Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://youtu.be/XBVkjVqKrBY
https://youtu.be/XBVkjVqKrBY
वहिनीने त्या
वहिनीने त्या शिक्षणमंत्र्यांना (सुरजच्या वडिलांना) कैद करून ठेवले आहे कुठेतरी. अंजली खचून गेली आहे. लाडूला झाडू काढायला मजबूर केले आहे, गोदाक्काचे पार हाल करून टाकलेत.सुरज दारू पिऊन झिंगून असतो. आणि राणा दा आता एनॅकाँडा बनून येणार आहे.
नंदीता व्हिलनच व्हती की
नंदीता व्हिलनच व्हती की आधीपासनाच.
आबासाहेबांना गोदामात कोंडून ठिवलंय. कोणीबी सोडवायला येनार न्हाई म्हणे. तिथं इतकी पोती ठेवलेली ती काय मान. परेश पाटलांनी यकट्याने न्हिऊन ठिवली व्हय. कामगार जात आसतीलच की तिथं.
दोन वर्षात लाडू जराबी वाढला नाय. एवढे हाल सोसून जसा हाय तसा हाय, बारीक बी झाला नाय.
मंत्री असलेल्या व्यक्तीची एक
मंत्री असलेल्या व्यक्तीची एक साधा गावगुंड आणि गृहिणी असलेली सून अशी अवस्था करते हे बघून धन्य झालो .
आपण उगाचच आपल्या नेत्यांना सर्वात मोठे गुंड असे समजत होतो .
बिचारा मंत्री असून सुद्धा किती साधा सरळ माणूस आहे
ही मालिका अजून चालूच आहे. मी
ही मालिका अजून चालूच आहे. मी टीव्ही बघत नाही. मध्येच फेबुवर एकदा प्रोमो पाहिला तेव्हा पाठक बाई एक गावरान बाईच्या वेशात राणासोबत भांडत होत्या. त्यांचे नाव पण जीजा असे होते.
आता फेबुवर सारखे हेच विडीओ येतात.
हे जीजा प्रकरण काय आहे? पाठक बाईचा डुप्लिकेट रोल आहे का? की पाठक बाईची ज्योतिबाच्या उत्तरतेरम्ब हरवलेली ही जुळी बहीण आहे.
Pages