Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळा वेडेपणा चालु आहे.. अस
सगळा वेडेपणा चालु आहे.. अस असतं का.. ति लहान मुलं तरी बरोबर ओळखतात सगळं
क्काय????? ७/१२ वगैरे प्रकार
क्काय????? ७/१२ वगैरे प्रकार दाखवलेत?!!!!!!! मी नेट वर आत्ताच ११२ वा भाग बघितला. त्यात तर शेवटी प्रीव्ह्यू मध्ये
त्यांनी दाखवलं, राणा पाठक बाईंना नीट लग्नाची मागणी घालतो. म्हटलं पुढचा भाग छान असेल. अजून नाहीच का..
बरं चाललय सध्या... पण पुढे
बरं चाललय सध्या... पण पुढे कोणतरी कट कारस्थानं करणार्या काका काकुंची एन्ट्रि दाखवलिय.. वर वहिनी साहेब आहेतच.. म्हणजे लग्न पार पडे पर्यंत जाम कटं असणार असं वाटतय.. गॅप घेउन बघाव आपलं
आत्ता पर्यंत राणा अंजली कडे आकर्षित झाला आहे असं वाटत होतं .. पण तो प्रेमात नसुन एक लग्नाची जबाबदारी पुर्ण करत आहे असं वाटत आहे....... म्हणजे त्याच प्रेम आहे / असेल पण नीट व्यक्त नाही होत आहे... म्हणजे प्रेमाळ्लेला नाही वाटत
अंजली मात्र प्रेमात वाटते
बघु पुढे
हो ना. त्या काका काकू ला का
हो ना. त्या काका काकू ला का उगीच एंट्री दिली.? वहिनी ला साथ कारस्थानं करण्यासाठी.. लग्न होईपर्यंत बरच पाणी ओतले जाईल आणि भाग वाढवतील..
चांगली चालली आहे मालिका म्हणता म्हणता ठराविक वळणे घेणार तर.!
झीला प्रेक्षकांपेक्षा,
झीला प्रेक्षकांपेक्षा, कलाकारांच्या पोटापाण्याची काळजी म्हणून नवीन नवीन कलाकारांच्या एन्ट्रीज होतात. कल्पेश झाला आता काका काकू.
राणा ला लग्न करून नन्तर
राणा ला लग्न करून नन्तर सन्यास घ्यायचा आहे, हे त्याने बाईना सान्गितलेच नाही अजून..
आनि राणा अन्गठेबहाद्दर आहे हे कधी कळणार बाईना , लग्न पत्रिका छापल्यावर की मुलाचा शाळेत दाखला घालताना ? झी वाले विसरले वाटते हे...
हल्ली ही सिरीयल रात्री
हल्ली ही सिरीयल रात्री साडेबाराला दाखवत नाहीत, त्यामुळे मला बघायला मिळत नाहीये. मध्ये कल्पेसमुळे मी बघत नव्हते.
राणा अन्गठेबहाद्दर आहे हे कधी
राणा अन्गठेबहाद्दर आहे हे कधी कळणार बाईना >>>ते बहुतेक वहिनीबाईंनी सांगण्यासाठी राखून ठेवले आहे वाटते. त्यांची अजून एक चाल !!
मध्ये कल्पेसमुळे मी बघत नव्हते.>>आता दोन नवीन पात्रे येऊ घातली आहेत. राणाचे काका-काकू म्हणून, अतिशय बोर आहेत ते...त्यांच्यापेक्षा कल्पेस बरा होता.
हम्म्म, चला म्हणजे नाही
हम्म्म, चला म्हणजे नाही बघायला मिळत ते बर आहे.
https://play.google.com/store
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.zeemarathi&hl=en
हे झी मराठी चं अॅप इन्स्टोल करा आणि बघा मालिका
मॅक्स आहे ओझी. पण मी आवडीने
मॅक्स आहे ओझी. पण मी आवडीने फक्त चु भु बघते. ती नाही बघता आली तर आवर्जून नेटवर बघते. बाकी नाही बघत्या आल्या तर मुद्दाम नेटवर नाही बघत, फार काही मिस होतंय असं वाटत नाही.
चांगले, साधे-सरळ असणे आणि
चांगले, साधे-सरळ असणे आणि बावळट असणे यात फरक असतो ना...
आपल्याला माणसांची पारख नाही, तर आपले बाबा म्हणतात ते ऐकायला नको का? अश्याने राणाचे पात्र अधिक बावळट होत जाईल.
