सिंहगडवर (व इतर गडांवर सुद्धा?) मांसाहारास बंदी कशासाठी?

Submitted by इनामदार on 1 June, 2018 - 13:28

काही दिवसांपूर्वी सिंहगडवर गेलो होतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी गेलो होतो तेंव्हा तिथे परिस्थिती वेगळी होती. आता खूप सकारात्मक बदल झाले आहेत. स्वच्छता, डागडुजी, रस्ते वगैरे. बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. पण त्याचबरोबर एका गोष्टीचे कोडे उलगडले नाही. गडावर पूर्वी मांसाहारी जेवण मिळायचे ते आता बंद केले आहे. मद्यपान बंदी एकवेळ समजू शकतो. आपल्याकडे बरेचसे पब्लिक दारू पिली कि आरडाओरडा, शिवीगाळी, बाटल्या फोडणे तसेच अन्य घृणास्पद कृत्ये करतात ज्याचा इतर पर्यटकांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष त्रास होऊ शकतो.

पण मांसाहाराने काय घोडे मारले आहे? त्यावर बंदी कशासाठी? कचरा म्हणावा तर तो अन्य खाण्यापिण्याने पण होतोच आहे गडावर. मांसाहाराने थोडा अधिक होईल इतकेच. तिथे मी विचारणा केली असता "गडाचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून" वगैरे उत्तरे मिळाली. अरे म्हणजे इतिहासातील ज्या वीर पुरुष व पराक्रमी योद्धा असलेल्या महान विभूतींमुळे हा गड पवित्र स्थान बनले आहे ते लोक मांसाहार करत नव्हते शाकाहारी होते असे म्हणावयाचे आहे का? नरवीर तानाजी मालुसरे असोत वा खुद्द शिवछत्रपती असोत. पराक्रमी योद्धे होते. मांसाहार तर करतच होते. मग तिथे येणाऱ्यानी मांसाहार केला तर पावित्र्य बिघडण्याचे काय कारण? थोडीतरी तर्कसंगती आहे का ह्या बंदीला? नक्की कोण आहेत या बंदिमागे?

थोडा मागोवा घेतला तेंव्हा लक्षात आले एक "शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्था" म्हणून आहे (जसे काय गड किल्ले म्हणजे सरकारची नव्हे तर यांचीच मक्तेदारी) त्यांनी हि बंदीची मागणी व नंतर अंमलबजावणी केली आहे. काही बातम्यांमधून लक्षात आले कि सरकारी यंत्रणा नव्हे तर या संघटनेचे लोकच गुंडगिरी करून मांसाहार करू देत नाहीत. अजून थोडे खोलात जाऊन पाहिले असता लक्षात आले कि हि संघटना म्हणजे देशातील कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे पिल्ले आहे हे जाणवले (त्यांच्या फेसबुक पेज व इतर माहितीवरून). गड किल्ल्यांची निगा राखण्यासाठी खरे तर सरकारी यंत्रणा आहे. गड किल्ले कोणाची खाजगी मालमत्ता नव्हे. तरीदेखील गडांवर या खाजगी संघटनेचे वर्चस्व आहे!

काही जण मांसाहार बंदीसाठी वनखात्याच्या नियमाचा आधार घेताना दिसतात. म्हणे वनक्षेत्रात मांसाहार वर्ज्य आहे. अरे पण तसे असेल तर मग इतकी वर्षे वनखात्याने हे सुरु ठेवूच कसे दिले असते?

आणि मग सगळी मेख लक्षात आली.

मांसाहाराचे वावडे ना राजाला होते ना मावळ्यांना. मांसाहार न करणारे आहेत ठराविक हिंदुत्ववादी. त्यांना आवडत नाही म्हणून त्यांनी तो "अपवित्र" ठरवून त्यास गडांवर बंदी घातली असे समजायला बक्कळ वाव आहे. म्हणजे सरळ सरळ धार्मिक दहशत. बाकी काही नाही. (शिवाय याचा साईड इफेक्ट म्हणून "राजांना मांसाहार वर्ज्य होता म्हणूनच आजही गडांवर मांसाहारास बंदी आहे" असे अजून पाच पन्नास वर्षांनी कोणतरी एखादा भुक्कड कवी/शाहीर लिहून जाऊ शकतो हा भाग वेगळाच).

