माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पदार्थ आहे होय? Uhoh
मला वाटलं आपण आगत-स्वागत, आवभगत म्हणतो तसं रातातुई का काय Uhoh

कसली येडछाप आहे ही राधाक्का. रेवती ठाम विरोधात असुनही नेहाला तिच्या वडिलांना भेटायला नेते? टीचर पण बोलतात तर म्हणे माणुसकी साठी नेहाला भेटवलं मी. अरे काय डोक्ञावर पडलीये का? दुसर्‍याच्या आयुष्यात एवढ्या हाय लेवलची ढवळाढवळ? उगाच नाय शन्या तिला बावळट म्हण्त.

नेहमी प्रमाणेच अर्ध्यावर मालिका बघणे सोडून द्यायची वेळ या मालिकेबाबत न येवो ही 'झी'चरणी प्रार्थना.>>

हे पहिल्या दिवशी माधव यानी लिहिले आहे.
आता ती वेळ आली आहे असे वाटते.

कसली येडछाप आहे ही राधाक्का. रेवती ठाम विरोधात असुनही नेहाला तिच्या वडिलांना भेटायला नेते? टीचर पण बोलतात तर म्हणे माणुसकी साठी नेहाला भेटवलं मी. अरे काय डोक्ञावर पडलीये का? दुसर्‍याच्या आयुष्यात एवढ्या हाय लेवलची ढवळाढवळ? उगाच नाय शन्या तिला बावळट म्हण्त.>>> अगदी अगदी! राधिका खरच डोक्यावर पडलिये , स्वतःच्या नाही निदान दुसर्‍याच्या स्वाभिमानाला धक्का लागणार काही कशाला करायचय, रेवतीने खरच हिला माफ करु नये.

आता खरचं गँरी शनाया समीधा बरोबर आहेत असं वाटायला लागलय... कारण राधिका वेणी (बळचं??)उडवण्याशिवाय आणि फालतू खोड्या केल्यावर हिडिंबा सारखे दात काढण्याशिवाय काहिचं करत नाही... निदान पोराचे उच्चार तरी सुधारं म्हणावं नाहितर तो खुकखु मधल्या मानसीला लवकरच जोर की टक्कर देगा..

आता खरचं गँरी शनाया समीधा बरोबर आहेत असं वाटायला लागलय..>>अगदी.
ऑफीस मधे आनंद त्याला सतत लेक्चर देत असतो. आता तर वाटते कि राधिकाने जरी सगळ्यांच्या मदतीने स्वतःमधला 'स्पार्क' दाखवला तरी शेवटी गुरुनाथने तिला सांगावे कि बाई मला तू तेव्हाही आवडत नव्हतीस आणि आताही आवडत नाहीस. मग मनात नाहीच तर मी का तुझ्याबरोबर संसार करु? भलेही पुढे माझे आणि शनायाचे पटो वा न पटो पण तू माझा नाद सोड__/\__

ही पुर्ण सिरीयल नक्की कुठल्या प्रेक्षक वर्गाला डोळ्यासमोर ठेवुन लिहली आहे कोण जाणे ?? Uhoh आता काय टीझर दाखवत आहेत की तो तिला प्रपोज करतो आनि ती सरळ सांगते मला इंटेरेस्ट नाही. Proud अरे प्रेक्षक काय एवढे डोकयावर पडले आहेत का ????

राधिकाने जरी सगळ्यांच्या मदतीने स्वतःमधला 'स्पार्क' दाखवला >>> कसला आलाय डोम्बलाचा स्पार्क? त्या राधिकाला साधे English बोलायला सुद्दा जेनीची मदत घ्यावी लागली.
निदान पोराचे उच्चार तरी सुधारं म्हणावं नाहितर >>> पोराचे उच्चार सुधारण्याआधी त्याच्या आईचे उच्चार आधी सुधारायला हवे. बोलीभाषेचा अभिमान वगैरे ठीक आहे. पण निदान आपल्या मुलाशी तरी नीट प्रमाण मराठीमध्ये तिने बोलाव ना. उदया तिच्या भावी सुनेशी सुद्दा अशीच बोलेल का?
समिधा स्वतःला practical म्हणवते, पण तिचे इशा- समिधाबरोबर पोरकट वागणे, gossiping करणे, चकाटया पिटणे ई. पटत नाही. हिला दुसरी काही महत्त्तवाची कामे नाहीत का?


