100 डेज - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49

रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>कसं अगदि meeting मध्ये discuss झालेले action items document केल्यासारखं वाटतय

__/\__ पण मी ती पोस्ट उपहासाने टाकली होती रे.....

>>तिच्या जागी उर्मिला कानिटकर पाहिजे होती. त्याची खरी बायको..

अगदी अगदी. तीही चालली असती. ही नेहा गळेपडू वाटतेय. विशेषतः फटाक्याला घाबरायच्या सीननंतर जास्तच.

>>>आणि तिने अगदी फोन केला मला काहीतरी भास होतोय असं नि तसं कि हा सगळं हातातलं सोडून धावत सुटतो असं दाखवलंय . असं असत का

+१....दुसरे लोक नाहीत का तिथे पाठवायला? ह्याला पण तेच हवंय. अग अग म्हशी.....

>>आदिनाथ जर आई आणि नेहा यांच्यातच अडकला तर शेवटी केस सॉल्व्ह करायला विश्वासराव येईल. ते परवडेल का पण ?

तो सगळ्यांवर खुनी म्हणून संशय घेईल पण काही पुरावे देणार नाही.

राणी: नवर्‍याची संपत्ती हवी म्हणून
धनंजयची बहिणः भावाची संपत्ती हवी म्हणून
अजय ठाकूरः राणीशी अफेअर
नेहा: अजयचं राणीशी अफेअर. राणीला अडकवायला धनंजयचा खून
धनंजयचे नोकर, ड्रायव्हरः मालकाच्या अपरोक्ष दागिने आणि पैसे चोरायचे आहेत म्हणून राणीला अडकवायला
विकी: राणीशी अफेअर
विकीचे वडीलः धंद्यातली अफरातफर लपवायला
अजयचे साहेबः अजय इमानदार ऑफिसर असल्याने त्याचा परस्पर काटा काढायला

१०० व्या दिवशी अजयच्या आईला अटक. पोलिसात असलेल्या नवर्‍याच्या मृत्यूला धनंजय कारणीभूत झाल्याचा सूड घ्यायला त्याचा खून केल्याचं आई कबूल करणार. प्रेक्षक बेशुध्द Proud

>>ही कमेण्ट व्हॉअ‍ॅपवर कॉपी केली तर चालेल का ?

नाव दिसेल अश्या बेताने स्क्रीनशॉट घेऊन टाकलात तर चालेल Happy

काय तो इन्स्पेक्टर, तिने बोलावलं लगेच गेला. एखाद्या लेडी इन्स्पेक्टरला घेऊन जायचंना. अशावेळी एखादी बाई आळ घेऊ शकतेना. पोलिसांना अलर्ट राहायला लागतं की वेगवेगळे angle तपासून. हा अजय असं का करतोय. वरिष्ठ अधिकारी यांना कळवायला हवंना आणि ते सांगतील तसं वागायला हवं. फारच मठ्ठपणा करतोय की मुद्दाम तसं करतोय तिचं खरं रूप कळावं म्हणून. आज फार मठ्ठ वाटला मला.

ते पं सॉलिड करतेय.

>>>स्वप्ना: -^-. झी विश्वात हे असं घडू शकतं .................... स्मित
अब्बास-मस्तान डायरेक्टर आहेत का? Happy

तो तिच्या अर्ध्या वचनात असल्यागत एका कॉलवर जातोय धावत. आणि म्हणे हा सगळ्यात हुषार इन्स्पेक्टर.

स्वप्ना Lol

काय तो इन्स्पेक्टर, तिने बोलावलं लगेच गेला. एखाद्या लेडी इन्स्पेक्टरला घेऊन जायचंना>> हो ना त्या अगडबेम बाईला धाडुन दिले असते तर जाम पचका झाला असता. Proud

अजयच्या मठ्ठ chara बद्दल लिहून आले त्यांच्या फेसबुकवर. block केली कमेंट तरी वाचतीलना एकदा (मलाच block केलं तर प्रश्नच संपेल तिथं कमेंट टाकायचा Wink ). साड्या डिझायनरने केल्यात तेजस्विनीने नाही असं उत्तर मिळालं मात्र ते दुसऱ्या कोणीतरी दिलंय, channel ने नाही. वेशभूषा पूजा कामत नाव आहे, काल मी आवर्जून बघितलं.

उद्याचा प्रीकॅप दाखवला तो बरा वाटला, बाकी आजचा भाग संथ. एक अँगल हापण असेल का की धनंजयने आधीच अजय किंवा पोलीसांना आपल्या जीवाला धोका आहे राणीपासून असं सांगितलं असेल. तो जिवंत असेल, मुद्दाम अजय राणीचं ऐकतोय असं दाखवत असेल.

काल पहिल्यांदाच तेही फारच थोडावेळ पहायला मिळाली मालिका. सगळ्या फ्रेम्स मध्ये आग दिसत होती. दिवाळी विशेष असावा बहुतेक. बाई पर्फेक्ट वाटल्या रोलमध्ये.

