Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तू थोरली म्हणून वहिनीकडून
तू थोरली म्हणून वहिनीकडून सगळ्या जबाबदार्या पार पडतात कि नाही याकडे लक्ष ठेवावे. नाहीतर नेहमीचाच वहिनीचा ड्रामा बघावा लागेल.>> राणाने अंजलीसोबत वाडा सोडला की. वहिनीला शब्द दिलाय ना त्याने तिच्या थोरलेपणाच्या अधिकारावर गदा येईल असं तो कधीही वागणार नाही म्हणून. बहुतेक तो शेतावर राहायला जाईल.
मला एकच कळलं नाही.. एवढा मोठ्ठा वाडा यांचा नि यांच्या वाड्यात पुरेशा खोल्या नाहीत?? बरं राणा आधी स्वतःच्या प्रशस्त मस्त बेडरूममध्ये पलंगावर झोपलेला वगैरे दाखवला होता. आणि काल कुठल्यातरी अडगळीच्या खोलीत जमिनीवर चादर टाकून झोपलेला दाखवला.
अंजली पहिल्यांदा वाड्यावर येते तेव्हा तिला तिच त्याची स्वतंत्र बेडरूम दाखवतो की तो. मग अचानकच राणाला राहायला खोली नाही असं कसं घडलं?? कि काहीतरी भांडणाला कारण दाखवायचंच म्हणून राणाची खोलीच गायब केली.
मला नाही आवडला कालचा भाग.
मला नाही आवडला कालचा भाग.
लग्न तर काय अगदी घाईतच दाखविलेय...
कोणी ईतका मठ्ठ कसा असु शकतो.. मांडवातुन पळुन जाऊन वहिनीला समजावुन येतो आणी ती नाईट गाऊन वरुन नववारी - हैर-स्टाईल - मेक अप ईतके सगळे करुन अगदी वेळेत येते सुद्धा.
भरीस भार याला अगदी माप ओलांडताना आठवते की आपण वहीनीला शब्द दिलाय तर या घरात जायचे नाही.
प्रीकॅप मध्ये दोघ शेतातल्या घराबाहेर दाखविलेत
अगदी काहीही म्हणजे काहीही दाखवितायेत
तो राणा भोळा म्हणजे मुर्ख आणी ती अंजली समजुतदार म्हणजे प्रेमात आंधळी झालेली महामुर्ख वाटतीये निदान मलातरी.
एवढा मोठ्ठा वाडा यांचा नि
एवढा मोठ्ठा वाडा यांचा नि यांच्या वाड्यात पुरेशा खोल्या नाहीत?? >>> निधी, हा प्रश्न मलाही पडला होता जेव्हा राणा त्याच्या काका - काकुसाठी त्याची खोली सोडतो.
त्याअगोदर तो त्या वहीनीच्या खोलीत रहायच जी त्याने त्यांच्यासाठी त्यांच्या लग्नाच्या वेळेला सोडली.... अगदी दानवीर कर्ण नाही का
आता पाणीदार होणार आहे ही पण
आता पाणीदार होणार आहे ही पण मालीका
आता पाणीदार होणार आहे ही पण
आता पाणीदार होणार आहे ही पण मालीका..असंच वाटतयं..
एवढा मोठ्ठा वाडा यांचा नि यांच्या वाड्यात पुरेशा खोल्या नाहीत?? हाच प्रश्न मलाही पडलेला.. काहीही दाखवत आहेत. खोली नाही ,थोरले पण वहिनी ला च मिळावं म्हणून लगेच घर सोडायचं.. काहीही......
राणा त्याच्या काका - काकुसाठी
राणा त्याच्या काका - काकुसाठी त्याची खोली सोडतो.>> हे नव्हतं माहित मला. मग काकांकडूनच त्याची खोली घ्यायची ना. नाहीतरी लग्नानंतर त्यांना परतच पाठवून द्यायचं ठरलं होतं ना. सूरजला त्याची खोली कशाला रिकामी करायला सांगायची?? ते पण लग्नाच्या आदल्या रात्रीपर्यंत कोणालाच आठवत नाही की नवर्याला राहायला खोलीच नाही. कैच्याकै दाखवलं बा.
आता पाणीदार होणार आहे ही पण मालीका>> लग्न झाल्यावर पाण्यातच जाणार मालिका हे आधीचं ठरलं होतं.
