काही दिवसांपूर्वी सिंहगडवर गेलो होतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी गेलो होतो तेंव्हा तिथे परिस्थिती वेगळी होती. आता खूप सकारात्मक बदल झाले आहेत. स्वच्छता, डागडुजी, रस्ते वगैरे. बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. पण त्याचबरोबर एका गोष्टीचे कोडे उलगडले नाही. गडावर पूर्वी मांसाहारी जेवण मिळायचे ते आता बंद केले आहे. मद्यपान बंदी एकवेळ समजू शकतो. आपल्याकडे बरेचसे पब्लिक दारू पिली कि आरडाओरडा, शिवीगाळी, बाटल्या फोडणे तसेच अन्य घृणास्पद कृत्ये करतात ज्याचा इतर पर्यटकांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष त्रास होऊ शकतो.
पण मांसाहाराने काय घोडे मारले आहे? त्यावर बंदी कशासाठी? कचरा म्हणावा तर तो अन्य खाण्यापिण्याने पण होतोच आहे गडावर. मांसाहाराने थोडा अधिक होईल इतकेच. तिथे मी विचारणा केली असता "गडाचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून" वगैरे उत्तरे मिळाली. अरे म्हणजे इतिहासातील ज्या वीर पुरुष व पराक्रमी योद्धा असलेल्या महान विभूतींमुळे हा गड पवित्र स्थान बनले आहे ते लोक मांसाहार करत नव्हते शाकाहारी होते असे म्हणावयाचे आहे का? नरवीर तानाजी मालुसरे असोत वा खुद्द शिवछत्रपती असोत. पराक्रमी योद्धे होते. मांसाहार तर करतच होते. मग तिथे येणाऱ्यानी मांसाहार केला तर पावित्र्य बिघडण्याचे काय कारण? थोडीतरी तर्कसंगती आहे का ह्या बंदीला? नक्की कोण आहेत या बंदिमागे?
थोडा मागोवा घेतला तेंव्हा लक्षात आले एक "शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्था" म्हणून आहे (जसे काय गड किल्ले म्हणजे सरकारची नव्हे तर यांचीच मक्तेदारी) त्यांनी हि बंदीची मागणी व नंतर अंमलबजावणी केली आहे. काही बातम्यांमधून लक्षात आले कि सरकारी यंत्रणा नव्हे तर या संघटनेचे लोकच गुंडगिरी करून मांसाहार करू देत नाहीत. अजून थोडे खोलात जाऊन पाहिले असता लक्षात आले कि हि संघटना म्हणजे देशातील कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे पिल्ले आहे हे जाणवले (त्यांच्या फेसबुक पेज व इतर माहितीवरून). गड किल्ल्यांची निगा राखण्यासाठी खरे तर सरकारी यंत्रणा आहे. गड किल्ले कोणाची खाजगी मालमत्ता नव्हे. तरीदेखील गडांवर या खाजगी संघटनेचे वर्चस्व आहे!
काही जण मांसाहार बंदीसाठी वनखात्याच्या नियमाचा आधार घेताना दिसतात. म्हणे वनक्षेत्रात मांसाहार वर्ज्य आहे. अरे पण तसे असेल तर मग इतकी वर्षे वनखात्याने हे सुरु ठेवूच कसे दिले असते?
आणि मग सगळी मेख लक्षात आली.
मांसाहाराचे वावडे ना राजाला होते ना मावळ्यांना. मांसाहार न करणारे आहेत ठराविक हिंदुत्ववादी. त्यांना आवडत नाही म्हणून त्यांनी तो "अपवित्र" ठरवून त्यास गडांवर बंदी घातली असे समजायला बक्कळ वाव आहे. म्हणजे सरळ सरळ धार्मिक दहशत. बाकी काही नाही. (शिवाय याचा साईड इफेक्ट म्हणून "राजांना मांसाहार वर्ज्य होता म्हणूनच आजही गडांवर मांसाहारास बंदी आहे" असे अजून पाच पन्नास वर्षांनी कोणतरी एखादा भुक्कड कवी/शाहीर लिहून जाऊ शकतो हा भाग वेगळाच).
कुणाची काय काय मते आहेत यावर?
"नॉनव्हेज खाण्याकरता तुमचा
"नॉनव्हेज खाण्याकरता तुमचा इतका जीव चाललाय तर घरी नॉनव्हेज बनवून, ते डब्यात भरुन घेऊन जाऊन, तिथे खा की, कोण अडवणार आहे तुम्हाला ? गडावरच शिजवून खायचा हट्ट कश्याला ?"