कुणाची काय काय मते आहेत यावर?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झाले का आर्ग्युमेंट आर्ग्युमेंट खेळून?
कोण जिंकले? कोण हारले? कुणाच्या मुद्द्यान्मुळे कुणाची मते बदलली? काय परिपाक काय चर्चेचा? गोळाबेरीज काय? शून्य?
चार घटका मनोरंजन झाले? आपल्या नावडत्या आयडींची जिरवून झाली? उद्देश सुफळ संपूर्ण? आता नवा एखादा विषय ऐरणीवर यायची वाट बघत बसूया

ज्यांचा ज्यांचा मांसाहार बंदीला विरोध आहे त्यापैकी किती जणांनी बंदी लादणाऱ्या संघटनेशी/व्यवस्थेशी संपर्क साधून खरी कारणे जाणून घ्यायचा प्रयत्न केला? सनदशीर मार्गाने निषेध नोंदवला? बंदी उठवण्यासाठी संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार केला? एखादी जनहित याचिका बिचिका दाखल केली?
बहुदा नसावी! कारण या सगळ्याला वेळ द्यावा लागतो, कष्ट करावे लागतात, कायदेशीर बाबींचा अभ्यास करावा लागतो, आपला मुद्दा नेटाने लावून धरावा लागतो
एव्हढे सगळे कुणी करायचे?
त्यापेक्षा इथे खरडणे सोप्पे... मुद्द्याच्या आडोशाने आपल्या नावडत्या आयडींवर, समाजावर, पक्षावर मनमुराद टीका करता येते.... मूळ मुद्दा धसास लागला काय आणि नाही काय? काय फरक पडतो?

दर थोडे दिवसांनी असा एखादा धागा निघतो आणि आपल्यातुपल्यातली तेढ अजुन वाढवण्याचे, वाढवतच नेण्याचे काम करतो

(माझ्या या पोस्टचा काहीएक उपयोग होणार नाही हे माहित असूनही केवळ रहावले नाही म्हणून लिहिले)

कवी श्यामची कविता
========

*थोड्यावेळापूर्वी*

आत्ताच थोड्या वेळापूर्वी
मैं हूँ डॉन...मैं हूँ डॉन..
ऐकत शिवाजी महाराज
मावळ्यांसह पुढच्या चौकात गेलेत
त्या आवाजाला घाबरून
माझ्या दिव्यांग मुलाने
चड्डीत सुसू केली..
राजांचं काय झालं माहीत नाही

आत्ताच थोड्या वेळापूर्वी
कोवळ्या गर्दीतून
सैराट ... सैराटचे आवाजही येत होते
ते मी शिवराय शिवराय मानून घेतले

एका आवेशित पोवाड्यानंतर
राजांना चौकात स्थानबद्ध करून
मावळ्यांनी ढाब्याकडे मोर्चा वळवलाय

आत्ताच थोड्यावेळापूर्वी
पाकिटावरून शाहिराशी हातघाई झाली
त्याने आईबापावरून चार तोफा डागल्या
आणि आपल्या बेदखल पराक्रमाची
कुणीतरी दखल घ्यावी म्हणून तोही गेलाय ढाब्यावर

आता चौक शांत आहे
पण कुठूनतरी आवाज येतोय
एक स्मारक तिकडेही व्हायला हवं
त्या.....
त्या ढाब्यावर!
_____________________ शाम
(*भवताल)

>>>>>>>>>>>>>>> जणांनी बंदी लादणाऱ्या संघटनेशी/व्यवस्थेशी संपर्क साधून खरी कारणे जाणून घ्यायचा प्रयत्न केला? सनदशीर मार्गाने निषेध नोंदवला? बंदी उठवण्यासाठी संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार केला? एखादी जनहित याचिका बिचिका दाखल केली?>>>>>>>

madam,
गैर-सरकारी लोकांनी नसलेल्या अधिकारात घातलेल्या बंदी साठी जनहित याचिका वगैरे दाखल करू म्हणता? आणि पत्रव्यवहार करू? कोणा बरोबर?
बरं,
उद्या हे लोण तुमच्या,माझ्या घरा पर्यंत पोहोचले आणि एकादशी ला अन्न शिजवणे बंद (एकादशीचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून ), बायकांनी जीन्स घालणे बंद (पुरुषाच्या मनाचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून ) वगैरे प्रकार सुरु झाले कि तुम्ही किती सनदशीर मार्गाने विरोध करता किंवा याचिका दाखल करता ते दाखवा बरं.

तसेही मायबोलीवर किंवा फेबु वर कीबोर्ड बदलून मुळ मुद्दा धसास लागत नाहीच, पण काही लोकांना एखाद्या गोष्टीकडे पहायचा वेगळा दृष्टीकोन नक्कीच मिळतो ज्यामुळे कदाचित एक माणूस/ एक कुटुंब आपली कुपमंडूक वृत्ती सोडून वागेल , पर्यायाने समाज एक micro/nanno//pico मिलीमीटर मोकळेपणा कडे पाउल टाकेल

( तुमच्या ज्या मागच्या पोस्ट आठवत आहेत त्यावरून माझ्या या पोस्टचा काहीएक उपयोग होणार नाही हे माहित असूनही केवळ रहावले नाही म्हणून लिहिले)

गैरसरकारी लोकांनी?
अहो सिन्हगडाचे विकीपेज तर म्हणतय की फॉरेस्ट डिपार्टमेंटनी प्रस्तावित केलेला आणि राज्य सरकारने शिक्कामोर्तब केलेला बॅन आहे हा!
लिहण्यापूर्वी जरा वाचत चला हो

बाकी ते इतरांच्या मतपरिवर्तनाचे म्हणाल तर त्या दर्जाची एकही पोस्ट दिसत नाही आहे मला इथे.
नुसता लोकांची उणीदुणी काढायचा पोस्टप्रपंच आहे

पालथ्या घड्यांवर पाणी ओतत बसायला फारसा रिकामा वेळ नाही आहे
त्यामुळे माझ्याकडून या धाग्यापुरता तरी पूर्णविराम.