नंदिता घरच्या मालमत्तेचा एव्हढा विचार करत असते पण 'या घरात आमचा पण वाटा आहे' असे म्हणणारा वाटेकरी तरी तिने घरात कसा येऊ दिला?
फारच डोक्यात जातात ते काका-काकू....अॅक्टींग-डायलॉग्स सगळेच बोरिंग आहे. आता या मालिकेला राम राम ठोकायला पाहिजे असे वाटत आहे.
काका काकू कोण दाखवलेत. ओळखीचे
काका काकू कोण दाखवलेत. ओळखीचे आहेत का?
अजिबात नाही. काकू मधेमधे
अजिबात नाही. काकू मधेमधे कन्नड बोलते. घंटा कळत नाही.
हो काका काकु जाम बोअर..
हो काका काकु जाम बोअर..
ऑनलाइन बघायच .. नको असलेलं पळवता येतं..काका काकु स्किप करुन बघितल मी..
काका काकु लग्नानंतर पळुन जाणार अस दिसतय .. तोपर्यंत वहिनी साहेबांबरोबर कारस्थानं असणार..
राणा अजुनही प्रेम म्हणजे काय ते माहित नाही असच म्हणत आहे..थोडं तरी कळतय असं दाखवायला हवं
हार्दिक जोशी (राणा) ची मुलाखत बघितली एबीपी वर छान आहे तो.. अॅक्टर म्हणुन तर ग्रेटच.
त्याच्या पर्सनल बॅक्ग्राउंड पेक्शा खुप वेगळं पात्र आहे.. आणि तो खुप छान वठवतोय..
अक्शया पण छान .... झी च्या सगळ्या नायिकांमधे ही नॅचरल कॉन्फिडंट वाटते
बाकी मला ते गाणं खुप आवडलं
बाकी मला ते गाणं खुप आवडलं आहे.. मन चिंब झालं जणु.. खुप मस्त वाटत ऐकताना
राणाच्या घरचे गेले का
राणाच्या घरचे गेले का बाईंच्या घरी लग्नाची बोल्णी करायला?
अतिशय बोर होतेय ही मालिका
अतिशय बोर होतेय ही मालिका सध्या. काय त्या काका ,काकू ना घुसवलय मालिकेत्, त्या राणाचा अति भोळेपणा, वहिनींची कारस्थानं...टिपीकल, रटाळ, बोरिंग.. आता नाही बघणार. ईथे येऊन वाचेन.
दोन दिवसांपूर्वी घरी आलेले
दोन दिवसांपूर्वी घरी आलेले सावत्र काकाकाकू मुलगी बघायला कसे काय जातात? पत्नीच्या मृत्यूनंतर गोदाक्काने राणाला लहानाचे मोठे केले म्हणुन राणाच्या वडिलांनी तो मान गोदाक्काला दिला असे दाखवता आले नसते का? सुरज आणि नंदिता तर राणापेक्षा वयाने लहान आहेत. म्हणजे ते दोघे अंजलीपेक्षाही वयाने लहान असतील. अंजली गायकवाड घराण्याची थोरली सुनबाई आणि नंदिता धाकटी सुनबाई असताना नंदिता अंजलीच्या घरी 'आम्हाला मुलगी पसंत आहे' असे कसे काय सांगते? राणा आणि अंजलीचे लग्न झाल्यावर नंदिता धाकटी सुनबाई म्हणुन थोरली सुनबाई असलेल्या अंजलीला 'अहो वाहिनीसाहेब' म्हणुनच हाक मारणार आहे ना?
मागेसुध्दा, अंजली शाळेत मुलांना पुर्ण मार्क देते त्यावेळी तो महाजन हेडसर वर्गात येऊन सगळया मुलांसमोर अंजलीला बोलतो. एखाद्या शिक्षकाला असे मुलांसमोर वर्गात न बोलता स्टाफरूम मध्ये जाऊन किंवा आपल्या खोलीत बोलावुन त्याची चूक समजावून द्यावी इतकी साधी अक्कल त्या हेड सरांना नाही का?
जाऊद्या ओ सारिका ताई..ईथे काय
जाऊद्या ओ सारिका ताई..ईथे काय बी लोजिकल नसतयं बघा. अवो मनून तर याला शिरेल मनतात नवं..
दोन दिवसांपूर्वी घरी आलेले
दोन दिवसांपूर्वी घरी आलेले सावत्र काकाकाकू मुलगी बघायला कसे काय जातात?