मला तर वाटल वहिनीने आबांना
मला तर वाटल वहिनीने आबांना खोली सोडाय सांगु नगा म्ह्टल्याव आबा आपलीच रुम रानाला नी थोरल्या सुनबाईस्नी देतील आणि वहिनीबायचा आणिकच खकाना हुईल
काल मला एकमेव आवडलेली गोष्ट
काल मला एकमेव आवडलेली गोष्ट म्हणजे वहिनीची चमची तीला नाव बदलायला सांगते ते
काल मला एकमेव आवडलेली गोष्ट
काल मला एकमेव आवडलेली गोष्ट म्हणजे वहिनीची चमची तीला नाव बदलायला सांगते ते
नन्दिता च्या नखर्याना राणा,
नन्दिता च्या नखर्याना सुरज, आबा कुणिही किमत देत नाही आणि राणा मात्र शब्द खाली पडु देत नाही... नन्दिताचा मुद्दा मला पटला , आय मिन एवढा वाडा असताना तिचीच खोली कशाला पाहिजे राणासाठी, ... आबानी काका-काकूना शेतावर आपण राणाच्या सिन्गल बेडरुम मधी आणि स्वत;ची रुम राणाला अस करायला हव होत...
लग्नाच्या एक दिवस अगोदर आबा
लग्नाच्या एक दिवस अगोदर आबा सूरज आणि नंदिताला त्यांची खोली खाली करायला सांगतात. खोली खाली करणे म्हणजे कपाटातुन टॉवेल काढुन देण्याइतके सोपे आहे का? राणाचे लग्न ठरल्यावर लगेच सांगण्याऐवजी आबा अगदी शेवटच्या दिवसापर्यंत का थांबले होते?
लग्नाला सगळे गाव आले पण राणाच्या आईकडचे (मामा, मावशी) आणि अंजलीच्या बाबांकडचे (काका, आत्या) कोणीच नातेवाईक कसे आले नाहीत?
घरात आबा सगळयात मोठे, त्यानंतर राणा, नंतर सूरज आणि नंदिता. अंजली राणापेक्षा लहान आणि सूरज आणि नंदितापेक्षा मानाने मोठी असुनसुध्दा राणा वहिनीला इतका मान का देतो?
राणा भोळा वाटण्याऐवजी मंद आणि मुर्ख वाटतो. उद्या वहिनीने हातात बंदुक आणुन दिली आणि अंजलीवर गोळी झाडायला सांगितली तरी तो तयार होईल. अंजली तर त्याहुन वरताण. "वहिनीने तुम्हाला माझ्यावर गोळी झाडायला सांगितली आहे म्हणजे त्या बरोबरच असतील. पण तुम्ही कशाला माझ्यावर गोळी झाडतांय, ती बंदुक माझ्याकडे द्या, मीच स्वत:वर गोळी झाडुन घेते." असे राणाला सांगायला कमी करणार नाही.
इतकी ऊच्चशिक्षित अंजली, जिला परदेशात जाऊन शिकायची संधी होती, ती आता आपले करियर सोडुन चूल आणि मूल यातच अडकुन रहाणार आहे का?
ती आता आपले करियर सोडुन चूल
ती आता आपले करियर सोडुन चूल आणि मूल यातच अडकुन रहाणार आहे का? अवो अंजलीबाईं प्रेमात पार बुडाल्यात बगा. त्या म्हन्ल्या नव..राणाजी तुम्ही शेतात काम करा मी जेवण घेऊन येईन. तिच्या मावशी का मामीने पण विचारलं तिला..जमेल का तुला हे सगळं..तेव्हा तिचं उत्तर ..हो..हो आवडेल मला हे सगळं करायला..!
पण ती शिक्षिकेची नोकरी
पण ती शिक्षिकेची नोकरी कंटीन्यू करणार आहे ना?? ती राणाला म्हणते कि तुम्ही शेतात जा, मी शाळेत जाईन म्हणून.
वाड्यात राहून अंजलीला नोकरी करणं कठीण गेलं असतं बहुतेक.
कटकारस्थानाचा भाग सोडला तर मला तरी आवडलं त्यांच असं शेतातल्या घरात जाऊन वेगळा संसार वगैरे मांडणं. वाड्याचा डामडौल नको नि वहिनीबाईचा आकस नको. साधा सरळ राणाराणीचा संसार.
साधा सरळ राणाराणीचा संसार
साधा सरळ राणाराणीचा संसार आबांनी परवानगी दिली पण?
आबांनी खूप विनवण्या केल्या पण
आबांनी खूप विनवण्या केल्या पण राणा काही ऐकला नाही. दोघं मिळून गेले शेतावर. आता तिथेच राहणार.
ओ.के. धन्यवाद. निधी.
ओ.के. धन्यवाद. निधी.
कालचा भाग अगदी काहीही होता..
कालचा भाग अगदी काहीही होता....
नवे नवरा नवरी असे एकटेच चालत जाताना दाखवलेत...
हे कोल्हापूर असुच शकत नाही
कमीत कमी शेजारीपाजारी तरी असतात.. मदत करायला, साफसफाई करायला वै. वै.
हो ना.. असे कसे दोघे एकटे
हो ना.. असे कसे दोघे एकटे गेलेले दाखविलेय.. गेलाबाजार बरकत तरी दाखवायचा सोबत अखेर तो तर शेतातल्या घरीच राहतो ना.