जरा रूट कॉजकडे लक्ष द्या.

धाग्याचं शीर्षक एक प्रश्न आहे -

सिंहगडवर (व इतर गडांवर सुद्धा?) मांसाहारास बंदी कशासाठी?

आणि या जेन्यूइन प्रश्नाचं उत्तर असं आहे -

मांसाहार विक्री जिथे केली जाते त्याच्या जवळपास त्याचा उग्र वास सुटतो जो अनेकांना सहन होत नाही. त्यातही सिंहगडाचा सीजन म्हणजे पावसाळा. पावसाळ्यात तर ही घाण अजुनच पसरते. (अनेकांना या कालावधीत मांसाहार वर्ज्य असतो हा अजुन एक मुद्दा) तर ह्या वासामुळे मांसाहारविक्रीच्या दुकानाच्या आजुबाजूच्या अजून चार शाकाहारी दुकानांत देखील पब्लिक फिरकणार नाही. त्यामुळे मांसाहार विक्री करणार्‍या दुकानाच्या बाजूला मोठी गॅप ठेवून इतर दुकाने असावी लागतील. याशिवाय मांसाहाराचं वेस्टेज फेकायचं कुठे? त्याकरिता पुन्हा वेगळी गाडी बोलवून ते लांब टाकावं लागणार. दुकानांमध्ये सोडावी लागणारी जागा आणि वेस्टेज डंपिंगच्या गाड्या यामुळे सिंहगडावर अजुनच जागेची कमतरता भासेल. आजच परिस्थिती अशी आहे की असलेली जागा पुरत नाही. शनिवार / रविवार / इतर सुटीच्या दिवशी सकाळी दहा अकरापर्यंत पार्किंग फूल झालं की पर्यटकांच्या गाड्या रस्त्यावरच लागलेल्या असतात.

खरं तर सिंहगडावर जागेची इतकी कमतरता आहे आणि येणारे पर्यटक इतके जास्त की कुठलेच खाद्यपदार्थ विक्रीकरता ठेवायला नकोयत पण काय आहे की लोक दुरून येतात - चार सहा तासांच्या वर शरीर बिन अन्नाचे राहू शकत नाही म्हणून केवळ शरीराची गरज भागविण्याकरिता ही अन्न विक्री केंद्रे आहेत. मग त्यात लिमिटेड आयटम्सच ठेवलेत जे सगळ्यांना चालु शकतील. जसे की पिठले, भजी, वांग्याचं भरीत इत्यादी. आता आपण नेहमी खातो त्या पनीर बटर मसाला, वेज कुर्मा अशा पंजाबी डिशेस किंवा डोसा इडली सारख्या साऊथ इंडियन डिशेस तरी कुठे आहेत? आता त्या नाहीत म्हणून तक्रार करायची की पोटाला चालतंय असं काही शिवाय सकस आणी स्वादिष्ट मिळतंय ते खाऊन गड पाहायचा हे आपलं आपणच ठरवायचं.

हे जेन्यूईन उत्तर पटत नसेल तर -

सोपी गोष्ट आहे ज्यांचा मांसाहार बंदीला विरोध आहे त्यांनी गडावर स्वतःच मांसाहार (म्हणजे अगदी एअर फ्रायर मधला मासाहार देखील चालेल) विकायला बसावं - कोणी दमदाटी करायला आलं तर सरळ पोलिस केस करावी नपेक्षा स्वतःची प्रायवेट सिक्युरिटी बाऊन्सर आदी ठेवावेत. जो विरोध करेल त्याची तंगडीच मोडावी. हाकानाका..

हां आता प्रायवेट सिक्युरिटी आणि बाउन्सरचा दिवसाचा खर्च निघेल इतका नफा कमविण्याइतपत पब्लिक रिस्पॉन्स मिळाला तर उत्तमच आहे.

सरकारकडूनच विरोध असेल तर तुम्हाला आवश्यक ती लायसन्सच मिळणार नाहीत मग ही विक्री बेकायदेशीर ठरेल. आता सरकारी बंदी असेल तर ती २०१४ पासून आहे की त्यापूर्वीपासूनच ह्याचेही विवेचन मांडा.

>>>>सिन्हगडाचे विकीपेज तर म्हणतय की फॉरेस्ट डिपार्टमेंटनी प्रस्तावित केलेला आणि राज्य सरकारने शिक्कामोर्तब केलेला बॅन आहे हा>>>>
कृपया विकिपेज वाचून मते बनवू नयेत,
विकिपेज सोडता दुसरा काही सोअर्स असेल तर जरूर सांगा, वाचायला आवडेल.

