तुझ्यात जीव रंगला - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26

तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग बाई म्हणाल्या.. जोपर्यंत तुम्ही मला रीतसर लग्नाच विचारत नाही तोपर्यंत मी लग्नाचा विचार ही करणार नाही..

आजच्या भागात राणाजी बाईंच्या घरी जाऊन बोलतो कि त्याच्या मनात असं काही नाही ...तो चुकून बोलला म्हणून...

हा ट्वीस्ट उगाच आणलाय.. एपी वाढवाय्ला.

कालच्या भागात राणा आणि बाई नी चांगली acting केली
सैरभैर राणा आणि हवेत तरंगत येणा-या बाई मस्त .
होय ट्विस्ट उगीच आणलाय. पण बाई काय सोडणार न्हाईत राणाला कबूलीजबाब दिल्याबिगर Happy

खरतर असं होउ शकतं .. राणा सारखा माणुस कधी बायकांशी न बोललेला.. अचानक येवढ मोठं पाउल झेपणार नाहि त्याला..
पण तरीही जास्तच झालं.. किती इंडिकेशन्स मिळाली राणाला पण स्विकारतच नाहिये

अरे झीवाल्यांना सांगा भोळेपणा आणि मंदपणा वेगळा. मागच्या काही भागांमध्ये कैच्या कै मंद दाखवलंय राणाला. पाठकबाई हिंट वर हिंट देतायेत आणि राणाला कळत नाही. बाकी राणा शहरी कपड्यांमध्ये (वेटरच्या का होईना), खूप हँडसम दिसला Happy

Zee वाल्यांच्या कडून हुषारी ची अपेक्षा च नाही.
पण निदान कथा अजून पर्यंत ट्रॅक वर आहे हेच समाधान.
वैनींची पण कारस्थानं किती बालिश असतात

Zee वाल्यांच्या कडून हुषारी ची अपेक्षा च नाही.
वैनींची पण कारस्थानं किती बालिश असतात >>>>>>>> वैनींची कशाला झी कडे सगळेच बालीश कारस्थाने करतात

शनाया - राधीका, हम्मा, निशा अगदी सगळेच

आणी ते नसेल तर जणु अगदीच मंद .... मानसी - विक्रांत

दिला त्याला चोप लोकांनी पण राणाने सोडवला त्याला पाहुणा म्हणुन..
Zee वाल्यांच्या कडून हुषारी ची अपेक्षा च नाही>>> झी च संथ झालीय तर मालीकांचं अजुन काय होणार.. सगळ्या रटाळ वाटताहेत. हि मालिका जरा बरी होती पण त्या राणान आता वैताग आणलाय भोळं बनुन.. चु-भु.. जरा बरी वाटतेय आता पहायला..

दिला त्याला चोप लोकांनी पण राणाने सोडवला त्याला पाहुणा म्हणुन..>>> अरेरे मी बघायला हवं होतं हे Wink .

थँक्यु भावना.

आता परत काही एपी यांच्या लपाछपी चा खेळ चालणार.
अजुन तर पाठक बाईंना तो अशिक्षित आहे हे कळाय्चय. पार लग्न उद्यावर येऊन ठेपलं की कळेल त्यांना सुनबाईकडुन.
तेव्ह्डीच एपीसोड्स मधे वाढ.
मग पाठकबाई उदार मनाने राणाला माफ करतील. त्याचा भोळेपणा बघुन.

आणि मग तिच्या आईचा विरोध. लग्नानंतर सतत लाजणारा बुजरा राणा , हे आपल्याला जमायचं न्हाय , ते आपल्याला जमायचं न्हाय चालूच .. मग वैनींची कारस्थानं , पाठकबाईंचा छळ , वैनींचं खरं रूप आपल्या हुष्षार पाठकबाई ओळखणार पण राणा ते खरं मानणार नाही. मग परत गैरसमज.
एकूणात पाणी ओतायला लई scope हाय.

पण मला सगळ्यात बरकत आवडतो. तो कलाकार ही मस्त काम करतो. कोण आहे तो?
किती नॅचरल वागतो-बोलतो तो रानाशी!
आणि किती निर्व्याज प्रेमही करतो त्याच्यावर!

>>अरे झीवाल्यांना सांगा भोळेपणा आणि मंदपणा वेगळा. मागच्या काही भागांमध्ये कैच्या कै मंद दाखवलंय राणाला

वहिनी तर त्याला पहिल्या भागापासूनच 'बैल' म्हणत होत्या... Happy
बरकत मुळे बैल पाण्यापाशी तरी आला. Happy

आता direct माझ्याशी लग्न करणार का असं विचारणार.
आधी सांगितलेलं लग्नाचं प्रेम घ्या. परत मग तसं काही मनात नव्हतं असं सांगितल्यामुळे पाठक बाई हिरमुसल्या. मग आता माफी मागून परत लग्नाचं विचारणार राणा .

आवरा आता. पुढे बरेच घोळ घालायचेत म्हणावं. गाडी ईथेच अडकलीये.
काल राणा गाडी सोडुन पळुन जातो तेंव्हा जाम हलु आलं..

काल राणा गाडी सोडुन पळुन जातो तेंव्हा जाम हलु आलं..>>>>>>>> हो तो अ‍ॅक्टिंग पण मस्त करतो.. कालचा एपिसोड आवडला मला..
राणाची भुमिका करणारा अ‍ॅक्टर खुप हँडसम आहे..
अंजलीची पण हाईट पर्सनॅलिटि छान आहे.. शोभते ती त्याला
टायटल साँग मधल्या एका सिन मधे राणाने पांढरा कुरता धोतर घातलं आहे... अंजली ने पिवळी साडी.. राणा मस्त दिसतो त्यावेळी..
तस आता हिरो आवडुन घ्यायची भिती वाटत आहे.. शिव पण आवडला होता आता बावळट वाटतो

त्या मैत्रिणीचं काम खुपच छान वाटलं.. राणाला मस्त झापते.. अन मैत्रिणीबद्दल किती काळजी करते.. हेडसर जरा जास्तच पाणउतारा करत असतात पाठकबाईंचा..

तो हेडसर लई डोक्यात जातो माझ्या..>>>हो पण सगलेच चन्गले असुन चालनार नाहि ना...बोर होइल...तो काम छान कर्तो

सध्या असे वाटतेय की राणाला त्याच्या वहिनीने अगदी योग्य नाव दिलेयं...... बैल तो पण मुर्ख, भोळा नाही.

झी वाल्यांची मुर्ख आणी भोळा यात काहीतरी गल्लत झालीये असे वाटते

अरे, कोणी अर्ज करतं का लग्नासाठी असं? Lol
त्या लिहीणार्याला पार वेडं करुन टाकलं होतं...

खरोखर रीतसर अर्ज केला राणाजींनी.. सोबत आधारकार्ड, फोटो, रेशनकार्ड... अरे देवा....!
रेशनकार्ड.. तेही केसरी रंगाचं.? आणि ओरीजनल..!

गोदाक्कांनाही कसं कळल नाही रित्सर मागणी म्हणजे घरच्या मोठ्यांना घेऊन जाणं असेल.
त्यांनीच सांगित्लं राणाला, वहीनी कडुन ७/१२ चा उतारा घेऊन जा.

Pages