100 डेज - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49

रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिरीयलचं टायमिंग अजिबात सोयीचं नाही त्यामुळे सुरूवातीचे पाच एपिसोड्स फक्त पाहता आले. इथल्या पोस्ट वाचून फार काही मिस झालेलं नाही असं वाटतंय.
संतोष अय्याचित या निर्मात्याची कुठलीही सिरीयल बघायलाच नको आता. दिग्दर्शक कुठलाही असू दे , हे पाणी घालायला सांगत असणार.

अजयरावांना एकदा हा पिक्चर दाखवाच - मराठी सबटायटल्ससकट लवकर्च झी युवा वर येईल . >>> आ, एवढा Bold पिक्चर झी युवावर?:अओ:

काल राणी अजयशी बोलताना 'धनंजय परत आले तर' असं म्हणते. खरं तर तिने 'धनंजय परत आले की' असं म्हणायला नको का? मग म्हणाली 'धनंजय फार महत्त्वाकांक्षी होते'. तिचा हा भूतकाळातला उल्लेख अजयला खटकला नाही? नंतर त्याने दारावरच्या सेक्युरीटीला 'इथे गेल्या आठवड्यात कोण कोण आलं होतं' असं कॅज्युअली विचारलं आणि तिचा फोन आल्यावर उत्तराची वाट न पहाताच आत निघून गेला. हा प्रश्न फार आधी विचारायला हवा होता आणि ते रजिस्टरही ताब्यात घ्यायला हवं होतं.

>>आ, एवढा Bold पिक्चर झी युवावर

हा पिक्चर कधीकाळी 'बोल्ड' ह्या सदरात मोडायचा. आताच्या काळात तसं असेल असं वाटत नाही.

आणखी एक प्रश्न - ह्या सिरियलमध्ये बटाट्याची भाजी किती वेळा दाखवणार आहेत? राखेचा मध्ये चहा आणि पोहे होते. तसंच सुषल्याचा घाम इतक्या वेळा दाखवला होता की शेवटी त्याचा कथानकाशी काहीतरी संबंध आहे अशी शंका येऊ लागली होती. इथे बटाट्याच्या भाजीचा काही सिग्निफिकन्स आहे का? Uhoh

काल नवरा मिसिंगची कम्प्लेंट आहे हे ऐकल्यावर अजयची आई म्हणते, 'काय अवस्था झाली असेल त्या बाईची' हे ऐकल्यावर मला वाटलेलं अजय म्हणेल, 'अगं अवस्था वगैरे काही नाही, एकदम व्यवस्थित आहे बाई. ' पण तो काही म्हणालाच नाही. Uhoh

आदीनाथ नेहाला परवाच्या भागात समजावताना म्हणाला ना
"अगं वेडे" एकदम महेश कोठारेच आला डोळ्यासमोर. सेम डायलॉग डिलिव्हरी. Happy

हा मायकलभाऊ आणि शेरॉनबाईंचा चित्रपट नाssssssही!! तेव्हढा झी आणि महेश कोठारेचा वकुब नाही

हा ८१ सालातला कॅथलिनमावशी आणि हर्ट्काकांचा बॉडी हिट आहे, जो आपण हिंदीत जिस्म नावाने पाहीलाय बिपाषामाऊली होती.
बरोब्बर त्याच काळातला जेव्हा महेश कोठारे हिरो होण्यासाठी धडपडत होता.

प्रत्येक वेळी तेजस्विनी आल्यावर ते कुंथल्यासारख संगीत का लावतात?
इथे मला साराभाई व्हर्सेस साराभाई आठवली
त्यातली सिरीयल कभी सांस कभी नागिन
मोनिशा : जब वो सांस आती है तो म्युझिक बजता है डायन हो हो डायन हो हो
सुमित : हां वरना लोगोंको पता कैसे चलेगा की...

मला ह्या पुचाट पो. ऑ. पेक्षा विश्वासराव आवडला होता. कुणाचा कुणाला ताकास तूर लागून देत नव्हता.

आणि इथे हा फियान्सेचा टेक्स्ट आला तर ह्या बयेसमोरच उत्तरं देत बसला.

हा छोठारे ह्या मालिकेत पोलीस इन्स्पेक्टर नव्हे तर ह्या बाईंचा खाजगी इन्स्पेक्टर वाटतोय.
प्रस्ण विचारला की रीपोर्टींग सुरु
आला फोन की चालला.

छोठारे...... खाजगी इन्स्पेक्टर >>> Biggrin

मी ही मालिका रोजच्या रोज पाहणं सोडून दिलं. अधूनमधून बघणार. इथल्या पोस्टी मात्र रोज वाचणार Proud

आईने इंटरेस्ट दाखवला नसल्याने आमच्याकडे ही मालिका बघितली जात नाही. मी इकडेच वाचते. पण त्यादिवशी चुकून बघायला मिळाले. त्या गवरीला तिच्या निर्विकार चेहऱ्याबद्दल लोक नावे ठेवतात... इथे हे छोठारे इन्स्पेक्टर पण काही कमी नाहीत. चेहऱ्यावर काहीच भाव नाही.