मी ज्या बातम्या वाचल्या त्यात केवळ न्यू इअर पार्टी साठी गडावर दारू आणि नॉनव्हेज नेण्यास बंदी केली आहे इतकेच होते. (ज्यात गेट वर बॅग चेक करून दारू नॉनव्हेज जप्त केले जात होते).

मूळ लेखात काय लिहिले आहे ते एकदा वाचा बरे.

सरकारकडूनच विरोध असेल तर तुम्हाला आवश्यक ती लायसन्सच मिळणार नाहीत मग ही विक्री बेकायदेशीर ठरेल. >>>>>
ताक पिठल्याचा बिजनेस सरकारी परवाने घेऊन होतो का?
नसल्यास तो बिजनेस बंद का करु नये?

https://punemirror.indiatimes.com/pune/cover-story/veg-only-menu-at-sinh...
मानसी वैद्य म्हणताहेत ते खरे आहे. बंदी फॉरेस्ट खात्याकडून आहे. पण कारण इनामदार यांनी दिले तेच आहे. पावित्र्य आणि भावना.
तसंच मद्यपान आणि धूम्रपानावरही बंदी आहे.
या दोन्ही गोष्टी त्यांनी एकाच तागडीत घातल्यात..
गडावरच्या Mtdc च्या विश्रामग्रुहांतही मांसाहाराला बंदी असावी अशी काह़ींंची मागणी असल्याचं दिसतं.
मांसाहारामुळे अस्वच्छता होते असंही एक कारण दिलंय. पण मांसाहार शिजवणाऱ्यांवर स्वच्छतेची जबाबदारी हवी.
मांसाहाराऐवजी शाकाहारी भजी खाल्ली तर त्यांची हरकत दिसत नाही .

, the forest authorities have decided to make the year-end celebrations at the fort premises a vegetarian affair, much to the dismay of visitors.

मी वर म्हंटल्याप्रमाणे, हे फक्त 31 dec ला होणाऱ्या पार्ट्या साठी आहे, पूर्ण वर्षभराची बंदी असल्याचा उल्लेख माझ्या वाचनात नाही.

खरे तर मग तिथे ( सिंहगडावर व इतर गडांवर देखील) लोकांनी घरुनच ( किंवा वाटेत असलेल्या हॉटेल मधून ) खाद्य पदार्थ आणुन त्याची योग्य ती विल्हेवाट लावली तर सरकारने हरकत घेऊ नये, कारण स्वच्छता हा महत्वाचा निकष / हेतू असावा. उरलेले खरकटे, रिकाम्या बॉटल्स ( पाण्याच्या ) इत्यादी व्यवस्थीत पॅक करुन घरी न्यावे. मग तुम्ही व्हेज खा की नॉनव्हेज, हा तुमचा प्रश्न . कारण भारतीय लोक अतीशय बेशिस्त आहेत. कितीही कानीकपाळी ओरडले तरी थर्माकॉल वगैरे वापरुन कचरा करतातच. कुणीतरी आधी लिहीले आहे ना की भिमाशंकरला सुद्धा धबधब्याजवळ कचरा होता ते.

म्हणजे मुळात बंदी सार्वकालिक नाही. फक्त ३१ डिसें च्या रात्री होती. हिंदुत्त्ववादी इन्वॉल्व्ड नाहीत. शिवाधिन संस्थेच्या फेबु पेज वर याचा उल्लेख नाही - तिथल्या "फ्लेक्स" च्या गर्दीमधून मला तरी दिसला नाही - ते नोव्हें २०१७ नंतर एकदम मार्च २०१८ ची पोस्ट आहे. गूगल सर्च मधे याव्यतिरिक्त काहीही सापडत नाही. कोणत्याही जातीच्या संघटनांनी काही लिहील्याचे दिसत नाही. कोणतेही "भुक्कड" किंवा गेल्या ४-५ वर्षात उगवलेले जागतिक कीर्तीचे युनो ने प्रमाणित केलेले पुरोगामी इतिहासकारही या मागे दिसत नाहीत.

मग राहिला प्रश्न ३१ डिसें चा. आता सुमारे ४-५ महिने उलटले आहेत. आणि ३१ डिसें ला सार्वजनिक ठिकाणी मूलभूत हक्कांवर जी गदा येते त्यात मांसाहार पहिल्या दहातही नसेल Happy

मांसाहारावर (३१ ला का होईना) बंदी घालणे हा हेवी हॅण्डेड निर्णय वाटला पण कायमचा निर्णय नसल्याने इतका का इश्यू केला जातोय कळले नाही.

