निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टिनाबाय फटु कुठं हाय??

बाकी सगळे फोटो माहिती मस्त आहे. आमच्याकडली काटेसावरही मस्त फुलली आहे. ह्या दिवसात काही दिवस रोझी स्टर्लिंग (साळुंकीची जातभाई) येतात. ज्या झाडावर बसतात तिथे कलकलाट चाललेला असतो. अगदी सैराटमधल्या पक्षांच्या थव्यासारखे द्रुष्य नसले तरी २०-२५ रोझी एकत्र थव्याने उडताना छान दिसतात...

निसर्गप्रेमी मंडळींनो मला थोडी मदत हवी आहे, कराल का?
लेकीच्या शाळेत येत्या १४ तारखेला एक छोटे रोपटे आणायला सांगितले आहे. म्हणजे घरात एका छोट्या कुंडीत एखादे बी रोवून त्याची जोपासना करुन त्याचे जे रोप तयार होईल ते घेऊन येण्यास सांगितले आहे. तर १२-१३ दिवसात कोणते रोप तयार होईल? मी याबाबतीत पुर्णपणे ढ आहे त्यामुळे जरा सविस्तर माहिती द्या. कोणते बी आणु? खाद कोणता वापरु? कुंडी मातीची आणु का प्लॅस्टीकची?, माती कोणती वापरु? अजुन काही सुचना असतील तर त्यापण सांगा. लेक पहिलीला आहे त्यामुळे तिला ने-आणण्यास जमेल असे सुचवा.
तयार रोपे मिळतातच पण मग ती चिटींग होईल आणि घरी लेकीच्या मदतीने केले तर शाळेत विचारल्यास ती नीट माहितीसुद्धा सांगु शकेल.

पलोमा आहा! काय सुरेख फुललाय अनंत!!! Happy
टीना व्हाईट शेव्हींग ब्रश चे फोटो दे की!
जिप्सी दापोली प्र.ची खुप सुरेख!!
मानसी ताई मस्तच!!

गोव्याकडे 'समई' म्हणतात. शस्त्रीय नाव Clerodendrum paniculatum
पॅगोडा फ्लॉवर>> यावर हमखास सनबर्ड येतात.

पण तो काळा नाही तर पूर्ण मातकट पिवळा होता..बाकी डिट्टो साळूंकी..कोण असावा बरे?>>
टीना त्या पक्षाचा फोटो असल्यास सांगता येईल कुठला होता ते.

मस्त फोटो!
जिप्स्या, नको रे असे फोटो दाखवू . Sad

देवकि, मस्त फोटो.

निल्सन.. अगदी हमखास तयार होईल असे रोप म्हणजे मोहरी. घरातली टप्पोरी मोहरी घ्या. मातीचे काही लाड नाहीत, साधी माती चालेल, खत वगैरे घालायची गरज नाही. कुंडी देखील बाहेरून आणायला नको. घरचा एखादा रिकामा डबा घ्या. त्याला तळाशी भोके पाडा. त्यावर विटांचे तूकडे, नारळाच्या शेंड्या असे पसरा. मग त्यावर साधी माती टाका आणि मोहरी पेरा, पाणी द्या. ३/४ दिवसात उगवेल.

तसेच हमखास उगवणारे घरातील कडधान्य, मूग, मटकी, चणे, शेंगदाणे वगैरे.

जिप्स्या Happy

अगदी सैराटमधल्या पक्षांच्या थव्यासारखे द्रुष्य नसले तरी २०-२५ रोझी एकत्र थव्याने उडताना छान दिसतात...>> मागच्या वर्षी मी भिगवणला याचा काही हजाराचा थवा बघीतला होता. अशक्य सुंदर.

Kay he dineshada mi pan hech lihit hote pan mobile varun kathin hotey.te photo whatsappvarache ahet ho.
Nilson methidane pan maat disatil

दिनेशदा, मोहरीबद्दल मला माहित होते, दिवाळीर किल्ले बांधायचो त्यावर टाकयचो म्हणुन Happy लेकीला सांगितले तर ती बोलते एकच रोप पाहिजे only one baby plant Proud आता शाळेत नक्की काय सांगितलय काय माहिती Lol
कडधान्य पेरुन बघते आणि सेफ साईड मोहरी आणि मेथीदाणे दुसर्‍या डब्ब्यात पेरते. धन्यवाद दिनेशदा आणि देवकीताई.

