Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरंच आताचे भाग बरेच कंटाळवाणे
खरंच आताचे भाग बरेच कंटाळवाणे चाललेत. यापेक्षा लग्ना आधीचेच भाग मस्त होते. कोल्हापूर मधलं दैनंदिन जीवन, राणा-अंजली ची हळू हळू फुलत जाणारी मैत्री, तेच बरं होतं. आता राणा गोठ्यामध्ये 'अंजलीच्या सुता तुला रामाचं वरदान' म्हणत बसलेला दाखवतायेत!! का-ही-ही
आता राणा गोठ्यामध्ये
आता राणा गोठ्यामध्ये 'अंजलीच्या सुता तुला रामाचं वरदान' म्हणत बसलेला दाखवतायेत!! का-ही-ही >>>>>
आवो, अंजनीच्या सुता ना
आवो, अंजनीच्या सुता ना
अंजलीला कधी व्हायचा सुत
हाहाहा खरंच की, चुकून
हाहाहा खरंच की, चुकून अंजलीच्या सुता लिव्हलं म्या.
अन बैलाच्या गोठ्यात जेवन?
अन बैलाच्या गोठ्यात जेवन? बरोबर एका बैलाबरोबर दुसर्या बैलाचं जेवण पण तिथेच
मिठ्या चं कळलं पण हे बिठ्या काय?
काय चाल्लय आमच्या राणादा आणि
काय चाल्लय आमच्या राणादा आणि वैनींच??
तुम्हा लोकांचं बोलणं झीने फार
तुम्हा लोकांचं बोलणं झीने फार मनावर घेतलंय
आधी बाम लावण्याचा प्रोमो होता आता लेटेस्ट प्रोमोत राणा बेडवर जाऊन झोपतो असं काहीतरी दिसतंय.
साबा आणि मुलीबरोबर हा शो बघायची सोय नाही आता. मुलीला हम्मा उर्फ साहेबराव असल्यामुळे शोत इंटरेस्ट, अन्यथा दुसर्या मालिकांत हम्मा नसतात.
अय्याव, बरीच मजल मारली की
अय्याव, बरीच मजल मारली की राणादाने. असोच. ते तेव्हड अतिभोळेपणाच काय ते झी ने पहाव एकदाच. त्यावरुन लोकांचे गैरसमज व्हायलेत हित.
बाकी दोघांनी एकमेकांच्या मानेला बाम लावायची जास्त गरज आहे इतक्यांदा माना वेळावतात दिवसातुन.
(No subject)
हळुहळु का होइना.. राणा
हळुहळु का होइना.. राणा सुधारतोय.. खुलतोय..
आता अंजली पासुन झटकन लांब पळुन जात नाही.. परवा पोहे खायला हात धरुन बसवत होता..
सिरियल मधे काहितरी घडत राहण्यासाठी वहिनी ठेवल्या आहेत..
अंजली ला त्यामुळे फार समजुतदार करुन टाकलं आहे.. ती ला असं नाही दाखवलं तर वहिनींचे डावं कशे दाखवणार..
बाकी दोघे खरच दिलेलं काम छान करतात..
अंजली तडफदार आहे.. गौरी मानसी टाइप ना या रोल मधे विचार पण करवत नाही...
लेटेस्ट एपिसोड गोग्गोड एकदम!
लेटेस्ट एपिसोड गोग्गोड एकदम!
राणा स्वीटहार्ट आहे एकदम. अंजली त्याला मारते तेव्हा मस्त एक्सप्रेशन दिलेत !
धाकट्या सुनबाईंचा पचका झालेला
धाकट्या सुनबाईंचा पचका झालेला बघायला, सासर्यांकडुन होतो तो जास्त करुन, फार मजा येते पण.
नंदिन किती बालिश खोड्या काढत
नंदिन किती बालिश खोड्या काढत असते
सासरे कशाला, अंजलीबाईंनी डोळे मोठे करुन जर सांगितले असते कि आता मला पेपर तपासताना जराही त्रास द्यायचा नाही हा, तर लगेच गप्प बसली असती
राणा चांगलाच गोड गोड वागतोय.
राणा चांगलाच गोड गोड वागतोय. उगाच घाबरुन पळत पण नाही..
बाई पण छान
बाईंच लाजणं .. हे लाजणं वाटतं
बाईंच लाजणं .. हे लाजणं वाटतं ..
फुकटचं गौरी सारखं खोटं खोटं इश्श म्हणायची गरज पडत नाही..
कुठे ती थंडाक्का अन् कुठे
कुठे ती थंडाक्का अन् कुठे आमच्या अंजलीबाई
तुलनाच होऊ शकत नाही.
