100 डेज - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49

रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए राया नको गं. मला राणी समोर अजय आला तरी तो बिचारा वाटतो. लग्न काय? ती कडेवर घेऊनच फिरेल त्याला मग.
केवढी ती बाई आणि हा किती नाजूक.

राणीला शरदच योग्य आहे का ? ती नेहा पण अजयला मिसफिटच आहे . त्याच्या प्रोफेशन च्या दुर्ष्टीने . आधी अगदी सांगत होती त्या राणी पासून सावध राहा रहा आणि राणी जरा का गोडं बोलायला लागली तर हि तिच्या गळ्यातच पडली. सगळं घडा घडा बोलून पार . ते सुद्धा अजयला ना सांगता
आधी वीणा झाली मग कॉक्स अ‍ॅन्ड किंग्ज, थॉमस कूक, केसरी येउदेत सगळ्या.
केसरीच्या गोटात हलचाल झालीच असेल . काय माहित Wink

केसरी च्या सौजन्याने असा काही झटकदार शेवट करता येईलः

सर्व जण एकत्र एका अलिशान बंगल्यात जमले आहेत. टिपिकल युरोपियन सेटींग मध्ये, डोंगर माथ्यावर.
कॅमेरा, साऊंड, अ‍ॅक्शनः
धनंजय सरदेसाई स्वतः सर्वांचे स्वागत करतात आणि एक एक गोष्ट ऊलगडत जाते..
पण कथानकात एव्हडी मोठी ऊडी घ्यायची तर ऊर्वरीत भागांमध्ये फारच भन्नाट असे ट्विस्ट घडवून आणावे लागतील. आणि मग राणी ची युरोप ची ऊडकी व पाठोपाठ सर्वांच्या ऊडक्या. जरा बजेट च्या बाहेरच जाईल प्रकरण... Happy

तूर्तास, पटवर्धनांचा दूरचा वारसदार हा ट्विस्ट येऊ घातलाय..

(राणी आणि शरद चा लग्नाचा फोटो हा एव्हडा एकच काय तो हुकूमी एक्का शिल्लक आहे. अन्यथा अजय रन आउट झालेलाच आहे.)

>>>अन्यथा अजय रन आउट झालेलाच आहे.----

अगदी अगदी. काय मस्तं लाजत होता तो. ब्लॅक शर्टमध्ये सॉल्लिड दिसत होता.

तूर्तास, पटवर्धनांचा दूरचा वारसदार हा ट्विस्ट येऊ घातलाय..>> शिवाय वाघमारे नक्कि कुठल्या बाजुने हेही काल सभ्रर्मात टाकणार होत, बाकी वाघमारे च काम करणारा कलाकार मस्त ह एक्दम , एक्दम परफेक्ट राजकारणी उभा केलात त्याने!

बाकी वाघमारे च काम करणारा कलाकार मस्त ह एक्दम , एक्दम परफेक्ट राजकारणी उभा केलात त्याने! >>>.. + १०००००० एक्दम भारी आहे तो . त्याच बोलणं , चालणं एक्दम मस्त .

अनंत जोग आणि राणीचे सीन्स आवडले . ती मस्तच काम करतेय . आणि जोग साहेब ही तो चापलूस एन्स्पेक्टर मस्त निभावतायेत .
परवा राणी , जाधवांवर भडकलेली बघून मलाच घाबरायला झाल Happy . कस्सले डोळे वटारते ती .

मी काल बरेच दिवसांनी बघितली. तपासाचं काहीच दाखवलं नाही. अजयचं घरं, नेहाचं घर, राणीचं घर... संपली सिरियल. Uhoh
नेहा अजयशी लग्नाचा पुन्हा विचार करणारे. का?? नेमकं काय झालंय?? राणी नेहाला कशी काय फोन करते?

नेहा अजयशी लग्नाचा पुन्हा विचार करणारे. का?? नेमकं काय झालंय?? राणी नेहाला कशी काय फोन करते? >>> अय्य्या तुला माहित नाही ? इतकी मोठी गोष्ट झाली ती .

छ्होटारे , सन्क्रातीनिमित्त ढासू ब्लॅक कलरचे शर्ट घालून राणीला भेटायला गेले . राणी तिच्या घरातच असल्यामुळे , रात्रीची वेळ असल्यामुळे सिल्क ची नाईटी घालून होती .तिने नेहमीप्रमाणे दुखियारी औरत चं रडगाण गायलं आणि आधारासाठी छोटारेना टेकली . बोलाफुलाला गाठ पडावी तशी नेहा नेमकी दारात उभी राहिली आणि तिने उगाचच कैच्याकै गैरसमज करून घेतलेत. बिचारे छ्होटारे . आजी आजारी , होणारी बायको चिडलेली आणि राणी सारखी गळ्यात पडणारी. या बायकानी वाट लावली आहे त्यांची .

अय्यो! असं होय. मी बर्‍याच दिवसांनी बघितली गं.

पण नेहा रात्रीची कशी काय राणीच्या घरी गेली??
छोटारे अजूनही लेडी काॅन्स्टेबलशिवाय एकटाच राणीच्या घरी जातो?? कधी सुधारायचा कोणास ठाऊक.

पण नेहा रात्रीची कशी काय राणीच्या घरी गेली??>>> राणीची खेळी. तीनेच फोन करुन बोलावले होते.