==> पुन्हा तिथेच आली का चर्चा? पहिली प्रतिक्रिया वाचा माझी या धाग्यावारची. त्यात तुम्हाला उत्तरे दिली आहेत मी. बायदवे तुमचा जीव का राहत नाही सुवर्ण दुर्गात जाऊन दारू पिल्याशिवाय? प्या ना घरी बसून. बाकी ते सुद्न्य वगैरे फालतू बाता आम्हाला पण करता येतातच. प्रत्यक्षात तुमच्या सारखेच लोक कचरा करून येत असतात.
पण मी काय म्हणतो नाही खाल्ले
पण मी काय म्हणतो नाही खाल्ले मांस गडावर, खालूनच खाऊन आलात किंवा गड उतरल्यावर खाल्ले तर काय होईल? उगीचच आपला वाद निर्माण करत राहायचे आणि घासत राहायचे ....
"उगीचच आपला वाद निर्माण करत
"उगीचच आपला वाद निर्माण करत राहायचे आणि घासत राहायचे"
==> फक्त धाग्याचे शीर्षक आणि शेवटच्या एकदोन प्रतिक्रिया वाचल्या कि अशा प्रतिक्रिया लिहिल्या जातात. किमान धाग्याच्या विषयाचा शेवटच्या चार पाच ओळी तरी वाचायचे कष्ट घ्या मुद्दा काय आहे तो कळण्यासाठी.
विस्तीर्ण कातळ कुठे संपतो?
विस्तीर्ण कातळ कुठे संपतो? आणि किल्ला कुठे सुरू होतो?
डोंगर कुठे संपतो आणि किल्ला कुठे सुरू होतो?
की तुमच्या पावित्र्याचा कल्पना केवळ तटाच्या आतल्या भु भागासाठी राखीव आहेत?
ज्या भागावर तट बुरुज नाहीत, तो भाग किल्ल्याचा नाही म्हणून तिकडे मांसाहार+दारू अलावूड आहे?
पावित्रतेच्या कल्पना
पावित्रतेच्या कल्पना व्यक्तीसापेक्ष आहेत. पवित्रतेच्या बाबतीत सर्वच गड सारखे नसतात.... एका गडाला एक न्याय तर दुसर्याला गडाला वेगळा न्याय... गड कशाला म्हणायचे? डोन्गर कुठे सुरु होतो... या प्रश्नाला काही अर्थ नाही. डोक्यात गडाचा निव्वळ विचार आला रे आला कि हातातला मान्साहार/ मद्य/ वाईट अत्याचारी विचार टाळायचे. केवळ सात्विक आहारच गिळायचा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<< "सगळेच लोक आमच्या इतकी सुज्ञ थोडीच असतात..." >>
------ एखाद्या गोष्टीचे आचरण स्वत: ला जमत नसेल, स्वत:ला करता येत नसेल आणि वर इतर लोकान्कडुन तशा अपेक्षा ठेवण्यासाठी जो निर्ढावलेपणा लागतो त्या निर्ढावलेपणाला तुम्ही सुज्ञ समजत असाल तर तुमच्या पुरते तुमचे म्हणणे योग्य आहे.
मयुरांबे यांच्या प्रतिसादात
मयुरांबे यांच्या प्रतिसादात जेण्डरलेस क्रियापदे का बरे आहेत ?
मी म्हणते, मी जाते असे दिसतच नाही. त्यांच्याबाबतीत मी जातो, मी येतो, मी म्हणालो, मी लिहीलो असे एकही क्रियापद नाही. केव्हांचं पाहतेय..
बाकी कुणाच्या कसे लक्षात नाही आले हे ?
हा ऋन्मेष चा डुया आयडी नसावा. त्याचे स्त्रीआयडीज खुशाल आपसात गप्पा मारत बसतात. त्यांना येते जाते करायला अवघड वाटत नाही. पुरूष तर आहेच तो त्यामुळे त्याचे मेल आयडीज सुद्धा जेण्डरचा उल्लेख टाळत नाहीत.
मंदार जोशी कसा का असेना पण असले प्रकार करत नाही.
मग हे आहेत तरी कोण ? कोई जाना पहचाना सा ? कि खरेच नवा / नव्या आहे हा / ही ?
सपना बाई किंवा वीणा बाई वाटतात.
त्या दोन्ही बाया प्रत्यक्षात
त्या दोन्ही बाया प्रत्यक्षात बाप्या होता हे माहिती आहे ना?
खरेच वाईट वाटले. मी उत्तर न
खरेच वाईट वाटले. मी उत्तर न देण्याचे ठरवले आहे. पण डॅमेज होतोच. म्हणून हे शेवटचे उत्तर. इथून पुढे डॅमेजची पण पर्वा करणार नाही.
मी म्हणणार नाही कि तुम्ही ड्युआयडी आहात. जरी नावात साम्य असले तरीही. तुमची मर्जी आहे. वैयक्तिक प्रतिसाद देऊ नयेत एव्हढेच म्हणणे. त्यासाठी विषयांतर तर चुकूनही नसावे.
