सिंहगडवर (व इतर गडांवर सुद्धा?) मांसाहारास बंदी कशासाठी?

Submitted by इनामदार on 1 June, 2018 - 13:28

काही दिवसांपूर्वी सिंहगडवर गेलो होतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी गेलो होतो तेंव्हा तिथे परिस्थिती वेगळी होती. आता खूप सकारात्मक बदल झाले आहेत. स्वच्छता, डागडुजी, रस्ते वगैरे. बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. पण त्याचबरोबर एका गोष्टीचे कोडे उलगडले नाही. गडावर पूर्वी मांसाहारी जेवण मिळायचे ते आता बंद केले आहे. मद्यपान बंदी एकवेळ समजू शकतो. आपल्याकडे बरेचसे पब्लिक दारू पिली कि आरडाओरडा, शिवीगाळी, बाटल्या फोडणे तसेच अन्य घृणास्पद कृत्ये करतात ज्याचा इतर पर्यटकांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष त्रास होऊ शकतो.

पण मांसाहाराने काय घोडे मारले आहे? त्यावर बंदी कशासाठी? कचरा म्हणावा तर तो अन्य खाण्यापिण्याने पण होतोच आहे गडावर. मांसाहाराने थोडा अधिक होईल इतकेच. तिथे मी विचारणा केली असता "गडाचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून" वगैरे उत्तरे मिळाली. अरे म्हणजे इतिहासातील ज्या वीर पुरुष व पराक्रमी योद्धा असलेल्या महान विभूतींमुळे हा गड पवित्र स्थान बनले आहे ते लोक मांसाहार करत नव्हते शाकाहारी होते असे म्हणावयाचे आहे का? नरवीर तानाजी मालुसरे असोत वा खुद्द शिवछत्रपती असोत. पराक्रमी योद्धे होते. मांसाहार तर करतच होते. मग तिथे येणाऱ्यानी मांसाहार केला तर पावित्र्य बिघडण्याचे काय कारण? थोडीतरी तर्कसंगती आहे का ह्या बंदीला? नक्की कोण आहेत या बंदिमागे?

थोडा मागोवा घेतला तेंव्हा लक्षात आले एक "शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्था" म्हणून आहे (जसे काय गड किल्ले म्हणजे सरकारची नव्हे तर यांचीच मक्तेदारी) त्यांनी हि बंदीची मागणी व नंतर अंमलबजावणी केली आहे. काही बातम्यांमधून लक्षात आले कि सरकारी यंत्रणा नव्हे तर या संघटनेचे लोकच गुंडगिरी करून मांसाहार करू देत नाहीत. अजून थोडे खोलात जाऊन पाहिले असता लक्षात आले कि हि संघटना म्हणजे देशातील कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे पिल्ले आहे हे जाणवले (त्यांच्या फेसबुक पेज व इतर माहितीवरून). गड किल्ल्यांची निगा राखण्यासाठी खरे तर सरकारी यंत्रणा आहे. गड किल्ले कोणाची खाजगी मालमत्ता नव्हे. तरीदेखील गडांवर या खाजगी संघटनेचे वर्चस्व आहे!

काही जण मांसाहार बंदीसाठी वनखात्याच्या नियमाचा आधार घेताना दिसतात. म्हणे वनक्षेत्रात मांसाहार वर्ज्य आहे. अरे पण तसे असेल तर मग इतकी वर्षे वनखात्याने हे सुरु ठेवूच कसे दिले असते?

आणि मग सगळी मेख लक्षात आली.

मांसाहाराचे वावडे ना राजाला होते ना मावळ्यांना. मांसाहार न करणारे आहेत ठराविक हिंदुत्ववादी. त्यांना आवडत नाही म्हणून त्यांनी तो "अपवित्र" ठरवून त्यास गडांवर बंदी घातली असे समजायला बक्कळ वाव आहे. म्हणजे सरळ सरळ धार्मिक दहशत. बाकी काही नाही. (शिवाय याचा साईड इफेक्ट म्हणून "राजांना मांसाहार वर्ज्य होता म्हणूनच आजही गडांवर मांसाहारास बंदी आहे" असे अजून पाच पन्नास वर्षांनी कोणतरी एखादा भुक्कड कवी/शाहीर लिहून जाऊ शकतो हा भाग वेगळाच).

