तुझ्यात जीव रंगला - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26

तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या मालिकेचे काही भाग किती छान रंगवले होते..लग्नावाले भाग मात्र उरकून टाकल्यासार्खे दाखवतायेत. कधी एकदाचं लग्न झालेलं दाखवून मग पुढची नेहमीची कट-कारस्थान दाखवतोय असं झालंय की काय झीवाल्यांना Proud

कधी एकदाचं लग्न झालेलं दाखवून मग पुढची नेहमीची कट-कारस्थान दाखवतोय असं झालंय की काय झीवाल्यांना Lol
मलाही असेच वाटतेय..लग्न छान दाखवलं आणि ग्रुह प्रवेश पासून काही तरी अ आणि अ दाखवत आहेत.

मुर्खाचा बाजार सुरु आहे.. या सिरीयल मधे...
तो राणा शेतात घरी जातो तेव्हा... कोणीही (वडिल, भाउ, ति काकु) सोबत येत नाहीत म्हणजे ..मला तर ते पाहुन रडाव कि हसाव कळेना..

पण मी खळखळुन हसलो.. त्या लेखकाच्या बुध्दिची किव करुन...

मी जुने एपिसोड बघावे म्हणत आहे. सध्यातरी छान वाटतेय सिरीयल. पण आता पुन्हा जावेचा कावा हीच स्टोरी असेल तर जुनेच एपिसोड बघायला हवेत.
याआधी तेलकट गवरी आणि कळकट माण्शी ला बघून झीला काय चांगल्या हिरोईन्स सापडतच नाहीयेत की काय असं वाटत होतं पण अंजली दिसायला छान ,स्मार्ट व क्युट आहे आणि कामही चोख करत आहे. गोदाक्का बरकत आणि प्रतापराव तर थेट जुन्या मराठी सिनेमातून उचलून इथे टाकले आहेत असं वाटतं! आणि हो- हिरोही छान आहे- किती सहज काम करतो- तो राणाच वाटतो!

हिरो शांत झोपलाय , त्याच्या चेहर्यावर उन पडतं , त्याची झोप चाळवते , हिरॉईन मध्ये येउन सावली पाडते.
हा घीसापीटा सीन , पार ह्रितिक रोशनच्या काळापासून आहे .

मुर्खाचा बाजार सुरु आहे.. या सिरीयल मधे...
तो राणा शेतात घरी जातो तेव्हा... कोणीही (वडिल, भाउ, ति काकु) सोबत येत नाहीत म्हणजे ..मला तर ते पाहुन रडाव कि हसाव कळेना

>> अगदी अगदी.. बाकिच्यांना तिथे जायला काहीच हरकत नव्हती. शिवाय राणा-अंजली ला बाहेर थांबवून नोकरांकरवी छान झाडलोट करवून घेता आली असती. मग छान रांगोळी काढुन, तोरण लावुन गृहप्रवेश. आणि मग काय पहिली रात्र वै होऊन गेली कि नोकर चाकर गडी पाठवून पूर्ण घराची साफसफाई, सजावट, लाईट पाण्याची, स्वयंपाकाची व्यवस्था.. बरंच काही करता / दाखवता आलं असतं. तेही लॉजिकल. पण काहीतरीच बावळटपणा दाखवला.

बाकी लग्नाच्या दिवशी व्हॉट्सअ‍ॅप वर 'पाठक बाईंचे फाटक आज..' अश्या काहीही गलिच्छ आणि घाणेरड्या पोस्ट्स फिरत होत्या.

कौतुक करे-करेपर्यंत गंडलीच की सिरियल + १

अगदी. काहीही दाखवत आहेत.
तो राणा आपल्या वडिलांचं काहीच कसं एकत नाही?
राणा एकत नाही तर अंजली पण एकत नाही सासर्यांच?
अंजली राणा ला एकदाही विचारत नाही की घर का सोडलं?
नवीन लग्न झालेल्या जोडप्याला असं कुणी एकटं सोडतं का?.....
एक धड मालिका होती..ती पण लॉजिक सोडून दाखवायला लागले...! Angry

@ पियू >>>> अरे अरे... मला आवडते ही हिरवीण... फार संयत करते अभिनय ... आणि निरागस हसू... थोडी बाणेदार लॉजिकल प्रॅक्टिकल पण आहे पण आता जरा राणा च्या प्रेमात पडल्यावर थोड़ी उगाचच सहनशील दाखवली आहे...खर तर तीने आता विचारावे राणाला कि हे सगळ का आणी कशासाठी करतो आहे तो... सँधर्भासहित स्पष्टिकरण घेऊन त्याला योग्य दिशा दाखवावी... नाहितर मग काय अर्थ आहे शिक्षिका असण्याचा.. त्याला पुस्तकी शिक्षण नाही पण निदान जगात सक्षमरिते जगण्याची रीत भात शिकवावी ... ...शिक्षिका असूनही अन्याय सहन करताना दाखवले तर मग मालिका पाहणे सोडून द्याव्वे लागेल... राणा आणी अंजली बाई आवडत असून सुद्धा...केवळ लेखकामुळे..

