काही दिवसांपूर्वी सिंहगडवर गेलो होतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी गेलो होतो तेंव्हा तिथे परिस्थिती वेगळी होती. आता खूप सकारात्मक बदल झाले आहेत. स्वच्छता, डागडुजी, रस्ते वगैरे. बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. पण त्याचबरोबर एका गोष्टीचे कोडे उलगडले नाही. गडावर पूर्वी मांसाहारी जेवण मिळायचे ते आता बंद केले आहे. मद्यपान बंदी एकवेळ समजू शकतो. आपल्याकडे बरेचसे पब्लिक दारू पिली कि आरडाओरडा, शिवीगाळी, बाटल्या फोडणे तसेच अन्य घृणास्पद कृत्ये करतात ज्याचा इतर पर्यटकांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष त्रास होऊ शकतो.
पण मांसाहाराने काय घोडे मारले आहे? त्यावर बंदी कशासाठी? कचरा म्हणावा तर तो अन्य खाण्यापिण्याने पण होतोच आहे गडावर. मांसाहाराने थोडा अधिक होईल इतकेच. तिथे मी विचारणा केली असता "गडाचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून" वगैरे उत्तरे मिळाली. अरे म्हणजे इतिहासातील ज्या वीर पुरुष व पराक्रमी योद्धा असलेल्या महान विभूतींमुळे हा गड पवित्र स्थान बनले आहे ते लोक मांसाहार करत नव्हते शाकाहारी होते असे म्हणावयाचे आहे का? नरवीर तानाजी मालुसरे असोत वा खुद्द शिवछत्रपती असोत. पराक्रमी योद्धे होते. मांसाहार तर करतच होते. मग तिथे येणाऱ्यानी मांसाहार केला तर पावित्र्य बिघडण्याचे काय कारण? थोडीतरी तर्कसंगती आहे का ह्या बंदीला? नक्की कोण आहेत या बंदिमागे?
थोडा मागोवा घेतला तेंव्हा लक्षात आले एक "शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्था" म्हणून आहे (जसे काय गड किल्ले म्हणजे सरकारची नव्हे तर यांचीच मक्तेदारी) त्यांनी हि बंदीची मागणी व नंतर अंमलबजावणी केली आहे. काही बातम्यांमधून लक्षात आले कि सरकारी यंत्रणा नव्हे तर या संघटनेचे लोकच गुंडगिरी करून मांसाहार करू देत नाहीत. अजून थोडे खोलात जाऊन पाहिले असता लक्षात आले कि हि संघटना म्हणजे देशातील कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे पिल्ले आहे हे जाणवले (त्यांच्या फेसबुक पेज व इतर माहितीवरून). गड किल्ल्यांची निगा राखण्यासाठी खरे तर सरकारी यंत्रणा आहे. गड किल्ले कोणाची खाजगी मालमत्ता नव्हे. तरीदेखील गडांवर या खाजगी संघटनेचे वर्चस्व आहे!
काही जण मांसाहार बंदीसाठी वनखात्याच्या नियमाचा आधार घेताना दिसतात. म्हणे वनक्षेत्रात मांसाहार वर्ज्य आहे. अरे पण तसे असेल तर मग इतकी वर्षे वनखात्याने हे सुरु ठेवूच कसे दिले असते?
आणि मग सगळी मेख लक्षात आली.
मांसाहाराचे वावडे ना राजाला होते ना मावळ्यांना. मांसाहार न करणारे आहेत ठराविक हिंदुत्ववादी. त्यांना आवडत नाही म्हणून त्यांनी तो "अपवित्र" ठरवून त्यास गडांवर बंदी घातली असे समजायला बक्कळ वाव आहे. म्हणजे सरळ सरळ धार्मिक दहशत. बाकी काही नाही. (शिवाय याचा साईड इफेक्ट म्हणून "राजांना मांसाहार वर्ज्य होता म्हणूनच आजही गडांवर मांसाहारास बंदी आहे" असे अजून पाच पन्नास वर्षांनी कोणतरी एखादा भुक्कड कवी/शाहीर लिहून जाऊ शकतो हा भाग वेगळाच).
कुणाची काय काय मते आहेत यावर?
