तुझ्यात जीव रंगला - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26

तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल तो कल्पेस रानाजींच्या दोस्तीनीसाथी नी लेंथ वन पीस घेउन देत होता. येडाय का?
रानाजी हे असे. त्यात कोल्हापुर शहर. त्यांची दोस्तीन असे इतके मॉर्ड्न कपडे घालेल काय? पंजाबी ड्रेस तरी घे म्हणायच. डायरेक्ट वन पीस. कायबी कळंना गड्याला.
आणि विना साईजचे मधे साडी सुचु नये दुकानदाराला? ओढणी?

तो कल्पेश राणाशी तुलना न करता सुद्धा किती पेद्रु आहे. त्याचा चेहरा विचित्र तुळतुळीत आणि डोळे बेडुकसारखे आहेत. अ‍ॅनिमिक वाटतो तो. आणि त्याची ती ओढुन ताणुन भाषा अगदीच नकोशी वाटते. असाच कोणी गावात व्यापारी म्हणुन आला असता तर चालला असता, पण अंजलीचा मित्र इतका 'बंडु' असावा ना.

बी एस....
रानाजी आणि पाठक बै आणि कल्पेश मोठ्या पंच तारांकित हॉटेलात जातात जेवायला. रानाभाऊजींना मुद्दामच वैनीबायने वेटर सारखा पोषाख करुन दिलेला...तिथे इचारत, गोंधळून जात रानाजी अखेर पोहोचतात. त्यांना लिहा वाचायाला येत नाय हे ऑलमोस्ट पाठक बैंन कळणारच व्हतं...
अक्षय कुमार तिथे आलेला असतो. कुणाचा तरी असिस्टंट म्हणून. तो त्यांना सहाय्य करेल बहुतेक पुढच्या एपि मधे.
कल्पेश रानाला खाली दाखविण्याचा प्रयत्न करतो पण अंजली बै आहेत नं त्याच्या बाजूच्या.

आमचा टीव्ही बिघडला नेमका. Angry

डिट्टो मध्येच बंद पडतो. बॅक करून मेन मेनू मध्ये येऊन पुन्हा सुरु करावा लागतो तेव्हा पुढची सिरियल बघायला मिळते. काल एवढे उद्योग करुन 100 डेज बघितली कि नंतर जामच वैताग आला.
झी चं अॅप कसं आणि कुठुन डाऊनलोड करायचं?? प्लीज कोणीतरी सांगा.

निधी हॉटस्टार घे डाऊनलोड करुन.. सगळं बघु शकशिल..
राणाच्या गालावर छान खळ्या पडतात.. पण त्या केसांच्या जंगलाने काहिच कळत नाहि... छान स्माईल देतो थोडक्यातलि Happy

ओके भावनाताई. Happy

केसांच जंगल>> Lol मी आधी राणाच्या डोक्यावरचं जंगल आठवत होते की गं. Proud

@ आंबट गोड धन्यवाद.
लवकरच राणाजी बाईंना सांगणार असं दिसतंय. प्रोमो पाहिला..

आज शेवटी पाठक बाईंनी सांगून टाकले ,साध्या भोळ्या स्वभावामुळे तुमच्यात माझा जीव गुंतला !
खुळ्याला तरी बी कळेना . वहिनींना पण सांगून टाकले . कसे होणार अंजलीचे??

बाई म्हणाल्या मला नकोय तुमच दोस्तीच प्रेम आणि पुढे चालू लागल्या. मग राणादा मागुन म्हणाला लग्नाच प्रेम घ्या मग आणि पळुन गेला. बाई गालातल्या गालात हसत उभ्या राहिल्या मग.
आता पुढचा आठवडा शुभमंगल सावधान होईल.

आता पुढचा आठवडा शुभमंगल सावधान होईल.>>>नाही ग शुभांगी ताई...आजच्या भागात राणाजी बाईंच्या घरी जाऊन बोलतो कि त्याच्या मनात असं काही नाही ...तो चुकून बोलला म्हणून...

Pages