माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>त्या नागपुरी टोन मुळे राधिका भान्ड्कुदळ वाटते सारखी.----

एक्झॅटली! हल्ली तीच फार आक्रस्ताळी वाटते.

राधिकाला उगीच लाऊड दाखवली आहे. तिचा नॉर्मल अभिनय जेव्हा तिचे तोंड बंद असते तेव्हा दिसतो आदरवाईस तोंड उघडले कि वेंगाडून बोलते असेच वाटते.

तो शाळेतला सिन फारच बाळबोध होता. राधिका आणि शनाया कधी कधी(?) लहान मुलांसारख्या भांडतात. घरात भूत असण्याचा एपिसोड तर अतिशय कैच्याकैच होता Uhoh

कोणाच्याच नाही.. शनायाने राधिकाच्या घरासाठी आणलेले गिर्हाईक पळवण्याकरीता रेवती आणी राधिकाने बनाव केला तिच्या घरी भुत असल्याचा

दक्षे....अगं.... ...:-)
गुरु- शनाया ला हनीमूनलाही पाठवलंस?

दक्षी कधी तरी काहितरी बघते आणि सगळी सरमिसळ करुन ठेवते. Lol आधिच त्या लेखकुला काय कळना झालय काय दाखवायच ते आता हनिमूनच काय ते नविन म्हणुन डोकं धरुन बसेल तो.

आले की नाही अजून परत हनीमून्हून?>>>

जाणार आहेत देव आणि म्हाळसा आता कैलासावर! Wink

झी टीव्हीच्या सगळ्या सिरेली एक पठडीतल्या!

द्येव आन म्हाळसा कैलासावं, शिव - गवरी झुरिक ला , राणा आन पाठक बै स्वप्नांच्या गावी आन विक्रांत मानसी हॉस्पिटलात!

गुरु office मध्ये कोणीतरी सिनियर व्यक्ती आणणार आहे म्हणे office साम्भाळायला. तो कोणीतरी स्पेशल आहे असे गुरु सान्गत होता. मेबी ति सिनियर व्यक्ती म्हणजे शनायाचे वडील असतील.

पराकोटीची गोंधळलेली सिरेल!
गोंधळलेला लेखक, दिग्दर्शक....
आणि भंडावलेले प्रेक्षक!

इतकी पोरकट सिरेल प्रथमच आली असेल.. गुरुनाथ कंपनीचा एवढा मोठ्ठा साहेब आहे का? त्याच्या बॉस ने हाकलून दिलेली पोरगी पुन्हा उच्चपदस्थ अधिकारी म्हणून नेमायला! आणि एच आर हेड ला देखिल ठाऊक नसते नविन कोण जॉईन होणार हा म्हणजे कळस!

कृष्णा प्रोप्रायटरी असेल ती गॅरी अँड असोसिएट्स अशी. म्हणुन तर आयो जायो घर तुम्हारा. कुणीही येत आणि कुणीही जात.
बर त्यावरुन आठवल तो जान्हवीचा मित्र दिसला नाहिये बरेच दिवसात हापिसात. दुसरीकडे कुठे जमवल वाटत त्याने.

पराकोटीची गोंधळलेली सिरेल!
गोंधळलेला लेखक, दिग्दर्शक....
आणि भंडावलेले प्रेक्षक!
इतकी पोरकट सिरेल प्रथमच आली असेल.. गुरुनाथ कंपनीचा एवढा मोठ्ठा साहेब आहे का? त्याच्या बॉस ने हाकलून दिलेली पोरगी पुन्हा उच्चपदस्थ अधिकारी म्हणून नेमायला! आणि एच आर हेड ला देखिल ठाऊक नसते नविन कोण जॉईन होणार हा म्हणजे कळस! >>>>>>>

खरच हे लोक प्रेक्षकांना ईतके बिनडोक का समजतात?????????? अगदी ग्रामीण प्रेक्षक ज्यांना कदाचित हा ऑफीस प्रकार निट माहीत नाही असे समजुया (आपल्या राणासारखे) ते सुद्धा हसत असतील यार

नाही. ज्यांना ऑफीस माहित नाहीत त्यांना हे सगळं खरं वाटतं. वाईट आहे हे. कारेदु मधेही तसंच.

जान्हवीचा मित्र - मनिष! Happy
शनाया ला गॅरी स्वतःच्या ऑफीस मधे बॉस म्हणून आणणार? काहीही! पण ह्या गॅरीचं मात्र खरंच प्रेमे हं तिच्यावर..तिचं नसलं तरी! एव्हढं तरी राधिकाला कळू नये? समहाऊ, त्या अभिजीत खांडकेकर चा चेहेरा अगदीच लहान आहे...... शनायाच्या मानाने तो अगदीच पोरसवदा दिसतो!

या सिरियलची फसलेली कथा आणि त्यातली मुख्य हिरॉइन - राधिका अगदी डोक्यात जाते, म्हणुन पहाणं बंद केलं आहे. पण इथले अपडेट्स मात्र नेहमी वाचते.

शनाया बॉस म्हणुन आली कि येणार असा तुम्हा लोकांचा अंदाज आहे? अंदाज असेल तर चुक आहे कारण कंपनीचा ओनर तो पंजु दाखवला आहे आणि मी सिरियल पहायचे तेव्हा त्याने शनायाला चांगलंच झापलं होतं. तो तिला सिनियर पोस्टसाठी कसा बरं हायर करेल?

समहाऊ, त्या अभिजीत खांडकेकर चा चेहेरा अगदीच लहान आहे...... शनायाच्या मानाने तो अगदीच पोरसवदा दिसतो! >>> तरी ती त्याला तुझं वय् झालं आहे किंवा तो काका सारखा वागतो इ इ काही म्हणायची ना? खरं तर राधिका पण त्याची मोठी बहिण वाटते.

मने, अग त्याच्या खास अधिकारात तो तिला अपॉइंट करणार आहे. ऑफिसातल्या सगळ्यांवर लक्ष ठेवायला. आणि ज्याने आधी तिला झापलेले असते ते कपूर सुद्धा एक एम्प्लॉईच असतात त्यांची बदली होते म्हणुन तर गॅरी त्यांच्याजागेवर प्रमोट होतो ना.

बाकी ते शनायाचा अंकल वाटावा आणि राधिकाचा नवरा वाटावा इतकाही गॅरी म्हातारा दिसत नाही. गंडलय पात्र निवडीत

Pages