Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजचा भाग फार संतापजनक होता .
आजचा भाग फार संतापजनक होता . राधिका असल्या मूर्ख माणसासाठी जीव टाकते आहे जो तिला काडीचीही किंमत देत नाही ! रायटर, डिरेक्टर डोक्यावर पडलेले दिसतात ! >>> नैतर काय. तो गुरु तिला केबिनबाहेर जायला सान्गतो आणि हि त्याच्या मागे मागे 'अहो माझ ऐकून तरि घ्या, अहो मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या' फिरते. तिने त्याच काहीही न ऐकता सरळ एका दमात सुजय बद्दल सान्गायच, तिने कडक शब्दात त्याला सुनवाव की 'घाबरु नका तुमचे पैसे वेळेवर मिळतील', हव तर अर्धे दोन लाख त्याच्या टेबलावर फेकावेत, आणि तडक office बाहेर निघून यावे. ति शनायाला हव तितके बोलते, पण गुरुसमोर तिची बोबडी वळते.
खरतर या सिरियलचा शेवट लाडला
खरतर या सिरियलचा शेवट लाडला (अनिल कपूर-श्रीदेवी) सारखा किव्वा सौदागर ( अमिताभ बच्चन-नूतन) सारखा असायला हवा. म्हणजे राधिका शेवटी मोठी उदयोजिका बनते. पण ती गुरुला स्वीकारत नाही, ती अर्थव बरोबर राहते. तिकडे शनाया सुधारते, ती गुरुशी लग्न करते आणि फुल टाईम गृहिणी बनते. पण नाही सिरियलवाले त्यान्ना दाखवायचा तोच टिपिकल शेवट करतील.
एक मोठ्ठा प्रश्न कोणाच्याच
एक मोठ्ठा प्रश्न कोणाच्याच मनात आला नाही. ४ लाखांचे मसाले बनवण्यासाठी रॉ मटेरीअलचे पैसे कुठुन आणले राधिका ने?
जर कुठुन कर्जाऊ घेतले असतील तर ४ लाखाच्या चेक मधून ते फेडायचे नाही का?
मला काही झेपलंच नाही.
मालिका आणि सगळेच डोक्यावर पडलेत. राधिकाचा सुद्धा आता इतका कंटाळा आला कि गुरुनाथच्या जागी मी असते तरी मीसुद्धा सोडून दिलं असतं तिला असं वाटायला लागलंय. काहीही लॉजिकल दाखवत नाहीयेत.
अन साड्या घरच्याच वापरते असं
अन साड्या घरच्याच वापरते असं दिसतय... झीकडे इतकहि नाहि का द्यायला..
बघा ना.. आंम्ही पण मसाले बनवतो.. ४-५ किलो ची ऑर्डर असली तरी नाकी नऊ येतात अन मारे ४ लाखची ऑर्डर हाती काहि नसताना तिने २० दिवसात पुरी केली.. लॉजिकल काहिच नाहि..
४ लाखाची ऑर्डर घ्यायला ते
४ लाखाची ऑर्डर घ्यायला ते कोणी साहेब आलेले तेव्हा सगळ सामान जेम्तेम एक रिक्षात मावेल एवढेच होते. ४ लाखात एवढेच मसाले
राधिकाचा गेअप बदलायला हवा..
राधिकाचा गेअप बदलायला हवा...त्या ब्लाउज सारख्या काठांच्या साड्या फार बोअर दिसतात. कुणीच अशा नेसत नाही. तिला साध्या ग्रेसफुल साड्या द्यायला काय हरकत आहे? त्यात ती पारच काकूबाई दिसत्ये.
आणि शनायाला गुढघ्यांच्या खाली कपड्यांची अॅलर्जी आहे बहुतेक.
शनायाला गुढघ्यांच्या खाली
शनायाला गुढघ्यांच्या खाली कपड्यांची अॅलर्जी आहे बहुतेक>>+१
Coffee आणि बरंच काही मध्ये
Coffee आणि बरंच काही मध्ये छान दिसते राधाक्का निदान तेवढा तरी change करावा ...
>>>Coffee आणि बरंच काही मध्ये
>>>Coffee आणि बरंच काही मध्ये छान दिसते राधाक्का निदान तेवढा तरी change करावा ...
