निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर पैशाचे झाड. Happy लहान्पणी हे गोळा करुन यात असलेल्या बदामासारख्या (खरतर चारोळीसारख्या) बिया कैकवेळा खाल्ल्या आहेत.

अरे वा बिया पण खातात होय! हे झाड मला मुंबई-गोवा हायवेच्या गो ग्रिन नर्सरीच्या बाहेर दिसल.

मला क्रोममध्ये जाता येत नाहीये त्यामुळे बरेचसे फोटो बघता येत नाहीयेत Sad

पिंपळाची पालवी, दुरंगी बाभूळ हे फोटो दिसले - मस्तच आहेत ते! माझ्याकडे पिंपळाचं छोटं रोप आहे - जेमतेम वर्षभराचं असेल. त्याचीही पानं झडली होती - आणि मी नेमकी गावाला गेले होते. झाड मेलं का काय म्हणून मी काळजीमध्ये होते, तर आता मस्त नवी पालवी येते आहे त्याला! दुरंगी बाभूळ पर्वतीवर बघितली आहे.

मी नेहेमी फिरायला जाते त्या टेकडीवर मोहाचं झाड फुललंय! इथे फोटो देता येत नाहीये - मोबाईलचा असहकार आहे त्यामुळे फोटो धड अपलोड होत नाहीयेत सद्ध्या. त्यामुळे http://mokale-aakash.blogspot.in/2017/03/blog-post_19.html इथे बघा फोटो. (तिथेही फोटो छोटाच दिसतोय.)

अन्जू, पोर्तुगीज भाषेत कडधान्यासाठी हा शब्द वापरतात.. अर्थात गोव्यातही >>> हो दिनेशदा आलं माझ्या लक्षात जरा उशिरा, पण कमेंट एडीट नाही केली मी. दुरंगी बाभुळची छानच माहीती.

बाकी फोटो क्रोमात जाईन तेव्हा बघेन जागूचे.

पिंपळाच्या फळांना पिंपरणी म्हणतात ना ? पक्ष्यांची झुंबड उडते त्यावर. मी खाऊन बघितलीत ती फळं, काहीच चव नसते त्यांना. वडाची निदान गोडसर तरी लागतात.

Foto varun vavla vatatoy g.

Dinesh, bhendichya jhadala pimparani mhantat ase dinesh walke yanchi comment vachli. Pimpalachya pana sarakhi mhanun pimparani. Ficus lacor la sanskrutat plaksh aani marathit pimparani mhantat hehi tithech vachle. Nakki kuthle khare sangane kathin.

म्हणून लॅटीन नावे हवीत कारण त्याच भेडींच्या झाडाला पारस पिंपळ पण म्हणतात, असे वाचल्याचे आठवतेय.. पिंपळाच्या फळांना काहीतरी खास शब्द आहे नक्की, आठवत नाही आता नेमका.

त्या भेंडीच्या झाडांची फळे आम्ही शाळेत एकमेकांच्या डोक्यात मारत असू. टणकन लागतात. आणि ती फुटली कि आत घट्ट पिवळा द्रव निघायचा.
आता ती झाडे पण कमी दिसायला लागलीत.

जिप्स्या सुंदर फोटो.

दिनेशदा आमच्याकडे आहेत भेंडीची बरीच झाडे. माझ्याच एरीयात तिन आहेत.

अदिजो मंकी बिस्कीट्स नाव पण मस्त आहे.

हे नाईट हेरॉन आमच्या पाठीमागच्या करंजाच्या झाडावर कायम असतात. वस्तीच आहे त्यांची तिथे. पण ह्यांना कधीही पाहीले की फक्त झाडावर असतात. काही विशेष हालचाल दिसत नाही ह्यांच्यात इतर पक्षांसारखी.
१)

२)

अहो अन्जुताय क्रोमात फेरी मारा जरा, कित्ती तो आळशीपणा. बरेच फोटो बघायचे राहिलेत>>>>>>>>>.ह्या अंजूताय कोन हो? Proud

अग, मी पण फक्त निग आणि इतर लेखातले न दिसणारे फोटो ह्यासाठीच क्रोम उघडते. मला आग्कोल्ह्याची ची सवय आहे. Happy

निल्सन, शेवटी कुठले रोप दिले मुलीच्या शाळेत ?>> हो पुढे काय झालं?

गोव्यातील आरामबोल बीच वर पाणी साचुन तयार झालेलं गोड्या पाण्याच तळं...
.

Pages