Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती Ph. D. चा अभ्यास करता यावा
ती Ph. D. चा अभ्यास करता यावा किंवा मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकविण्याचा अनुभव मिळावा म्हणून फक्त शिक्षिका झाली असेल.
पण शिक्षकांना मुलांना शिकविण्याबरोबर साक्षरता अभियान, निवडणूका-मत मोजणी, भरारी पथक येते तेव्हा मुलांकडून project करुन घेणे, स्पर्धा परिक्षेची तयारी, स्नेह-सम्मेलनाची तयारी असे बरेच उद्द्योग असतात ना?
बेळ्गाव वरुन आलेल्या काकांचं
बेळ्गाव वरुन आलेल्या काकांचं काम करणारे नागेश मोर्वेकर आहेत बहुतेक ज्यांनी डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजेला गाणं म्हटलंय
https://www.youtube.com/watch?v=8uJtiXElNt0
बाकी सगळं ठीक, पण या झी
बाकी सगळं ठीक, पण या झी वाल्याचं वेळेच गणित पार गंडलय. राणाचे बाबा सकाळीच मुंबईला जावचं लागेल म्हणुन निघालेले दाखवले आहेत, तेव्हाच वहिनीच वाक्य येत की आटपा लवकर पाव्हण्यांकडे वेळेत जायला हवं. म्हणजे थोड्याच वेळात ते अंजलीकडे येतात. लग्नाची बोलणी होऊन लग्न मोडायला येईपर्यंत तास २ तास लागले अस जरी म्हटल तरी अवघ्या ४ - ५ तासात राणाचे बाबा मुंबईला जाऊन परत पण येतात
तिकडे गौरीचे बाबा पहाटे बनारसला जायला निघतात (रेल्वेने) आणि बनारला बेफाच्या वेळेपर्यंत पोहचतात सुध्दा बरोबर तेव्हा इकडे नचि झोपेतुन उठतो. रेल्वे आजकाल विमानाच्या गतीने जाते की काय ?
ह्यात पण आता अॅड दाखवायला
ह्यात पण आता अॅड दाखवायला लागले..
नवरदेवासाठी कपडे घ्यायला म्हणून लिनेन किंग मध्ये गेले..आणि कपडे तर घेतले नाहीच.. म्हणजे फक्त दुकानाची जाहिरात.. अगदीच अ आणि अ सीन होता तो..
कालचा भाग छान होता, शेवट खुप
कालचा भाग छान होता, शेवट खुप हळवा
snigdha, लग्न मोडलं ??
snigdha, लग्न मोडलं ??
snigdha, लग्न मोडलं ?? >>
snigdha, लग्न मोडलं ?? >> मोडल नाही, पण वहिनीबाईने पुर्ण प्रयत्न केले. आयत्यावेळी बाबांनी येऊन सांगितल आम्हाला फक्त नारळं आणि मुलगी द्या त्या आयत्यावेळी येण्याच्या वेळेच्या संदर्भात ती पोस्ट आहे माझी
http://www.lokmat.com
http://www.lokmat.com/storypage.php?catid=247&newsid=18770318
राणा आणि अंजलीच्या मालिकेतल्या लग्नाचे फोटो
सईने दिलेल्या लिंकमधले फोटो
सईने दिलेल्या लिंकमधले फोटो फार सुंदर आहेत दोघांचे.
राणाला नवरा-बायको, मुलगा
राणाला नवरा-बायको, मुलगा-मुलगी.. यांच्यातल्या फिजिकल नात्याबद्दल.. कनेक्शन बद्दल काहिच माहिती नाही असं दाखवत आहेत.. अंजली त्याला स्पर्श करते तसा तो लांब पळतो.. काल पण विचारत होता संसार म्हणजे काय अँड ऑल.
ती बिचारी त्याच्या खांद्यावर थोड टेकायला गेली तोअपर्यंत हा उठला...
पण हा येवढा वयात आला आहे.. मिश्या बिश्या आल्या आहेत म्हणजे त्या भावना नॅचरलीच कधीतरी कळल्या असतिलच ना...
