100 डेज - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49

रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुर्वे बाई राणीकडे सुरूवातीपासून संशयानेच पाहतात. त्यांना आवडत नाही बहुतेक ती Happy

>> त्यांना आवडत नाही बहुतेक ती

चालायचच.. जेन्युइन समस्या आहे. सुंदर स्त्री बद्दलची जेलसी. Happy
बाकी आता खरच गुंडाळायच्या मागे लागलेत... फक्त कुठला क्ल्यु वापरून केस सोडवलेली दाखवतात ते बघायचे.. टायटल सॉंग मध्ये राणी व अजय हथकडी मध्ये दाखवलेले प्रत्यक्षात होईल असे काही वाटत नाही... तो ही एक सस्पेंसच म्हणायचा.. Happy

d3 yet aahe feb madhe, bahutek 18 feb pasun suru hot aahe

दिल दोस्ती दोबारा

१५

काल राणी छोटा रे च्या घरी त्याच्या आईला भेटली तर आईची तब्येत खालावली आणि ती तिला मोठ्या दवाखान्यात घेउन गेली. छोटा रे चिडला. आणि बोलला राणीला खूप.
पुढे काय झालं माहिती नाही मला.

तेवढच झाल! तेप चान्गला अभिनय करते , मधे स्वजो बरोबरच्या मुव्हिमधे मात्र शोभेची बाहुली बनुन फिरत होती, तिला व्हॅम्प रोल सुट होतात

शरदने तिवारीचा खून केला नि प्रेत गायब केलंय. राणीने तिवारी सकाळपासून गायब असल्याचं व त्यामुळे ती काळजीत असल्याचं सगळीकडे पसरवलंय.
वाघमारेंनी कंपनीला गिर्‍हाइक आणलंय. अगदी पैसे ताबडतोब देणारं.
अजयची आई अजयला राणीने केलेल्या मदतीचा उल्लेख करुन दाखवते. (स्वतः अशा सिरियस कंडिशनमध्ये असताना असले उद्योग बरे सुचतात या बायांना.) आता आला ना अजय दबावाखाली. Sad
सुर्वेमॅडम, शेलार नि मेमाणे तिवारी गायबल्याच्या चौकशीसाठी वाड्यावर येतात. राणीबाई त्यांना ताकास तूर लागू देत नाहीये. Uhoh
अजयच्या आईचं ऑपरेशन झालं.

१०० दिवसात काय काय घडतंय. इथे आम्हाला एक वर्ष सरलं तर 'अय्या कित्ती भराभर संपलं ना २०१६' असं वाटतं आणि जे काय त्या वर्षात घडायचं करायचं असतं ते काहीही तडीस गेलेलं नसतं.

सुसाट सुटलीये गाडी.. १० दिवसच राहिले म्हटल्यावर.
अजय ने राणी चे पैसे परत केले. (तत्वापायी ही शेवटची संधी पण वाया घालवली.. माठ कुठला!)
पोलिस राणी कडे तिवारी च्या खोली चे झडती वॉरंट घेऊन आले.
संगीता ने मोठ्ठे डोळे करून तिवारी अलिकडे घाबरलेला होता असे पोलिसांना सांगितले. त्यावर राणी ने कातिल कटाक्ष टाकला. (ऊरल्या दहा दिवसात संगीताला पण ऊडवणार बहुतेक)
'पुढील भागात'- अजय ला तिवारीच्या बँक अकाऊंट मध्ये १ लाख ची कॅश एंट्री झालेली आढळते, तेही धनंजय गेल्याच्या दुसर्‍याच दिवशी. (शेवटी कॅश ला पर्याय नाही!)

आई ला वेळेत हॉस्पिटल ला नेऊन वाचवले म्हणून अजय राणी शी (ह्युमॅनिटेरियन ग्राऊंड्स) मांडवली करेल अशी एक फुकट आशा आहे.

रच्याकने: मीरा, गायत्री, भाऊ, आणि पटवर्धन चा नातेवाईक, सगळेच गायब झालेत.. वाघमारे नी कंपनी हातगाडी वर भाजी विकतात तितक्या सहज विकली. च्या मारी अख्ख्या मालिकेत एकच पात्र कंसींस्टंट दाखवले आहे: नेहाचे वडील. Happy

आई ला वेळेत हॉस्पिटल ला नेऊन वाचवले म्हणून अजय राणी शी (ह्युमॅनिटेरियन ग्राऊंड्स) मांडवली करेल अशी एक फुकट आशा आहे. <<< अशी आशा का करता राव.

तिवारीच्या रुमची... रादर राणीच्या घराची झडती सुरूवातीच्या काही भागांतच व्हायला हवी होती. ते लॉजिकल नव्हतं का? धनंजयची मिसिंग कप्लेंट आहे म्हटल्यावर त्याच्या घरात काही संशयास्पद आहे का हे पहायला हवं होतं. माठ लोक्स!

