Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49
रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉव! ब्रिलियन्ट!
वॉव! ब्रिलियन्ट!
शरद चा पेपर (एकाच कानशीलात)
शरद चा पेपर (एकाच कानशीलात) फुटला पण राणी बाईंनी मात्र 'सो व्हॉट' म्हणून त्यांना वाटेला लावले>>:D
फुसका बार. मला तर रमेश भाटकर जिवंतच आहे व चोरावर मोर बनुन राणीलाच त्याने गंडा घातला असा काहीतरी ट्विस्ट असता तर आवडला असता. पण झीच्या शिरेलीत एवढा विचार कोण करणार.
बहुतेक त्याच्या मिशीचे असावेत
बहुतेक त्याच्या मिशीचे असावेत! <<<
झी मराठीच्या सध्याच्या मालिकांपेक्षा उजवी होती <<< कारण १०० मिलीचे ताक करायचे आहे असे ठरवून तेवढ्याचेच केले. पाणी ओतून सात लिटर केले नाही, म्हणून असेल. आता त्या १०० मिलीत मोजक्या ५-६ मिलीच सकस असतील ते सोडा!
आदिनाथ कोठारे आहे म्हणून मी ही मालिका बघायला सुरुवात केली होती. आधी एका सिनेमात (नीळकण्ठ मास्तर) त्याची गेस्ट एंट्री आश्वासक वाटली होती. त्याचे आणखी काम बघायची इच्छा होती. आणि पोलिस स्टेशनातले लुटुपुटुचे स्टेटस अपडेट्स वगळता या मालिकेतही त्याचे काम चांगले वाटले. राणी, मीरा, संगिता, पटवर्धन, वाघमारे, तिवारी या सर्वांनीही चांगले काम केले आहे. आता स्टोरी, लॉजिक, दिग्दर्शन इ. इ. बाबी मालिकांना लागू असतात का?
Pages