निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुलछडी छान्च देवकी...

Sad वर्षू,
मी उद्याच एम्रेस गार्डन मधे सक्युलंट साठी चक्कर टाकायच्या विचारात होते..
इथे पुण्यात कुठे मिळेल या प्रश्नाला कुणीच उत्तर दिले नाही बघ माझ्या Sad

आमच्यकडे म्हणजे अंगोलामधे सर्वत्र रेतीच आहे, तरी ती फार सुपीक आहे. इथे स्थानिक लोक फारसे शेती करत नाहीत, पण चिनी लोक मात्र खुप भाज्या पिकवतात.
गेली २ वर्षे इथे कोथिंबीर पण मुबलक दिसायला लागली आहे, काल जरा वेगळा प्रकार दिसला कोथिंबीरीचा.
याला फारसे देठ नव्हते, थेट जमीनीपासूनच दाट पाने होती..

Kobee4.JPG

गेल्या आठवड्यात, एका संध्याकाळी शुक्र फार तेजस्वी दिसत होता. त्याचे फोटो...

१)

Shukra1.JPG

२)

Shukra2.JPG

३)

Shukra3.JPG

४)

Shukra4.JPG

५)
Shukra6.JPG

दिनेशदा सॉलीड फोटो .

बाकी सर्व फोटो पण छानंच.

काल अनेक महीन्यांनी बदलापूर पाईपलाईन रोडला फिरायला गेलो होतो. गिरीपुष्प नव्हता अजिबात, फुलुन गेला होता बहुतेक त्यामुळे बघता नाही आला. रेन ट्री, शाल्मली मात्र फुललेत. आय मिस्ड गिरीपुष्प. यावेळी गरमी खूपंच आहे. माझी एप्रिलमधे येणारी लिली फेब एन्डला आली होती.

सायु फोटो वर्षूने टाकलेत, मी नाही Happy
दा, पहिला फोटो बघूनच वाटलं, हा नकी दिनेशदांचा Happy जांभळा कोबी सुंदर दिसतोय. टेस्ट कशी होती?
अन्जू, या वर्षीचा उन्हाळा जगभरच खूप गरम असणार आहे असं (नेहमीसारखंच :P) प्रेडिक्शन आहे ना.

मस्तच फोटो दिदा..
हि कोबी नाही खाल्ली मी कधी...कशी लागते?
शुक्र असणारा पहिला फोटो खुप आवडला...

परवा मी शांकली(अंजली) आणि शशांक पुरंदरे या द्वयींबरोबर सिंहगडाच्या मागील बाजुस असलेल्या कोंढणापूर(?) गावाबाजुला फिरुन आली..
कात्रज घाटातुन मग तिकडे वळलो... मन तृप्त झालं..

पांगारा,
वारस,
मेडशिंगी,
खडशिंगी,
दातपाडी उर्फ रामेठा,
रानकुंद असे सारे हात लावता येईल या उंचीवर भेटले आणि सार्‍यांच्या फुलांना आंजारता गोंजारता आलं..

याबरोबरच जॅकरांदा,
गुलाबी कॅशिया,
जांभुळाचं फ्लॉवरींग,
सोनसावरीचे फळं,
मोवईचे फुलं फळं,
सिल्वर ओकचं फ्लॉवरींग,
शिरीष वृक्षाचं पांढर हिरवं पफ असलेलं फ्लॉवरींग,
पुत्रंजीवी वृक्ष आणि काही न ओळखता आलेले वृक्ष अन झुडुपं दिसले..

सोबतीला कोतवाल,
टकाचोर,
भोरड्या(रानचिमणी),
बुलबुल,
सनबर्ड्स,
निखारी (रेड मिनीवेट),
ताडपाकोळी (एशियन पाम स्विट),
दयाळ असे भरपुर पक्षी सुद्धा दिसले..

थोडक्यात मज्जा आली Happy

काळ हनुमान टेकडीवर गेली होती तेव्हा तेथे शिसव आणि पुर्ण फुललेला पाचुंदा भेटला..

हा लाल कोबी, जरा करकरीत लागतो. शिजवला तर जांभळा होतो, आणि त्यावर लिंबू पिळला कि परत लाल होतो. शिजवला कि चवीला किंचीत गोडसर लागतो.

मेढशिंगीची फुलं..
.

.
.
पांगारा..
.

.
.
याच नाव कळू शकलं नाही..फुलं आणि फळांचा फोटो देते..
.

.
.

टीना, lucky you Happy Happy पांगारा मस्त फ्लुरोसंट नेलपेंट लावून तयार झालाय(झाली?).
फोटो जेवढे उपलब्ध असतील ते सगळे टाकलेस तर लय बेस होईल.

शांकलीच्या मोबाईल मधे काढलेत अगं फोटो जास्त..तिने पाठवले खरे पण मला लॅपटॉप मधे घेता येत नाहीए..मोबाईल कनेक्ट होईना म्हणुन नाही टाकले सारे..

दिनेशदा, निसर्गचित्रे मस्तच..

<<<पहिला फोटो बघूनच वाटलं, हा नकी दिनेशदांचा Happy >>> +११११११ ........अगदी मला पण असेच वाटले....

तशी सर्वांकडुनच निसर्गाची उधळण मस्तच होते...

निसर्गाच्या गप्पा हा धागा बघुन मन अगदी तसंच हिरवंगार... टवटवीत होतं...

सरिव,टीना,मस्त फोटो.शिरीष कसा दिसतो हे तुमच्यामुळे कळले.

सिल्वर ओकचं फ्लॉवरींग,

पुत्रंजीवी वृक्ष आणि काही न ओळखता आलेले वृक्ष अन झुडुपं दिसले.. >>>> फोटो टाक ना टीना.

Pages