निल्सन - वर्गातली ८० -९० टक्के मुलं मोहरी किंवा मेथी आणतील बहुतेक Happy वेगळं काही हवं असेल तर

गहू, अळीव, , तुळशीच्या बिया, गुलबक्षीच्या बिया , भरडलेले धणे, कलौंजी हमखास उगवतील. नर्सरीतून आणायला जमणार असेल तर मुळा, पालक, भोपळा, चार्ड यांच्या बिया पण पटकन उगवतात.

बी पेरूनच उगवलेले अशी अट नसेल तर गाजर - वरची अर्धा इंच चकती पाण्यात ठेवून , लसणीच्या पाकळ्या पेरून पण रोप तयार करु शकता.

जे काही पेराल त्यात मुलांना इन्व्हॉल्व्ह करा आणि रोजच्या रोज रोपाची काय प्रगती होते त्याचं निरीक्षण करायला लावा.

>>>>मागच्या वर्षी मी भिगवणला याचा काही हजाराचा थवा बघीतला होता. अशक्य सुंदर.>>>> लक्की!!!

http://www.msn.com/en-us/lifestyle/smart-living/the-rarest-things-found-...
ंMSN होमपेज वर वरील लिंक सापडली. काय मस्त मस्त फोटो आहेत. त्यातील चायनिज लँटर्न बघितल्यावर इथेच कुणीतरी असाच फोटो ५-६ पान आधी टाकलेला आठवला...
शितोकू जपानमधला झगमगणार्या मशरूम पाहील्यावर अवतार सिनेमातले सीन अगदिच अशक्य नाहीत वाटले Happy
आणि मालदिवचे चमकणारे किनारे हल्ली गेले काही वर्षे जुहु, मुम्बईला सुद्धा दिसतात... मी नाही पाहिलेय, पण गेल्या वर्षी पेपरात फोटो आलेला.

लदिवचे चमकणारे किनारे हल्ली गेले काही वर्षे जुहु, मुम्बईला सुद्धा दिसतात>> या वर्षी गुहागर भागात दिसले. यावर्षी अंबोलीमधली फ्लुरसंट अल्गी पण बघीतली.

हाच तो व्हाईट शेविंग ब्रश.. साध्या डीजी कॅमच्या 4X झुममुळे त्या उंच वृक्षावरील फुले मला तितकिशी स्पष्ट टिपता आली नाहीए तरी इथे देते..
.

टीना आणि सायू, तुम्ही दोघी आता छान फोटो काढायला शिकला आहात. एखादा बेसिक कॅमेरा घ्या आणि प्रॅक्टीस करायला सुरवात करा.

सायु, सोनसावर खरच सोन्याची दिस्ते आहे. खूप सुंदर.
टीना, व्हाईट शेविंग ब्रश तू जवळून बघितलास, लकी यू.
टीनाने मागे लाल झुंबर्=ब्राउनिया म्हणून फुलाचे फोटो टाकले होते. मी brownia ट्री म्हणून गूगल्वर शोधलं पण नाही सापडलं. प्लीज स्पेलिंग सांगा.
सरिवांनी ते गुलाबी फूल टाकलंय ना, ते कशाचं आहे ? वेगळंच आहे.

वॉव काय बहरलाय धागा. सगळ्यांचे फोटो अफलातून.

कोकीळाबाईंनी पदर धरलाय लाजायला. इश्य बाई

टीना आणि सायू, तुम्ही दोघी आता छान फोटो काढायला शिकला आहात. +++ दा ही खुप मोठी कॉम्प्लीमेंट आहे माझ्या साठ Happy ___ /\___
नक्की प्रयत्न करेन.:)

मानसी ताई, सुलक्षणा धन्स..

सोन सावर पहिल्यांदा नि.ग वरच पाहिली/ वाचली.. आज प्रत्यक्ष बघायला मिळाली.. खुप आनंद झाला..
अगदी सोन्या सारखा झळझळीत रंग होता फुलांचा Happy

जागु क्लास फोटो..

Pages