खाण्यापिण्याच्या बाबतीत भेदभाव, उच्चनीचता आणि तुच्छता बाळगायचा मूठभर लोकांचा कडवेपणा इतका वाढू लागलाय की कधी कधी ब्रिगेडसारख्या एखाद्या जहाल संघटनेने यात लक्ष घालावे असे वाटून जाते. >>> हीरा, एरव्ही तुमच्या अनेक पोस्ट्स १००% पटण्यासारख्या असतात. पण ही पाहून आश्चर्य वाटले. यातल्या कडवेपणा बद्दल वाद नाही, त्याचा विषाद तुम्हाला वाटला त्याबद्दलही पूर्ण आदर आहे. पण याकरता ब्रिगेड म्हणजे श्रीराम सेनेच्या लोकांची जिरवायला बजरंग दलाचे लोक बोलावण्यासारखे झाले. दोन्हीत काहीच फरक नाही Happy

फारएन्ड गल्लत करत आहात,

सरकारी नियमाने घातलेली बंदी केवळ 31 डिसेंबर पुरती होती.
आजच्या तारखेला तशी ऑफिशियल बंदी व नियम अस्तित्वात नाही
परंतु इनामदार यांच्या अनुभवानुसार
>>>> मागोवा घेतला तेंव्हा लक्षात आले एक "शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्था" म्हणून आहे (जसे काय गड किल्ले म्हणजे सरकारची नव्हे तर यांचीच मक्तेदारी) त्यांनी हि बंदीची मागणी व नंतर अंमलबजावणी केली आहे. काही बातम्यांमधून लक्षात आले कि सरकारी यंत्रणा नव्हे तर या संघटनेचे लोकच गुंडगिरी करून मांसाहार करू देत नाहीत.>>>(हे 31 दिसेम्बर सोडून रेग्युलर फिचर आहे असे वाटतंय) ही जी घटनाबाह्य बंदी/मुस्कटदाबी केली आहे त्याबद्दल त्यांनी लिहिले आहे

आता तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे?
1) शिवाधीन च्या FB पेज वर या गुंडगिरी चा उल्लेख नाही म्हणून त्यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत
2) 31 दिसेम्बर ला बंदी होती मग आता पण असेल तर काय हरकत आहे?
3) 31 dec ला बंदी होती मग ते आता 5 महिन्यानंतर का उगाळताय?

यातले काहीही नाही. पण मूळ पोस्ट मधे जे आरोप आहेत त्याला काहीतरी बेसिस हवे ना? त्यांनी इतके जरी लिहीले असते की त्यांनी स्वतः तेथे पाहिले की अमुक संघटनेचे लोक अडवत होते, तरी त्यावर शंका घेण्याचे कारण नाही. पण तसेही दिसत नाही.त्यांनी फेबु पेज चा संदर्भ दिला आहे. त्यात काही नाही. सर्च मधेही काही दिसले नाही. फेबु पेज वर बघितले तर मुजरा, एकच राजे, मावळा, मर्द गडी वगैरेंची रेलचेल आहे. हे टीपिकल सनातनी नव्हेत

अशी स्वघोषित बंदी घालायची पॉवर कोणत्याच सरकारबाह्य/घटनाबाह्य केन्द्राकडे नसायलाच हवी. पण मुळात तसे काहीच सापडले नाही, म्हणून ते लिहीले आहे.

झाली अनेक वर्ष या किश्श्याला पण हे सगळं वाचून आठवलं
माझा एक जैन रूममेट होता, कांदा लसूण खायचा नाही, दारू मात्र आवडीने प्यायचा
नवीन पोराला घेताना तो मांसाहारी नाही ना हे पाहूनच घ्यायचा,
एकाला एकदा परत पाठवला कारण मांसाहारी होता,
तो पोरगा याला विचारत होता मी दारू पीत नाही इथे कोणी दारू पितात का? मला चालणार नाही Happy Happy Happy
या महान मुलाने त्याला कधीच सांगितलं नाही की हा स्वतः दारू पितो.
त्याला सांगितलं तू मांसाहारी आहेस म्हणून तुला इथे राहता येणार नाही Happy Happy Happy

Submitted by मानसी वैद्य on 4 June, 2018 - 04:15
- सदर पोस्टही उणेदुणे काढण्यापेक्षा वेगळं काही करत नाही. शेंबुड आपल्या नाकाला म्हण आठवली.

येथील काही पोस्ट वाचून असे वाटत आहे की शाकाहार दारूला पवित्र करतो !

मायबोलीवर कोणी जाणकार असेल तर प्रकाश टाका,
पिताना सोबत शाकाहार केल्यावर दारू चढत नाही का?

माझ्यापुरते सांगायचे झाल्यास मी मांसाहार करतो.
पण मी आजवर सोबत कधी दारू प्यायलो नाही.
माझा आजवरचा मांसाहार व्यर्थ झाला का?
की मी एक अ‍ॅबनॉर्मल व्यक्तीमत्व आहे जो दारूला स्पर्श न करता मांसाहार करतो, करू शकतो..

मी वर दिलेल्या पुणे मिररमधल्या बातमीतला हा भाग वाचला का?
Cooking of non-vegetarian food and consuming liquor prompt the youths to become violent at the fort.