>>च्या मारी अख्ख्या मालिकेत एकच पात्र कंसींस्टंट दाखवले आहे: नेहाचे वडील

मला त्यांची दया येते. नेहाची आई म्हणजे ढालगज भवानी आहे एक नंबरची. वर श्रीमंतीचा माज तो किती. तरी बरंय ते सगळं नवर्‍याने मिळवलंय. स्वतःची कमाई काही नाही पण नुसती नाकाने कांदे सोलते बाई. काल चुकून थोडा एपिसोड पाहिला तर त्यात 'मला हे पटत नाही' असं २-३ वेळा म्हणाली असं वाटलं. मी मनात म्हटलं आम्हाला ह्या सिरियलमधलं काहीच पटत नाहिये पण आमचं ऐकतो कोण.

संगीता माठ आहे. एव्हढं होऊनही तिथे राहिलेय. सर सलामत तो पगडी पचास ही म्हण तिने ऐकली नसावी. बरं एव्हढे दिवस तिथे राहूनही राणी आणि तो शरद ह्यांच्यात काहीतरी नातं आहे एव्हढंही तिच्या ध्यानात आलं नाही. ही सिरियल म्हणजे माठांची मांदियाळी आहे.

>>>>अजय ने राणी चे पैसे परत केले. (तत्वापायी ही शेवटची संधी पण वाया घालवली.. माठ कुठला!)---

ही ही. पण खरंच मला राणी आणी छोटारे यांचा थोडा तरी रोमान्स पहायचा आहे. भले ते राणीचे स्वप्न दाखवले तरी चालेल.

नेहाचे वडील>>> योगेश केळकर बहुतेक. ते नाटकांची प्रकाशयोजना करतात. वाचलंय त्यांचं नांव. माझे नातेवाईक वगैरे नाहीयेत, सहज मधे कुठेतरी त्यांचा फोटो आणि नाव कळलं.

ते कमी महत्वाचे दाखवत असतील, शांत दाखवत असतील तर काहीतरी मोठा रोल असेल की काय त्यांना शेवटी. सस्पेन्समधे काहीही होऊ शकतं Wink .

>>ही ही. पण खरंच मला राणी आणी छोटारे यांचा थोडा तरी रोमान्स पहायचा आहे. भले ते राणीचे स्वप्न दाखवले तरी चालेल.

नको हो. त्यात पण राणीच पुढाकार घेईल आणि छोटारे एक तर लाजत बसतील किंवा 'आता ह्यावर मी काय करणं अपेक्षित आहे' असा विचार करतील.

शरदने तिवारीला मारून बॉडी कुठे गायब केली म्हणे. का परसातच पुरलाय त्याला? काय सहजतेने उडवतात हे लोकांना. आम्हाला डास पण नाही मारता येत असे. लानत है ऐसी जिंदगीपे. बरं त्याला मारलं ते मारलं पण त्याची रूम चेक करून काही पुरावे असतील तर नष्ट करावेत की. ह्या सगळ्या मंडळींची बँकखाती छोटारेंनी खूप आधी चेक करायला हवी होती नाही? तो तिवारी पण माठच. एव्हढी कॅश मिळाली तर गावाकडे पाठवावी की नाही तर इमानेइतबारे बँकेत जमा केली.

आता छोटारेला राणीचं इतिहाससंशोधन करायला मुहूर्त मिळाला. आणि त्याबद्दलही मीराला विचारतोय. ह्या माणसाने सरदेसाईंच्या वाड्याची एकदा तरी झडती घेतली आहे का?

काल १२ दिवस राहिलेत असं दाखवत होते. म्हणजे ह्या आठवड्यातला १, पुढच्या आठवड्यातले ६ आणि त्यानंतरचे ५. इथे कोणीतरी लिहिल्याप्रमाणे १८ ला नवी सिरियल.

स्वप्ना आता थोडे दिवस उरलेत म्हणून आठवत असेल पुरावे, झडती. इतके दिवस छोटारेला राणीने बोलावलंकी वाड्यावर जायचं एवढाच रोल होता.

च ह ये द्या मधे छान खिल्ली उडवली ह्या टीमची मला आवडलं आणि वरद चव्हाणने मस्त अँक्टींग करुन दाखवली छोटारे सेटवर कसं काम करतो त्याची.

इतके दिवस छोटारेला राणीने बोलावलंकी वाड्यावर जायचं एवढाच रोल होता.>> राणी तर छोटारेंच्या आईला पण वाडयावर बोलवत होती. Proud

च ह ये द्या मधे छान खिल्ली उडवली ह्या टीमची <<< कधी? >>> मागच्या सोमवारी. सगळे जोक फिरत होतेना मधे, अस्मिताला केस द्या. ती तीन दिवसांत सोडवते. तसं एका दिवसांत अस्मिताने केस सोडवली आणि छोटारेलाच गुन्हेगार सिध्द केले असं दाखवलं त्यात.

राणी तर छोटारेंच्या आईला पण वाडयावर बोलवत होती. >>> हो का? मग काय उत्तर दिलं त्याच्या आईने.

>>>राणी तर छोटारेंच्या आईला पण वाडयावर बोलवत होती. >>> हो का? मग काय उत्तर दिलं त्याच्या आईने.
डायरेक्ट अ‍ॅडमिट करावं लागलं Wink Lol

Pages