अशा हल्ल्यांनी मी विचलीत होणार नाही. वाईट याचे वाटले कि माझे कुणाशीच शत्रूत्व नाही. माझे प्रतिसाद बोअर असतील, इरीटेट करत असतील. कदाचित थोडा आगाऊपणा पण होत असेल. पण मी वाईट चिंतत नाही कुणाचे. मला स्कोअर सेटल करायचे नाहीत. भांडण करायचे नाही.
तरी असे टार्गेट केल्यासारखे प्रतिसाद येत आहेत, धारेवर धरले जात आहे. मी कसे प्रतिसाद द्यावेत हे मला ठरवू द्या ना. माझी शैली जशी असेल तसे प्रतिसाद तिथे येतील. मुद्दामहून जेण्डरवाचक क्रियापदांची गरज पडत नसेल तर मी तसे का करावे ? आणि यावरून उत्तरदेही तरी का असावे ?
त्यावरून लोकांचा काय समज होईल तो होवो. ते मी आणि ते पाहून घेऊ. तुम्ही का एव्हढे अस्वस्थ होत आहात ? एक तर मी नजरेतून उतरेन किंवा लोक मला हळूहळू समजून घेतील.
माझा इथल्या कुठल्याच आयडीशी कसलाही संबंध नाही हे शेवटचे. ज्याला विश्वास ठेवायचा तो ठेवेल. नाही ठेवायचा त्याच्या गळ्यात मी तरी का पडावे ? काही उपयोग आहे का त्याचा ?
तुम्ही इतक्यातच आला आहात तरीही माझा भरपूर अभ्यास केल्याचे पाहून अभिमान वाटला स्वतःचा. आभार.
सिंबा यांचे असे वैयक्तिक
सिंबा यांचे असे वैयक्तिक हल्ले बहुतेका विषयाला धरून असावेत. त्यांचे बरेच प्रतिसाद यातच खर्ची पडलेले दिसतात. कदाचित त्यामुळे ते विषयाला न्याय देत असावेत. तेच असे नाही. त्यांचे कळपबंधू सुद्धा. इति लेखनसीमा (या बाबतीत).
बरं आता विषयांतर झालेच आहे
बरं आता विषयांतर झालेच आहे म्हणून
जेण्डरलेस लिहीणे यात चुकीचे काहीच नाही. उलट मी अमूक जेण्डरचा/ची आहे हे सतत ठसवून सांगणे यात क्रौर्य आहे असे मला वाटते. तुम्ही पुरूष किंवा स्त्री आहातच, तर मग जेण्डरवाचक क्रियापदे तरी का असावीत ? हळू हळू एस्टॅब्लिश होत चाललेल्या जेण्डरलेस समाजात असे जेण्डर सुचवणे हेच घातक आहे. यावर विचार व्हायला हवा. आपल्या डोक्यात जात, प्रांत, देश, लिंग याचा विषय नसेल तेव्हांच असे निरपेक्ष बोलणे शक्य आहे.
विचार करा.
(विषयांतराबद्दल , झालेच होते ते, क्षमस्व )
हा ऋन्मेष चा डुया आयडी नसावा.
हा ऋन्मेष चा डुया आयडी नसावा. त्याचे स्त्रीआयडीज खुशाल आपसात गप्पा मारत बसतात.
>>> Lol
सिंबा यांचे असे वैयक्तिक
सिंबा यांचे असे वैयक्तिक हल्ले बहुतेका विषयाला धरून >>>>
यात मी तुम्हाला उद्देशून कुठे बोललोय? आधीच्या प्रतिसादात नाव आलेल्या 2 स्त्री id मागे कोण होते या बद्दल मी बोललो आहे.
उगाच जग फक्त आपल्या बद्द्लच बोलतंय अशी समजूत करून घेणारे ऋन्मेष नंतर तुम्हीच आहात
अच्छा म्हणजे तो प्रतिसाद
अच्छा म्हणजे तो प्रतिसाद विषयाला धरून होता का ? कि चतुरांबे यांचा ? चांगले आहे. चालू द्या तुमचे.
<आपल्या डोक्यात जात, प्रांत,
<आपल्या डोक्यात जात, प्रांत, देश, लिंग याचा विषय नसेल>
धर्म राहिला बघा. की मुद्दाम राहू दिलाय?
मला तर चतुरांबे आणि मधुरांबे
मला तर चतुरांबे आणि मधुरांबे हेही एकच वाटताहेत.
देशी गायीचे शेण वापरल्याने
देशी गायीचे शेण वापरल्याने इतके विविध जातीचे आंबे भरघोस प्रमाणात आले असतील का बाजारात !
