तुझ्यात जीव रंगला - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26

तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय वैताग आहे. काही दाखवायला नसेल तर बंद करा म्हणावं हे दळण.
त्या माठाला मराठी काय शिकवते. ते येतंय का नाही त्याचा पत्ताच नाही तर आता इंग्लिश शिकवायला चालु.
काय तर म्हणे तालमीत जाताना सकाळी काय म्हणाल गुड मॉर्निंग

भयंकर पाणी ओतणे चालू आहे.... आता जीव गुंतला हे दाखवल्यावर काय दाखवायचं म्हणून हे दळण चालू केलंय... वेगवान कथानक,ट्विस्ट वगैरे पासून बरीच लांब आहे मालिका... नुस्त आता एक एक सण साजरे करतील हे लोक...गणेशोत्सव तर झालाच ..आता नवरात्र,दसरा, दिवाळी मग ख्रिसमस ,न्यू इयर पण दाखवा...बरकत आहे तर मग ईद वगैरे पण होऊन जाऊ दे... मग अंजली बाई सर्वाना सर्वधर्म समभाव शिकवतील...

हो ना....तेच ते...किती वेळा.....रानाचा अडानी पणा...आणि अंजली बैंचं त्याना न कंटाळता शिकविणं...वहिनी बाईंची अपयशी कारस्थानं...
राणाचं मान डोलावणं आणि अंजली ची शुद्ध तुपातली भाषा.....कितीदा ??????

:रागः

मजाच येत नाही..
बाईंच त्याच्यावर प्रेम आहे हे आधी पासुनच वाटायचं..
राणाचं मात्र थोडं थोडं... लग्नानंतर दोघांच्यात सगळं जमताना , थोडे एपि पुरतं वाटलं..
नवरा बायको प्रेम न वाटता भाउ बहिण .. शिक्षक- विद्यार्थी .. आई -मुलगा .. अशा वेगळ्याच कॅटॅगरी मधलं प्रेम वाटतं..
कथा म्हणावी तर आधी थोडी होती प्रेमक्था आता तर तसही नाही..

काल राणाने अंजलीबाईंच्या मांडीवर डोकं ठेवलेलं. तर तिने चक्क 'नीज माझ्या नंदलाला' आळवायला सुरुवात केली Uhoh

अन्जली ची जर्मनीला जायची काय भानगड झालिये का? मी मधले बरेच भाग मिस केलेत.
राणा एअरपोर्ट ला येतो येतो म्हणाला ही नाही नाही म्हणतेय.

राणाने मांडीवर डोके ठेवले तेव्हाच मला वाटले... हि काय आता अंगाई गाणार का? आणि सुरु झाले..नीज माझ्या नंदलाला.

हो ना...निज नंदलाला... जेव्हा केव्हा दोघे जरा रोमँटिक होतायेत अस वाटलं की लगेच बैलाच डोकं मांडीवर आणि मग अंगाई सुरू...
आवरा अरे...हनिमूनचा तर काय पत्ताच नाही..नाव ही नाय काढायचं...
नवरा बायको न वाटता फक्त एक मास्तरिण आणि एक येडा खुळचट पैलवान वाटतात.... प्रेम न दिसता फक्त दया,कणव, काळजी ,मातृ करुणा एवढ्याच भावना दिसतायेत... आडदांड विद्यार्थी आणि समजूतदार मास्तरीन यांच्या पुढे केव्हा जाणार मालिका...

आडदांड विद्यार्थी आणि समजूतदार मास्तरीन यांच्या पुढे केव्हा जाणार मालिका... >>>. Ohh म्हणजे अजून आहे का ही मालिका , मला वाटले संपतेय म्हणून त्यांना जुने आठवतेय
बरंय आम्ही बघत नाही,

>>मला वाटले संपतेय म्हणून त्यांना जुने आठवतेय>>> बरंय विबी तुम्ही बघत नाही.. मालिका बैल आणि मास्तरणीच लग्न झाल्या आधी जिथे आहे तिथेच आहे..सगळं तसंच आहे..वैनीची कारस्थाने,गोदाक्कच मूग गिळून गप्प बसणं, राणाला वैनीने गंडवणं, मास्तरणीचा सोशिकपणा, राणाचा खुळचटपणा,बरकतचे अडाणी सल्ले, वैनीची चमची...नवीन काही नाही..पाणी ओतायला ठिगळं आहेत साक्षरतेची, शिक्षणाची, कुस्तीची... पण नक्की निश्चित कथानक अस नाहीच.. शेंडा बुडका नसलेल्या मालिका सगळ्या.. पुढची येईस्तोपर्यंत पाणी घालणार मग दुसरी आली की इथे अचानक सगळं मतपरिवर्तन,सारवासारव आणि गोड गोड शेवट...हुश्श..

नटुकाकी >>> Lol

खरेय तुमचे हल्ली खूप पकवतात मालिकांमध्ये
आम्ही काय करतो जोवर मज्जा येतेय तोवर बघतो
एकदा का शिरेल कंटाळवाणी झाली की दुसरी एखादी बघायला चालू करतो

सध्या ती ब्रेक अप चांगली वाटतेय
Timepass

राणा गचकणार असे दिसते, म्हणुनच फ्लॅशबॅक दाखविला असणार.
किंवा अधू होणार मग अंजलीबाई त्याची सेवा करुन, त्याला धीर देऊन, त्याला पुन्हा पैलवान बनवायचा प्रयत्न करणार.

इतकं काही होईल असं वाटत नाही, फक्त accident होईल आणि अंजलीबाईंच जाणं रद्द होईल. मेन हिरविण २ महिने गायब झालेली कसं चालेल?
पण हे ही तितकच खरं आहे की मालिकेतला accident कधीच साधा नसतो. Angry

राणा गचकणार असे दिसते, म्हणुनच फ्लॅशबॅक दाखविला असणार.
किंवा अधू होणार मग अंजलीबाई त्याची सेवा करुन, त्याला धीर देऊन, त्याला पुन्हा पैलवान बनवायचा प्रयत्न करणार. >>> नको रे बाबा
असे काही झाले तर आहेत अजुन दीडेक वर्ष.

त्यापेक्षा, बाईंना जावु दे जर्मणीला, अन त्यांचा जिव तिथे, अन बैलाचा कोपुत रमला दाखवा अन संपवा एक्दाचे

पण खरेच चाललं असते की थोडा बदल म्हणुन, कमीत कमी आपली म्हणजे प्रेक्षकांची सुटका.

आमच्या कडे कामाला येणार्या मावशी तर मानबा बघुनच जातात, घरी वेळ मिळ्तं नाही म्हणुन.

अन त्यांच्यामुळे मम्मी पण बघते, तीला नाही कसे सांगणार ना.

नाहीच जाणार आता.
आई म्हटली,'याला काय गरज होती, निघायच्या वेळी मरायला जायची' Lol

निज नंदलाला...
तुम्हाला झी चा इतिहास माहीत आहे ना. मांडीवर डोक ही रॉमॅण्टीसिझची परीसीमा आहे.
आठवा जानी चा दोनदा हनिमून असाच झाला. मग पुढे ती दिड वर्षांसाठी प्रेग्नंट झाली.

Pages