छोटारे अजूनही लेडी काॅन्स्टेबलशिवाय एकटाच राणीच्या घरी जातो?? कधी सुधारायचा कोणास ठाऊक.>> तो सुभेदार ला पकडायला जातो.

कधी सुधारायचा कोणास ठाऊक.>> तो सुभेदार ला पकडायला जातो. >>>>>

सुभेदार म्हणजे रणजित सुभेदार Happy
तो राधिकेचा गुरुनाथ नाही हं.

मला असं वाटायला लागलाय अजयच्या आईच्या ऑपरेशनचा खर्च राणी देईल. आणि मग अजय तिचा दासच बनून जाईल. मोहिते राणीची केस सोडवतील आणि राणी अजयनीच खून केला असं सिद्ध करून मालिकेच्या शेवटी अजय ठाकूर धनंजयचं खून केल्याबद्दल गजाआड. केस सॉल्व आणि मालिकाही द एन्ड

पटवर्धनांनी लांबची नातेवाईक पण येऊ घातलेय का मालिकेत नवीन कॅरेक्टर म्हणून ?
वाघमारे आणि मीरा सरदेसाई-गायत्री गॅंग पण एकमेकाना मिळालेले आहेत.
मस्त सस्पेन्स राखलंय. काय होईल असं का तसं . प्रेक्षकांना तर्क लढवायला भरपूर वाव दिलाय Happy

ट्विस्ट घालत आहेत खरे..
पण आजकाल काही दिवसापूर्वी आलेला कॉल वा मेसेज ज्या सिम वा नंबर बरून आला आहे त्यावेळचं त्याचं लोकेशन ट्रेस करता येण नक्कीच शक्य असणारे.. मग राणी ने एव्हडे खुल्लम खुल्ला सांगितले मला धनंजय चा मिस्ड कॉल वा मेसेज आला आहे तर पोलिस टीम ला ते लोकेशन नक्कीच कळू शकेल. आणि तो मेसेज राणी च्या घरी शरद च खुद्द तिला करतो असे दाखवले की परवा.
मग तर केस सहज सुटायला हवी...?

खरं तर ही पोलिस टीम इतकी बुध्धू दाखवली आहे की आताच्या अनेक ट्विस्ट ची गरज नाही. Happy

अनंत जोग सगळा डाव उलटू शकला असता, पण आता आपल्या हिरोला हिरो दाखवायचे आहे तर त्याचा पत्ता कट.
त्याने सांगितलेले मुद्दे, त्याच्या तपासाची दिशा बघून राणी खरच घाबरते. त्यावर आता हि खेळी. आता चिडून तो जास्त वेगाने तपास करणार असे दाखवले तर मजा येईल.
हिरोचे लग्नाचे मार्गी लागलेले दिसते, आईला पण बरे करतील......त्यामुळे तो तपास करायला मोकळा.

आईला बरे करायला 4 लाखांची गरज आहे. हे तो कुठून उभे करणार हा खरा प्रश्न आहे. राणीला सोडवायच्या बदल्यात राणीकडून घेणार का?? की नेहाच्या आईवडीलांकडून घेणार??

जमत नाही तर केस क्राइम पेट्रोल कडे सोपवून द्या.एका तासात सोडवून देतील्,सर्वजण तुरुन्गात .

तावडे साहेब बॅक? मोहितेनी जरा गिअरअप केली होती केस परत स्लो डाउन होइल अशाने, राणिच्या घरी मोहिते गेले तेव्हा काय झाल, ऑनलाइन तो एपिसोड फक्त २ मिनिटाचा आहे..कारण काल मोहितेना डायरेक्ट चौकशीलाच बोलावले

मोहितेसाहेबांनी राणीसाहेबांशी गैरवर्तन केले असे राणीसाहेबांनी ठाकूरसाहेबांना फोनातून सांगितले.
(प्रत्यक्षात धनंजय आणि पटवर्धनांना घातलेले वीष हे परदेशातच मिळत असून मोहित्यांच्या पोरांनी (म्हणजे अ ठा आणि टीम) त्यादृष्टीने विकीच्या पारपत्राची चौकशी केली आहे, अशी राणीला घाब्रवूण सोडणारी माहिती मोहिते बंगल्यावर जाऊन सांगतात व राणीचा विनेभंग करायचा प्रेत्नं करतात. मग राणी हळूच त्यांच्या दारूत नशेची गोळी टाकते, त्यांची बंदूक रुमालात धरून छतावर २-३ गोळ्या झाडते आणि नशेत ढुस्स झालेल्या म्हतार्याला इथून घेऊन जा आणि पोलीस स्टेशनात टाकून ये असे तिवारीला सांगते.)

परत बाळबोधपणा किंवा निर्बुद्धपणा सुरू झाला. आता चारपाच एपिसोड नाही बघितले तरी चालावे.

कालचा भाग पाहिला. छोटा रे राणीकडे संशयित नजरेने पहात मोहितेंबद्दल प्रश्न विचारत होता. खरा इन्स्पेक्टर वाटला थोड्या वेळासाठी.
आणि काल राणी ने सुर्वे बाईंना मी बोलतेय ते बरोबर ना? असं विचारल्यावर सुर्वे बाईंनी हो हुंकार भरला, तो लाजवाब होता.

Pages