सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्या हिवाळी ऋतूचे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
काय क्युट आहे ही...वा..
काय क्युट आहे ही...वा..
सगळ्यांचे फोटो आणि माहीती
सगळ्यांचे फोटो आणि माहीती सुंदर.
चैत्रचाहूल
चैत्रचाहूल
पिंपळाच सारं सौंदर्य पानांच्या बहरात आणि त्यांच्या सळसळण्यात होतं. उन्हाळ्यानंतर निष्पर्ण पिंपळावर पिवळ्या रंगाच्या पानांच्या कळ्या येत. एके दिवशी त्या कळ्यांची आवरणं गळून पडत आणि सर्व फांद्यावर लाल-किरमिजी रंगाची कोवळी मुलायम पानं फुलतं. पिंपळाला या पान-फुलांवरच समाधान मानावं लागे. पण त्यातही केवढं अफाट सौंदर्य असे!! या पारदर्शक पान-फुलांची पोपटी पालवी होत असे. कालांतराने त्या नाजूक पानांची लांबसड्क, ताठ, हिरव्या रंगाची पानं होतं. उभी लोंबणारी पिंपळपान वार्यानें एकमेकांवर आपटुन होणारी सळसळ अस्वस्थ करणारी असे. मंद झुळुकीवर त्यांचा आवाज श्रावण-निर्झरासारखा वाटे, वार्यामध्ये तो धबधब्यासारखा वाटे, तर एखाद्या सोसाट्याच्या वादळात तो खवळलेल्या समुद्रासारखा वाटे.
(लेखकः श्रीकांत इंगळहळीकर - पुस्तकः "आसमंत")
सुंदर रंग!! जिप्सी हे फोटो
सुंदर रंग!! जिप्सी हे फोटो वेगवेगळे टाकले असतेस तर अजून छान दिसले असते. अजूनही टाक ना तसे, जमलं तर.
आमच्या घरातून पूर्वी आजुआबाजूची शेतं, झाडं दिसायची, कारणं तेव्हा खूप बिल्डिंगा झाल्या नव्हत्या. एक पिंपळाचं झाड नवीकोरी पानं लेवून उन्हामध्ये एकदा असं चमकत होतं की भर दिवसा त्याच्यावर खूप सारे काजवे बसले आहेत असा भास होत होता.
जिप्सी हे फोटो वेगवेगळे टाकले
जिप्सी हे फोटो वेगवेगळे टाकले असतेस तर अजून छान दिसले असते. अजूनही टाक ना तसे, जमलं तर.>>>>नक्कीच. हे घ्या
.
.
.
.
.
.
.
.
.
अहा!
अहा!
वा जिप्सी सुंदर फोटो.
वा जिप्सी सुंदर फोटो.
मी ही रोज पहाते पिंपळाची झाड ऑफिसला येताना. सध्या सुंदर कोवळी पाने फुटुन झाड सोनेरी रंगात चमकत आहेत.
मी ह्यावर्षी लिहीलेली सुरंगी आणि तिचे फोटो. http://www.maayboli.com/node/61985
छान फोटो जिप्स्या.
छान फोटो जिप्स्या.
माझ्या आजोळी जाळी पडलेल्या पिंपळपानावर काढलेले एक चित्र फ्रेम मधे आहे. आईकडे चौकशी केल्यावर कळले कि तिच्या मैत्रिणीने ते, माझ्या मोठ्या बहिणीच्या बारश्याला दिले होते... म्हणजे त्याला आता तब्बल ६३ वर्षे झाली !!!
जिप्स्या त्यातला २ नं चा फोटो
जिप्स्या त्यातला २ नं चा फोटो मस्तय. आमच्या समोरच एक पिपळाचे मोठे झाड आहे. त्याचे निष्पर्ण होणे व नंतर परत बहरण बघणे म्हणजे पर्वणी असते.
सद्ध्या घरासमोर असलेल्या
सद्ध्या घरासमोर असलेल्या पिंपळालासुद्धा पालवी फुटलीए...सोहळा...मस्त फोटो जिप्सी..
जागू, धागा वाचला गं...छान्च लिहिलयसं..
सर्वांचे फोटो मस्तच. सरीवा,
सर्वांचे फोटो मस्तच. सरीवा, फोटो दिसत नाही
फोटोसाठी मात्र क्रोमात जायला लागेल मला. >>>>>>>>..फक्त नि.ग. साठी मी क्रोमा. परत डा.लो. करून घेतलं.
जागू, सुरंगी मस्त. शांकलीच्या कृपेने ह्याच झाड पाहिलं पण प्रत्यक्ष फुलं नाही पहायला मिळाली. बघू कधी योग येतोय ते.
पुण्यातले जे निसर्गात फिरायला जात असतील त्यांनी जरा मलाही हाक मारत जा. मी पण येईन.