When Mirror asked Bhavsar why there was a ban on cooked non-veg food as well, he asserted, “Only veg meals will be allowed, not non-veg ones. The fort is a historical monument. The emotions of history lovers and followers of Chhatrapati Shivaji and his general Tanaji Malusare are attached with the place We would not allow eating or cooking nonveg on the fort.”

However, regular visitors are protesting against this decision, terming it as nothing but moral policing that puts restrictions on the eating habits of people for no reason. Rajesh Date, a student who plans to visit Sinhagad Fort on this New Year’s Eve, said, “It is okay if they won’t allow liquor, but why is there a ban on eating non-veg? It is our choice what to eat and what not to. It is also okay if there is a ban on cooking non-veg at the fort. But what is the issue if we bring nonveg in a tiffin or parcel? This is nothing but moral policing.”

Another IT engineer told Mirror on condition of anonymity, “It is not a good decision as it measures all the visitors by the same yardstick. Non-veg food is the USP of the fort; this is where we could get desi chicken thalis. This decision will hamper tourism prospects as the number of tourists would dwindle. We have no option but to find another destination to celebrate New Year.”

.दुर्गप्रेमींनी उधळली सिंहगडावर दारूपार्टी

यात खाजगी विश्रामगृहात चाललेली उच्चभ्रू लोकांची पार्टी म्हटलंय. कोंणत्याही प्रकारचा कचरा करू नये, याबद्द्ल प्रश्नच नाही. पण त्या संघटनेच्या प्रमुखाच्या वक्तव्यातही मांसाहाराचा उल्लेख आहेच.

३. सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता राखण्यासाठी कडक पावले उचलावी - आशुतोष देशमुख

याही बातमीत मांसाहाराला मद्यपान, धूम्र्पान, गैरवर्तणूक यांच्या पंक्तीत बसवलंय.

४. किल्ले रायगड येथिल MTDC मधे मांसाहार विक्री बंद करावी तसेच सर्व किल्ल्यांवरील मांसाहार विक्रिला बंदी घालावी असे निवेदन देण्यात आले

महाराष्ट्रातील बहुसंख्य जनता मांसाहारी असताना, मांसाहार केल्याने एखाद्या जागेचे "पावित्र्य" नष्ट होते हा विचार कसा रुजला असेल?

{{{ मांसाहार केल्याने एखाद्या जागेचे "पावित्र्य" नष्ट होते हा विचार कसा रुजला असेल? }}}

वारकरी संप्रदायामुळे.

वारकरी (माळकरी) हे स्वतः मांसाहार करत नाहीत पण दुसर्‍यांच्या मांसाहारावर त्यांचा आक्षेप कधी जाणवला नाही. माझे चुलत आजोबा माळकरी होते पण त्यांच्या (आणि त्यांच्या इतर माळकरी मित्रांच्या) घरी आणि इतरही वेळी त्यांच्या पंक्तिला मांसाहार चालायचा. माळ काढुन ठेउन मांसाहार करणे हे देखिल काही जणांना चालायचे. अगदी काही वर्षांपुर्वीपर्यंत वारकरी खुपच सहिष्णु होते. एखाद्या जागेचे "पावित्र्य" ही कल्पना आणि त्यातला कर्मठपणा वारकरी संप्रदायामुळे रुजला असेल हे पटत नाही.

मांसाहार अपवित्र आहे, तो केल्याने एखाद्या ठिकाणचे पावित्र्य भंग पावते, मांसाहार शक्यतो घरी किंवा हॉटेलात करावा, बाहेर सार्वजनिक जागेत शक्यतो नको कारण तो करताना दृष्टीस पडल्यास काहींच्या भावना दुखावल्या जातात हा विचारच किती हीन आहे. सत्तर ते ऐशी टक्के लोक जे अन्न आनंदाने खातात ते अपवित्र होऊच कसे शकते. इतरांच्या चालीरीती समजून घ्यायच्या नाहीतच उलट त्यांविषयी तुच्छ भाव बाळगायचा हे कुठले शुद्ध आचरण! कुठले धर्मपालन! कुठली समरसता!
हे सर्व पाहून विषण्णता आणि हतबलता येते. फार एण्ड यांनी म्हटल्याप्रमाणे माझे ब्रिगेडविषयीचे ते तीव्र वाक्य खरोखर आत्यंतिक उद्वेगातून आले आहे. काहीतरी जहाल उपाययोजना केल्याशिवाय ही ॲपर्थाइड, कंपार्टमेंटलाय्झेशन संपणारच नाही का असे वाटते. हा प्रश्न शेकडो वर्षे रुजलेल्या मानसिकतेचा, उच्चनीचतेचा, विषमतेचा आहे म्हणून त्याला महत्त्व आहे आणि म्हणूनच इतके प्रतिसाद लिहिले.