कुणाची काय काय मते आहेत यावर?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Submitted by अनिरुध्द.. on 20 June, 2018 - 15:16
"समीर यांनी दिलेला सल्ला आमलात आणायचा प्रयत्न करा"

बुद्धीची कुवत कळली. बौद्धिक प्रतिवादात मुद्दे संपले कि मानसिक चिडचिड होऊन हाणामारीचे समर्थन. नवीन काहीच नाही.

<<< नरवीर तानाजी मालुसरे असोत वा खुद्द शिवछत्रपती असोत. पराक्रमी योद्धे होते. मांसाहार तर करतच होते. मग तिथे येणाऱ्यानी मांसाहार केला तर पावित्र्य बिघडण्याचे काय कारण? थोडीतरी तर्कसंगती आहे का ह्या बंदीला? नक्की कोण आहेत या बंदिमागे?<<<
हे लय लय लय भारी राव!
या न्यायाने शनवारवाड्यावर नाटकशाळाही नाचवायला हव्या. पेशवाईत होत्याच की!

बुद्धीची कुवत कळली. बौद्धिक प्रतिवादात मुद्दे संपले कि मानसिक चिडचिड होऊन हाणामारीचे समर्थन. नवीन काहीच नाही.
नवीन Submitted by इनामदार on 20 June, 2018 - 15:25
<<

समीर यांच्या सल्ल्यात तुम्हाला फक्त मारहाणच दिसली ?? त्यांनी फक्त ती शक्यता वर्तवली आहे. व त्यांच्या सल्ल्यात सविनय कायदे भंग वगैरे आहेच की ? ते करा. कदाचीत त्या उपायाने तरी तुम्हाला बकर्‍या, कोंंबड्याच्या तंगड्या गडावर खायला मिळतील.
---

"त्यांच्या सल्ल्यात सविनय कायदे भंग वगैरे आहेच की ? ते करा."

लोच्या ८: कायदेभंग भोंदूत्ववादी गुंड करत आहेत. त्याविरोधात हा धागा आहे.
लोच्या ९: सविनय कायदेभंग तेंव्हा करतात जेंव्हा परकीय सत्तेच्या कायद्याला विरोध करायचा असतो. दीड दमडीच्या फालतू गुंडांना नव्हे.

आता तुमच्या मागच्या पानावर दिलेल्या हास्यास्पद व टाकावू प्रतिसादाची थोडी चिरफाड करुया.
---
लोच्या १: मागणी करणे बेकायदेशीर मी म्हणालो नाही. मी विचारतोय गैरवर्तणुकीच्या यादीत मांसाहार करणे कसे येऊ शकते.
लोच्या २: जरी सार्वजनिक ठिकाणी कोण बेकायदेशीर काही करत असतील तरी तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही . त्यासाठी पोलीस आहेत. तुम्ही फारतर पोलिसांना बोलवू शकता.

<<
लोच्या १ : तुम्ही म्हणताय मागणी करणे बेकायदेशीर नाही (नवीन Submitted by इनामदार on 20 June, 2018 - 13:00, या प्रतिसादात तुम्ही म्हणताय :"गडावर मांसाहार, मद्यपान, धूम्रपान, गैरवर्तणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली." त्यावर मी लिहिले की यात बेकायदेशीर काय आहे) तर आता परत तुम्ही प्रश्न बदलून विचारताय "गैरवर्तणुकीच्या यादीत मांसाहार करणे कसे येऊ शकते." आता हा प्रश्न त्या कार्यकर्त्यांना विचारुन काय फायदा ? हा प्रश्न नियम बनविणार्‍या पुरातत्व विभाग किंव्हा वनखात्याला विचारा जाऊन विचारा.

लोच्या २: मग त्या कार्यकर्त्यांनी वेगळे काय केले ? त्या पार्टी करणार्‍यांना झोडपले असते तर एकवेळ गुंडगिरी केले असे म्हणता आले असते मात्र त्या बातमीत लिहिल्याप्रमाणे दारुपार्टी थांबवून त्या कार्यकर्त्यांनी रितसर त्या सर्वाना पोलीसांच्या हवाली केले. (त्यावर या >Submitted by इनामदार on 20 June, 2018 - 13:04< प्रतिसादात तुम्ही लिहिताय : हि गुंडगिरी नव्हे काय? पोलीसंच्यावर कारवाईचे बंधन आणले म्हणजे उजव्या विचारसरणीच्या कोणीतरी "वरून" फोन केला असणार हे ओघाने आलेच ना? इतर कोणी असते तर पोलिसांनी ऐकून घेतले असते का?) म्हणजे पोलीसांच्या हवाली केले तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे ?