बाकी ते सुद्न्य वगैरे फालतू
बाकी ते सुद्न्य वगैरे फालतू बाता आम्हाला पण करता येतातच. प्रत्यक्षात तुमच्या सारखेच लोक कचरा करून येत असतात.
Submitted by इनामदार on 19 June, 2018 - 20:13
<<
@इनामदार,
मुळात तुमचा हा लेख अतिशय फालतू व ऐकिव माहितीवर आधारीत आहे. तुम्ही लेखात सिंहगडावर मासांहार, मद्यपान करण्यावर बंदी "शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्था" यांनी घातल्याची थाप ठोकून दिली आहे मुळात पुरातत्त्व विभाग तसेच वन विभागाच्या नियमानुसार कोणत्याही किल्ल्यावर मद्यपान, मांसाहार आणि धूम्रपानास बंदी आहे. असे असताना "शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्था" यांनीच ती बंदी घातलेय असे खोटे सांगण्याचा तुमचा हेतू काय होता ?
---
हि बातमी जरा वाचा आणि मग थापा मारा. : दुर्गप्रेमींनी उधळली सिंहगडावर दारूपार्टी
---
पुरातत्त्व विभाग तसेच वन विभागाच्या नियमानुसार कोणत्याही किल्ल्यावर मद्यपान, मांसाहार आणि धूम्रपानास बंदी आहे. पण वीकेंड पार्ट्यांचे लोण आता गडांपर्यंत येऊन ठेपल्याने पुणे परिसरातील गडकिल्ल्यांवर सध्या दारूपार्ट्यांनी उच्छाद मांडला आहे. दोन महिन्यांपूर्वी लोहगड-विसापूर किल्ल्यावर पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय तंबू ठोकून मोठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. दुर्गप्रेमींनी तेथील पर्यटकांना मद्यपान करताना पकडले होते. गेल्या महिन्यात राजमाची किल्ल्यावरील दारू आणि मटण पार्टीचा डाव दुर्गप्रेमींनी उधळून लावला. आता सिंहगडावर हा प्रकार घडल्याने ऐतिहासिक वारसा असलेल्या गडांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सिंहगडावर रविवारी सकाळी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेसाठी शिवाधीन दुर्ग संवर्धन ग्रुपचे कार्यकर्ते शनिवारी रात्रीस मुक्कामासाठी गेले होते. रात्री बाराच्या दरम्यान त्यांना खासगी विश्रामगृहाबाहेर गोंधळ ऐकू आला. घटनास्थळी गेल्यावर दुर्गप्रेमींना तिथे दारूपार्टी सुरू असल्याचे दिसले. या सर्व प्रकाराचे त्यांनी मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग केले. पार्टी थांबवून त्यांनी संबंधितांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली नाही. आशुतोष देशमुख, अरविंद बोराडे, महेश रेणुसे आणि नंदकुमार मते यांनी दारूपार्टी उधळली आणि संबंधितांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
या प्रकाराबाबत देशमुख म्हणाले की,‘ कोंढाणेश्वर मंदिराजवळील गेस्ट हाउसमध्ये शनिवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. पार्टी करणारे लोक खासगी बँकेचे कर्मचारी होते. त्यामध्ये दोन महिलाही होत्या. ही दारूपार्टी सुरू असतानाचे संपूर्ण रेकॉर्डिंग आम्ही केले आहे. जेव्हा आम्ही त्यांच्याकडील सर्व बाटल्या जप्त केल्या आणि पोलिसांना कळविणार असल्याचे सांगितले, तेव्हा त्यांनी आमच्यावर पैसे देऊन प्रकरण मिटविण्यासाठी दबाव आणला. काही वेळातच पोलिस दाखल झाले. पोलिस त्यांना घेऊन अभिरूची पोलिस स्टेशनमध्ये गेले. आमचे दोन कार्यकर्तेही त्यांच्याबरोबर होते. मात्र, तिथे पोहोचल्यावर पोलिसांनी दुर्गप्रेमींनाच सल्ला देण्यास सुरुवात केली. थोडे मद्यपान केले तर बिघडते कुठे, असे सांगून थोड्यावेळात कोणत्याही कारवाईशिवाय त्या लोकांना सोडून देण्यात आले.
बंदी कागदावरच...
या पूर्वी देखील आम्ही केलेल्या स्वच्छता मोहिमांदरम्यान गडावर मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. याचा अर्थ गडावर खासगी गेस्ट हाउसमध्ये नियमित मद्यपान होते. कागदावर मद्यपान आणि मांसाहारास बंदी असली तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यास वन विभाग आणि पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होते आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
सिंहगड हे संरक्षित स्मारक आहे. गडावर मद्यपान आणि मांसाहारास बंदी आहे. पर्यटकांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गैरप्रकार टाळले पाहिजेत. या संदर्भात खासगी जागा मालकांशी आम्ही संवाद साधणार आहोत. गरज पडल्यास गैरप्रकार करणाऱ्यांवर पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करण्यात येईल.