१. केवळ वाद निर्माण करण्याकरिता किंवा कोणावर टीका करायला किंवा कोणाला जिंकण्या/हरवण्याकरिता हा धागा निर्माण केलेला नाही. जे काही निर्णय घेतले जातात त्याआडून अन्य अजेंडे राबवले जात असतील तर त्याची चर्चा होणे अपेक्षित आहे. आणि अजाणतेपणी जर कोणी अशा निर्णयां मागील हेतूंवर विश्वास ठेवला असेल त्यांना त्यावर प्रश्न विचारायची बुद्धी झाली तरी या धाग्याचे सार्थक झाले असे मी मानतो. बाकी, कोणी आपले मत बदलावे कि नाही हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.

२. सरकारी यंत्रणांना हाताशी धरून ज्या संघटनांनी हा निर्णय लादला आहे त्यांचे समर्थन करणाऱ्यांनी कायदेशीर बाबींचा काय अभ्यास केलाय हे जरा सांगावेच. कारण या देशाच्या संविधानानुसार प्रत्येकाला आपापल्या खाण्यापिण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. कोणीही कोणाच्याही खाण्याबाबत मर्यादा आणू शकत नाही. पण जिथे झुंडशाही असते तिथे "संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार" करणे आणि "सनदशीर मार्गाने निषेध" नोंदवणे वगैरे केवळ हास्यास्पद आणि निरर्थक आहे. जनहित याचिका नक्कीच दाखल करावी लागेल कारण हा संविधानाने दिलेल्या अधिकारावर घाला आहेच शिवाय या निर्णयाने सिंहगडावर पर्यटकांसाठी जेवण बनवणाऱ्या कित्येक असंघटीत गरीब हॉटेल व्यवसायिकांच्या व्यवसायावर सुद्धा मोठा परिणाम झालेला आहे. पण अशी याचिका दाखल करण्यापूर्वी तितकी जागृती निर्माण व्हायला हवी. अशा प्रकारच्या धाग्यांमुळे ती व्हायला मदत होते यावर माझा विश्वास आहे. केवळ मीच नाही अनेकांनी सोशल फोरम्सवर याबाबत निषेध नोंदवलेला आहे. एक उदाहरण:

https://punemirror.indiatimes.com/pune/campus/campus-debate/articleshow/...

३. हा निर्णय केवळ ३१ डिसेम्बर करिता घेतलेला नाही. कायमचा आहे. भरत यांनी बातम्यांचे दुवे दिलेले आहेतच. त्याबद्दल त्यांचे आभार.

>> कवी श्यामची कविता

या कवितेचा आशय आणि संदर्भ वेगळा आहे. बेशिस्त बेतालपणाचे मी सुद्धा समर्थन करत नाही. पण धाग्याचा विषय वेगळा आहे.

मांसाहार बंद करण्यापेक्षा लेज ची पाकिटे, कुरकुरे, प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या तिथे विकण्यास किंवा घेऊन जाण्यास बंदी केली तर जास्त फायदा होईल.अगदी सुंदर दरीत डोकावून पहावे तर झाडं दिसण्यापूर्वी अडकलेल्या पाण्याच्या बाटल्या, मक्याची कणसं आणि लेज ची रंगीत पाकिटं दिसतात.
गड स्वच्छ ठेवायला हे मुद्दे
१. लेज्/कुरकुरे/ज्याचा कचरा खाल्ल्यावर टाकावा लागेल असे काहीही गडावर घेऊन जाण्यास किंवा विकण्यास सर्व दिवस बंदी.
२. मांसाहार बनवल्यास तिथे चुलीवर कोणालाही बनवू न देणे, व्यवस्थित हॉटेलात विकून उसाच्या चिपाडाच्या प्लेट मध्ये वाढून उरलेला कचरा कचर्‍याच्या डब्यात टाकणे. हे होतेय का हे पाळण्याची जबाबदारी विक्रेत्याची. न पाळल्यास दंड.
३. व्हेज च्या बाबतीत मुद्दा क्र. २ प्रमाणेच, फक्त कचरा कंपोस्ट करता येईल.
४. लोकांना सवयी लावून/येताना बक्षिस म्हणून काढलेल्या तिकीटाची निम्मी रक्कम परत देऊन स्वतःच्या मेटल च्या बाटल्या/न फेकता येणार्‍या वॉटर बॅग्/स्टिलच्या ताटल्या/चहाचे मग घरुन आणण्यास प्रवृत्त करणे. सुरुवातीला त्रास होईल पण नंतर सवय लागेल.
५. युज्ड पॅड्+लहान मुलांचे डायपर टाकायला सोयीच्या जागी २-३ इन्सिनरेटर ठेवणे. (बंगलोर मध्ये ५०००/नग पासून उपलब्ध, कोणाकडून असेंबल करुन घेतल्यास अजून स्वस्त पडतील.)
६. हे सर्व पाळणार्‍यास रिवार्ड आणि न पाळणार्‍यास दंड.

