तुझ्यात जीव रंगला - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26

तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वभावा विरुद्ध जाऊन सगळ्यांशी ईतकं गोड बोलणं अवघडच जातय सुनबाईंना Lol
अंजली ला माहितीये हि नाटक करतीये तर कशाला सांभाळुन घेते सासर्यां समोर!!?? म्हणे त्यांच्या बद्दल असा विचार नका करु.

अतिशहाणी अंजलीबै आणि बैलोबा राणा.
साहेबरावाला चारा दिला नाही म्हणून बैलोबा राणा कसला कावत होता अंजलीबैवर वैनीआईचं ऐकुन. लैच डोक्यात गेला.

फार बोअर चालु आहे.. नक्की काय दाखवायचय?
अंजली बाई तशा खुप सहन करत नाहित बोल्तात .... पण तरीही भरकटली आहे मालिका

अंजली बाई तशा खुप सहन करत नाहित बोल्तात >>>पण लग्न झाल्यापासून तर एकदम गरीबगाय झाली आहे. काल ते सासरे बोलले म्हणुन नाहीतर नंदिनीसमोर एकदम गप्प असते.

हो ना.. अंजली बाय पण आता अडाणा गत कराया लागल्यात...आव तिच्या मैतरिणीला आणि सान्निदा , आबानाबी कळतंय की दाल मे कुच काला हैं...आणि राणा तर कै बाई लईच डोक्यात जायला लागला ह्याय बगा... आव त्याच्या पेक्षा ती शाळेतली बारकी पोर बरी म्हणायची येळ आली...आव त्यांना बी कळतंय की वैनीसाब अचानक कशा काय बदलल्या..लाडूत विष हाय का तेही बोलली बारकी पोरं... मला तर आता आपला सनीदाच लीड वाटायला लागलाय.. त्याच्यामुळेच घर तुटयाचं वाचलंय बगा.. अवो तो जरी बाहेर बारा भानगडी करत असला तरी बी त्याच्या डोक्यात काय बी आणि कुणी बी भरवली तरी ह्यो स्वतःची थोडी तरी बुद्धी वापरतो...त्योच आबांना म्हनला की आबा यी बाई च म्हणतीये पण मला नको वाटणी...नाहीतर उद्या उलट राणा मुळेच घर तुटेल ...त्याला उद्या वैनीबाईंनी सांगितलं काही करून वाटणी कशी चांगली तर ह्यो सगळ्यांविरोधात जाऊन वाटणी करूनच दम खाईल.. मास्तरीन त्याला उगा हुशार म्हणते पण ह्यो स्वतः आपली बुद्धी इतकीशी ही वापरत नाही..प्रेमात काय प्रॉब्लेम आला की घ्या बरकत आणि त्यो बाळू का कोण पेहेलवान ची मदत.. स्वतःला कायबी मत न्हाई..उगा नंदी बैलावानी कर्तुया.. हा वैणीसायबाच्या विरोधात कधी बी जाणार न्हाय.. आता या दोघांपेक्षा आबा,सान्निदा,मंजू आणि पोरं बरी.. या दोघांनाच कणा न्हाय तर बाकीचे तरी काय करणार... Angry

बोअर.. रोजच्या कारस्थानावर पोहचली शेवटी मालिका..
घडघड न बोलता सहन करणार्या सुना , बायका.. बंद करा काही वेगळं दाखवायला नाही तर..
सुरवात किती छन होती मालिकेची आता बिन शिडाच जहाजं झालय

आज थोडीसी दिसली ही शिरेल.... खुप वाईट वाटले एका चांगल्या मालिकेची वाट लागलेली बघुन.

अंजली साधा चुडीदार घालुन ईतकी घाबरत होती जणु वनपीस घातलाय.
अन त्यात आपल्याच नवर्याकडुन बाईक शिकायला लपत छपत जाते. अन म्हणे ही ऊच्च शिक्षीत शिक्षीका.
मान्य आहे की गाव दाखवलेय पण तीथेही ईतकी मागासलेली विचारसरणी नाहीये आता

>>अन म्हणे ही ऊच्च शिक्षीत शिक्षीका>>>
हो ना...ड्रेस घालायला आता का एकदम प्रॉब्लेम आहे...आधी लेगीन घालूनच फिरायची ना.. मालिकेचा प्रोमो आल्यापासून फोटोग्राफी सैराट सारखीच वाटत होतं... शेत, ऊस,स्लो मोशन,विहीर...आणि शेवटी सैराट सारखी बुलेट पण चालवली...
आता अंजलीचा सोशिकपणा नको वाटतोय..आणि राणाचा भोळसटपणा पण... आबा ऑल टाईम हिट....

आबा ऑल टाईम हिट.... >>>> हो अगदी, एकटे तेच चांगले काम करताहेत आता.