"यातले लॉजिक मला कळले नाहीये"
"यातले लॉजिक मला कळले नाहीये" - सिंबा, 'लॉजिक' शोधायचा प्रयत्न केल्याबद्दल दंडवत आणी लॉजिक असण्याचा आरोप केल्याबद्दल निषेध!
"तो ब्लॉग कोणत्या फेरफटक्या
"तो ब्लॉग कोणत्या फेरफटक्या चा आहे,
मराठी की इंग्रजी?" - not me. त्यांचा आय-डी जरी रोमन लिपीतला असला, तरी ब्लॉग मराठीत आहे.
पर्वती ला का लोक दारु पिऊन
पर्वती ला का लोक दारु पिऊन मांस खातील? पर्वती इतर गडांप्रमाणे उंच नाही आणि शहरापासून दूर नाही. देवस्थान आहे. वनखात्याच्याचे लोक असतात. 25 वर्षांपूर्वी वर्दळ कमी असेल कदाचित.
सिंहगड आजही शहरापासून दूर आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक गडावर नसतात. गड संवर्धन की काय समितीचे लोक देखभाल करतात म्हणून फरक पडत आहे.
त्या समितीच्या लोकांच्या विचारधारेचवर टीका करताना आपण हे काम का नाही करत याचा पण खुलासा केला पाहिजे.
"आऊटिंगला गेलेल्या मंडळींकडून
"आऊटिंगला गेलेल्या मंडळींकडून मोस्टली अभक्ष्य भक्षण आणि अपेयपान हा कॉंबो प्राफर केला जातो."
==> थेट चुकीचे विधान. मी कित्येकदा कुटुंबासहित, मित्रांसाहित गेलो आहे. मांसाहार केला आहे (म्हणजे तिथले जे गरीब विक्रेते आहेत त्यांच्याकडे चिकनचे जेवण, इतकेच). कित्येक वर्षे. पण कधीच आम्ही मद्यपान केले नाही. आणि आमच्यासारखे अजून कितीतरीजण असतील. किंबहुना अशांचीच संख्या जास्त आहे. एकतर गडावर मद्य कधीच मिळत नव्हते. ते काय गोवा नव्हे. आणि स्वत:बरोबर मद्य गडावर घेऊन जाणारे फार कमी असतील.
"मांसाहार आणि मद्यपान दोन्ही वाईट. मांसाहार करणारे कॉंबो प्रेफर करतात" वगैरे म्हणजे माझ्या मते ज्यांना मांसाहाराचे वावडे आहे (बहुतांशी कट्टर धार्मिक प्रवृत्तीचे लोक) अशा लोकांचा फाजील कल्पनाविलास आहे. बाकी काही नाही. यातूनच हि बंदीची खुळचट मागणी झाली असणार. मुळातच मांसाहारासाठी "अभक्ष्य भक्षण" हा प्रतवारी करणाऱ्या मानसिकतेतून आलेला शब्द आहे. केवळ तुम्ही खात नाही म्हणून "अभक्ष्य"?
बॅचलर हा शब्द वाचला नाही का?
बॅचलर हा शब्द वाचला नाही का?
>> आपण हे काम का नाही करत
>> आपण हे काम का नाही करत
गड/किल्ले हे सरकारची मालमत्ता आहे. त्याच्या देखभालीसाठी सरकारचे विभाग आहेत. गड म्हणजे कोणाची खाजगी मालमत्ता नाही. मी सरकारी जागेची देखभाल करायला घेतली आणि मला हवे असलेले नियम तिथे लावायला गेलो तर मला अटक होईल. या खाजगी लोकांना खरतर अटक व्हायला हवी.
>> बॅचलर हा शब्द वाचला नाही
>> बॅचलर हा शब्द वाचला नाही का?
शब्दच्छल करण्यात अर्थ नाही. माझी प्रतिक्रिया आणि आधीचे प्रतिसाद यात सगळे आलेले आहे. आधी नीट वाचा मग लिहा.
