तुझ्यात जीव रंगला - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26

तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिक्षणमंत्री तरी असे कसे, स्वतःच्या हयातीतच सगळी संपत्ती आडाणी आणि मंद तसेच कजाग वैनीला आई मानणार्‍या मुलाच्या नवावर करून बसले > +१ . हे सोडून बाकी आबा आवडतात मला. राणा मात्र महामठ्ठ आहे अगदी.

साहेबराव माझा भाऊ आहे असे राणा म्हणतो ...
ते खरोखरच तो सिध्द करतोय.
गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक भागात याची प्रचिती येतेय. Biggrin Biggrin

"साहेबराव माझा भाऊ आहे असे राणा म्हणतो ..."
हे असलं काहीतरी ऐकूनच आई फोटोत गेली असणार.
तो बापही काही बोलत नाही अगदीच हा आहे.

अंजलीबै ना आवरा आता प्लीजच.
नंदुडीने शिवणाची मशीन घेतलीये. भाराभर कपडे आणु देताहेत लोक. मला वाटतं अल्टरेशनला.
आणि नंदुडीला काही येतच नाही.
मग अंजलीबै पदर खोचतात आणि शिवण मशीन चालवताहेत.
आवरा रे बासच आता

Submitted by च्रप्स on 4 April, 2018 - 02:41
अंजलीबै ना आवरा आता प्लीजच.
नंदुडीने शिवणाची मशीन घेतलीये. भाराभर कपडे आणु देताहेत लोक. मला वाटतं अल्टरेशनला.
आणि नंदुडीला काही येतच नाही.
मग अंजलीबै पदर खोचतात आणि शिवण मशीन चालवताहेत.
आवरा रे बासच आता>>>>>> सस्मित Proud

अय्या! आता मला माझे लाडके गाणे म्हणण्याची संधी दिली सस्मितने. चला म्हणूया..

फू बाई फू फुगडी फू, दमलीस काय गं माझी वैनुडी तू गं वैनुडी तू

वैनूडीने केला कपड्यांचा फाफटपसारा
अंजली धावते मदतीला, तिला कुणीssतरी आवरा
बाई फुगडी फू..

राणादाच्या कल्पनेची उडते पतंग गगनी
वैनुडीच्या अंगी मात्र भरते हुडहुडी
गं बाई फुगडी फू...

ओह.. धनश्री काडगावकर नाव आहे का तीच.. तीच नाव माहीत नसल्यामुळे तिला आम्ही रॅबीटच म्हणतो... तिच्या उचपत्या मुळे जरा तरी बघणेबल होत नाहीतर आता काय राणा आणि अंजली बाई, आबा,गोदाक्का यांमध्ये काही दम नाही...या मालिकेचा उद्देश काय तेच कळत नाही। जीव रंगला ,रंगून मग लग्न झालं...आता पुढे काय..

हो मी नव्हते बघत ती पण नंतर माझी भाची तिची आई झाली होती, दत्तक मुलगी घेतात धनश्रीला त्यामुळे भाचीसाठी दोन तीन एपिसोडस बघितले होते.

थोडी प्रिचोप्रा सारखी दिसते.>>>> नाही, स्मिता शेवाळे सारखीच दिसते. स्मिता शेवाळे लाजिरवाण्या घरात होती सुरुवातीला. ही धनश्री त्या गंध फुलांचा मध्ये इंजिनदादा इंजिनदादा म्हणत झुकझुक करत फिरायची. नंतर त्या इंजिनाने या डब्ब्या ला जोडुन स्वतःची अवनती करुन घेतली.

चिखल

स्मिता शेवाळे कोण माहीत नव्हती.. गूगल केल्यावर दिसली.. वाटत आहे धनश्री सारखी.
पण वहिनी जास्त सुंदर आहे... डोळे आणि स्पेशली केस.. एक नंबर...

Pages