Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49
रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गायब नै कै......हल्ली तशी
गायब नै कै......हल्ली तशी फॅशन आहे.....एक नख वेगळं/गडद रंगवायची >>> काल परवा शनायाच्या बोटावर अस नेलपेन्ट बघितल होत.
ही राणी, आणी हिचा नवरा रमेश
ही राणी, आणी हिचा नवरा रमेश भाटकर?>>> जिस्म मध्ये नाही का, बिपाशा बसू पैश्यासाठी गुलशन ग्रोव्हरशी लग्न करते.
वाजवी वीणा >>
वाजवी वीणा >>
आज नेमकं जरा उशिराने बघितलं .
आज नेमकं जरा उशिराने बघितलं . नेहाची एंट्री झाली आहे . कारे दुरावा मधली "जुई" .
पण ती तशीच्या तशी जाड जुड आहे. तिनी बारीक व्हायला नको का ?
विकी राणीचा प्रियकर आहे का?
विकी राणीचा प्रियकर आहे का? बिलकुल शोभत नाही तिला आणि अजय लग्न आईच्या सांगण्यावरुन लग्न करतोय वाटतं. नेहा भेटायला आल्याचा आनंद नाही झाला उलट कामातच गढून गेला होता. लगेच तपासाचे अपडेट्स द्यायला ती राणी काय बॉस आहे का त्याची :र:::
विकी राणीचा प्रियकर आहे का?
विकी राणीचा प्रियकर आहे का? बिलकुल शोभत नाही तिला आणि अजय लग्न आईच्या सांगण्यावरुन लग्न करतोय वाटतं. नेहा भेटायला आल्याचा आनंद नाही झाला उलट कामातच गढून गेला होता. लगेच तपासाचे अपडेट्स द्यायला ती राणी काय बॉस आहे का त्याची :र:::
ती जुई का बरं आदीची gf.
ती जुई का बरं आदीची gf. त्याच्यासाठी कोणीतरी छान हवी होती. ती जुई मला नाही आवडत.
नेहाची एंट्री झाली आहे . कारे
नेहाची एंट्री झाली आहे . कारे दुरावा मधली "जुई" >>> उप्स ! हो का ? आदीनाथ स्मार्ट आहे, त्याच्या समोर ही अगदीच 'मंदा' कॅटेगरी वाटेल. या मालिकेते पाहिली नाही, पण कारेदु मधे ती अगदीच 'मंदा' होती.
तेजस्विनीची ऑलिव ग्रीन प्रिंटेड आणि डीप परपल नाजुक बॉर्डर असलेली साडी मस्त. क्लोज अप नसतील तर छान दिसते ती. मराठी सिरियलमधे इतक्या क्लासी आणि ग्लॅमरस कपड्यांना पहिल्यांदाच वाव मिळाला आहे. बाकी नाही तरी साड्या पहाण्यासाठी तरी पहावी ही मालिका.
विकी राणीचा प्रियकर आहे का? बिलकुल शोभत नाही तिला >>> नाहीच आहे. She is using him. Her expression shows it. दुसर्या तिसर्या भागात स्पष्ट दाखवलं होतं.
नेहाची एंट्री झाली आहे . कारे
नेहाची एंट्री झाली आहे . कारे दुरावा मधली "जुई" >>> उप्स ! हो का ? आदीनाथ स्मार्ट आहे, त्याच्या समोर ही अगदीच 'मंदा' कॅटेगरी वाटेल. या मालिकेते पाहिली नाही, पण कारेदु मधे ती अगदीच 'मंदा' होती.>>>> इथे तीने फार मेक अप केल्यासारख्या वाटतो . आणि ती आदूची ( आदीनाथ /आदित्य) मोठी बहिण वाटतेय .
त्याच्यासाठी कोणी नाजूक राणी नाही का मिळाली .
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है.....पण ह्या सिरियलमध्ये कोणीतरी कोणाला मॅच होतंय का? रमेश भाटकर तेजस्विनीला मॅच होत नाहिये. तेजस्विनी आदिनाथला मॅच होत नाहिये. नेहा आदिनाथला मॅच होत नाहिये. विकी तेजस्विनीला मॅच होत नाहिये. काय चाललंय काय?
त्या दिवशीच्या एपिसोडची शेवटची १-२ मिनिटं पाहिली. त्यात गाडी सुरु करून सगळे धावत धावत निघत होते. हे पोलिसांचं नेहमीचं आहे. अगदी सीआयडीपासून ते जुन्या हिंदी पिक्चरमधल्या इप्तकारपर्यंत. तरी नशीब अजून पोलिस स्टेशनमध्ये फोन आलाय आणि तो घेणारा कॉन्स्टेबल 'काय? खून?' असं ओरडलेला दाखवला नाहिये. रच्याकने, हे लोक स्वतः धावत गुजरातमध्ये कशाला चाललेत? लोकल पोलिसांना इन्फॉर्म करायचं नाही का? ते जरा लवकर पोचले असते तिथे.