पहिले पाढे पढ पंचावन.
पहिले पाढे पढ पंचावन.
या बातमीची लिंक मीच आधी दिली होती.
मद्यपानाला बंदी आहे कळलं.
मांसाहाराचा काय संबंध?
पहिले पाढे पढ पंचावन.
पहिले पाढे पढ पंचावन.
या बातमीची लिंक मीच आधी दिली होती.
मद्यपानाला बंदी आहे कळलं.
मांसाहाराचा काय संबंध?
नवीन Submitted by भरत. on 20 June, 2018 - 11:00
<<
या बातमीची लिंक तुम्हीच आधी दिली असे म्हणताय मग किमान ती लिंक उघडून वाचायची तरी तसदी घ्या.
--
त्या बातमीतील पहिलीच ओळ पहा.
--
पुरातत्त्व विभाग तसेच वन विभागाच्या नियमानुसार कोणत्याही किल्ल्यावर मद्यपान, मांसाहार आणि धूम्रपानास बंदी आहे.
--
तरिही तुम्ही म्हणताय "मांसाहाराचा काय संबंध?"
---
तसेच कोणत्याही गडावर मद्यपान, मांसाहार आणि धूम्रपानास बंदी ही पुरातत्त्व विभाग तसेच वन विभागाच्या नियमानुसार असताना "शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्था" यांनीच ह्या बंदीची मागणी व अंमलबजावणी सुरु केल्याची थाप इनामदारांना हया लेखात मारायची काय गरज होती ?
बाळ्/आजोबा, मांसाहारावर बंदी
बाळ्/आजोबा, मांसाहारावर बंदी पावित्र्याच्या कल्पनेतूनच आणली आहे.
वाचा बर मागे जाऊन.
न वाचता लिंक द्यायला मी काय आयटीसेलच्या पे-रोलवर नाही.
बाळ्/आजोबा, मांसाहारावर बंदी
बाळ्/आजोबा, मांसाहारावर बंदी पावित्र्याच्या कल्पनेतूनच आणली आहे.
<<
मग टिका पुरात्वविभाग व वनविभागावर करा ना. "शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्था" व हिंदूत्ववाद्याना मध्ये आणायची गरजच काय ? उगा तकाला जाऊन भांडे लपविण्याला काय अर्थ ?
-----------
न वाचता लिंक द्यायला मी काय आयटीसेलच्या पे-रोलवर नाही.
नवीन Submitted by भरत. on 20 June, 2018 - 11:13
<<
मग लेखातील खालील पॅराचा, अर्थ नक्की काय होतो ?
---
थोडा मागोवा घेतला तेंव्हा लक्षात आले एक "शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्था" म्हणून आहे (जसे काय गड किल्ले म्हणजे सरकारची नव्हे तर यांचीच मक्तेदारी) त्यांनी हि बंदीची मागणी व नंतर अंमलबजावणी केली आहे. काही बातम्यांमधून लक्षात आले कि सरकारी यंत्रणा नव्हे तर या संघटनेचे लोकच गुंडगिरी करून मांसाहार करू देत नाहीत. अजून थोडे खोलात जाऊन पाहिले असता लक्षात आले कि हि संघटना म्हणजे देशातील कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे पिल्ले आहे हे जाणवले (त्यांच्या फेसबुक पेज व इतर माहितीवरून). गड किल्ल्यांची निगा राखण्यासाठी खरे तर सरकारी यंत्रणा आहे. गड किल्ले कोणाची खाजगी मालमत्ता नव्हे. तरीदेखील गडांवर या खाजगी संघटनेचे वर्चस्व आहे!
----
ग्रहण धागा फॉलो न करता तिथे
ग्रहण धागा फॉलो न करता तिथे जाऊन स्पॉयलर अलर्ट ची काडी टाकून येणारे काका इथे विषयाला धरून प्रतिसाद देताना पाहून डोळे पाणावले..
पुन्हा पुन्हा त्याच चर्चा होत
पुन्हा पुन्हा त्याच चर्चा होत आहेत. खोटे बोलण्याची परंपरा कोणाची आहे या देशात हे जगजाहीर आहे. तरीही चोरांच्या उलट्या बोंबा या न्यायाने माझ्यावरच खोटे बोलण्याचा आरोप झाल्याने प्रतिसाद लिहिणे अपरिहार्य आहे.
---
"गडावर मांसाहार, मद्यपान, धूम्रपान, गैरवर्तणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली."