दिवाळी स्पेशलच होता. पण राणीने दिवाळी साजरी करणार नाही म्हणून घरभर पणत्या लावल्या होत्या. Uhoh
आम्ही दिवाळी साजरी करतो तरी याच्या निम्याच पणत्या लावतो ते पण घराबाहेर. Wink

कालची राणीची हेअरस्टाईल आवडलीच. तिलापण छान दिसत होती.

अजय ठाकूर येडाय. लेडी काॅन्स्टेबलला मॅसेज केला, तिचा येऊ शकतेचा रिप्लाय आला तर याने लगेच बोलावून घ्यायचं ना, राणीला सोबत नकोच असेल तर, स्वतःसोबत परत घेऊन जायचं. राणी लेडी काॅन्स्टेबल पण नको म्हणते आणि याला पण थांबायची विनंती करते, हुश्शार पोलिस ऑफीसर ना हा. याला विचित्र नाही वाटत.????

मी जरा दोन-तीन एपिसोड मागे आहे.
पो. स्टे. मधून गुजराथ बॉर्डरवर निघताना जीपमधे बसल्यावर आदिनाथचा पी कॅप घालून क्लोजप घेतलाय, महेश कोठारेची कॉपीच अगदी!

तो रोज ब्रेकमधे दिवसाचा काऊंटडाऊन दाखवतात तो येडेपणा आहे... निव्वळ एपिसोडस मोजण्यात काय अर्थ आहे? Uhoh

राणीचा (सो-कॉल्ड) मादकपणा, सिडक्शन दाखवण्याच्या नादात एपिसोडस फारच स्लो होतायत... पटकथा कंटाळवाणी होतेय... केवळ वेगवेगळ्या कॅमेरा-अँगल्समधेच समाधान मिळत असेल, तर मग काही बोलायलाच नको!

कालचा भाग अतिशय बकवास होता.. कथा एका सेकंदानेही पुढे गेली नाही... अश्याने लोक सिरियल बघणं सोडून देतील आणि मग १०० च्या ऐवजी ५० दिवसातच गुंडाळावी लागेल मालिका..

अश्याने लोक सिरियल बघणं सोडून देतील आणि मग १०० च्या ऐवजी ५० दिवसातच गुंडाळावी लागेल मालिका..>>>> +१
हिरवीणीच्या मादकपणा हॉटपणाचा ओव्हरडोस व्हायलाय. कधी चीप वाटतं.

कालचा भाग अतिशय बकवास होता.. कथा एका सेकंदानेही पुढे गेली नाही..>> राखेचाचे असे कित्येक एपिसोड होते की कथेत काहीच घडायच नाही. पण आम्ही आत्यंतिक उत्कंठेने पुढचा भाग बघायचो येड्यासारखे.

अश्याने लोक सिरियल बघणं सोडून देतील आणि मग १०० च्या ऐवजी ५० दिवसातच गुंडाळावी लागेल मालिका..>>>> +११.
राखेचाचीच टीम आहे इथेही. सो अपेक्षाच नाहीत मलातरी. ती कसातरी फालतू शेवट करुन गुंडाळली.. इथे काय करतायत देवच जाणे.

हिरवीणीच्या मादकपणा हॉटपणाचा ओव्हरडोस व्हायलाय. कधी चीप वाटतं.>> +१.

अश्याने लोक सिरियल बघणं सोडून देतील आणि मग १०० च्या ऐवजी ५० दिवसातच गुंडाळावी लागेल मालिका..>>>> हिम्या असे काही नसते. लोकं बिनडोक आहे हे झी ला कळुन चुकले आहे. त्यामुळे १००-१ १००-२ असे करत ५०० भागही चालेल ही सिरीयल. P

मालिका संथ आहे अशी तक्रार करू नका.
अजय ठाकूरच्या वरीष्ठांनी त्याला ही केस सोडवण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. अजय ठाकूर म्हणे मुदतीआधीच केस सोडवतो. त्याला लिवॉनचा ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर बनवला पाहिजे. मालिका १०० भागांची आहे, आधीच ९-१० भाग झालेले आहेत. म्हणजे इथून पुढे एकेका दिवसावर १०-१२ भाग होऊ शकतील. गरजेप्रमाणे कमी अधिक Biggrin

त्या सासूबाई आग्रह करतात तरी एक पदार्थ टाकेल तोंडात तर शपथ, हिच्याकडे जेवतोना. का कॉफी पितो फक्त. पण असं करणे योग्य नाहीना केस चालू असताना, जर एखादा इन्स्पेक्टर नकोय तर काही घालू शकतातना पदार्थात. विषच असं नाही, गुंगीचं औषध वगैरे आणि काही करू शकतात.

अर्थात अजय मुद्दामून जाणून बुजून, तिला गंडवण्यासाठी तिच्या तालावर नाचत असेल तर ठीक नाहीतर फार मठ्ठ इन्स्पेक्टर आहे. कालचा भाग बघितला नसता तरी चाललं असतं.

कालच्या भागातली तेजस्विनीची साडी तीला छान दिसत होती , ओव्हरऑलच काल जरा यन्ग वाटत होती. बाकी ड्रामा फुटकळ.

Pages