तेजस्वीनी-रमेश्-विकी-आदिनाथ
तेजस्वीनी-रमेश्-विकी-आदिनाथ कथेचा जॉनर वेगळा आहे पण आदिनाथसाठी कोणीतरी छान हवी होती, उर्मिलाला तरी घ्यायचं. त्या जुईला नकोच जास्त काम. झी असंच करते नेहेमी. हिरो चांगला असतो तेव्हा हिरॉईन नाही (जरी ती जुई हिरॉईन नसली तरी). हिरॉईन चांगली असेल तर हिरो नसतो नीट.
स्वप्ना: १. मला वाटतं की
स्वप्ना:
१. मला वाटतं की तेजस्विनी आणि भाटकर ही विजोड जोडी हाच कथेचा पाया आहे. तसं नसतं तर पुढची १०० दिवसांची कथा घडलीच नसती.
२. विकी आणि तेजस्विनी ही फक्त तेजस्विनीची सोय आहे, कथा पुढे न्यायला
३. आदिनाथ आणि तेजस्विनी यांच या कथेत जुळणारच नाहिये
४. आदिनाथ आणि नेहा मात्र विजोड जोडी वाटते. त्यापेक्षा नेहा च्या जागी मानब मधल्या शनाया ला किंवा खुकखु मधल्या मोनिका ला उभं करायला पाहिजे होतं
कसं अगदि meeting मध्ये discuss झालेले action items document केल्यासारखं वाटतय ...........
कसं अगदि meeting मध्ये
कसं अगदि meeting मध्ये discuss झालेले action items document केल्यासारखं वाटतय ...........
हा हा पण मुद्दे पटले.
तेजस्वीनी मस्त पचका करतेय
तेजस्वीनी मस्त पचका करतेय सध्या आदीचा. आदीचा स्पार्क दिसायला वेळ लागणार, तो काम छान करतोय पण राणीचं chara भारी ठरतंय, शहाला काटशह सुरु होईल तेव्हा मजा येईल. बाकी ह्या दोघांशिवाय मला कोणीही भावलेलं नाहीये त्यामुळे बाकीच्यांबद्दल नाही बोलत काही.
मला तर तो अजिबात हुषार वाटत
मला तर तो अजिबात हुषार वाटत नाही. नुस्ताच बिन्डोकसारखा पाठलाग करतोय. तिने ड्रायव्हर आहे असं सांगितलं आणि त्याने खातरजमाही केली नाही.
तो कसलीच खातरजमा करत नाहीये,
तो कसलीच खातरजमा करत नाहीये, सध्यातरी ती त्याला बुद्धीबळाच्या प्याद्याप्रमाणे वापरतेय असं मला वाटतंय, भाळतोय की काय हळूहळू तिच्यावर असं वाटतंय मला. ५० एपिसोड्स असंच असेल की काय? बरं ते त्याच्यावरचे साहेब ते पण काही dashing नाहीत पण तरी आदि आवडतो मला.
त्याच्या डोक्यात काय चाल्लय
त्याच्या डोक्यात काय चाल्लय काही कळत नाही. गफ्रे पोलिस स्टेशनात भेटायला आली तर त्याला राणीचे पाय आठ्वले. नेहा नीट बस, नेहा नीट बस. अशी काय वाईट बसली होती ती? काहिही. तिच्या जागी उर्मिला कानिटकर पाहिजे होती. त्याची खरी बायको.
आदी मला आवडत असला तरी तो
आदी मला आवडत असला तरी तो सध्या पुचाट इन्स्पेक्टर वाटतोय, त्याचा बाबा मला आवडत नसला तरी dashing इन्स्पेक्टर वाटायचा. तेवढं बाबांकडून घे की. अर्थात मी थोडा वेळ द्यायला हवा सिरीयलला, कदाचित होईल तो dashing.
बरं ते त्याच्यावरचे साहेब ते
बरं ते त्याच्यावरचे साहेब ते पण काही dashing नाहीत >> अन्जूताई, ते डी३ मधले रेश्माचे बाबा. ते कायमच प्रेमळ बाबा वाटतात. त्यांना या रोलमध्ये बघून मला बर्यापैकी धक्का बसला होता.
कालचा एपि मिसला. वेळ मिळाला तर ओझीवर बघणार नंतर
रेश्माचे बाबा झी युवा वरच्या
रेश्माचे बाबा झी युवा वरच्या १का सिरीयल मधेही आहेत, प्रेमळ बाबा म्हणुनच.. डी३ मधल्या प्रग्लभाचे वडील दाखवलेत.
फ्रेशर्स
फ्रेशर्स
कायतरी चांगलं बाघायला सुरुवात
कायतरी चांगलं बाघायला सुरुवात करावी तर मधेच फसक्तात. काल आदि, त्याची ती आई आणि ढम्मा नेहा यांचा पिळकाढुपणा असह्य झाला. अरे काय लाडेलाडे-बळेबळे.