लिंक: http://www.mpcnews.in/other-news/item/1692-2017-04-06-16-41-44
इतर गैरवर्तणूक बरोबर मांसाहार पण बंद करण्याची मागणी कुणी केली आहे?
---
"पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली नाही. आशुतोष देशमुख, अरविंद बोराडे, महेश रेणुसे आणि नंदकुमार मते यांनी दारूपार्टी उधळली"
लिंक: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/pune-peopl...
हि गुंडगिरी नव्हे काय? पोलीसंच्यावर कारवाईचे बंधन आणले म्हणजे उजव्या विचारसरणीच्या कोणीतरी "वरून" फोन केला असणार हे ओघाने आलेच ना? इतर कोणी असते तर पोलिसांनी ऐकून घेतले असते का? मुळात यांना कुणी अधिकार दिला गडाची स्वच्छता आणि संवर्धन करण्याचा? गड किल्ले यांच्या मालकीचे आहेत का? सरकारी खाती आहेत ना त्यासाठी? मी "विधानसभा संवर्धन संस्था" काढून तिथे झाडलोट केली आणि कोणी काय खायचे नियम करू लागलो तर त्यास मला परवानगी मिळेल का?
---
वनखात्याच्या नियमानुसार वन्यक्षेत्रात मांसाहार वर्ज्य आहे हे मलाही माहित आहे. हा नियम गेली कित्येक वर्षे सातपुडा, गिर, राधानगरी तसेच अन्य अभयारण्यात कटाक्षाने पाळला जातो. असे असताना इतकी वर्षे गडांवर मात्र मांसाहार राजरोसपणे सुरु राहू शकेल का? नियमांचा गैरवापर करून पोलिसांवर दडपण आणून धार्मिक बंधने लादायला सुरवात केली आहे हे स्पष्ट आहे. हाईट म्हणजे "सुज्ञ" असण्याच्या नावाखाली काही जणांना मात्र मटनाबरोबर दारू सुद्धा प्यायला चालते. व्वा!
भरत टिंब, आरारा, सिंबा आणि
भरत टिंब, आरारा, सिंबा आणि काही लोकांना दुसरी कामे नाहीत का? की यांच्या वैयक्तिक प्रतिसादांना अवांतर म्हणण्याची पद्धत नाही? नवीन सदस्य आले की त्यांना कुणाचा तरी ड्युआयडी ठरवावे. त्यांचे खच्चीकरण करणे यातून पण ते टिकले की नंतर आलेले आयडी त्यांच्या नावावर खपवायचे किंवा स्वतःच नामसाधर्म्य असणारे आयडी काढणे आणि बिल दुसर्याच्या नावाने फाडावे. अगदी छान चालू आहे. निरुत्तर झाले म्हणून सूड घेण्यासाठी एव्हढे उद्योग??
आपल्याला नाही जमणारे हे..
नवीन Submitted by इनामदार on
नवीन Submitted by इनामदार on 20 June, 2018 - 13:00
<<
@इनामदार,
तुमच्या बेसिक मध्येच काहीतरी लोच्या आहे.
---
"गडावर मांसाहार, मद्यपान, धूम्रपान, गैरवर्तणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली."
<<
मग अशी मागणी करणे बेकायदेशीर कधी पासून झाले ? मुळात गडावर जाऊन बेकायदेशीर वर्तन काही लोक करत असतील तर त्यांना ते कृत्य करण्यापासून रोखणे हे सुजाण नागरिक असल्याचे लक्षण आहे.
---
हि गुंडगिरी नव्हे काय? पोलीसंच्यावर कारवाईचे बंधन आणले म्हणजे उजव्या विचारसरणीच्या कोणीतरी "वरून" फोन केला असणार हे ओघाने आलेच ना? इतर कोणी असते तर पोलिसांनी ऐकून घेतले असते का?
<<
इथे पोलिसांचा ऐकुन घेण्याचा न घेण्याचा प्रश्नच कुठुन येतो? पुरात्वविभाग व वनखाते यांचे नियम धाब्यावर बसवून ती सुशिक्षीत लोक गडावर बेकायदेशीर कृत्य करत होती. पुरात्वविभाग व वनखातेच्या नियमांप्रमाने व कायद्याने त्यांना शिक्षा देणे हे पोलिसांचे काम आहे. "उजव्या विचारसरणीच्या कोणीतरी "वरून" फोन केला असणार" वगैरे म्हणून, तुम्ही तुमची एक थाप लपविण्यासाठी आणखी किती थापा मारणार आहात?
---
मुळात यांना कुणी अधिकार दिला गडाची स्वच्छता आणि संवर्धन करण्याचा? गड किल्ले यांच्या मालकीचे आहेत का? सरकारी खाती आहेत ना त्यासाठी?