असे ही त्या राणासाठी जेवण बनवत्तानाच सकाळची संध्याकाळ होईल ईतके जेवण दाखविलेय त्याचे
मलापण खटकलं ते दोघंच गेलेत
मलापण खटकलं ते दोघंच गेलेत तेही हळदीच्या अंगाने.
काल शेतातल्या घराचं दार बरकतच उघडतो ना?? बर बरकत तिथेच राहतो तर घरात एवढी घाण कशी असते त्या?? कायच कळेना झालंय या सिरियलच.
मलापण आवडलं.. शेतावर मस्त
मलापण आवडलं.. शेतावर मस्त राहतिल की दोघे..
राणा वहिनी मागे जरा जास्तच.. म्हणजे आबांच्या शब्दाला काही महत्व नाही ..
लग्न छान दाखवलं पण..
राणाला हातात हात घ्यायला काय प्रॉब्लेम आहे?
शॉक बसल्यासारखा सोडवुन घेतो...
अंजलीला हात धरायला लावण्यापासुन सुरुवात करायची आहे..
दोघच गेले हे चुकिचच दाखवल..
दोघच गेले हे चुकिचच दाखवल.. बरकत तिथे राहताना नाही दाखवलेला.. घर नेहमी बंद आणि बरकत बाहेर कुठेतरी पडलेला दाखवलाय..
हो ना.....रानादा एव्ह्ढा
हो ना.....रानादा एव्ह्ढा गावात लोकप्रिय............एकही जण त्यांच्या सोबत येऊ नये? निदान बरकत..पोरं?
काहीही.......
आणि एव्हढ्या खंबिर आबाना कळंना व्हय की हे वहिनी बाईंचंच काहीतरी कारस्तान असनार ते?
.
राणाचे लग्न ठरल्यावर लगेच
राणाचे लग्न ठरल्यावर लगेच सांगण्याऐवजी आबा अगदी शेवटच्या दिवसापर्यंत का थांबले होते?>>>
अहो तवर हे सुचलं नव्हतं की लिव्हायला! आता भांडण दावायचं म्हनलं तर कारण हवं नव्हं! तवा एवढं चालवून घ्या की!
राणा म्हणतोय नव्हं चालतयं की!
मलापण खटकलं ते दोघंच गेलेत
मलापण खटकलं ते दोघंच गेलेत तेही हळदीच्या अंगाने.>>+१
घर तुटू नये म्हणून वेगळे व्हायचे....हे कसले logic?
मला वाटले कि बाकीचे सगळेच शेतावरच्या घरी जातील आणि तिकडची व्यवस्था लावतील. ईकडे वहिनीबाई एकटीत वाड्यावर चिडत असेल.
आता त्यांनी शेतामधे मस्त मोठे फार्म हाऊस बांधावे, आबा-गोदक्कांनी पण तिकडेच रहायला जावे. वहिनीच्या नाकावर टिच्चून!!
शेतावरच्या घरी पण कामाला माणसे ठेवता येतील, उगाच ते हसत हसत सगळी कामे करणे, सगळे सहन करणे अजिबात दाखवायला नको.
मला पण अंजली बाई आणी राणा
मला पण अंजली बाई आणी राणा एकटे रहाणार म्हणून बर वाटल...नाहीतरी वाड्या वर त्यांना एवढी प्राइवसी नसती मिळाली... जे होत ते चांगल्या साठी च.. मला वाटतय आता गोदाक्का पण शेतात शिफ्ट होतील...मगं हळू हळु सगळी नौकर माणसे..आणी मग शेवटी आबा पण डाइरेक्ट मुम्बई हून शेतावर च उतरतील.... वाड्या वर एकट्या वहिनी उरतील बहुतेक.. जुदाई सिनेमा....
चांगली चाम्ङली म्हणता म्हणता
चांगली चांगली म्हणता म्हणता माती खाल्लीच सिरेलीने
काय ह्ये रानादा...
काय ह्ये रानादा...
बडा घर पोकळ वासा...
स्मिता, अगं सिरियल तात्पुरतीच
स्मिता, अगं सिरियल तात्पुरतीच चांगली होती. हिरो-हिराॅइन एकमेकांना साजेसे नि गुणी कलाकार असल्याने.
पुढे जाऊन माती खाण्याचे फुल्ल चान्सेस आधीच क्लिअर होते स्टोरीत.
निधी...तुला एकुणातच झीच्या
निधी...तुला एकुणातच झीच्या मराठी सिरीयलल्स चांगल्याच 'घडलेल्या' दिसतात!
चिंचे
चिंचे
अगं मी एखादी सिरियल एका लिमिट पर्यंतच पाहते/पाहू शकते. नंतर त्यात काय घडणार हे ठरलेलं असतं, त्या वळणाने सिरियल जायला लागली की शहाण्यासारखं बघणं बंद करायचं.
(अपवाद- राखेचा, दिदोदु, 100 डेज आणि आता दिदोदो या मी नियमित बघितल्यात.)
Pages