तुम्हाला उत्तर देणे म्हणजे
तुम्हाला उत्तर देणे म्हणजे चिखलात दगड
अशक्य लोक आहेत, मांसाहार आणि
अशक्य लोक आहेत, मांसाहार आणि दारू पिण्याचा काय संबंध
आशुचँप, माझं पुढे जाऊन हे
आशुचँप, माझं पुढे जाऊन हे देखील म्हणणं आहे की मांसाहार, मद्यपान ह्याचा हिंसाचार, अस्वच्छता, गुंडगिरी वगैरे गोष्टींशी सुद्धा काहीही संबंध नाहीये.
>>तो मी नव्हेच!
>>तो मी नव्हेच!
तोच मी असे दस्तुरखुद्द तू स्वतः जरी म्हणाला असतास तरीही पटलेच नसते!
न जाने जिंदगी का, ये कैसा दौर
न जाने जिंदगी का, ये कौन सा दौर है…
इंसान खामोश हैं और ऑनलाइन कितना शोर है..!!
हा फेरफटका आहे तो फेरफाटका
हा फेरफटका आहे तो फेरफाटका आहे...
अभक्ष्य हा शब्द मांसाहारासाठी
अभक्ष्य हा शब्द मांसाहारासाठी वापरलेला मला अगदीच पटत नाही. ज्या लोकांना ऋचा स्फुरल्या, ज्यांनी रामायण महाभारतासारखी काव्ये रचली, शाकुंतलसारखी नाटके रचली, गीतांजलीसारखे जगप्रसिद्ध काव्य रचले आणि नोबेल पुरस्कार मिळवला, याच पुरस्काराचे भारतीय वंशाचे मानकरी अमर्त्यसेन, हरगोबिंद खुराना या सर्वांसाठी जे भक्ष्य, किंबहुना स्वत: श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे भक्ष्य, ते इतरांसाठे अभक्ष्य आणि अपवित्र कसे? अग्नीच्या साक्षीने बलीपशूचे मांस सोमरसाबरोबर भक्षण करून जश्न (यज्ञ) करण्याची, आनंद साजरा करण्याची प्रथा अतिरेकी आणि सक्तीच्या पशुहत्येमुळे त्याज्य ठरली. पण अपवित्र नाही ठरू शकत. अतिरेक कुठेही होऊ नये. तेच मांसाहारबंदीलाही लागू आहे.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/mumbai-news/raigad-shivrajyabhishek-youth-died-...
"तोच मी असे दस्तुरखुद्द तू
"तोच मी असे दस्तुरखुद्द तू स्वतः जरी म्हणाला असतास तरीही पटलेच नसते!" -
"हा फेरफटका आहे तो फेरफाटका आहे" - 'काना'-डोळा करण्याइतका हा फरक सुक्ष्म नाही.
काळ झाला जाऊन. पूर्वी मिळत
काळ झाला जाऊन. पूर्वी मिळत होते गडावर नॉनव्हेज. चवदार असायचे. मध्यंतरी, गडावर मांसाहार बंद करणार वगैरे बातम्या येत होत्या खऱ्या. पूर्वी हा गड शिकारीसाठी प्रसिद्ध होता म्हणे. व्यंकटेश माडगुळकर (कि जे माझे सर्वात आवडते मराठी लेखक आहेत) यांनी त्यावर अतिशय सुंदर कथा लिहिल्या आहेत. लिखाणात इतका जिवंतपणा कि कथेच्या शेवटी माडगुळकरांचा अनुभव म्हणजे आपला अनुभव होऊन जातो
असो. विषयांतराबदल क्षमस्व. काळ बदलला हे मात्र खरे...
>> Submitted by mi_anu on 5 June, 2018 - 16:52
या प्रतिसादाशी सहमत आहे.
माझी पोस्ट कुठे गेली ? बरं
माझी पोस्ट कुठे गेली ? बरं असो.
अभक्ष्य भक्षण हा शब्द माझ्या घरचा नाही. गाडगेबाबा कि पुल देशपांडे अशा कोणत्या तरी सेलेब्रिटीने वापरला असेल बहुतेक.
'इफ यु गिव्ह माउस अ कुकी'
'इफ यु गिव्ह माउस अ कुकी' टाईप सिरीजच्या पुस्तकांची आठवण झाली हे मांसाहार--> दारु--> बलात्कार लॉजिक वाचून.