कंपेअर करायचं असेल तर अय्या मध्ल्या तिच्या कॅरेक्टर बरोबर करा
कुरियर मधला फ्रॉक ड्रायक्लीन
कुरियर मधला फ्रॉक ड्रायक्लीन मध्ये आणि ड्रायक्लीन चा कुरियर मध्ये! कसल्या पोरकट बालीश खोड्या करते ही राधिका अरे एवढी मोठी आता व्यवसायिक होणार म्हणे! आणि साधी प्रगल्भता नाही दाखविता येत!!???
काहीही बळेच ओढून ताणून प्रसंग!!!
कंपेअर करायचं असेल तर अय्या
कंपेअर करायचं असेल तर अय्या मध्ल्या तिच्या कॅरेक्टर बरोबर करा>>>> ई... काय तर तो मुव्ही आणि काय ते तिच कैरेक्टर ...
कसल्या पोरकट बालीश खोड्या
कसल्या पोरकट बालीश खोड्या करते ही राधिका अरे एवढी मोठी आता व्यवसायिक होणार म्हणे! आणि साधी प्रगल्भता नाही दाखविता येत!!???>>> हया असल्या बालिश खोडया करण्यापेक्षा १० दिवसात गुरुचे पैसे कसे करायचे ह्याचा विचार कर म्हणाव हिने.
ह्यान्चा valentine's day उशिरा आला?
काल समिधा बरी वागली राधिकाशी. पन्कजने सुद्दा छान point मान्डला होता काल.
कालचा एपिसोडच्या सुरुवातीचा गुरु-शनायामधला सीन क्यूट होता. हे असल राधिकाच्या वाटयाला का नाही आल, तिच्या नशिबी फक्त आजारी नवर्याची सेवा करण एव ढच आहे का?
http://www.loksatta.com
http://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-entertainment-industry-z...
अरे वा अंजु, आपल्यासारखा
अरे वा अंजु, आपल्यासारखा विचार करणारे लोक आहेत हे पाहुन बरे वाटले.
हि रेवती पण ना, त्या
हि रेवती पण ना, त्या गुप्तेने तिला Happy Valentine's Day मेसेज पाठवला तो वाचून ती गालातल्या गालात हसत होती, पण नन्तर राधिकाने तिला दुसर्या लग्नाविषयी विचारले तेव्हा मात्र तिने नकार दिला. असच जर होत तर मग, रेवतीने तो मेसेज वाचून का हसाव? तिने गुप्तेला मेसेज क राव की तुमचा मेसेज मिळाला, यापुढे असे मेसेजेस पाठवत जाऊ नका, I'm not interested, sorry म्हणून.
सुलू ,जाऊ दे ग होत असं कधी
सुलू ,जाऊ दे ग होत असं कधी कधी. चालतंय
मला तर रेवती गुप्ते एकदम
मला तर रेवती गुप्ते एकदम ग्रेट कपल वाटतात. त्यांचं हो नाही म्हणत जमेलच. रेवती चे काम कोण करते? खूप क्यूट दिसते ती नटी. बेअरिंग पण छान असते. नाहितर राधिका म्हणजे निथळा गौर. खरे म्हणजे तिला असे गुरवाच्या हपिसात जाउन दयेची भीक मागायची गरजच नव्हती. त्याला पैसे परत हवेत, जागा हवी तर त्याने फॉलो अप करावा. आपण कूल बसून राहावे. चार लाखात आणि पुढच्या कामाची काही बेगमी करावी. त्याला आज उद्या देतो म्हण त झुलवत ठेवून रोज दहा पाच हजार द्यावेत. असे प्रत्यक्षत करणार्या बायका आहेत मुंबईत. त्रास एखाद्याला कसा द्यावा ते पण यायला हवे. आता दुसरे काम पण त्याच्यात ऑफिसात. असे कशाला नवी क्षितिजे शोधावीत.
सासर चे सपोर्ट करतात समजून घेतात हे पण मला अतिरंजित वाटते. सर्व मुलालाच सपोर्ट करतात सून काय मेली तरी चालते. नातू पळवून नेतील. असे असतात प्रत्यक्षात. ते गुरू व शनाया कार मध्ये अडकून बसतात का? मला नीट कळले नाही.
राधाक्का समोरच रहाते ना
राधाक्का समोरच रहाते ना गुरनाथच्या मग हापिसात कशला रडं घेउन गेलेली? घरीच काय ते बोलायचं ना.
सासर चे सपोर्ट करतात समजून
सासर चे सपोर्ट करतात समजून घेतात हे पण मला अतिरंजित वाटते. सर्व मुलालाच सपोर्ट करतात सून काय मेली तरी चालते.>> नाही अमा. सगळेच असे नसतात. अपवाद आहेतच की. मुलगा दारु पिऊन सुनेला मारतो म्हणून त्याला घराबाहेर काढून सुनेला आधार देणारे सासुसासरे माझ्या पाहण्यात आहेत.