कुठे ती थंडाक्का अन् कुठे
कुठे ती थंडाक्का अन् कुठे आमच्या अंजलीबाई (डोळ्यंत बदाम स्माईली)
तुलनाच होऊ शकत नाही. + १
कुठे ती थंडाक्का अन् कुठे
कुठे ती थंडाक्का अन् कुठे आमच्या अंजलीबाई
तुलनाच होऊ शकत नाही. +१
अंजलीबाई लई आवडत्यात बघा.. दिसणं, स्माईल, अभिनय.. छान एकदम.
हो ना...अंजलीची हुशारी जाणवते
हो ना...अंजलीची हुशारी जाणवते अगदी!
इव्हन रानादा ची पण.
थंडाक्का अगदीच माठ अभिनय करते. शनाया, अंजली अगदी गेला बाजार म्हाळसा सुद्धा.......कितीतरी उजव्या आहेत!
गवरी म्हणजे सानुनासिक स्वर, थंड भावहीन डोळे, मठ्ठ हावभाव यांचा वस्तुपाठच जणू!
कालचा भाग मस्त होता..
कालचा भाग मस्त होता..
राणा गोडं
बाई पण छानच
गवरी म्हणजे सानुनासिक स्वर,
गवरी म्हणजे सानुनासिक स्वर, थंड भावहीन डोळे, मठ्ठ हावभाव यांचा वस्तुपाठच जणू! >>>>> तरी झी मराठी च बेस्ट न्युकमर अवार्ड तिलाच मिळालं होत
कालच्या भागात राणाचे
कालच्या भागात राणाचे एक्सप्रेशन्स मस्त... पहिल्यांदा येवढं मनापासुन हसत होता बाईंकडे बघुन.. दोघं मस्त आहेत..
सन्नीदाच काम पण छान.. तो अभिनेता पण छान आहे ...
सन्नीदाच काम पण छान.. तो
सन्नीदाच काम पण छान.. तो अभिनेता पण छान आहे ... >>> त्याचे डोळे आणि त्याचे एक्सप्रेशन्स एकदम मस्त. हॅन्डसम आहे आणि चांगला अभिनेता पण. याला पुढे मागे अजुन जास्त काम मिळायला हरकत नाही. या सिरियलमधे तो मंत्र्याचा उडाणटप्पु मुलगा म्हणुन मस्त सुट झाला आहे.
सनिदा आणि गोदाक्का मधे मात्र
सनिदा आणि गोदाक्का मधे मात्र काही बॉन्डिन्ग दाखवल नाहिये फारस, सगळ्यान्चे अभिनय भारी, आबा तर लय भारी! आबान्ची आणि धाकल्या सुनबाइची जुगलबन्दी भारी असते.
स्टोरी मात्र फार स्लोपेस घेतायत, राणा इतका मन्द असु शकत्तो?
मस्त सुरु आहे सध्या . आता
मस्त सुरु आहे सध्या . आता राणादा पोतंभर पुस्तके भेट देणार
बाकीच्या सीरिअल्स भयंकर बोर आहेत सध्या . खरंतर नवीन बेस्ट नायिकेची ट्रॉफी अक्षयालाच मिळायला हवी होती .
अक्षया ? हि कोण ?
अक्षया ? हि कोण ?
अक्षया म्हणजे अंजलीचं रियल
अक्षया म्हणजे अंजलीचं रियल लाईफमधील नाव!
मजा चालू आहे सध्या मालिकेत. पुस्तकांचं प्रकरण मस्त घेतलंय.
अंजली फार सुरेख दिसत होती
अंजली फार सुरेख दिसत होती कविता म्हणताना ... फार छान... साडी ,मेकअप, हास्य, एक्स्प्रेशन ,हुषारी, स्वभावातील चांगुलपणा ,चुणचुणीतपणा.... फारच छान....
अवांतर.... हे मराठी मी डायरेक्ट येथे google indic keyboard ने टाईप केलंय... सगळं आहे यात... ऑटो टाईप पण येत सगळं... सही आहे एकदम... सोप्प...
अरे वा!!! शेवटी
अरे वा!!! शेवटी पुस्तकांपर्यंत राणादाची गाडी पोचली का! पण त्याच्या स्वतःच्या शिक्षणाचं काय झालं की नाही अजून???? त्यांचं लग्न झाल्यापासून वाट बघतेय, पाठकूबाई त्याला कधी एकदाचं साक्षर बनवतायेत. प्रौढ साक्षरता म्हणणार होते, पण जाऊदे म्हटलं सध्याच्या परिस्थितीत डब्बल मीनिंग होईल
सन्नीदा खरंच मस्त अभिनय करतो. नंदिनी सुद्धा. सगळेजण sincerely अभिनय करतात. पाट्या टाकत नाहीत.
म्हणून ही मालिका बघाविशी वाटते.
>>प्रौढ साक्षरता<<
>>प्रौढ साक्षरता<<
Pages