----
लोच्या ३:
मी वर स्पष्ट सांगितले आहे वनखाते त्यांचे नियम इतर ठिकाणी काटेकोरपणे पाळते. सिंहगडावर गेली कित्येक वर्षे लाखो लोक दिवसाढवळ्या उघडपणे मांसाहार करत होते.
<<
काहीही थापा मारु नका, "सिंहगडावर गेली कित्येक वर्षे लाखो लोक दिवसाढवळ्या उघडपणे मांसाहार करत होते" ह्या गोष्टीचा काही पुरावा वगैरे आहे का तुमच्या कडे ?

बाकी ठिकाणी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणारे वनखाते इतक्या राजरोसपणे नियमभंग होऊ देणे शक्य नाही.
<<
बाकी ठिकाणी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणारे वनखाते सिंहगडावर इतक्या राजरोसपणे नियमभंग करत असेल तर त्याचा जाब तुम्ही वनखात्याला विचारायला हवा त्या संस्थेला दोष कश्याला देताय.

आणि जरी या लोकांनी अन्य काही बेकायदेशीर केले असेल तर त्यांना पकडण्याचे काम पोलिसांचे आहे. संवर्धनाच्या नावाखाली गुंडगिरी करता येत नाही या देशात.
<<
त्या बातमीत लिहिल्याप्रमाणे कोणाला ही मारझोड न करता त्या संस्थेच्या सदस्यांनी त्या पार्टी करणार्‍या लोकांना पोलीसांच्याच ताब्यात दिले. मग तुमचा नक्की आक्षेप काय आहे ?
---
तुमचे बाकी सर्व लोचे दखल घेण्या योग्य देखिल नाहित तेंव्हा माझा पास.

लोच्या ८: कायदेभंग भोंदूत्ववादी गुंड करत आहेत. त्याविरोधात हा धागा आहे.
लोच्या ९: सविनय कायदेभंग तेंव्हा करतात जेंव्हा परकीय सत्तेच्या कायद्याला विरोध करायचा असतो. दीड दमडीच्या फालतू गुंडांना नव्हे.
Submitted by इनामदार on 20 June, 2018 - 06:37
<<

लोच्या ८: वनविभाग व पुरात्वखाते यांनी बनविलेला कायद, दिवसाढवळ्या मोडून जे लोक गडांवर दारु व मांसाहार करत आहेत ते तुमच्या मते भोंदूत्ववादी गुंड आहेत तर. असे असेल तर तुमच्याशी मी देखील सहमत आहे.

लोच्या ९: "गड किल्ल्यांर मांसाहार, मद्यपान व धुम्रपान करण्यास बंदी घालणारे व तसा नियम बनविणारे वनविभाग व पुरात्वखात्याचे अधिकार दीड दमडीचे फालतू गुंड आहेत तर. Proud
--

अस कस समीर,
---
त्या इनामदारांच्या मते सरकारी नियम धाब्यावर बसवून तिथे दारु, मटण यांच्या पार्ट्या करणारे खरे सेक्युलर व निधर्मी व या बेकायदेशीर कृत्याचा विरोध करुन त्या पार्ट्या करणार्‍यांना पोलीसांच्या हवाली करणारे सदस्य मात्र हिंदुत्ववादी गुंड !
---
अजबच तर्कट ह्या माणसाचे.