अपवाद आहेतच की>> तेच तर
अपवाद आहेतच की>> तेच तर अपवादच. आणि दारू पिणे वेगळे. लफ डी करणे वेगळे. भारतीय आई कधीपण माझा पोटचा गोळा मानसिकतेतून मुक्त होउ शकत नाही.
एफएसएसएआय रेजिस्ट्रेशन,
एफएसएसएआय रेजिस्ट्रेशन, लायसेन्स वगैरे काही प्रकार असतात की नाही टेंडर भरण्यापुर्वी? आणि हाती काही नसताना असे कुठल्याही कंपनीचे टेंडर मिळते???
एफएसएसएआय रेजिस्ट्रेशन,
एफएसएसएआय रेजिस्ट्रेशन, लायसेन्स वगैरे काही प्रकार असतात की नाही टेंडर भरण्यापुर्वी? आणि हाती काही नसताना असे कुठल्याही कंपनीचे टेंडर मिळते??? >>> हे असले प्रश्न झी वाल्यांना पडतील का कधी. प्रेक्षक म्हणजे डोके नसलेला मुर्ख प्राणी अशी कदाचीत त्यांची समजुत असावी
एफएसएसएआय रेजिस्ट्रेशन,
एफएसएसएआय रेजिस्ट्रेशन, लायसेन्स वगैरे काही प्रकार असतात की नाही टेंडर भरण्यापुर्वी? आणि हाती काही नसताना असे कुठल्याही कंपनीचे टेंडर मिळते??? >>> पण ते (शिन्मा, मालिका वाले) आधीच कबूल करतात की कथेचा वास्तवाशी संबंध नाही !!
त्रास एखाद्याला कसा द्यावा ते
त्रास एखाद्याला कसा द्यावा ते पण यायला हवे. >>>हे राधिकाला कधीच समजत नाही. ती फक्त ड्रेस बदलणे, तो खाजणारा पाला अंगावर टाकेणे एवढेच करते
>>>>सासर चे सपोर्ट करतात
>>>>सासर चे सपोर्ट करतात समजून घेतात हे पण मला अतिरंजित वाटते. सर्व मुलालाच सपोर्ट करतात सून काय मेली तरी चालते. नातू पळवून नेतील. असे असतात प्रत्यक्षात. ------
एक उदाहरण आहे पाहण्यात. मुलगा AIDS ने गेला. नशिबाने सुनेला झाला नाही रोग आणि नातवालाही. पण तरी वाईट सुनच. तिला हाकलुन लावले. पण ती त्यांच्या नाकावर टिच्चुन परत आली आणि हिस्साही मिळवला. आता तिचीच जोरदार बदनामी चालु आहे.
कालच्या भागात मला ते शनाया
कालच्या भागात मला ते शनाया राधिकाला ऑफिसात बोलाऊन मिटींगचा मेन्यु दाखवुन विचारते की तुला नावं धड वाचता येत नाहीत आणि तू हे पदार्थ कसे बनवणार? हे आवडल एकदम प्रॅक्टीकल दाखवलय.
बाकी ते आरजीस वगैरे पोरखेळ तर
बाकी ते आरजीस वगैरे पोरखेळ तर जाम टुकार दाखवलेत.
राधिकाने माबो आणि रविवारचा
राधिकाने माबो आणि रविवारचा लोकसत्ता वाचला कि काय? परवाच्या भागात राधिका म्हणत होती की, मला अर्थवला खुप शिकवून मोठ करायचय, स्वतःची जागा घ्यायची आहे. नवर्याकडे परत जायचे खूळ डोक्यातून काढून टाकलेय कि काय तिने? अस जर असेल तर चान्गलच आहे की. Good.
अस जर असेल तर चान्गलच आहे की.
अस जर असेल तर चान्गलच आहे की. Good.>>>असे काही होईल असे वाटत नाही. सतत स्वतःचा अपमान करून घ्यायची हौस, त्रास देण्यासाठी बालिश चाळे करणे, माया नवरा-माह्या नवरा करत रडत बसणे यामुळे काहीही होणार नाही.
हि आक्खी सिरीयल ताबडतोब बंद
हि आक्खी सिरीयल ताबडतोब बंद करायला हवी आहे काय लेखक दिग्दर्शक डोक्यावर पडलेत का?
Pages