ना पाव भाजी.>>>>>:D Lol

उगा ती कविता आठवली तडफदार जर टाच मारूनी इ. इ.

Pages