निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम. खूपच देखणा वेल आहे हा. इकडे थोडा शोध घेऊन बघितला तर कुंडीत standard specimen म्हणून पण लावता येतो म्हणे. म्हणजे उंची फारशी वाढू द्यायची नाही आणि लॉलीपॉप शेप मध्ये कापणी करत रहायची. तुमने ये फोटो डालके मेरेको नया भूत लगाया. कुछ करना पडेगा...

करो करो...
आउर इधर आठवणीसे फटू डालना..

एक समस्या का प्रश्न म्हणु? .. प्रश्नच म्हणु...
पुण्यात सक्युलंट कुठल्या नर्सरीमधे मिळणार?
कितीचे असतात?
मी शनिवार पेठेत राहते त्यामुळे जवळ्पासचा पत्ता असल्यास सोने पे सुहागा..

नव्या मायबोलीत गेल्या १-२ दिवसात तुम्हाला काही त्रास जाणवतो आहे का? गेल्या काही दिवसात laptop वरून IE किवा क्रोम दोन्हीमध्ये मायबोली बघताना अशक्य होतेय. क्रोम जरा तरी बरा, IE तर पुरे मशीनच हंग होते. Sad

मला फक्त फोटो बघताना कधी दिसतात तर कधी नाही..
आणि नविन विपू केली कुणी कि आधी विपूच्या बाजुला कंसात १ २ अस दिसणं बंद झालयं..

हो देवकी..
रेन ट्रीच तो...सद्ध्या बहारात आहे मस्त.. पफ असणारी पांढरी गुलाबी फुले..पण खाळी कचरा खुप पडतो याचा..
आणि हा वृक्ष भारतीय नाही हे मला इथेच कळले..पण तरी आवडतो मला याचा ऐसपैस विस्तार...
खरतर ऐसपैस विस्तार असणारी सारीच झाडं आवडतात..मग तो वड. पिंपळ असो, पर्यन्यवृक्ष, आताशा गोरखचिंच, आपली चिंच किंवा बांबुची जाळी असो...मस्त वाटत त्यांच्या सहवासात.. आज्जी आजोबांच्या उबदार पण थंड अशा सावलीत बसल्यासारखं... या सार्‍यांमधे वडाची सर मात्र कुणालाच नाही हं..तो सर्वात फेवरेट..

आणि देवकी तू पहिले टाकलेले फोटो गिरीपुष्पाचे नाहीए बरं का..
तो तबेबुया आहे असं वाटयत मला फोटोत तरी...
हि अशी काहिशी फुलं असतील ना त्याची..
.
Image result for tabebuia flowers

देवकी तू भाभा अ‍ॅटोमिक सेंटर परिसरात राहते?

सॉरी लोक तीन तीन कमेंटसाठी..
चाबी विसरली,
हेल्मेट विसरली,
स्टोल राहिला,
मोबाईल राहिला म्हणुन ३ ४ चक्कर परत परत मारायची सवय आहे मला.. Proud

हि अशी काहिशी फुलं असतील ना त्याची..>>>>>>>> हो अशीच काहीशी आहेत.पान १६ वर असलेल्या प्रचिप्रमाणे गुच्छ नाही पाहिले.डोळे असून नसल्यासारखे झाले बघ.
रेन ट्री या दिवसात मस्त तकतकीत दिसतो.ते झाड इकडचे नाही,पण मलाही ते आवडते.२ हातांनी आभाळ पेलावे तसा काहीसा विस्तार असतो त्याचा.काही वर्षांपूर्वी चेंबूरच्या सांडूवाडी स्टॉपवर मी दुपारी उभी होते.पण अजिबात उन्हाचा लवलेश नाही.एका बाजूच्या या झाडाच्या फांद्या रस्त्याच्या दुसर्‍या बाजूपर्यंत पसरलेल्या.एकदम मस्त वाटत होते.

>>टीना हया zaadaache नाव काय?रेन ट्री ना>>
देवकी, याची फुलं गुलाबी वाटत नाहीयेत. पांढरीच वाटत आहेत.
नक्की कशी आहेत?
पांढरी, पोपटीसर असतील तर तो शिरीष आहे. त्या फुलांना वासही असेल. आत्ता शिरीष फुलले आहेत.

, याची फुलं गुलाबी वाटत नाहीयेत. पांढरीच वाटत आहेत.
नक्की कशी आहेत? .....गुलाबी आहेत. खाली टोकाकडे पांढरी आहेत.
वरषऊ,फोटो मस्त आहे.

गुलाबी आहेत. खाली टोकाकडे पांढरी आहेत.>> मग पर्जन्यवृक्षच असणार..
तसपन त्या झाडाच्या ढाचावरुन तोच वाटतोय..

तामण आणि पळसोबा छानच..

वर्षू, मस्तच फोटो..
मी काल विपू केली होती तुला...

हो महाराष्ट्राचे राज्य फुल ताम्हण पण फुलले आहे बंगलोरला ! अजून १ फुल पहिले इथे जवळ च बागे मध्ये पण नाव नाही माहित ....
image_0.jpg

Aha

आमोदी, हे Malvaceae कुळातले फूल आहे- म्हणजे जास्वंदीचा भाऊबन्द. abutilon जातीचे. स्थानिक नाव बहुदा पेटारी.
फोटोत याची फळेही दिसत आहेत. बिया तयार होतात, तेव्हा या फळाचे कप्पे वरच्या बाजूने उकलतात. वार्‍याबरोबर फांद्या डोलतात त्यावेळी आतल्या बिया उधळल्या जातात.

वर्षू,
सक्युलंट..वॉव..कुठ मिळाले?

अदिजो,
छानच माहिती..

Pages