फक्त तपासाचं काय ते दाखवा ना. त्या आदिच्या आई-बायकोत आजिबात इंटरेस्ट नाहीये निदान मलातरी.
पण ती जुई अगदीच 'मंदा'
पण ती जुई अगदीच 'मंदा' आहे...सहमत!
तेजस्विनी खरंच मज्जाआणतेय
तेजस्विनी खरंच मज्जाआणतेय .
आदू बरोबर फोनवर बोलतानाचा तिचा अभिनय धमाल आणतो .
चेहरा थंड ठेउन ती आवाजात जी काळजी , भीती दाखवते - सहीच .
तो आदू तिला सांगतो की धनंजय चा फोन गुजरात हायवेवर डिटेक्ट झालाय .
तेन्व्हा तीचा पाउट केवळ कहर होता . किती पाताळ्यंत्री आहे ती राणी .
तेजस्वीनी पंडीत तिच्या
तेजस्वीनी पंडीत तिच्या वयाच्या मानाने म्हातारी दिसतेय,फारच सुरकुत्या आहेत तिच्या चेहर्यावर.
<<तिने ड्रायव्हर आहे असं
<<तिने ड्रायव्हर आहे असं सांगितलं आणि त्याने खातरजमाही केली नाही.>> +१११
आणि तिने अगदी फोन केला मला काहीतरी भास होतोय असं नि तसं कि हा सगळं हातातलं सोडून धावत सुटतो असं दाखवलंय . असं असत का ? कदाचित मोठ्या धेंडाची मिसिंग केस असल्याने असेल कदाचित. इथे सामान्य माणसाला विचारतो कोण ? सामान्य माणसाने फोन केला तर सांगतील आम्ही शोधतोय /शोधतोय . असा थोडाच कोणी धावत येणार आहे इन्स्पेक्टर? तेजस्विनी ( राणी ) त्याला मस्त जाळ्यात अडकवतेय .
तेजस्विनी मोठीच दिसते आणि मग आदी तिच्यासमोर अगदीच कोवळा दिसतोय
तेजस्विनीने काम चांगलं केलंय.
तेजस्विनीने काम चांगलं केलंय. सध्य तरी तीच एकटी एक नंबरला आहे.
आई म्हणजे ग्रेटच. दात दिसु नयेत म्हणुन ओठ गच्च मिटुन संवाद बोलतात त्या काकू. आणि लाडात येणं तर ....
आदिनाथ जर आई आणि नेहा यांच्यातच अडकला तर शेवटी केस सॉल्व्ह करायला विश्वासराव येईल. ते परवडेल का पण ?
आदिनाथ दिसतो झक्कास पण बाकी
आदिनाथ दिसतो झक्कास पण बाकी हुशार वैगरे नाही वाटत ह, त्या ड्रायव्हरची शहानिशा करुन फोन चेक केला असता तरी बरेच क्लु मिळतिल, २ भागाची कथा पाणि घालुन १०० करणार म्हणजे चालायचच म्हणा! मध्यम वर्गिय दाखवलाय तो त्यामुळे गफ्रे पण तशिच दाखवलिय.
तेजस्विनीची उन्ची,बान्धा आणि ड्रेसिन्ग मस्त पण तिचा चेहराच मुळात उग्र आहे त्यामूले ति थोराडच दिसते. तिच्या सगळ्या साड्या एवन आहेत आणि ती त्या कॅरी पण मस्त करतेय.
पण तिचा चेहराच मुळात उग्र आहे
पण तिचा चेहराच मुळात उग्र आहे >> + १
बाकी इन्स्पेक्टरसाहेबांनी
बाकी इन्स्पेक्टरसाहेबांनी आपली गर्लफ्रेन्ड म्हणून ओळख नाही करून दिली तिची. 'आपण कुठेतरी मस्त फिरायला जाऊ' म्हटल्यावर मला अगदी मॉरिशस, पॅरिस नाही तरी गेला बाजार गोवा, उटी, निदान माथेरान असं काहीतरी डोक्यात आलं. म्हटलं लग्नाआधी हे चालेल का घरी. तर इथे हे चौपाटीवर जायच्या गोष्टी करताहेत. मुल्लाकी दौड मस्जिदतक. गरिब इन्स्पेक्टर दाखवायचा म्हणून लगेच भेळपुरी खाऊ वगैरे. अरे त्यापेक्षा हलदीरामची भेल बनवा घरी. निदान बाधणार तरी नाही पोटाला.
वर हा म्हणतो केस संपू देत मग जाऊ. माझ्यासारखी गर्लफ्रेन्ड असती तर म्हणाली असती ठोंब्या, बूड टेकायला घरी जातोस ना? मग फिरायला यायला काय धाड झाली आहे? पण नेहा समजूतदार. असो.
Pages