100 डेज - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49

रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डायरेक्ट अ‍ॅडमिट करावं लागलं >>> अगदी. म्हणे तुम्हाला बर वाटत नसेल तर तुम्ही माझ्या बंगल्यावर या. मी तुमची काळजी घेईन. हे ऐकुन बाईला फेफरंच आले.

>>डायरेक्ट अ‍ॅडमिट करावं लागलं

Proud छोटारे त्या मीराला राणीच्या भूतकाळाबद्दल काय विचारतोय? तिला कसं काय माहित असणार? त्यपेक्षा त्या शरदच्या मागे साध्या वेषातला पोलिस लावला असता तर एव्हाना केस सॉल्व्ह झाली पण असती.

त्या शरदच्या मागे साध्या वेषातला पोलिस लावला असता तर एव्हाना केस सॉल्व्ह झाली पण असती...>> त्या करता १०० दिवस लागले नसते ना पण..

म्हणे तुम्हाला बर वाटत नसेल तर तुम्ही माझ्या बंगल्यावर या. मी तुमची काळजी घेईन. हे ऐकुन बाईला फेफरंच आले. >>> Lol

पण काहिही म्हणा.. 'या एकदा बंगल्यावर' हे आता राणीचं सिग्नेचर वाक्य झालय... आणि तीलाच शोभतं. Happy
(निळू फुले यांच्या नंतर राणी च...!)
आता एकच उत्सुकता आहे: राणी आता शरद ला पण टपकवते की काय?

आज 9 दिवस राहिले असं दाखवलं.

आत्ता छोटारे मीरा आणि धनंजयची आधीची बायको यांना झापताहेत असं दाखवलंय. पण अज्जिबात तो झापण्याचा आवेश आणताच आला नाही त्याला. खऱ्या पोलिसांनी नुसते प्रश्न विचारले तरी आवेशामुळेच हवा टाईट होते समोरच्याची.

आत्ता शरद येऊन सांगतो की साहेब जिवंत आहेत आणि मला आणि राणी मॅडमला ते दिसले. Uhoh

या मालिकेची कथा बव्हंशी 'मधुराणी' या कादंबरीवरून प्रेरीत आहे असे वाटते. कोणी 'मधुराणी' वाचली असल्यास नक्की मतं मांडावीत.

'मधुराणी' आंतरजालावर उपलब्ध आहे. (खालील पत्त्यावर)
http://googleweblight.com/?lite_url=http://www.marathinovels.net/2009/11...

>>आत्ता छोटारे मीरा आणि धनंजयची आधीची बायको यांना झापताहेत असं दाखवलंय.

हो ना, मात्र राणीपुढे गोगलगाय होते त्याची. काल तिचा फोन स्पिकरफोनवर टाकलाय ते माहित नव्हतं तिला म्हणून पुन्हा त्याला घरी बोलावत होती.

काल छोटारेंचा बॉस म्हणत होता की लवकर कामाला लागा, आपल्याकडे वेळ नाहिये. मी मनात म्हटलं हो ना, थोडेच एपिसोडस राहिलेत आता.

आणि त्या बॉसला स्टेटस अपडेट द्यायला सगळी टीम कशाला गेली आत? छोटारे त्यांचा बॉस म्हणजे फक्त त्यानेच जायला नको का? Uhoh

संगीता म्हणजे माठांचा सरताज आहे. इतकं होऊन अजून त्या बंगल्यावर रहातेय. मला वाटलं होतं की ती छोटारेंची छुपी इन्फॉर्मंट निघते का काय. पण तिला काहीच पत्ता नाहिये किंवा ती उत्तम अभिनेत्री आहे.

>>आत्ता शरद येऊन सांगतो की साहेब जिवंत आहेत आणि मला आणि राणी मॅडमला ते दिसले

तो शरद आणि त्याची ती मिशी माझ्या अगदी डोक्यात जातात. :रागः

शेवट नक्कीच काहीतरी टर्न आणि ट्विस्ट असणार आणि तसं नसेन तर 'खोदा पहाड निकाल चुहा ' Happy
मला तरी उगाच ९९ दिवस पहिली असे वाटेन Happy

मला अशी शंका येते की तो कंपनी आणि बंगला घ्यायला आलेला माणूस राणीच्या नवर्‍यानेच अ‍ॅरेंज केलाय.

राणीने शरदशी लग्न का केलं त्याचा खुलासा शेवटी झाला म्हणजे मिळवलं.

राणीचा भूतकाळ ह्या लोकांनी कसा शोधला ते काही नीट स्पष्ट झालं नाही बुवा. शाळेच्या वेबसाईटवरून ह्यांना काय क्लू मिळाला? तिथे राणीचा फोटो होता का काय? Uhoh

सोलापुरातून छोटारेंनी बॉसला फोन केला तेव्हा त्याने अगदी 'टेक युअर टाईम' असं म्हटलं. 'वरून प्रेशर' यायचं ते बंद झालं का आता?

>>शेवट नक्कीच काहीतरी टर्न आणि ट्विस्ट असणार

राणी नवर्‍याला मारायचा प्लान करून झोप जाते आणि तिला हे सगळं स्वप्नात दिसतं. एव्हढं सगळं रामायण करण्यापेक्षा नीट संसार करावा असं ती ठरवते असा शेवट कसा वाटतो? Proud

पोहे 'मिडलक्लास'? आणि पेस्ट्रीज 'हाय क्लास'?....गल्लोगल्ली पेस्ट्रीज विकणारी दुकानं आहेत ताई. तुम्ही काय प्रायव्हेट जेटने परदेशातून मागवणार आहात का?

>>शेवटी धनंजय जिवंत असेल का? तोच आला तर मस्त ट्विस्ट.