सुवर्णदुर्गा शेजारी तो विस्तीर्ण खडक कुठे आहे हे कोणी सांगेल का!
नवीन Submitted by सूनटून्या on 21 June, 2018 - 09:32
---

सुवर्णदुर्ग - १
IMG_0313.JPG

सुवर्णदुर्ग - २
IMG_0319.JPG

सुवर्णदुर्ग - ३
IMG_0328.JPG
--
सर्व फोटो ट्रेकक्षितिज.कॉम वरुन साभार

तीनवेळा तेच सांगून झाले. आता शेवटचा प्रयत्न करतोय सांगायचा:

१. वन्यक्षेत्रात मांसाहार करू नये असा वनविभागाचा नियम आहे. गेली कित्येक वर्षे तो हा नियम अतिशय कटाक्षाने पाळतात. कोणत्याही अभयारण्यात मांसाहारास परवानगी नाही. करू दिलाच जात नाही. पण सिंहगडावर गेली कित्येक दशके तिथल्या गरीब विक्रेत्यांनी मांसाहार बनवणे आणि येणाऱ्या पर्यटकांनी तो खाणे असे नियमितपणे सुरु होते. कित्येक हजार किंवा लाख लोकांनी आजवर तिथे मांसाहार केला असेल. वनखात्याचा नियम जर गड किल्ल्यांवर लागू असता तर वनविभागाने त्यांच्या अखत्यारीतील इतर अनेक क्षेत्राप्रमाणे सिंहगडावर हे राजरोसपणे सुरु ठेऊ देणे शक्यच नव्हते. अर्थातच हा नियम तिथे लागू नसणार (लागू असता तर कोणताही किल्ला आणि परिसर वन्यक्षेत्रात आला असता. तिथे दारू पिणाऱ्या आणि कचरा करणाऱ्या "सुज्ञ" लोकांना सुद्धा पेकाटात लाथ घालून त्यांनी हाकलले नसते काय?). पण धार्मिक झुंडीना उत्तेजन देणारे सरकार असेल तर कोणतेही नियम सोयीखातर कुठेही लावून भुरट्या गुंडांना हाताशी धरून धार्मिक दडपशाही सुरु होते. सिंहगडावर जे सुरु आहे तो याचाच एक भाग. आधी पुण्यात प्रयोग मग राज्यभर आणि मग देशभर. आले का ध्यानात? ढोंग करायचे तर ध्यानात येणे अवघड आहे.

२. जे टोळके तिथे मॉरल पोलिसिंगच्या नावाखाली गेले आणि मांसाहार व मद्यपान करणाऱ्या लोकांना पकडून पोलिसांकडे घेऊन गेले त्यांना सुरवातीला पोलिसांनी कारवाई न करता हाकलून दिले. योग्यच आहे. कारण तसा कायदाच नसणार. अन्यथा पोलिसांनी कारवाई केली असती. पण म्हणे ह्या टुकार गुंडांनी पोलिसांना कारवाईला भाग पाडले! उलटा चोर कोतवाल को डांटे. कसे शक्य आहे सरकारी वरदहस्त असल्याशिवाय? हि संघटना मोठ्या संघटनेचे पिल्ले आहे हे मी वर लिहिले आहेच. सध्या "संघ"टना आणि झुंडी यांचे राज्य आहे. आणि त्यांची तळी उचलून धरणारे मॉरल पोलिसिंग करणारे हेच भामटे स्वत: मात्र दारू पीत मटन खात घाण करत इतर किल्ल्यांवर फिरत असतात (दाखवून दिले कि मात्र "सुज्ञ" असल्याने परवानगी दिली असे हास्यास्पद दावे करून पळवाटा काढतात. सुज्ञांना गुन्हे करायला परवानगी आहे का?).

किल्ल्यावर मांसाहार केल्यास हिंदू धर्मावर घाला कसा काय बुवा??
नवीन Submitted by विठ्ठल on 21 June, 2018 - 11:20
<<

असे कोणी आणि कुठे लिहिलेय ?
---
ते इनामदार काहीही थापा मारत सुटलेत, जे नियम सरकारने बनविलेत, ते नियम एका खासगी संस्थेच्या माथी मारुन वडाची साल पिंपळाला लावायचा त्यांच्या उद्योग सुरु आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.

फोटोत विस्तीर्ण खडक कुठे आहेत. तेच विचारतोय. देवळाच्या पायऱ्यांवर बसून दारू प्यायल्यासारखे झालं हे.
नवीन Submitted by सूनटून्या on 21 June, 2018 - 11:41
<<
__/\__

फोटो पाहून तुम्हाला कदाचीत कल्पना येणार नाही, प्रत्यक्ष पाहिलेत तर तो खडक किती विस्तिर्ण आहे ह्याची तुम्हाला कल्पना येईल. शिवाय त्या खडकाची लांबी किती व रुंदी किती यावर मी कोणतेही विधान केले नव्हते. मुद्दा फक्त तो भाग किल्ल्याचा आहे किंव्हा नाही एवढाच आहे. माझ्या मते तो भाग किल्ल्याचा नाही.