भरत, धन्यवाद. ती लिन्क नव्हती पाहिली - कारण तुमच्या पोस्ट मधे बंदी फॉरेस्ट खात्याकडून आहे वाचले त्यामुळे तीही ३१ च्याच बातमीबद्दल असेल असे वाटले. आता त्या बाकी लिन्क्स पाहिल्या.

हे बरेच क्लिष्ट आहे. कायमची बंदी आहे ती वनखात्याकडून. ते ती एन्फोर्स करत नाहीत पण अशा संघटना करतात, त्यांचे स्वतःचे इण्टरप्रिटेशन वापरून व त्यांना जे डोक्यात जाते त्याला विरोध करून.

पण यावरून नेहमीच्या यशस्वी कलाकारांचे जे बॅशिंग झाले त्यांचा इथे काही संबंध नाही. इथले कलाकार वेगळे आहेत. मला पूर्वी अनेक माहीत होते. खूप कट्टर असतात - अशा अर्थाने, की जी कामे करतात त्यात झोकून देउन करतात. दिवसरात्र गडावर जाउन बसतात. अनेक चांगली कामे करतात, जी सरकारनेच करायला हवीत. यातले अनेकजण एरव्ही "खाणारे" असतात. पण कोठे आणि कधी खायचे यांचे त्यांचे कट्टर लॉजिक असते, आणि ते इतरांनीही फॉलो करावे असा त्यांचा हट्ट असतो. यांना कंट्रोल मधे ठेवले नाही तर यांची न्यूसन्स व्हॅल्यू प्रचंड असते. पण हे केवळ गुंड टाइप नसतात. वैयक्तिकरीत्या नॉर्मल, शिकणारी, नोकरी करणारी मुलेच असतात बरीचशी. फक्त इतिहास, शिवराय्/संभाजी, गड किल्ले यांचे ऑब्सेशन असते. तेथे अनेक चांगली कामे करतात, पण त्यातूनच एक "ओनरशिप" वाटते त्यांना व त्यातून ते असले काहीतरी चमत्कारिक निर्णय घेतात व त्याचा सर्वसामान्य लोकांना त्रास होउ शकतो. तसेच यातील बहुतेकांना कोणतेही व्यक्तिस्वातंत्र, स्त्रीस्वातंत्र्य वगैरेंचे वावडे असते. किंवा समजतच नाही (अनेक तेवढे वयाने मोठेही नसतात समजण्याइतके). "नाही म्हणजे नाही. विषय संपला" टाइप असतात हे. याबाबतीत कट्टर्/हौशी पण घटनेची सुद्धा नीट माहिती नसलेले देशप्रेमी असतात त्याचीच ही जरा वेगळी आवृती.

सत्तर ते ऐशी टक्के लोक जे अन्न आनंदाने खातात ते अपवित्र होऊच कसे शकते. इतरांच्या चालीरीती समजून घ्यायच्या नाहीतच उलट त्यांविषयी तुच्छ भाव बाळगायचा हे कुठले शुद्ध आचरण! कुठले धर्मपालन! कुठली समरसता! >>> हीरा यांच्या या वाक्याशी पूर्ण सहमत आहे. मात्र स्पेसिफिकली या बातमीत हा विरोध फक्त न खाणार्‍यांकडून आहे असे नाही. एरव्ही खाणारे लोकही त्यांच्या दृष्टीने जेव्हा खाणे योग्य नसते (अमुक वारी, देवळा जाण्या आधी ई.ई. शंभरएक प्रकार असतील) तेव्हाही तितकेच कट्टर होतात मांसाहाराच्या बाबतीत.

वास्तविक गडावरच्या कचर्‍यात घरचे नेलेले "शुद्ध व्हेज" त्रिकोणी सॅण्डविच, चिकनचे हाड, लेज चे पाकीट या तिन्हीत काहीच फरक नाही. तिन्ही तेथे उपरेच आहे. किंबहुना सॅण्डविच आणि लेज जास्त उपरे आहे. माझा या सार्वत्रिक कचर्‍याला विरोध आहे, लोकांवर आपले म्हणणे लादायला विरोध आहे. मांसाहाराला अजिबात नाही. गडांवर ऐतिहासिक जागा असतात, तेथे कोणतेच खाणे, कचरा होईल असे काहीच घेउन जाउ देउ नका. नेमून दिलेल्या जागी लोकांना काहीही खाउदे, कचर्‍याच्या विल्हेवाटीची व्यवस्था असेल तर कोणाला विरोध असायचे काय कारण आहे?

mi-anu , सर्वोत्तम प्रतिसाद. नुसती चर्चा करण्याऐवजी आणि भावनोद्रेकात गुंतण्याऐवजी काही खरेखुरे मुळाशी पोचणारे उपाय सुचवलेत.

बर्राच उहापोह झाला ... आता काय इनामदार गडावर नॉनव्हेजचे दुकान टाकणार का ? असतील तर नाव काय ठेवणार ?

Pages