नारायण पेठ, पुणे : मोदी
नारायण पेठ, पुणे : मोदी गणपती मंदिरामागील दुरंगी बाभूळ, मस्त फुललेय. ज्यांना दर्शनाच लाभ घ्यायचा असेल, त्यांनी गणपतीचे दर्शन घेऊन, प्रदक्षिणा करावी, व गणपतीच्या बरोबर पाठीमागे गेल्यावर शेजारच्या झाडाचे दर्शन घ्यावे.
आता किती वेळ मला अशी पोज
आता किती वेळ मला अशी पोज घ्यायला लावणार आहेस?
जागू, तुझ्यावर फारच रागवलाय
जागू, तुझ्यावर फारच रागवलाय तो.
खराखुरा angry bird
खराखुरा angry bird
जिप्सी थँक्स रे.. छान दिसतायेत, किती बघावं किती नको असं होतंय.
शोभा१, दुरंगी बाभूळ? भारी दिसतंय की.
मस्त आहेत पिंपळाच्या पानाचे.
मस्त आहेत पिंपळाच्या पानाचे.
आमच्यकडच्या चिनी चॅनेलवर एका
आमच्यकडच्या चिनी चॅनेलवर एका नदीबद्दल माहितीपट दाखवत होते.
त्या नदीच्या किनारी, मोगरा ( हो फुलांचा मोगरा पण तिथे चहासाठी वापरतात.) चक्रीफूल, लिची, दालचिनी आणि चंदन यांची शेती केली जाते.
दालचिनी आपल्याकडे मिळते ( खरे तर आपल्याकडे मिळते, ती पण खरी नसते ) तशी नसून आकाराने बरीच मोठी आणि जाड होती.
पण मला जरा नवल वाटले ते चंदनाचे. माझा असा समज होता, कि चंदनाचे झाड चांगले ५०/६० वर्षांचे झाल्याशिवाय त्याचा गाभा सुगंधी होत नाही.
तिथले चंदन जरा वेगळे दिसत होते. पाने जरा वेगळी होती. आणि ते बहुदा २/३ वर्षात तयार होत होते. बुंधा फार जाड नव्हता पण सुगंधी
असावा असे दिसत होते. तिथेही त्या लाकडाचा उपयोग, कोरीव काम आणि उदबत्ती साठी करताना दिसत होते.
पण ते झाडही परजीवीच होते. त्या झाडाला बळी म्हणून कोथिंबीरीसारख्या काही झाडांची लागवड केलेली दिसत होती.
त्याशिवाय तो शेतकरी सांगत होता ( निवेदन मँडरीन मधेच असते पण सब टायटल्स इंग्लिश मधे होती ) कि ती झाडे त्यांनी परदेशातून
आणली होती ( भारताचे नाव घेतले नाही )
चक्रीफूलासाठी मात्र त्या शेतकर्याने भारतातील बाजारपेठेचा उल्लेख केला.
असे कार्यक्रम मला फार आवडतात. एकतर चित्रीकरण फार सुरेख असते आणि शेतकरी, त्याचे कष्ट आणि प्रश्न थेट आपल्या सारखेच असतात.
नारायण पेठ, पुणे : मोदी गणपती
नारायण पेठ, पुणे : मोदी गणपती मंदिरामागील दुरंगी बाभूळ, मस्त फुललेय >>> ओहह. नणंदेला कळवते, बघायला सांगते. ती अगदी जवळ रहाते तिथे.
दिनेशदा छान माहीती, मलापण आवडतात असे प्रोग्रॅम बघायला.
बाकी आधीचे काही फोटो बघण्यासाठी क्रोमात जायला लागेल.
नणंदेला कळवते, बघायला सांगते.
नणंदेला कळवते, बघायला सांगते. ती अगदी जवळ रहाते तिथे.>>>>>>...अंजू, तिला व्हि.डी.ओ. शुटींग करायला सांग. छान दिसतील फुले.
बाकी आधीचे काही फोटो बघण्यासाठी क्रोमात जायला लागेल.>>>>>>>>>आधीच क्रोमातून का येत नाही?
सवय झालीय आय इ ची.
सवय झालीय आय इ ची.
प्रत्येक देशात काही वेगळा
प्रत्येक देशात काही वेगळा रानमेवा असतोच. अंगोलातला हा. याचे स्थानिक नाव माझ्या लक्षात रहात नाही.
मी याला वेलचीच म्हणतो. पण आकाराने मात्र साधारण ५ सेमी लांब व दोन सेमी रुंद असते. आकारही तसाच त्रिकोणी
लांबूळका. पण आपल्या हिरव्या किंवा मसाला वेलचीला जश्या तीन धारा असतात ( त्या धारांवर ती वेलची सोलता येते )
तसे हिचे नसते. साल सहज सोलले जात नाही.