शेजारी पाजारी बघुन .. वहिनी भावाला बघुन तरी कळलं असेल ना थोडतरी...
मग अंजली गावातल्या साध्याभोळ्या नाहीतर .. मंद मुलाशी लग्न करत आहे असं वाटत आहे ...
हम्म्म्म .. अंजलीला बरच काम
हम्म्म्म .. अंजलीला बरच काम आहे लग्नानंतर..
सर्वदा +1.
सर्वदा +1.
गावात कोणाचं लग्न ठरलं की ती बातमी वार्यासारखी पसरते. इथे तर राणाचं घराणं मोठं खानदानी दाखवलेलं आहे. आणि राणा सर्वांच्याच चांगल्या परिचयातला. आणि गावात कोणाला आसभासच नाही राणाचं लग्न ठरलंय त्याचा.
बरं काही भाग आधी बरकत गावभर साखर वाटत फिरत होता राणादाचं लगीन ठरलंय म्हणून. तरी लोक विचारतात गायकवाडांकडे कुणाचं लगीन?? सुरजदानं परत लगीन कराया काढलंय काय??
सईने दिलेल्या लिंकमधले फोटो
सईने दिलेल्या लिंकमधले फोटो फार सुंदर आहेत दोघांचे.
मग अंजली गावातल्या
मग अंजली गावातल्या साध्याभोळ्या नाहीतर .. मंद मुलाशी लग्न करत आहे असं वाटत आहे ...स ह म त
अंजलीला बरच काम आहे लग्नानंतर
अंजलीला बरच काम आहे लग्नानंतर..>>
मी आधीच लिहिलेय ईथे की
मी आधीच लिहिलेय ईथे की राणाला भोळा - अडाणी दाखवायच्या नादात अगदी मुर्ख दाखवतायेत सध्या.
बरं काही भाग आधी बरकत गावभर साखर वाटत फिरत होता राणादाचं लगीन ठरलंय म्हणून. तरी लोक विचारतात गायकवाडांकडे कुणाचं लगीन?? सुरजदानं परत लगीन कराया काढलंय काय?? Sad >>>> हे त्यांनी त्या ऊस्ताद जी पासुन लपविले होते म्हणुन फक्त त्याने विचारले की सुरज दुसरे लग्न करतोय काय?
अंजली गावातल्या साध्याभोळ्या
अंजली गावातल्या साध्याभोळ्या नाहीतर .. मंद मुलाशी लग्न करत आहे असं वाटत आहे ...>>>>>>>>> येस्स. भोळा आणि मुर्ख मंद ह्यातला फरक दाखवता येत नाहीये त्यांना
मानिनी पण जवळपास पत्रिका
मानिनी पण जवळपास पत्रिका घेणारा प्रत्येक जणच कोणाचं लगीन हा प्रश्न विचारतच होता कालच्या भागात. त्यामुळे मला पटलं नाही ते.
राणाच्या बाबांची पर्सनॅलिटी मात्र भारी आहे एकदम. एकदम करारी वाटतात ते. बघताक्षणी वचक बसावा अशी नजर आणि तेवढंच मृदू हसू.
ते खरे राजकारणि वाट्तात
ते खरे राजकारणि वाट्तात
बाबा छान काम करतायेत. त्या
बाबा छान काम करतायेत. त्या कल्पेस एंट्रीनंतर बघितलीच नाहीये मी. रात्री साडेबाराचा रिपीट बंद केलाय झीने. ओझीवर जाऊन बघावी असं काही वाटत नाही.
ओके निधी,
ओके निधी,
पण तरीही अजुन तरी मी रोज डाऊनलोड करुन बघते, नंतरचे माहीत नाही.
कालचा राणाची पत्रीका वाटायचा भाग मलातरी नाही पटला. एकतर गावी गल्लीतली मोठी मुले किंवा नातेवाईक वाटतात पत्रीका. नवरा मुलगा फारतर अगदी जवळच्यानां वाटतो, ते पण असे वरात काढुन नाही
शेवटी ट्विस्ट टाकलाच..
