100 डेज - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49

रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला २अ ची शक्यताच जास्त वाटतेय. त्यात पैसे जास्त दिलेपेक्शा मालकाप्रती निष्ठा म्हणून खून न करता ड्रायव्हरने मालकाला लपवून ठेवलं असणार आणि त्याचा तिथला खर्च चालवण्यासाठी तो वारंवार राणीला ब्लॅकमेल करणार. पटवर्धनांच्या मुलाला राणी आता डिच करेल. चिडून जाऊन तो राणीला ब्लॅकमेल करेल आणि पैसे मागेल.

राणी आणि इन्स्पेक्टर एकमेकांच्या प्रेमात आहेत. >> तसं असेल तर मग प्रोमोज दिशाभुल करतात. राणि हुषार असेल तर एका पोलीस एन्स्पेक्टरशी लगेच लगट करुन संशय स्वत्;कडे घेणार नाही. पण प्रोमोज पाहुन एक तर ती
oversmart असेल किंवा तो कोठारेबॉय बावळट असेल.

कालच्या म. टा. मध्ये वाचल की या मालिकेचं शिर्षक दर दिवशी बदलणार आहे , म्हणजे १०० डेज, ९९ डेज ९८ डेज असं. इथे अमेरिकेत तरी असं काही दिसत नाहिये. भारतात काय स्थिती आहे?????

बाकी, हिरोची आई सोडली तर बाकीचा प्लॉट (आत्तातरी) चांगला वाटतोय. सरिता ला या नव्या रुपात बघायची सवय नाहिये.

>>तसं असेल तर मग प्रोमोज दिशाभुल करतात

प्रोमोज वर जाऊ नका हो. राखेचा सुरु व्हायच्या आधी पेपरमध्ये आलं होतं की मुंबईची सून घरातल्या लोकांच्या अंधश्रध्दा आहेत हे कसं सिध्द करते आणि घरात घडणार्‍या घटनांची सायन्सचा आधार घेऊन उकल कशी करते ह्यावर मालिका आहे. प्रत्यक्षात ती सूनच गुन्हेगार दाखवली त्यांनी. प्रोमोजच काय पण मालिकेच्या शीर्षकगीतात पण झोपाळ्यावर कोणी बसलं नसताना तो हलतो, सुनेला धुक्यात कोणाचा चेहेरा दिसतो असं कायकाय दाखवलं होतं. तस्मात डोन्ट ट्रस्ट एनिथिंग. औरंगजेब होऊन मालिका पहा Happy

राणीने त्या दोघांनी आपल्याला ब्लॅकमेल करू नये म्हणून आधीच काहीतरी योजना बनवून ठेवली असली पाहिजे. नाहीतर बाई मूर्ख आहे म्हणायचं.

औरंगजेब > खरंच.
आज दुसरा भाग पाहिला. आईचा सीन नसता तरी चाललं असतं.

टॉवेलने केस पुसतानाची एण्ट्री आवडली. मस्त दिसला आदिनाथ.

लोकांना कसे रिऍक्ट व्हायचे ना तेच कळत नाही आहे हि मालिका बघून. कोणी टायटल सोंग वरून गहजब माजवू पाहतेय तर कोणी त्या हिरो आणि हिरवणीच्या लूक वरून........ काय तर म्हणे या सिरीयल चे टायटल सॉन्ग हिंदीत का ती हिरोईन अशी का नि तशी का>> हे असलं या धाग्यावर तरी कोणी लिहिलेलं मला दिसलं नाही. तुम्हाला कुठे दिसलं??

आम्ही कौतुक करतो ते तुम्ही वाचतच नाही का?? काय आवडतं ते लिहितो तसंच काय आवडत नाही तेही लिहिलं जाणारच की.