मी श्रीलंकेला ओली वेलची खाल्ली होती, त्यामूळे खात्रीने सांगू शकतो, कि हिची चव तशीच असते ( सोललेल्या
वेलचीची पण तशीच असते, पण यात जो पांढरा गर दिसतो तो अगदी सुकून गेलेला असतो.)
हा प्रकार सुपरमार्केट मधे क्वचितच असतो, त्यामूळे माझ्या सहकार्यापैकी कुणी मला आणून दिला तरच
( रस्त्याच्या कडेला किंवा स्थानिक बाजारात विकयला असते )
या सोबत मीठ मिरचीची झणझणीत चवीची पुडी मिळते.
सालीच्या आत अशी असते
हा आणखी जवळून फोटो
चिमटीने थोडासा गर आणि एखादी बी काढायची आणि त्याला मीठ मिरची लावून चघळत खायची..
अंगोलाची आणखी एक खासियत
अंगोलाची आणखी एक खासियत म्हणजे.. पॅशन फ्रुट.. फोटोतून नेमकी कल्पना येणार नाही पण ही फळे लांबीला
१० ते १२ सेमी आणि रुंदीला ८ ते १० सेमी आहेत.
आतला गर असा असतो.
असाच खाल्ला तर याची चव खुपच आंबट असते. म्हणून साखर घालून खावे लागते. इतर फळांसोबत किंवा आईसक्रिम सोबत छान लागते. याचे सरबत तर अप्रतिम लागते ( अगदी नावाला साजेसे ) या स्वादाचे वर्णन
करणे कठीण आहे पण साधारणपणे आंबा, अननस आणि मोसंबी यांच्या एकत्रित स्वादासारखे लागते.
हे आहे पॅसिफ्लोरा म्हणजेच कृषकमळाच्या कूळातले. याची फुले तशीच पण रंगाने पांढरी आणि निळी असतात.
इथे हा वेल खुप माजतो. कुंपणावर किंवा एखद्या मांडवावर सोडतात. एखाद्या लहान झुडूपावर सोडला तर त्या झुडूपाचा बळी घेतो हा वेल.
वॉव भारी फोटो आणि माहीतीही
वॉव भारी फोटो आणि माहीतीही छान.
आज मला इथे या शेंगा मिळाल्या
आज मला इथे या शेंगा मिळाल्या. स्थानिक नाव नसावे कारण या चिनी दुकानात मिळाल्या, पण इथल्याच शेतातल्या आहेत. इथे सगळ्याच शेंगाना फेजँव असा शब्द वापरतात.
शेंगांना किंचीत जांभळी कडा..
आतले दाणेही असे नक्षीदार ...
आणि माझी भाजी भाकरी...
ही दुरंगी बाभूळ लब्बाड असते..
ही दुरंगी बाभूळ लब्बाड असते.. यातला गुलाबी भाग रात्री पांढरा होतो.. आता म्हणाल लबाडी कसली.. तर दिवसांच्या किटकांना आकर्षित करण्यासाठी गुलाबी आणि रात्रीच्या किटकांना आकर्षित करण्यासाठी पांढरा रंग धारण करते ती. हा पांढरा रंग, रात्रीच्या अंधारात किंचीत चमकतोही !
ओहोहो, का आले इथे, भूक लागली.
ओहोहो, का आले इथे, भूक लागली. काय सुंदर पदार्थ एकेक आणि डिशपण सुंदर.
फेजँव ह्या नावाचं काहीतरी असंच गोवा साईडला मिळतं का, नाव वाचल्यासारखं वाटतं. उसळंच करतात बहुतेक त्याची. मी मात्र बघितलं नाही कधी. भारी आहेत शेंगा.
दुरंगी बाभुळची माहत्ती छानच
दुरंगी बाभुळची माहत्ती छानच दिनेशदा.
काल गोविंद फुलासारखीच छोटी फुले पाहीली. झुडूप गोविंद्फुलाचेच पण त्यातही जाती असाव्यात.
दिनेशदा, शेंगा पाहून
दिनेशदा, शेंगा पाहून आपल्याकडे मिळणार्या सुरती पापडीची आठवण येतेय (उंधीयोसाठी खास आणल्या जातात)
अन्जू, पोर्तुगीज भाषेत
अन्जू, पोर्तुगीज भाषेत कडधान्यासाठी हा शब्द वापरतात.. अर्थात गोव्यातही !
सिग्धा, मी पण त्याच हेतूने आणल्या होत्या, पण साली जाड होत्या !
ह्याच नाव काय? ह्याला पैशाच
ह्याच नाव काय? ह्याला पैशाच झाड म्हणतात का?
१)
२)
३)
Pages