शेवटी ट्विस्ट टाकलाच..
राणा आडाणी असल्याचं अंजलीला कळण्याचा..
कालच्या भागात राणाची अगदी शोभा केली..
केळी काय सिलिंडर काय..
विनोदी वाटण्या ऐवजी दया आली त्याची...
आणि अंजलीला बिचारीला वाटत होतं की तिला भेटायला म्हणुन येतोय सारखा सारखा
तरी लग्नात काय दाखवतिल ही उत्सुकता आहेच मला..
लग्न तर झालेय, फक्त आता
लग्न तर झालेय, फक्त आता ईतके बघायचे आहे की लग्नाअगोदर अंजली कळाले आहे की नाही
राणा दा साधा भोळाच दाखवला आहे
राणा दा साधा भोळाच दाखवला आहे , ज्यांना काळत नाही त्यांनी पुन्हा एकदा सर्व भाग पाहावेत, तो ब्रह्मचारी होणार होता त्यामुळे तो बायकांपासून लांब राहत होता इतकाच , पण हळू हळू तोच राणा दा रोमान्स पण करेल ,,,,,,,,,,,,,, (मालिकेत )
चला लग्न झालं एकदाचं... पण
चला लग्न झालं एकदाचं... पण राणा "प्रेमाने" लग्न करतोयं अस वाटतं नाही... अंजलीची आता दया येउ लागलीये की ही खरचं का करतीये ह्या येड्याशी लग्न.. असो, वहिनीने अखेर डाव साधलाच वाटतं..
त्या पाठक बाईंच्या नाचावर
त्या पाठक बाईंच्या नाचावर पब्लिक ने काही कॉमेंट्स आणि विनोद केले आहेत का ?
लग्न जन्गी दाखवल झीने! अन्जली
लग्न जन्गी दाखवल झीने! अन्जली बाइ गोड दिसत होत्या, राणा पण भारी!
छान दाखवलं लग्न. अधूनमधून
छान दाखवलं लग्न. अधूनमधून बघायला बरी आहे मालिका असं वाटतंय. लीड पेअर छान. शिव गवरीसारखे लेचेपेचे वाटत नाहीत, खमकं कोल्हापूरी जोडपं आहे! आता बेटा मुव्हीप्रमाणे स्टोरी जाईल का?
वहिनी म्हणजे मला सासू हवीची काशी आहे का?
वहिनी म्हणजे मला सासू हवीची
वहिनी म्हणजे मला सासू हवीची काशी आहे का? >>> नाही ती त्या सिरीयलमधे नव्हती. ती माझिया प्रियाला प्रीत कळेना मधे हिरोची बहीण, इ टिव्हीच्या एका सिरीयलमधे लीड हिरॉईन आणि रुंजी ह्या स्टार प्रवाहच्या सिरीयलमधे व्हिलन होती ह्या आधी प्लस साम टीव्हीवर कुकरी शोची अँकर होती.
मागे संक्रंतीच्या वेळेस त्या
मागे संक्रंतीच्या वेळेस त्या वहिनीची सासरी पहिली संक्रांत होती म्हणे. आता एका वर्षाच्या आत त्यांनी राणाला किती संभाळले आहे बरे?
राणा साधा भोळा पेक्षा मंदच वाटायला लागला आहे. काहीही झाले कि मी आबांना समजावतो, म्हणजे आबा काय म्हणतात ते सोडून बाकी सगळ्यांचे त्याला पटते.
अंजलीबाईंनी बाकीच्या लोकांना सरळ करायच्या ऐवजी आता राणालाच सुधारायला हवे, आणि बरे बाई तू थोरली म्हणून वहिनीकडून सगळ्या जबाबदार्या पार पडतात कि नाही याकडे लक्ष ठेवावे. नाहीतर नेहमीचाच वहिनीचा ड्रामा बघावा लागेल.
Pages