>> ते राणा ला गळ घालुन जातात..राणाचा वडिलानी त्याना घरातुनही बाहेर काढलेले असते पण राणाच त्याना घरात घेतो
पत्नीच्या मृत्यूनंतर गोदाक्काने राणाला लहानाचे मोठे केले म्हणुन राणाच्या वडिलांनी तो मान गोदाक्काला दिला असे दाखवता आले नसते का? >>> वडील त्यानाच घेउन जा म्हणत असतात पण नंदिता कडे पाहुन त्याच नको म्हणतात
काहीही शेंडा बुडुख नसलेली
काहीही शेंडा बुडुख नसलेली अजून एक मालिका ... झी कडे दर्जेदार कार्यक्रम नसतील तरी चॅनेल बंद करावे ताबडतोब
मला आवडला कालचा एपी.
मला आवडला कालचा एपी.
हो बरेचसे न पटणारे मुद्दे आहेत पण.... चालतयं की
कालचा शाळेत सोडण्याचा प्रसंग आणी तीच्या आईची घुसमट छान दाखवलीये
खुप निगेटिव्ह फक्त वहिनी आहे.
खुप निगेटिव्ह फक्त वहिनी आहे..
बाकी ओके आहे.. अगदी अशक्यप्राय नाही दाखवताहेत
नव्या अॅड मधे दाखवल की राणाचे बाबा म्हणतात मुलगी आणि नारळ घेणार..
राणा मधे पण थोडा बदल दाखवत आहेत थोडा ओपनली बोलतो आता अंजली शी..
हळुहळु बदल दाखवतिल.. सध्या तरी ओके आहे.. लग्न झाल्यावर काय दाखवतिल देवाला माहित
राणाचे बाबा म्हणतात मुलगी आणि
राणाचे बाबा म्हणतात मुलगी आणि नारळ घेणार.. >>>> बरे झाले असदाखवलेम,, नाहीतर ऊगाच कोपुकर बदनाम
तसेही हुंडा वगैरे प्रकारे ईकडे जास्त नाहीच आहे (निदान माझ्या माहीतीत तरी)
राणाचे बाबा म्हणतात मुलगी आणि
राणाचे बाबा म्हणतात मुलगी आणि नारळ घेणार.. >>>> नशीब. मला वाटलं गौराई च्या आईबाबासारखे कर्ज काढुन मागण्या पुर्ण करतात असं दाखवतात की काय
राणाचे बाबा म्हणतात मुलगी आणि
राणाचे बाबा म्हणतात मुलगी आणि नारळ घेणार.. >>> हे तर छानच पण नंदिनीला अंजलीच्या आई-बाबांनी 'आम्हाला जेव्हढे शक्य आहे तेव्हढेच आम्ही करु' असे स्पष्ट सांगताना सुद्धा दाखवायला पाहिजे होते.
तेच तेच ...मागणार्यांना लाज
तेच तेच ...मागणार्यांना लाज नाही आणि देता येत नाही म्हणून घाबरलेले आई-बाबा.... किती दिवस तेच दाखवणार आहेत हे टिव्हीवाले? तुमचा डामडौल तुम्हीच सांभाळा असे नाही सांगता येत का त्यांना?
आत्ताच फेसबुकवर राणा आणि
आत्ताच फेसबुकवर राणा आणि अंजलीच्या लग्नाची पत्रिका पाहिली. राणाच्या नावापुढे प्रगतशील शेतकरी असे लिहिले आहे. अंजलीच्या नावापुढे तिच्या डिग्र्या लिहिताना 12th Science, M.A. Economics, M.Phil, Phd (Education System) असे लिहिले आहे. इतकी शिकलेली मुलगी एका गावाकडच्या प्राथमिक/माध्यमिक शाळेत शिक्षिकेचे काम का करते? जर तिच्याकडे इतक्या डिग्र्या असतील तर तिला किमान त्या शाळेची मुख्याध्यापिका किंवा एखाद्या ज्युनियर/सिनियर कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणुन तरी दाखवायला पाहिजे होते. अंजलीवर सतत डिग्रीवाल्या बाई म्हणुन डाफरणारा तो महाजन हेडसर तरी इतके शिकलेला आहे का?
आमच्या वेळी शाळेत शिकवणारे शिक्षक बी.ए. किंवा एम. ए. बी. एड. केलेले असायचे. सध्या सिनियर कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल पदासाठी पीएचडी आवश्यक असते असे मागे वाचले होते. पण जर गावाकडच्या शाळेत शिकवणारी मुलगीसुध्दा इतकी शिकलेली असेल तर सध्या शिक्षणाचा दर्जा खुपच उंचावला आहे असे म्हणायला हरकत नाही.
बरोबर सारीका.
बरोबर सारीका.
Pages