च्यायला या सिरीयल च्या.. Uhoh
ही बाई इतके खाजगी प्रश्न विचारतेय त्या ठाकूर ला.. मी थोबाड फोड उत्तर दिलं असतं. सारखं घरी या, घरी या, काय सत्यनारायण घालताय का, मग अख्खं पोलीस स्टेशन घेऊन येतो म्हणायचं. ती खूळचेट नेहा, तिला एक उद्योग नाही, सारखं... अजय तु कुठे अजय तू कुठे? आणि आई.... खोटा प्लास्टिक चेहरा घेऊन इथे तिथे धडपडणार किंवा शेपाक करत असणार.. अजय च्या आवडीची भाजी... Proud

दक्षिणा ताई.. Rofl

हा प्रत्येकवेळी एकटाच जातो.. लेडी काॅन्स्टेबल सोबत घेऊन जायला काय होतं. त्या राणीचे एकएक हावभाव बघून भितीच वाटते बाई मला.

मी कालचा भाग पहिला.. पाणी टाकुन शिरेल वाढवली असं वाटलं.
मा रा खे चा आठवलं
१०० Days सांगून ९९ ३/४ सिरीयल हि पाणी टाकू होणार
आणि शेवटची ५मिनिटे शिरेल संपणार

मी ही मालिका रोजच्या रोज पाहणं सोडून दिलं>>> मम. मी इथे येऊन वाचणार. इतकी स्लो आहे की माझे पेशन्स संपले. जाऊदे माझ्याकडे नाहीच आहेत.

शेवटचा भाग बघेन बहुतेक, त्यात अजय सांगेल मी मुद्दामून तू म्हणेल तसं ९९ दिवस वागलो, मला पोलीस स्टेशनला आलीस तेव्हाच कळले होते की तूच आरोपी आहेस.

मग ती म्हणेल तुम्ही प्रॉमीस केलंत की केस solve झाली की जेवाल माझ्याकडे मग जेवणात विष देईल त्याला.

मग ती म्हणेल तुम्ही प्रॉमीस केलंत की केस solve झाली की जेवाल माझ्याकडे मग जेवणात विष देईल त्याला.+११११

typical zee marathi ++++1111

वळणाचे पाणी १०० days ला

कॅथलिनमावशी, हर्टकाका, बिपाषामाऊली,डायन हो हो डायन हो हो>>>> Rofl

इथे मला साराभाई व्हर्सेस साराभाई आठवली
त्यातली सिरीयल कभी सांस कभी नागिन
मोनिशा : जब वो सांस आती है तो म्युझिक बजता है डायन हो हो डायन हो हो
सुमित : हां वरना लोगोंको पता कैसे चलेगा की...>>> साराभाई व्हर्सेस साराभाई आता दाखवायला हवी होती, सध्या टिव्ही वर सापान्चा सुळसुळाटच आहे बुवा. Lol

अरे कालपण एकटाच गेला? मागे तर दहा वेळा म्हणाला, मी एकटा जात नाही असा. लेडी इन्पेक्टर असते बरोबर.

त्या गवरीला तिच्या निर्विकार चेहऱ्याबद्दल लोक नावे ठेवतात... इथे हे छोठारे इन्स्पेक्टर पण काही कमी नाहीत. चेहऱ्यावर काहीच भाव नाही. >>> vt२२, त्याला पण नावं ठेवतायेत की सगळे पण कुठेतरी सगळ्यांना वाटतंय तो मुद्दाम तसं करतोय केससाठी. मी तर त्यांच्या फेसबुक पेजवर जाऊन त्याला मठ्ठ म्हणून आले. Wink

जर धनंजय मेला असेल आणि अजयने सिद्ध केलं सर्व तिनेच केलं असं, तर बहुतेक शेवटी जेवणात विष घालणार राणी, स्वतःपण जेवेल त्याच्याबरोबर. यहा नही वहा सही साथ साथ.

हो निधी, आज नाही मागेच. त्यावर likes पण आल्या काही जणांच्या.

मी फक्त इथेच लिहित नाही, डायरेक्ट तिथे लिहिते. झी युवा वर पण. फक्त इथली लिंक देत नाही कारण मग block करतील मला. इ टीव्हीने केलंय (इथल्या लिंकसाठी नाही, सिरीयलच्या एका track बद्दल सारखं वैतागून लिहिलं म्हणून).

गौरीबद्दल पण लिहिलंय मागे दोनदा.

पण कुठेतरी सगळ्यांना वाटतंय तो मुद्दाम तसं करतोय >>> राणीबाईंच्या बरोबर असताना समजू शकते मुद्दाम करतोय... पण गर्लफ्रेंड बरोबरच्या सीन्स मध्ये देखील उगीच दूर कुठेतरी शून्यात बघितल्यासारखे भाव वाटतात चेहऱ्यावर...

Pages