आयटीसेलने नवी भरती केल्याचे ऐकले. इथे पुन्हा सक्रिय झालेले पाहून आनंद जाहला.

अनिरुद्ध,

ज्याप्रमाणे "विस्तिर्ण खडक" किल्ल्याचा भाग नाही असे तुम्ही सांगत आहात, तसेच इनामदार म्हणताहेत, की किल्ला अर्थात तटबंदीआतला रहिवासी भाग वनविभागाच्या अखत्यारीत येत नाही. तस्मात, वनविभागाचे नियम तिथे लागू होत नाहीत. व तिथे मासाहारास बंदी हा दीडशहाणपणा सध्याच्या विकृत हिंदुत्ववादी लोकांचा आहे.

जशी गोहत्याबंदी ही दुभत्या जनावरांच्या संवर्धनाच्या जुन्या कायद्याआधारे गळी मारली आहे, तसेच हे मासाहारबंदीचे नाटक जर कायद्याने करता येत असते, तर कुण्या पित्त्या संघटनेच्या नावाखाली टोळकेशाही करायची गरज पडली नसती. सरकारने एक नोटीस लावली की काम भागले असते.

मांसाहार करावा की नाही वगैरे चर्चा वेगळी गोष्ट, पण लोकांच्या फूड चॉइसेस डिक्टेट करणे हा माज कशाला हवाय?

फडतूस लॉजिक लावून इथे तोफांड घालणे बंद करा अन आता तिकडे दारूच्या धाग्यावर या.

कारण किल्ल्याबाहेरचा कातळ वनविभागाच्या अखत्यारीत येत असेल तर तुम्ही सूज्ञ लोक पाप नव्हे, कायदा मोडत आहात.

नवीन Submitted by आ.रा.रा. on 21 June, 2018 - 12:30
<<

याप्रमाणे "विस्तिर्ण खडक" किल्ल्याचा भाग नाही असे तुम्ही सांगत आहात, तसेच इनामदार म्हणताहेत, की किल्ला अर्थात तटबंदीआतला रहिवासी भाग वनविभागाच्या अखत्यारीत येत नाही. तस्मात, वनविभागाचे नियम तिथे लागू होत नाहीत. व तिथे मासाहारास बंदी हा दीडशहाणपणा सध्याच्या विकृत हिंदुत्ववादी लोकांचा आहे.
---
__/\__ Proud
---
तुमच्या सारख्या "दिड शहाण्या" माणसाबरोबर बोलण्यात काहिच अर्थ नसतो, हे आजपर्यंत मला कळून चुकले आहे. तेंव्हा तुमच्यासारख्यांना फाट्यावर मारतो.

सग्ळ्यात आधी, तुमच्या फाट्यात तेवढा दम नाही, हे लक्षात घ्या.

दुसरे, रहिवासी जागेत, हॉटेलात काय शिजवावे, विकावे, खावे, हा शिजवण्यार्‍याचा अन खाणार्‍याचा खासगी प्रश्न आहे, तुम्हासारख्या मद्दडांचा नाही. समजवून सांगून समजत नसेल तर त्यावरून तुमच्या भक्त आयक्यूची कल्पना येते.

<< फोटोत विस्तीर्ण खडक कुठे आहेत. तेच विचारतोय. >>
------- विस्तीर्ण खडक दारु पिल्यानन्तरच दिसत असेल तर तो फोटोत कसा येणार ?

सरकारी वनक्षेत्रात शिकारीला बंदी असते. शिकार तेथेच शिजवून खाण्यावरही अर्थात बंदी असतेच. पण वनक्षेत्राबाहेर शिजवलेले मांस वनक्षेत्रात फिरताना खाण्यास बंदी अशासाठी असणे शक्य आहे की त्या मांसाच्या आशेने इतर हिंस्र प्राणीपक्षी तिथे ओढले जाऊन खाणाऱ्याला अपाय होऊ शकतो. पण हे सरकारी वनक्षेत्राबाबत झाले. इतर ठिकाणी जिथे जिथे कच्चे/ शिजवलेले शाकाहारी अन्न खाण्यास परवानगी आहे तिथे तिथे मांसाहारावर बंदी असणे अतार्किक आहे. तटबंदीच्या आतला सिंहगड वनक्षेत्रात मोडतो की नाही याबद्दल माहिती नाही.