Submitted by सूलू_८२ ::
निदान पोराचे उच्चार तरी सुधारं म्हणावं नाहितर >>> पोराचे उच्चार सुधारण्याआधी त्याच्या आईचे उच्चार आधी सुधारायला हवे. बोलीभाषेचा अभिमान वगैरे ठीक आहे. पण निदान आपल्या मुलाशी तरी नीट प्रमाण मराठीमध्ये तिने बोलाव ना. उदया तिच्या भावी सुनेशी सुद्दा अशीच बोलेल का?
>>>>>

हे काही पटल नाही... आणि ते योग्य ही नाही, पुर्ण चुकिच उदा. देत आहात आणि त्याची भालमण ही करताय... ते चुकिच आहे.

बोलीभाषेचा अभिमान वगैरे ठीक आहे >>>
प्रत्येकाला बोलीभाषेचा अभिमान असायलाच हवा, त्यात "वगैरे ठीक आहे" हा प्रतिवाद होऊ शकतो का? प्रत्येकाची बोलीभाषा हि ती बोलनार्‍याच्या दॄष्टीने प्रमाणच असते. आमुक एक बोलीभाषा प्रमाण आणि बाकी नाही हे कोण आणि कस ठरवल. मला वाटत सल्ला देण्या अगोदर भाषा या विषयावर थोडा अभ्यास करुन तो द्यावा हि आपेक्षा...

भाषेमध्ये व्याकरण, लिपी, शब्दसंग्रह हे घटक असतात.
- तिचे व्याकरण मला तर मराठी व्याकरणच वाटते...
- लिपी ( जिथे कुठे वापरली असेल) ती बाळबोध देवनागरीच आहे अस दिसतय (तेलगु, वा बंगाली लिपीची मिसळ नाही)...
- शब्दसंग्रह ... शब्दसंग्रह ह्याचे प्रमाणीकरण म्हणजे मुर्खपणा ठरेल, आणि तो ही बोलीभाषेमध्ये प्रमाणीकरण...!!!

उगाच एखाद्यचा शब्दसंग्रह वेगळा आहे म्हणुन त्याला अप्रमाणित वा अशुध्द म्हणने अप्रस्तुत व चुकिचे आहे ..

राधिकाने जरी सगळ्यांच्या मदतीने स्वतःमधला 'स्पार्क' दाखवला >>> कसला आलाय डोम्बलाचा स्पार्क? त्या राधिकाला साधे English बोलायला सुद्दा जेनीची मदत घ्यावी लागली.>>>> तो आनंद सांगत असतो, English is a language not knowledge. तसेही या मालिकेत गुरुनाथला शनाया सारखी मुलगी आवडते आणि राधिकाला वाटते कि पैसे कमविले, स्वतःच्या पायावर उभे रहिले की गुरुनाथ आपल्याला जवळ करेल.

पोराचे उच्चार सुधारण्याआधी त्याच्या आईचे उच्चार आधी सुधारायला हवे. बोलीभाषेचा अभिमान वगैरे ठीक आहे. पण निदान आपल्या मुलाशी तरी नीट प्रमाण मराठीमध्ये तिने बोलाव ना. उदया तिच्या भावी सुनेशी सुद्दा अशीच बोलेल का? >>>>>
हे काही पटल नाही... आणि ते योग्य ही नाही, पुर्ण चुकिच उदा. देत आहात आणि त्याची भालमण ही करताय... ते चुकिच आहे.
बोलीभाषेचा अभिमान वगैरे ठीक आहे >>>
प्रत्येकाला बोलीभाषेचा अभिमान असायलाच हवा, त्यात "वगैरे ठीक आहे" हा प्रतिवाद होऊ शकतो का? प्रत्येकाची बोलीभाषा हि ती बोलनार्‍याच्या दॄष्टीने प्रमाणच असते. आमुक एक बोलीभाषा प्रमाण आणि बाकी नाही हे कोण आणि कस ठरवल. मला वाटत सल्ला देण्या अगोदर भाषा या विषयावर थोडा अभ्यास करुन तो द्यावा हि आपेक्षा... >>>> बोलीभाषा प्रमाण नसते अस मी कुठेही म्हटलेल नाही. प्रत्येक बोलीभाषेचा गोडवा वेगळाच असतो. बोलीभाषा अशुद्द नसतेच मुळी. पण मुलाच्या भावी आयुष्याचा विचार करता त्याच्याशी सर्वमान्य प्रमाण भाषेत बोलायला काय हरकत आहे? आज त्याला हि भाषा आवडते, पण तो मोठा झाल्यावर काय? पुढे बाहेरच्या जगात इतरान्शी बोलीभाषेत बोलताना त्याला विचित्र वाटणार नाही कशावरुन? सगळ्याच मुलीन्ना असा बोलीभाषेत बोलणारा मुलगा आवडतोच आणि आवडायलाच हवा अस काही नाही . राधिकाचा भाऊ , राधिकाचे सासरे हे बाहेरच्यानशी बोलताना बोलीभाषा वापरत नाही, मग राधिकाला काय problem आहे असे करण्यात? निदान बाहेरच्यान्शी बोलताना तरी तिने सर्वमान्य भाषेत बोलाव.