हापिसात दुपारच्या जेवणात दररोज किमान तीन प्रकारचा मांसाहार असतो, तरी कोणी दुपारी दारु मागितली नाहीये. आणि संध्याकाळी दारु असते ती पिउन कधी बलात्कार केला नाहीये.
दारु पिण्याने बलात्कार करावासा वाटतो हे त्या अॅम्बिअनच्या (झोप येण्याचं औषध आहे) रेसिझम साईड इफेक्ट सारखं झालं.
मांसाहार - दारू - बलात्कार
मांसाहार - दारू - बलात्कार असा संबंध मी तरी नाही लावला. पण अशा आडबाजूच्या ठिकाणी किंवा आउटिंगला निघाल्यावर (मुलं मुलं असतात तेव्हां) शकक्यतो दारू आणि मांसाहार प्रिफर केला जातो. याचा अर्थ या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहे असे लिहीले आहे असे समजून त्यावर वाद घालणे हे इरीटेटिंग आहे. मोस्टली असे घडते. आणि ब-याचदा अशा मंडळींकडून (नेहमीच नव्हे) बलात्काराच्या घटना घडतात.
हा काही गणिताचा नियम नव्हे हे मी मागेच म्हटलेले आहे. पण जो तो आपल्या सोयीनुसार अर्थ काढून पुरोगामायला मोकळा आहेच. ते स्वातंत्र्य कोण नाकारू शकेल ?
मांसाहार - दारू - बलात्कार
मांसाहार - दारू - बलात्कार असा संबंध मी तरी नाही लावला. >>>
मोस्टली असे घडते. आणि ब-याचदा अशा मंडळींकडून (नेहमीच नव्हे) बलात्काराच्या घटना घडतात. >> घ्या!
काय घ्या ?
काय घ्या ?
निर्जन ठिकाणी पार्टी करायला गेलेल्यांचा मेन्यू काय असतो जनरली ?
भयंकर अकलेचे तारे तोडून आलेत
भयंकर अकलेचे तारे तोडून आलेत लोक... मांसाहार, त्याचा संबंध दारूसोबत, आणि दारू पिल्याबरोबर लगेच बलात्कार.. जे कोणी असा संबंध लावत आहेत त्यांना एक नम्र विनंती,
थोडीफार ब्रँडेड घेत चला बुवा तुम्ही, पहिल्या धारेची नवटाक मारून लिव्हर खराब होतं. बरं तुमचं लिव्हर, तुमचा प्रश्न, पण.. एक नक्की करा, अशी पहिल्या धारेची मारून मायबोलीवर नका येत जाऊ गडे!
चालू द्या... माझ्याकडून
चालू द्या... माझ्याकडून सर्वांना कडवे पुरोगामी असा पुरस्कार !
मधुरांबे, वीणा नावाच्या एक
मधुरांबे, वीणा नावाच्या एक विदुषी होत्या इथं, त्यांची काही पुण्यकर्मे उजेडात आल्याने त्यांनी इथंच जीव दिला, आणि मरता मरता शाप दिला,
मी परत येईन! (अधिक माहितीसाठी विशाल कुलकर्णींनी लिहिलेली कथा वाचा)
आणि त्या येत असतात अधून मधून.
बरं. छान छान.
बरं. छान छान.
का हो राव पाटील , या ज्या
का हो राव पाटील , या ज्या कुणी विदुषी होत्या त्या गेल्या सहा महीन्यात होत्या का ? तुम्ही सहा महीन्यांचे आहात म्हणून विचारले. की अभिमन्यूप्रमाणे शिकून आलात ?
हो! गेल्याच महिन्यात गेल्या
हो! गेल्याच महिन्यात गेल्या त्या!
अरे देवा. हे काय पाहतो आहोत
अरे देवा. हे काय पाहतो आहोत आम्ही इथे. थेट बलात्कार? आणखी काही धांसु कारण मिळेल का आपले चॉइसेस इतरांवर लादायचे? बलात्कार इज हॉट टॉपिक नाही का?
धागा मोदिंवर कधी येणार ???
धागा मोदिंवर कधी येणार ???
Pages