हे असे सगळे जर खर्या आयुष्यात घडले असते ना तर दोघी जावांनी झिंज्या ऊपटल्या असत्या एकमेकींच्या एव्हाना

वहिनीबाई घर सोडुन गेल्या होत्या तेंव्हा स्वतःची बायको घर सोडुन गेल्या सारखा रुसुन बसला होता राणा..

अंजली ने छान चालवली बाईक काल. पण आता सुरज पण वैनींच्या बाजूने व्हायलाय हळूहळू.
धाकल्या सुन बैच जरा अजून वाकड्यात हैत. आणि चंदीचं तळ्यात मळ्यात सुरुये.

प्रोमोत पाहिलं की अंजलीचे वडिल म्हणतात अंजली तुझं पत्र आलंय थेट जर्मनीहून .. "थेट.. Uhoh Lol शब्दप्रयोग लै आवडला...
पण हिचं असं स्पेशल काय क्वालिफिकेशन आहे? कसली कॉन्फरन्स? Uhoh

कॉन्फरन्स? मी तर सेमिनार ऐकलं आणि ते ही अडीच महिने चालणारं. सेमिनार इतके दिवस असतं का? Uhoh ट्रेनिंग म्हटलं असतं तर चाललं असतं.

खरंच आबांच काम एकदम मस्त. जशास तसे. अंजली बाईंना किंवा लेखकाला जरा माधुरी दीक्षित चा बेटा सिनेमा दाखवायला हवा .ती कशी कारस्थानी आईला धडा शिकवते. नाहीतर एवढी हुशारी काय कामाची. मध्ये मध्ये इन्कलाब घेते अंजली वहिनी विरोधात पण राणा आला कि सगळं संपत.

बास...मी आबांची फॅन... तेच हिरो आहेत आता माझ्यासाठी.... शिक्षण मंत्री का काय दाखवलेत ना??? एकदम शोभतात ते त्या रोलला.. त्यांचा रुबाब पण त्याचबरोबर विनम्रपणा... बाहेरून कणखर पण आतून आईची माया.... कधीतरी ठोकळ्या बैलासमोर हतबल होणारे, संनिदाची काळजी असणारे पण त्याला सतत ओरडणारे आबा आणि वैनीबाईंना 'चांगलेच' ओळखून असणारे आणि योग्य ठिकाणी त्यांना बरोबर झापणारे आबा मस्त उभे केलेत या अभिनेत्याने...

हो मलापण आबा खूप आवडतात. पेचप्रसंगी ते योग्य वेळी आले की हुश्य होतं- ते आता सगळं सॉर्ट करणार असा विश्वास असतो, मस्त पर्सनॅलिटी आहे.
पण ते जर्मनी प्रकरण दोन महिने असेल तर काय दोन महिने अंजलीशिवाय मालिका असणार??

पण ते जर्मनी प्रकरण दोन महिने असेल तर काय दोन महिने अंजलीशिवाय मालिका असणार?? ..... मालिकेच्या सोयीसाठी अंजली जर्मनी च्या संधीवर पाणी सोडणार, आपलं कारस्थान चाललं म्हणून वाहिनीबाय खुश होणार. परत मागल्या पानावरुन पुढे चालू.

मालिकांच काय खर नसतंय ओ सनव. दोन महिने दोन दिवसांत पण संपवू शकतात किंवा नऊ महिने दिड वर्ष चालवू शकतात. Wink

मला पण वाटतंय अंजलीबाई काय जर्मनीला जात नाय.

मला पण वाटतंय अंजलीबाई काय जर्मनीला जात नाय. >>>> जाऊ ही शकते राणाला सोबत घेऊन, तसेही हल्ली परदेस दौर्याचे फ्याड चालु आहे.

कदाचित आबा दोघांना पाठवतील जर्मनीला

हो जाऊहि शकतात दोघे .. केसरीची टुर्स सध्या सिंगापुर साठी दिसतेय... किती जाहिरात चालु आहे मानबा मध्ये..

वीणा आक्रमक आहे म्हणून ज्यात त्यात घुसतेच आहे पण क्वालिटीचा विचार केला तर मला स्वतःला वीणा पेक्षा केसरी किती तरी पटींनी सरस वाटते . आता मे महिन्यात वीणा बरोबर यूएस ला जाऊन आले पण त्यांचा अनुभव फारच उद्विग्न करणारा होता आणि साधी औपचारिक माफी सुद्धा मागत नाहीत ती लोक . चुका होऊनही आमच्या कडून असं होतच नाही अशी भाषा होती Sad

ओहह असं आहे काय. सध्या काही विचार नाही पण यावरून दोघांच्यात निवड केसरीची करायला हवी असं वाटतंय.

Pages