<<
इथले गड, किल्ले, मंदिरे, लेणी महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा एक भाग आहेत ह्या न्यायाने त्याच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाकडे येते. आज अश्या गडसंवर्धन करणार्या हजोरो संस्था महाराष्ट्रात आहेत
---
"विधानसभा संवर्धन संस्था" काढून तिथे झाडलोट केली आणि कोणी काय खायचे नियम करू लागलो तर त्यास मला परवानगी मिळेल का?
<<
प्रयत्न तर करुन बघा, तुमच्यात धमक असेल तर. परवानगी मिळेल न मिळेल हा नंतरचा प्रश्न !
---
नियमांचा गैरवापर घेऊन पोलिसांवर दडपण आणून भामट्यांनी धार्मिक बंधने लादायला सुरवात केली आहे हे स्पष्ट आहे. हाईट म्हणजे "सुज्ञ" असण्याच्या नावाखाली काही जणांना मात्र मटनाबरोबर दारू सुद्धा प्यायला चालते. व्वा!
<<
"पुरातत्त्व विभाग तसेच वन विभागाच्या नियमानुसार कोणत्याही किल्ल्यावर मद्यपान, मांसाहार आणि धूम्रपानास बंदी आहे." हा नियम इतका स्पष्ट असताना, वरिल वाक्य लिहिणार्या माणसाच्या मनात हिंदू व हिंदूत्ववाद्यांबद्दल किती विखार भरला आहे स्पष्टच दिसत आहे. स्वत:च्या थापा लपविण्या करता, तुम्ही बेकायदेशीर कृत्य करणार्यांचे एकातर्हेने समर्थन करताय हे तुमच्या लक्षात कसे येत नाही.
अहो इनामदार,
अहो इनामदार,
इथे मायबोलीवर या असल्या फेक जिलेब्या टाकून काय उपयोग ?
--
त्याऐवजी तुम्ही एक काम करा. या मासांहार बंदी विरोधात सिंहगडावर एक सविनय कायदे भंगाचे आंदोलन करा. सोबत एक बकरा व एक कडकनाथ घेऊन जा व तिथल्या बंदीची मागणी करणार्या हिंदूत्ववाद्यांसमोर बकरा व कडकनाथ आडवा पाडून यथेच्छ त्याचे मटण चापा.
असे करत असताना समजा त्या हिंदूत्ववाद्यांनी तुम्हाला यथेच्छ चोपला तर "एका पुरोगाम्याला हिंदूत्ववाद्यांची अमानुष मारहाण" अशी ब्रेकिंग न्युज देणारा एकादा पत्रकार सोबत ठेवा व पहा कसा ह्या हिंदूत्ववाद्यांचा माज एका झटक्यात उतरतो ते.
हिंदूत्ववाद्यांनी तुम्हाला
हिंदूत्ववाद्यांनी तुम्हाला यथेच्छ चोपला तर "एका पुरोगाम्याला हिंदूत्ववाद्यांची अमानुष मारहाण" अशी ब्रेकिंग न्युज देणारा एकादा पत्रकार सोबत ठेवा
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
"तुमच्या बेसिक मध्येच काहीतरी
"तुमच्या बेसिक मध्येच काहीतरी लोच्या आहे."
ओके बघूया कुणाच्या बेसिक मध्ये किती लोच्या आहे....
"मग अशी मागणी करणे बेकायदेशीर कधी पासून झाले ? मुळात गडावर जाऊन बेकायदेशीर वर्तन काही लोक करत असतील तर त्यांना ते कृत्य करण्यापासून रोखणे हे सुजाण नागरिक असल्याचे लक्षण आहे."
लोच्या १: मागणी करणे बेकायदेशीर मी म्हणालो नाही. मी विचारतोय गैरवर्तणुकीच्या यादीत मांसाहार करणे कसे येऊ शकते.
लोच्या २: जरी सार्वजनिक ठिकाणी कोण बेकायदेशीर काही करत असतील तरी तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही . त्यासाठी पोलीस आहेत. तुम्ही फारतर पोलिसांना बोलवू शकता.
"पुरात्वविभाग व वनखाते यांचे नियम धाब्यावर बसवून ती सुशिक्षीत लोक गडावर बेकायदेशीर कृत्य करत होती. पुरात्वविभाग व वनखातेच्या नियमांप्रमाने व कायद्याने त्यांना शिक्षा देणे हे पोलिसांचे काम आहे."
