काही दिवसांपूर्वी सिंहगडवर गेलो होतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी गेलो होतो तेंव्हा तिथे परिस्थिती वेगळी होती. आता खूप सकारात्मक बदल झाले आहेत. स्वच्छता, डागडुजी, रस्ते वगैरे. बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. पण त्याचबरोबर एका गोष्टीचे कोडे उलगडले नाही. गडावर पूर्वी मांसाहारी जेवण मिळायचे ते आता बंद केले आहे. मद्यपान बंदी एकवेळ समजू शकतो. आपल्याकडे बरेचसे पब्लिक दारू पिली कि आरडाओरडा, शिवीगाळी, बाटल्या फोडणे तसेच अन्य घृणास्पद कृत्ये करतात ज्याचा इतर पर्यटकांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष त्रास होऊ शकतो.
पण मांसाहाराने काय घोडे मारले आहे? त्यावर बंदी कशासाठी? कचरा म्हणावा तर तो अन्य खाण्यापिण्याने पण होतोच आहे गडावर. मांसाहाराने थोडा अधिक होईल इतकेच. तिथे मी विचारणा केली असता "गडाचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून" वगैरे उत्तरे मिळाली. अरे म्हणजे इतिहासातील ज्या वीर पुरुष व पराक्रमी योद्धा असलेल्या महान विभूतींमुळे हा गड पवित्र स्थान बनले आहे ते लोक मांसाहार करत नव्हते शाकाहारी होते असे म्हणावयाचे आहे का? नरवीर तानाजी मालुसरे असोत वा खुद्द शिवछत्रपती असोत. पराक्रमी योद्धे होते. मांसाहार तर करतच होते. मग तिथे येणाऱ्यानी मांसाहार केला तर पावित्र्य बिघडण्याचे काय कारण? थोडीतरी तर्कसंगती आहे का ह्या बंदीला? नक्की कोण आहेत या बंदिमागे?
थोडा मागोवा घेतला तेंव्हा लक्षात आले एक "शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्था" म्हणून आहे (जसे काय गड किल्ले म्हणजे सरकारची नव्हे तर यांचीच मक्तेदारी) त्यांनी हि बंदीची मागणी व नंतर अंमलबजावणी केली आहे. काही बातम्यांमधून लक्षात आले कि सरकारी यंत्रणा नव्हे तर या संघटनेचे लोकच गुंडगिरी करून मांसाहार करू देत नाहीत. अजून थोडे खोलात जाऊन पाहिले असता लक्षात आले कि हि संघटना म्हणजे देशातील कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे पिल्ले आहे हे जाणवले (त्यांच्या फेसबुक पेज व इतर माहितीवरून). गड किल्ल्यांची निगा राखण्यासाठी खरे तर सरकारी यंत्रणा आहे. गड किल्ले कोणाची खाजगी मालमत्ता नव्हे. तरीदेखील गडांवर या खाजगी संघटनेचे वर्चस्व आहे!
काही जण मांसाहार बंदीसाठी वनखात्याच्या नियमाचा आधार घेताना दिसतात. म्हणे वनक्षेत्रात मांसाहार वर्ज्य आहे. अरे पण तसे असेल तर मग इतकी वर्षे वनखात्याने हे सुरु ठेवूच कसे दिले असते?
आणि मग सगळी मेख लक्षात आली.
मांसाहाराचे वावडे ना राजाला होते ना मावळ्यांना. मांसाहार न करणारे आहेत ठराविक हिंदुत्ववादी. त्यांना आवडत नाही म्हणून त्यांनी तो "अपवित्र" ठरवून त्यास गडांवर बंदी घातली असे समजायला बक्कळ वाव आहे. म्हणजे सरळ सरळ धार्मिक दहशत. बाकी काही नाही. (शिवाय याचा साईड इफेक्ट म्हणून "राजांना मांसाहार वर्ज्य होता म्हणूनच आजही गडांवर मांसाहारास बंदी आहे" असे अजून पाच पन्नास वर्षांनी कोणतरी एखादा भुक्कड कवी/शाहीर लिहून जाऊ शकतो हा भाग वेगळाच).
कुणाची काय काय मते आहेत यावर?
मटण घरात खा, गडावर नको... असा
मटण घरात खा, गडावर नको... असा सन्देश आहे.
आता गडाला मी घर मानतो असे म्हणुन गडावर हादडू नका....
हळूच लपवून खा
हळूच लपवून खा
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-tourism-department...
या बातमी बद्दल मनात मिक्स
या बातमी बद्दल मनात मिक्स विचार आहेत.
महत्वाचे टुरिस्ट उत्पन्न मिळणारे किल्ले तसेच ठेवून इतर लहान सहान किल्ल्यात गावाच्या परवानगीने त्याचे हॉटेल बनवायला हरकत नसेल ना?म्हणजे एरवी किल्ले ओस पडले असतील, त्यावर ड्रग घेत असतील लोक किंवा गैर कृत्ये करत असतील त्या ऐवजी लीगल काही असं.पण मला याचे सर्व पैलू नीट माहीत नाहीत.
शिवाय काही जण ही अफवा आहे असं पण म्हणतायत.
https://www.tv9marathi.com
https://www.tv9marathi.com/maharashtra/list-of-maharashtra-forts-which-a...
1947 साली धडधाकट वास्तू राजा
1947 साली धडधाकट वास्तू राजा महाराज संस्थानिक ह्यांनी गिळल्या आणि हिंदू इतिहास या नावाने खंड , खंडहर, खिंड, खंदक, खिंडार , खिद्रापूरसारखी मोडकी देवळे आणि म्युझियम मधले खापराचे तुकडे हे सामान्य लोकांच्या नरड्यात घातले , असे माझे स्पष्ट मत आहे.
https://www.maayboli.com/node/46232
1947 साली धडधाकट वास्तू राजा
1947 साली धडधाकट वास्तू राजा महाराज संस्थानिक ह्यांनी गिळल्या आणि हिंदू इतिहास या नावाने खंड , खंडहर, खिंड, खंदक, खिंडार , खिद्रापूरसारखी मोडकी देवळे आणि म्युझियम मधले खापराचे तुकडे हे सामान्य लोकांच्या नरड्यात घातले , असे माझे स्पष्ट मत आहे.>>>>
मग? आता काय करायचे?
त्यांचेही सगळे काढून घ्यायचे
आहे ते वापरायचे
आपल्याच जुन्या जुन्या
आपल्याच जुन्या जुन्या धाग्यांनी (आयड्यांनी) लईच नॉस्टॅल्जिक होऊन राहलंय जामोप्याभौ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-tourism-department...
असले काहीतरी खुसपट निर्माण करायचे आणि लोकांच्या प्रतिक्रिया आजमावून बघायच्या किंवा त्यांचे लक्ष अन्य मुद्यांवरून विचलित करायचे हे यांचे नेहमीचेच उद्योग.
Pages