तुझ्यात जीव रंगला - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26

तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता फारच कंटाळा आला, यांची गुडी गुडी भातुकली खेळून झाली कि कळवा मला. तोपर्यंत बघायच्या ऐवजी इथेच वाचत जाईन.

धन्स शलाका अगं पण मी जिथे आहे तिथे ओझी दिसत नाही. यूट्यूबवर वगैरे मिळेल तसे जुने एपिसोड बघत आहे.
सध्या ही मालिका टीआरपीमध्ये एक नम्बरवर आहे. यूट्यूबवर वेबिसोड असतात तिथेही इतर मालिकांचे १०-२० हजार व्ह्यू तेव्हा टीजेआरचे लाखदोनलाख व्ह्यू झालेले असतात. तसं मालिकेत घडत काहीच नाहीये पण राणा अंजलीचे सीन एकदम गोड आणि केमिस्ट्री सिझलिंग!

मालिकेत घडत काहीच नाहीये.. म्हणूनच रटाळ होतेय सध्या.. तेच तेच प्रत्येकाचं सांगणं..राणा घरी परत ये आणि राणाचं नाही म्हणणं..

काल थोडी पुढे सरकली मालिका.. अंजली डायरेक्ट बोलली आबांशी की आम्ही परत नक्की / लवकरच येउ ई.
राणा मात्र लईच घाबरतुय बाईना..
दोघे एकत्र छान दिसतात मात्र...

पोरं लई मस्त हायेती...रानादा रानादा करतात...बरकत बी येक नंबर! त्यांचं मनापासून प्रेम हाये रानावर.
अंजली बाईंना पोरं घरी आल्यावर वहिनी म्हणतात.....चा- प्वहे मागत होती काल!
तो छोटा तर सगळ्यात गोड आहे. किती छान अभिनय करताहेत......! गवरी- मानसी पेक्षा कितीतरी सरस!

मटा मध्ये एक बातमी वाचली आता... अंजलीबाई सुयश टिळक ला डेट करतायेत वाटते

मला नाही आवडत तो.. मठ्ठ आणी सुस्त वाटतो नेहमी.. त्यामानाने अक्षया छान वाटते

ते दोघे घरी परतणार की नाही यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग आहे- राणा कुस्ती जिंकेल का, तो लिहावाचायला शिकेल का, त्याने अडाणीपणा लपवला नव्हता हे अंजलीला कळेल का, अंजलीच्या करियरचं पुढे काय, आणि मुख्य म्हणजे राणा बरमचारीपणा सोडून संसारी कधी होणार!
बघू या पुढे काय काय होणार!
परवाचा सूरज अंजली राणाचा सीन छान होता. तो तुला न्यायला येणार नाही असं रेणू आणि सूरज तिला सांगत असताना राणा मात्र पोचतो आणि सुरजलाही समजून घेतो.

कोण आहे ह सुयश टिळक? >>> हिरो आहे, सध्या 'सख्या रे' ह्या कलर्स मराठी शो मध्ये डबल रोल करतोय. त्याआधी का रे दुरावा, दुर्वा, पुढचं पाऊल मध्ये होता. strawbery हे नाटक आणि काही मुवीज पण केल्यात त्याने.

expertblogz.com sodun dusari konati website ahe ka US madhe chalanari ?
halli disat nahiye TJR tyaawar Sad

छान छान म्हणत या सिरीयलने पण अवलक्षण दाखवायला सुरुवात केली....
तद्दन मसाला छाप सिन आणि भिकार कथानक दाखवत आहेत...