विस्तीर्ण खडक दारु पिल्यानन्तरच दिसत असेल तर तो फोटोत कसा येणार ? Happy Happy

<< फोटोत विस्तीर्ण खडक कुठे आहेत. तेच विचारतोय. >>
------- विस्तीर्ण खडक दारु पिल्यानन्तरच दिसत असेल तर तो फोटोत कसा येणार ?
Submitted by उदय on 22 June, 2018 - 04:57
<<

हिहिहि....हि...
असले पांचट जोक करण्याआधी, माझ्या कोणत्या प्रतिसादात सुवर्णदुर्गा भोवतीचा खडक "विस्तीर्ण" आहे, असे लिहिल्याचे दाखवून देता का जरा ? की वरचा प्रतिसाद तुम्ही गावठीचे दोन घोट मारुन दिला आहे ?
--
मांडायला मुद्दे नसल्यावर वैयक्तिक हल्ले करायची तुम्हा लोकांची खोड तशी जुनीच आहे. त्या जागी एकदा जाऊन, स्वत:च्या डोळ्यांनी पाहून खात्री करुन घ्यायची तुम्हा लोकांची लायकी नाही वर असले पांचट जोक मारुन स्वत:चे हसे का करुन घेत आहात?

विस्तीर्ण खडक दारु पिल्यानन्तरच दिसत असेल तर तो फोटोत कसा येणार ?
Rofl

इथे प्रतिसादही त्या विस्तीर्ण खडकावर बसूनच दिले जात असावेत.

मंदार जोशी. भीतीने थरथरत हातापाया पडणार्‍याने इतरांची लायकी काढणे शोभत नाही हो. हात किबोर्ड आणि तोंडावर मुखवटा घेतला की कोणीही उंदीर सोताला सिंह समजू लागतो.

@अनिरुद्ध,

मुळ प्रतिसाद न वाचता, त्यावर प्रतिसाद देऊन जोक करणारे व त्या फालतू जोकवर दात काढणारे असे सर्वच, हातभट्टीची पहिल्या धारेची पिणारे आहेत. त्यामुळे अश्यांच्या नादी लागून काहिच व्हायचे नाही.

मांसाहारावर सरसकट बंदी नसावी याबद्दल वाद नाही. गडावर बंदी असावी कि नाही हा वाद आहे. त्यामुळे मांसाहार कि शाकाहार अशी चर्चा सुरू झालेली आहे. काही लोकांसाठी मांसाहार निषिद्ध आहे. त्यांच्या धर्मात जीवजंतूंची हत्या निषिद्ध आहे. काल एबीपी माझावर चर्चा झाली. या चर्चेचा जो संदर्भ आहे त्याकडे दुर्लक्ष करूयात. मला वाटतं रिचा जैन या काही वक्त्या नव्हेत. त्यांना समर खडस आणि जितेंद्र आव्हाड यांनी दमदाटी केली. या दोघांकडून अपेक्षा कधीच नव्हत्या. पण प्रसन्न जोशीने सुद्धा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोण ठेवत चर्चा एका वेगळ्याच रस्त्यावर आणून ठेवली.

त्या म्हणत होत्या की हत्या करण्याऐवजी त्यापासून अन्य उत्पन्न मिळते का यावर संशोधन व्हायला हवे. हा मुद्दा नीटपणे मांडूच दिला नाही. पुन्हा पुन्हा मला मटण खायचे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असा सवाल केला गेला. त्यामुळे रिचा जैन भरकटल्या गेल्या. नीट पहा कशा प्रकारे ट्रोलिंग केले जाते. मला पुन्हा सांगायचेय, मांसाहार बंद्दीचं समर्थन मी करत नाही. त्या मुद्यांकडे दुर्लक्ष करावे.

https://www.facebook.com/abpmajha/videos/10160776641740271/

Pages