नटुकाकी.. +1.
राणाचं घर तर शेतात आहे ना?? काल अंजली विहिरीतून पाणी भरताना दाखवली तेव्हा घराजवळून टूव्हिलर जाताना दिसली. त्यामागे इतरही घरं होती. त्याच्या शेतातल्या घराजवळच विहिर आहे ना?? आणि त्या घराच्या आजूबाजूला तर फक्त शेतच आहे. मग काल कुठचं घर दाखवलं??

नटुकाकी + १

नुसत आपलं , तुम्ही माझ्या सोबत आहात ना ... मला काही त्रास नाही .. करून काय फायदा .

बाकी लग्नाच्या दिवशी व्हॉट्सअ‍ॅप वर 'पाठक बाईंचे फाटक आज..' अश्या काहीही गलिच्छ आणि घाणेरड्या पोस्ट्स फिरत होत्या.>> ती पोस्ट तुम्ही तिथेच डिलीट करायला हवी होती. ईथे सांगून ती अजून पसरवली जाते आहे.

उगाचच सहनशील दाखवली आहे...खर तर तीने आता विचारावे राणाला कि हे सगळ का आणी कशासाठी करतो आहे तो... सँधर्भासहित स्पष्टिकरण घेऊन त्याला योग्य दिशा दाखवावी... नाहितर मग काय अर्थ आहे शिक्षिका असण्याचा.>>> अगदी.

उगाचच काहीही दाखवत आहेत आता. त्यांच्याकडे एक नोकर सुद्धा कोणी पाठवत नाही. त्यांना झोपायला साधी गादी पण नाही आणता आली वाड्यावरुन कि तिथून जेवणाचा डबासुद्धा मागवता येत नाही. अंजली बाई पाणी भरणार, केर काढणार, चुलीवर भरमसाठ स्वयंपाक करणार, दिवा गेला तर त्याला टिचक्या मारत राहणार.... हे सगळे करून शाळेत पण जाणार असतील, धन्य आहेत. सुपरवुमन होणार तर Happy

आज ६,७,८ मार्चचे वेबिसोड बघितले. खरंच बेक्कार दाखवलंय. पाठकूबाई त्या गोठ्यात जाऊन रहायला तयार होतात. कारण की राणाचा शब्द खाली नाही पडू द्यायचा. अक्षरशः Disgusting. तिकडे राणाचे वडील रडतायेत तरी हे दोघं वाड्यावर येत नाही. ये बात कुछ हजम नही हो रही. अंजलीची व्यक्तिरेखा आतापर्यंत किती छान उभी केली होती. पार ढेपाळवली आता.
आज काय झालं कोणी सांगा ना प्लीज.

एकदा वाटतं की बहुतेक राणा ला कळ्लं आहे की पाठक बाईना वाड्यात त्रासच होणार आहे ते .. पण दुसर्‍या क्षणाला शंका येते की तसं काही नसावं
वडील का येत नाहीयेत शेतावर? काय कसम वगैरे दिली/खाल्ली आहे का? Proud

आज....
राणा आणि राणी Happy जेवत असताना तेथे बरकत येतो त्यांच्यासाठी जेवण घेऊन, तेव्हाच पीठाचा डबा द्यायला अजून एकजण येतो. त्या दोघांना राणा जेवायला थांबवतो. ते सुद्धा राणाबरोबर छान छान म्हणत २ भाकर्या जास्त खाउन जातात. सगळ्या भाकर्या संपतात, राणी उपाशीच मग राणाला वाईट वाटते व तो बाईंकडुन भाकरी शिकतो, करतो आणि खाऊ घालतो. (पार्श्वगायन-संगित एकदम भयाण)
राणीचे आई-बाबा वाड्यावर जातात, तर आबा त्यांच्यासमोर तोंड पाडून बसतात. वहिनीबाई सल्ला देतात कि तुमच्या पुरीला समजवा किंवा तिथून घरी घेऊन जावा म्हणजे राणाभाऊजी ऐकतील.
राणा राणीची शेणी कशा थापायच्या, त्याचे उपयोग काय अशी शिकवणी घेत असतो. तेथे आई-बाबा येतात. आई बघून गहिवरते बिचारी, पण छोटे असले तरी 'घर' आहे ना, आता हेच माझे घर असे राणी म्हणते. आई म्हणते कि वाड्यावर नसेल रहायचे तर आपल्या घरी रहायला या पण राणाजींना नाही पटणार अन मी नाही येणार असे सांगते.
बाबा राणाला विचारतात पण राणाचे तेच ...मक्खासारखे तोंड करुन बाईना काही कमी पडू देणार नाही असे सांगतो, आम्ही घरी येऊ पण फक्त मांडव परतावणीसाठी असेही.
तिकडे वहिनीबाई फक्त राणाला घरी आणून राणीला कायमची माहेरी कशी पाठवायची याचा प्लान करते.