ह्या सिरियलमध्ये एलियन आला तर तोच ट्विस्ट होईल आता.

राणीने शरदशी लग्न का केलं त्याचा खुलासा शेवटी झाला म्हणजे मिळवलं.>>>ते लहानपणापासून एकमेकांना ओळखत असतात. त्यांना पैसा प्रिय आहे, त्यासाठी कोणत्याही थराला जायची तयारी आहेच. शरद ने तिला सगळ्याच बाबतीत मोकळी सोडली आहे. तिचे शरदवर प्रेम(?) आहे.

संगिता खूपच माठ आहे. नाही तेव्हा अपडेटस् देत असते पण मला राणीनेच असे सांगायला सांगितले आहे, तिने मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, मला नोकरी सोडू देत नाही.. हे असे काही कोणालाच सांगत नाही. कोणताही नोकर नोकरी सोडू का? असे विचारत बसतो काय?

मी आता बघायला सुरुवात केली, अजयला जाग येऊन चौकशी सुरु केलेली दिसतेय. त्यामुळे आता खणून काढतील, बाकीचे ९२ दिवस माठपणा चालू होता. एका आठवड्याची सिरीयल १०० दिवस लांबवल्यावर करायला लागतं असं सर्व.

सन्गिता माठ नाही तर राजण आहे , पहिल्यादा राणिने गळ्याला सुरी लावली तेव्हाच तिथुन सटकायल हव होत तिने , अतिहुशार अजय ठाकुर तर काय विचारुच नका , सगळ्या गोस्टी तावडेना विचारुन चालल्यात की आता खोदकाम सुरु आहे अजुन किती फुट खणु ? शिवाय आज तावडेनी दिलेल्या बारिकशा सुचनेबद्दल आक्खी टिम आभारप्रदर्शनात मग्न ! अरे चोर-पोलिस खेळणारे लहान पोर बरी तुमच्यापेक्षा.
राणि, शरद आणि वाघमारे बेस्ट!

>>कोणताही नोकर नोकरी सोडू का? असे विचारत बसतो काय?

नाही तर काय....भाजी आणायला जाते म्हणून सटकायचं ना. छोटारे मोठ्ठा क्लू शोधून आणल्याच्या थाटात 'ही बाई खोटं बोलतेय' म्हणून सांगतात. अरे माठा, आम्हाला हे पहिल्या एपिसोडपासूनच माहित होतं. तो बॉस त्याला जमिनीवर आणतो की हे सगळं शोधून आपल्याला काही फायदा होणार नाही म्हणून. त्याचे ते दोन असिस्टंट्स तर काल पोलिसच्या नोकरीवर लागल्यासारखे वागतात.

>>ते लहानपणापासून एकमेकांना ओळखत असतात.

म्हणून एकमेकांशी लग्न केलंय? ह्या बाईचं पैश्यावर प्रेम आहे. ती एखाद्या लुख्ख्या माणसावर प्रेम करेल असं वाटत नाही एकंदरीत. असो.... तो शरद तर तिचा दलाल वाटतोय. हे पैसे मिळाले की म्हणे पुढच्या कामाची तयारी करु. Uhoh

छोटारे मोठ्ठा क्लू शोधून आणल्याच्या थाटात 'ही बाई खोटं बोलतेय' म्हणून सांगतात. अरे माठा, आम्हाला हे पहिल्या एपिसोडपासूनच माहित होतं. तो बॉस त्याला जमिनीवर आणतो की हे सगळं शोधून आपल्याला काही फायदा होणार नाही म्हणून. त्याचे ते दोन असिस्टंट्स तर काल पोलिसच्या नोकरीवर लागल्यासारखे वागतात. >>> Lol

तो मेमाणे दुसऱ्या एका सिरीयलमध्ये मागे इन्स्पेक्टर होता तेव्हा सुंदर काम केलं होतं. एकदम dashing होता आणि नीट track वर शोध लावायचा तो. त्याचं charactor तिकडे छान present केलं होतं. दोन केस झटपट सोडवल्या त्याने. इथे तसा लहान रोल स्वीकारला कारण झी मराठी असेल. झी मराठी सिरियल्स कशाही असोत, जास्त बघितल्या जातात आणि कलाकारांना ओळख पण मिळते.

लोकहो चांगली सिरीयल बघायची असेल तर POW बघा. पहिल्या भागापासुन उत्तम चालु आहे. Hotstar वर पहिल्या भागापासुन बघा. सुंदर अति सुंदर. कलाकार मस्त, डायरेक्शन मस्त.

आता काय ३ दिवस उरले. त्यात वीस मिनीटे हॉस्पिटल मधे, दहा मिनीटे नेहा बरोबर गुफ्तगु आणि पंधरा मिनीटे तावडे साहेबांना रीपोर्टींग.

बहुतेक शेवटच्या दिवशी शेवटच्या ब्रेक मधे विमान थांबवणार आणि आम्ही तुम्हाला अटक करतो सांगुन सीरीयल संपवणार. रा खे चा सारखी ह्याच्या एंड ची पण वाट लावणार बहुतेक.

बाकी छोटारे आणि राणी चा रोमान्स दाखवुन द्या उद्या व्हॅलंटाइन ला ...आणि राणी बरोबर डिनर उरलय ना !!! राणी नसेल तर छोटारे बरोबर आम्हाला तरी डिनर ची कुपने द्या

सगळ्यांचे प्रतिसाद भारीच. संगीताचा पत्ता कट होणार कि काय ? पुढील भागात ती शरद आणि राणीचा फोटो बघताना दाखवली आहे.

शरद ची कधी झडती घ्याविशी वाटली नाही का छोटारे ला ? तिवारी ची झडती सगळं संपल्यावर...कथा मांडणी अगदीच पुअर....

Pages