निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ टीना.....<<<< कालपरवा मला एक साळूंकी सारखा पक्षी दिसला...पण तो काळा नाही तर पूर्ण मातकट पिवळा होता..बाकी डिट्टो साळूंकी..कोण असावा बरे?>>>>
सातभाई होता कां....?
सर्वसाधारणतः ते 2,3,4 च्या ग्रुपमधे फिरत असतात....

सातभाई होता कां....?
सर्वसाधारणतः ते 2,3,4 च्या ग्रुपमधे फिरत असतात....>> निरु काल मानुषीची रोझी स्ट्ररलिंग पक्ष्याची पोस्ट पाहिली..गुगल करुन पाहिलं तर साम्य वाटलं जरास मग त्याबरोबरच्या ऑप्शन सुद्धा बघितल्या तर कळलं कि ती ब्राम्हणी मैना होती ..
झालं असं कि काही दिवसांपूर्वी जेव्हा मी आणि शांकली झाडं बघायला गेलो त्यावेळी एका घारीचा फोटो काढलेला मी तेथे जी होती ती ब्राम्हणी मैना आहे असे शांकलीने मला सांगितले होते..हा पक्षी तसा नव्हता म्हणुन आय गॉट कन्फ्युज्ड.. खरतर शांकलीने दाखवलेली ती ब्राम्हणी मैना नसुन जंगली मैना होती अस उत्खननात कळलं मला आणि ताईकडे दिसली ती खरी ब्राम्हणी मैना होती...हुश्श..

थांबा इथे जालावरचे फोटो टाकते ओळखु यावे म्हणून...

हि बघा जंगली मैना.. तो तुरा दिसतोय चोचीजवळ..आणि रंग पण बराचसा काळ्याकडे झुकणारा..
Jungle Myna (Acridotheres fuscus) on Kapok (Ceiba pentandra) in Kolkata
.
Related image
.
.
आणि हि ब्राम्हणी मैना..रंग दिसतोय कॉफी + हलका केसरी..चोच साळूंकीसारखी पिवळी..
The brahminy myna or brahminy starling (Sturnia pagodarum), भांगपाडी मैना, पोपई मैना..
तिचा चोचीच्या शेवटी असलेला निळा रंग काही मला दिसला नव्हता..ठिकठाक दुर होती ती आणि फोटो काढायला कॅमेरा आणावा इतका पेशन्स सुद्धा नव्हता तिच्यात..सो राहुन गेल..
.
Image result for brahminy myna

मी पेट्रिया वोल्युबिलीसचं रोपटं आणलं नर्सरीतुन..
जवळपास दोन चार हफ्ते झाले पण आणुन लावलेल्या चार पानांना अजुन नवा सोबती मिळाला नाही Sad
एक दिवसाआड पाणी टाकतेय.. उन्ह सुद्धा मिळतयं..कुंडीत लावताना खाली विटांचे तुकडे, मग झाडांच्या गळालेल्या पानांचा दोन इंच जाडीचा थर देऊन मग माती टाकली.. गरजेपेक्षा जास्त पाणी घालत नाही तरीसुद्धा नवी पानं यायला इतका वेळ का लागत असावा?
फुटावे आहेत खरे पण नविन पानं नाहीच अजुन..
ह्या वेलीची वाढ खुप हळू होते का?
माझ्याकडे गांडूळखत आहे ते टाकावं का?
कृपया मार्गदर्शन करा _/\_ ..

टीना मस्त आहे ते शेव्हींग ब्रश ट्री.. मागे मी एक फोटो काढला होता तो पण या सारखाच होतो.. बघतो सापडतो क.

येउद्या...
व्हाईट शेव्हिंग ब्रश सारखी काही फुले इंडीयन फ्लोरा या ग्रुपवर आली आहेत.. Capparis genus मधली होती शायद...

Capparis genus मधली होती शायद...>> हो एक मी अंबा घाटात काढलेले व ताम्हीणी घाटातले (Capparis Spinosa) तसे आहे.

देवकी, मला वाटल केपी माबोवर होत असलेल्या चौर्यकर्मामुळे म्हणत असावे.. बाकी जर त्रासदायक पद्धतीमुळे म्हणत असेल तर तेपन एका अंशी खरचं आहे म्हणा..

बाकी जर त्रासदायक पद्धतीमुळे म्हणत असेल>> ह्या बद्दल बोलतोय. चोरीकरता मी वॉटरमार्क टकुन काळजी घेतो, तरी चोर्य होते त्याला काही करु शकत नाही.

एक टेस्ट Happy

टीना, पेट्रिया वोल्युबिलीसचं रोप कुठल्या नर्सरित मिळालं?
हरवलेल्या व्यक्तीचा फोटो दाखवून ' आपण यांना पाहिलत का?' असा शोध घेतात ना, तसा मी पेट्रिया वोल्युबिलीसचा फोटो दाखवुन कितीतरी नर्सर्‍यांमध्ये 'ओ तुमच्याकडे ही वेल आहे का?' असं विचारत हिंडले. नाहीच मिळाली Happy

केपी,
मी क्रोमच वापरते अरे..तरी नाही दिसतयं..

हरवलेल्या व्यक्तीचा फोटो दाखवून ' आपण यांना पाहिलत का?' असा शोध घेतात ना, तसा मी पेट्रिया वोल्युबिलीसचा फोटो दाखवुन कितीतरी नर्सर्‍यांमध्ये 'ओ तुमच्याकडे ही वेल आहे का?' असं विचारत हिंडले. >> Proud
अदिजो, अगं मला पण ध्यानीमनी नसताना गावलं ते..
एम्प्रेस गार्डन मधल्या नर्सरीत मिळालं मला फक्त २० रुपड्यात...खरतर जवळपास सारीच रोपं तिथं २० रुपयाला हायती..
पेट्रिया पांढर्‍या रंगातसुद्धा येतो बरं का.. आणि त्याचं रोपटं सुद्धा आहे तिथे..
माझा विचार आहे कि पांढरा आणि हा निळा एकत्र गुंफुन लावावे मस्त Wink काय सॉल्ल्लीड वाटेल ना...

ब्राम्हणी मैना चानच.
टीना चिंता करू नकोस, ते रोप सध्या मुळं तयार करत असेल म्हणून वरती वाढ दिसत नसेल अजून. कुंडीत काही महिन्यांसाठीच ठेवणार आहेस ना? कारण हा वेल चांगला उंच वाढणारा आहे. (नेटवर वाचलं. मी अजून लावला नाहीये)

टीनातायला हॅप्पीवाला बड्डे.>>> हो ग टीना , आम्हां सार्‍यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सरिवा, फोटो दिसेना.

धन्यवाद ऑल...
हो अगं सुलक्षणा...खुप मोठ्ठा आणि दणकट Wink वेल आहे हा...कुंडीत मावणं शक्यच नाही...

हे बघ मी बोन्साय पाहिलं याचं पिंटरेस्ट्वर...चुम्मा आहे ना..
.
Image result for petrea volubilis bonsai
.
.
आणखी एक....
.
Related image
.

पण चिल मी मात्र त्याला त्याची नॅचरल वाढच देणार आहे..

Pages