लोच्या ३: मी वर स्पष्ट सांगितले आहे वनखाते त्यांचे नियम इतर ठिकाणी काटेकोरपणे पाळते. सिंहगडावर गेली कित्येक वर्षे लाखो लोक दिवसाढवळ्या उघडपणे मांसाहार करत होते. बाकी ठिकाणी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणारे वनखाते इतक्या राजरोसपणे नियमभंग होऊ देणे शक्य नाही. आणि जरी या लोकांनी अन्य काही बेकायदेशीर केले असेल तर त्यांना पकडण्याचे काम पोलिसांचे आहे. संवर्धनाच्या नावाखाली गुंडगिरी करता येत नाही या देशात.
"उजव्या विचारसरणीच्या कोणीतरी "वरून" फोन केला असणार" वगैरे म्हणून, तुम्ही तुमची एक थाप लपविण्यासाठी आणखी किती थापा मारणार आहात?
लोच्या ४: पोलिसांना शहाणपण शिकवायला जा तुमच्या कानाखाली हाणून सांगतील आमचे काम आम्हाला करू द्या म्हणून. इथे मात्र चार गुंडांनी पोलिसांवर दबाव काय आणला आणि पोलिसांनी ऐकले याचे मी केलेल्या अंदाजाव्यतिरिक्त अन्य समाधानकारक स्पष्टीकरण असू शकत नाही.
"इथले गड, किल्ले, मंदिरे, लेणी महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा एक भाग आहेत ह्या न्यायाने त्याच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाकडे येते. आज अश्या गडसंवर्धन करणार्या हजोरो संस्था महाराष्ट्रात आहेत"
लोच्या ५: कायद्यानुसार संवर्धनाची जबाबदारी पुरातत्वखात्याची असते. नागरिकांची नव्हे. नागरिकांना डागडुजी बांधकाम वगैरे करता येत नाही. ज्या संस्था आहेत त्या उजव्यांच्या आशीर्वादाने सुरु असणार यात वादच नाही. उद्या मी अशी एखादी फलानि डीमकी संस्था काढून शनिवारवाड्याची डागडुजी करायला घेतली तर बेकायदेशीर कृत्य म्हणून मला अटक होईल.
"प्रयत्न तर करुन बघा, तुमच्यात धमक असेल तर. परवानगी मिळेल न मिळेल हा नंतरचा प्रश्न !"
लोच्या ६: २०१४ पूर्वी मात्र कोणत्या बिळात लपून बसल्या होत्या या संस्था आणि हे लोक? इतकी धमक त्यांनी २०१४ नंतर इम्पोर्ट केली का? धमक असण्यावर नाही त्याचे निकष वेगळे आहेत. आणि ते काय आहेत ते उघड गुपित आहे. गड किल्ले सारख्या सर्वजनिक व ऐतिहासिक वस्तूंची देखभाल करण्याची परवानगी "ठराविक" लोकांनाच मिळते. त्याआधारे चार गुंडांकरवी ते तिथे तानाशाही पण करू शकतात.
""पुरातत्त्व विभाग तसेच वन विभागाच्या नियमानुसार कोणत्याही किल्ल्यावर मद्यपान, मांसाहार आणि धूम्रपानास बंदी आहे." हा नियम इतका स्पष्ट असताना"
लोच्या ७: वनखाते त्यांचे नियम इतर ठिकाणी काटेकोरपणे पाळते. सिंहगडावर गेली कित्येक दशके लाखो लोक दिवसाढवळ्या उघडपणे मांसाहार करत होते. बाकी ठिकाणी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणारे वनखाते इतक्या राजरोसपणे नियमभंग होऊ देणे शक्य नाही.
@समीर.. मला काय करायचे आहे
@समीर.. मला काय करायचे आहे ते मी करत आहे. आपल्या सारख्या टुकार भोंदूत्ववाद्याने ते सांगण्याची आवश्यकता नाही. बाकी "चोप देणे" वगैरे बोलून भोन्दुत्ववाद्यांची सर्वत्र गुंडगिरी सुरु आहे हे कबूल केलेत हे योग्य झाले. सुमार विचारसरणी असणाऱ्या लोकांकडून तशीही फार अपेक्षा नाहीच.
नवीन Submitted by इनामदार on
नवीन Submitted by इनामदार on 20 June, 2018 - 15:06
<<
ह्या वरच्या प्रतिसादा इतका हास्यास्पद व टाकावू प्रतिसाद आजवर मी पाहिला नव्हता. महाराष्ट्रात गड-किल्ले संवर्धन करणार्या संस्था २०१४ नंतर उदयास आल्यात ??
जाऊद्या तुम्हाला उत्तर देणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे. तेंव्हा मी थांबतो.
---
जमल्यास वर समीर यांनी दिलेला सल्ला आमलात आणायचा प्रयत्न करा. सिंहगडावरच काय इतर सर्व किल्ल्यांवर तुम्हाला मटण चापायला मिळण्याचे चॅंनसेस आहेत.
Pages