English is a language not knowledge. तसेही या मालिकेत गुरुनाथला शनाया सारखी मुलगी आवडते आणि राधिकाला वाटते कि पैसे कमविले, स्वतःच्या पायावर उभे रहिले की गुरुनाथ आपल्याला जवळ करेल. >>>> English is a language not knowledge सहमत पण त्या गुरु आणि शनायाची बोलती बन्द करायला तिने थोडेसे English झाडायला हवे होते. तसही ती म्हणते ना कि मी हयान्ना दाखवून देईन की मी बावळट, अशिक्षित मुळीच नाही. मग ती नानाजीकडे English वाचण्याचा सराव करते त्याचा काय उपयोग? तसही शनायालाही English येत नसत हे एका प्रसन्गात दाखवले होते.
राधिकाला वाटते कि पैसे कमविले, स्वतःच्या पायावर उभे रहिले की गुरुनाथ आपल्याला जवळ करेल. >>> हो पण personality development नावाचा काही प्रकार असतो कि नाही? शनायासारखच राहिल पाहिजे अस काही नाही. थोडस आधुनिक राहायला काय हरकत आहे? तोकडे कपडे घातले म्हणजे आपण आधुनिक झालो हा समज राधिका खोडून काढू शकते. आधुनिक राहूनही सन्सकृती पाळता येते हे तिने दाखवून दयायला हवे.

समिधाला राधिका तिच्या घरात येवुन राहते ते पटत नाही म्हणून असाव.>>> पण म्हणून समिधाने शनायाच्या पातळीवर उतराव?

त्या नानी ईतके दिवस बाहेर फिरून आल्या ना .
मग आल्या आल्या त्याना रेवतीचं प्रकरणं लक्षात आलं ? तिच्या नवर्याच नाव मंदार आहे हे पण त्याना माहितेय .
राधिका भारी उपडेट देत होती वाटतं रोजच्या रोजं .
गेल्या वेळेला राधिका सांगत होती , नाना-नानीना महत्वाच्या कामासाठी जावं लागलं . इथे नानी आणि गुप्ते म्हणतायेत , नानी मस्त हवेत फिरूओन आल्यात .

आता सासूच्या रहाण्याच राधिकाला का टेन्शन यावं ? गेल्यावेळेला त्या राहिल्या होत्या की लेकाच्या घरी. या वेळीपण रहातिल. राधिकाला भेटावं वाटलं तर समोरचं रहाते की ती. आता नानी नी मोठेपणा दाखवून जर गुरूच्या आईलाही ४ दिवस आपल्याकडे रहायला सांगितलं तर मात्र कोपरापासून नमस्कार !!!!!

माह्या नवरा माह्या नवरा ... मागितला ना शेवटी डिवोर्स Sad . आता रेवती येईल समजवायला बहुतेक . तरी मी सांगत होते म्हणून .....

आधुनिक राहूनही सन्सकृती पाळता येते हे तिने दाखवून दयायला हवे.>>> तसे काही दाखवण्याच्या भानगडीत हे झीवाले पडतील असे नाही वाटत अजून तरी.
तो मुलगा अजून लहान आहे, शिकेल हळूहळू. मुलांची भाषा तर खूप बदलते नंतर, घरातले कसेही बोलत असले तरी.

तो मुलगा अजून लहान आहे, शिकेल हळूहळू. मुलांची भाषा तर खूप बदलते नंतर, घरातले कसेही बोलत असले तरी. >>> हो पण उद्या त्याने आईचा बोलीभाषेवरुन द्वेष करायला नको? तो गुरुही खुद्द नागपुरचा असून त्याला आपली बोलीभाषा खटकते.

पण उद्या त्याने आईचा बोलीभाषेवरुन द्वेष करायला नको?>>आजचा भाग बघून वाटते कि बोलीभाषेवरून नाही पण पुढे स्वतःही कधी आनंदात राहिली नाही आणि बाबांनाही राहू दिले नाही म्हणून नक्कीच द्वेष करेल.

Pages