- एका मुली वर एवढे महीने (की वर्ष) प्रेम केला ... आणि लग्नानंतर तिला साधा हात ही लावत नाही आणि पळून जातो.. राणाला साधा दाखवण्याच्या नादात तो आता "गे" आहे कि काय अस वाटयला लागलय... मुर्ख पणाचा कळस...!!
- कोणाला दुखवायच नाही म्हणतो.. आणि एका बाजुला बाप, भाउ, आणि बायको याना दुखवुन वहिणीला सुखी करतोय म्हणे... मुर्ख पणाचा कळस++...
- त्या बैला वरचा एपीसोड तर महामुर्ख पणा.. अहो आमच्या पण घरी गाई म्हशी सगळ होत.. पण इथे मुर्ख पणाचा कळस++++...

आजचा भाग क्युट आहे पण. राणाची चिडचिड मस्तच! आधी पोरं त्याला अंजलीसोबत एकटं टाकून पळतात म्हणून चिडायचा. आता पोरं दोघांना एकांत देत नाहीत म्हणून चिडतोय! सगळा फोकस राणांजली, पोरं ,बरकतवर असेल तर एपिसोड छान होतो.
मोरपंखी अहो झी मराठीची मालिका म्हणजे महामूर्खपणा असणारच. राणा गे नाही पण लहानपणापासून ते ब्रम्हचर्य , बाईशी बोलायचं नाही वगैरे फार हॅमर केलंय त्याच्या डोक्यात, ते अनलर्न करायला वेळ हवाय त्याला.
वहिनी आज नव्हती. मी तिचे सीन फॉरवर्ड करते, जस्ट डोन्ट केअर अबाऊट हर.असो. आता गुढीपाडव्याला परतणार म्हणे दोघं घरी.

खरंतर त्यानी शेतातल्या घरात राहणे हे त्यांच्या (झीच्या नाही, राणा अन्जलीबाईंच्या) कहाणिची गरज आहे. नाहितर लग्न म्हणजे काय हे थोरल्या सुनबाईंना एवध्या मोठया वाड्यात समजावणे कठिणच जाईल.

हे शेवटचे 2 एपिसोड chaangale hote pan .. shewati hatat haat ghetlach nahi tyani.. ani raana anjalichya mandiwar zoptana dakhawala te pan tila aaichya rupat baghun.. boring..
Nehmi tila aaichya rupat baghto
Thod vichitr waatayla laglay he sagal..

आबा मस्त आहेत! सर्वांन्ना घेऊन शेतात याय्चा प्लॅन भारी! इतर नायिकांप्रमाणेच अंजलीबाई सुद्धा स्वयंपाकात सुगरण निघाल्या. गोड दिसतात पण. भाकरी सुद्धा छान जम्ल्या होत्या.

खरंतर त्यानी शेतातल्या घरात राहणे हे त्यांच्या (झीच्या नाही, राणा अन्जलीबाईंच्या) कहाणिची गरज आहे. नाहितर लग्न म्हणजे काय हे थोरल्या सुनबाईंना एवध्या मोठया वाड्यात समजावणे कठिणच जाईल. >> सहमत. अलिकडचे ४-५ भाग काल बघितले आणि असंच वाटलं की त्यांनी सुरुवातीला वेगळं राहणं खरंच गरजेचं होतं. मालिका परत चांगली वाटायला लागली आहे.
सगळे बारके आता थोडे मोठे दिसायला लागले नै?

सगळे बारके आता थोडे मोठे दिसायला लागले नै?>> हो खरच.. तो छोटा मुलगा खुप लहान होता आता जरा मोठा वाटु लागलाय.. अन हि छोटी मंडळी खुपच छान काम करताहेत.. राणावर खुप प्रेम करतात. Happy

शुक्रवारचा राणा अंजली गच्चित उभे राहुन बोलत होते तो सिन छान होता.. कधी कधी राणा तिच्याकडे प्रेमाने बघ्तोय असं दाखवतात तर कधी कधी त्याला काही समजत नाही असं दाखवतात,,
सिरियल स्लो जाते खुप .. लग्न होउन बरेच दिवस झाले तसे.. दोघातलं नात अजुन खुलत नाहिये..
पण केमिस्ट्रि खुप छान आहे दोघात.. शोभतात

Pages