राणा सोबत ती अंजली पण मंद सारखी का वागतेय? एवढी शिकलेली आहे तर तिला राणाला समजावता येत नाही का? ईतकी प्रेमात बुडली आहे की तिला आपले आई वडिल् ,सासरे, गोदाक्का जीव तोडून सांग्त आहेत तेही लक्षात येत नाहीये.
आबांचा अभिनय तेवढा छान. पण तेही राणाला घरी परत आणु शकले नाहीत..

sonalisl धन्यवाद. शेणीच्या गवर्‍या बिवर्‍या सुद्धा आल्यात का मालिकेत...येऊद्या येऊद्या तेवढीच कमी होती Proud

Lol

राणा सांगतो...दोन दिवसात या गवरी वाळतील, त्यावर आपले जेवण बननार, मग त्या राखेने भांडीपण स्वच्छ घासता येतील आणि याच राखेत मीठ मिसळले कि त्याने दात घासतात. अंजली बाई 'मला माहितच नव्हते' म्हणून खूष होतात. आता बाई मिनीमलिस्टीक राहणीमान सुरु करणार तर Happy

अरेपण अचानक पाठक बाई आणि राणा वाडा सोडून शेतात का रहायला जातात?
मूळ कारण काय? कुणि कुणाला शब्द दिलाय?
आणि कसला? Uhoh

दक्षिणा, यू डोन्ट क्नो? Wink
लग्नाच्या थोडं आधी राणाला नंदिता इमोशनल ब्लॅकमेल करते आणि त्याच्याकडून वचन घेते की तो आणि अंजली लग्नानंतर वाड्यात राहणार नाही. म्हणून हे दोघं लग्न झाल्या झाल्या तिकडे शेतातल्या घरी रहायला जातात. आबा, गोदाक्का, अंजलीची आईवडील सगळे त्यांना खूप विनवण्या Sad करतात, वाड्यावर परत यायला. पण ते ऐकतही नाहीत आणि राणा खरं कारण सांगतही नाही. कालचा भाग मी अजून नाही बघितला, अजून काय दिवे लावले असतील तर Happy

आता अंजलीची आई राणाला सांगते कि अंजलीला शेतात राहणे नाही झेपणार आणि तसे ती तुम्हाला सांगणार पण नाही, तर तिला काही दिवस आमच्याकडे राहु द्या. आता ती अंजलीला राणा वाड्यावर गेल्याशिवाय पाठवणार नाही म्हणे.

मालिकेचा चाहतावर्ग यांत तरुण-तरुणींची संख्या खूप आहे सैराटप्रमाणे. त्यांना आता हे वहिनी कारस्थान प्रकरण बोअर होईल आणि मालिकेचा टीआरपी घसरेल असं वाटतंय. राणा-अंजली क्यूट आहेत पण बाकीचे लोक फार बोअर करतात. लग्न झाल्यापासून राणा तर पार टेन्शनमध्येच आहे आणि अंजलीलाही कळत नाहीये नक्की काय प्रकार आहे ते.
या मालिकेचे जुने (सुरुवातीचे) एपिसोड अमेरिकेत अ‍ॅक्सेस करुन कुठे बघता येतील हे माहीत असेल तर प्लीज मला सांगा/विपु करा.

>>>राणा-अंजली क्यूट आहेत पण बाकीचे लोक फार बोअर करतात>>> हो  सनव... अंजली बाई अजुन तरी फार आवडतायेत... बरकत आणि आबा पण फेवरिट.. गोदाक्का गायब च आहेत... आणि सन्नीदा आला न्हाय व्हय अजुन एकदा पण शेतावर...

Pages