राखेचाच्या धाग्याचा विचार केला तर सुरुवातीला कौतुकच होतं पण नंतर संवाद सुद्धा अगदी तेच तेच यायला लागल्यावर त्यावर टीका करणे चूक कसे काय ठरु शकते?? सुरुवातीला निलिमा सर्व घटनांची वैज्ञानिक दृष्टीकोनातून उकल करणार असंच चित्र रंगवलं गेलं होतं. नंतर तिलाच व्हिलन करून मोकळे झाले. रहस्यकथा उलगडताना ज्या घटना घडवल्या गेल्या त्या कोणी आणि कशा घडवल्या हे सांगायला नको? ही अपेक्षा आम्ही प्रेक्षक म्हणून केली आणि तसं स्पष्ट लिहिलं तर आम्ही पिसं काढतो?? नवे प्रयोग नको असते तर सासू-सुनेच्या मालिका सोडून या मालिका पाहिल्याच नसत्या. जे काही या मालिकांबद्दल बोलले जाते (मायबोलीच्या धाग्यावर) त्यात अजिबात तथ्य नसते का? उगाचच ओढुनताणून करायचीच म्हणून कोणीही टीका करत सुटत नाही. जे जसं दाखवतात त्यावर तसंच बोललं जातं. यात काय चूक आहे??

अपर्णा. , मंजूडी +१

मी ही सिरीयल बघतेय . मला आवडायला लागलीये. शीर्षकगीतही चांगलं आहे. आदिनाथ आणि तेजस्विनी मस्त दिसत आहेत रोल मध्ये . लेट्स सी , पुढे काय होत ते .

आजचा इंटरेस्टिंग होता, आदिला छान वाव मिळाला. छान काम केलं त्यानेपण. त्याच्या हाताखालचा एक इन्स्पेक्टर वरद विजय चव्हाण आहे, विजय चव्हाण यांचा मुलगा. आजचा भाग आवडला असल्याने सध्यातरी बघेन मालिका. कालचा बघून आज बघू का नको करत होते.

तेजस्विनी आज छान दिसत होती, मेकअप पण माफक होता. दोन दिवस मात्र मला तिचं काम आवडलं पण मेकअप नव्हता आवडला.

मी ही सिरीयल बघतेय . मला आवडायला लागलीये. शीर्षकगीतही चांगलं आहे. आदिनाथ आणि तेजस्विनी मस्त दिसत आहेत रोल मध्ये . >>> + १०००

नेहमीच्या लग्न, डायनिंग टेबलवर खाण्याच्या गप्पा, सणवार आणि डोहाळजेवणं, यापेक्शा वेगळ्या विषयावर आहे हाच मोठा रिलिफ आहे. त्यात तेजस्विनीचं दिसणं आणि तिचा वॉर्डरोब आवडला आहे. मस्त साड्या, हेअर आणि मेकअप आहे. नेहमीच्या झी मराठीच्या काकुबाई छाप नायिका, त्यांचे तेच तेच बहेनजी छाप कपडे याचा कंटाळाच आला होता. मला तरी १०० दिवस पहावेल ही मालिका.

( या आधी गुंतता ह्रुदय हे मधे मृणाल आणि पल्लवी सुभाष पण झी मराठीचे भाडोत्री कपडे वापरत नव्हत्या. त्या दोघिंना पहाण्यासाठी सिरियल पहायला सुरुवात केली आणि ती नंतर आवडुन गेली तशीच अपेक्षा या मालिकेकडुन पण आहे. )

तेजस्विनी चे एवढे क्लोज अप्स घेतात की तिच्या चेह्र्यावरचे खड्डे दिसतात. ती मुळात सुंदर आहे. सारखा तिचा बटबटीत मेकप दाखवतात.

राइट. तिला बहुदा warts आहेत आणि मेकअपचा थर पण दिसतो. जनरली मराठी मालिकांमधे चांगल्या मेकअपच्या नावाने उजेडच असतो. पण पहिल्या भागात ती रात्री सिल्क नाइटी आणि नो/न्युड मेकअप मधे छानच दिसली होती. काल आणि आज मात्र फारच क्लोजअप्स होते. लिपस्टिक तर फारच लहान मुलीने लावल्यासारखं अनइव्हन होतं. But still she has style.

साड्या तिनेच डिझाईन केल्या असाव्यात असं मला वाटतं, उद्या सर्व नावं नीट बघते सुरुवातीची. मी झीला विचारलं पण त्यांनी काही उत्तर नाही दिलं.

महिला हवालदाराचा 'मुलाला बरं नाहीये... लवकर घरी जायचंय' संवाद ...... माझा अंदाज खरा ठरणार कदाचित Wink

शिवाय राणीसारखी स्टायलिश बाई आणि काँट्रास्टमधे ही महिला-हवालदार... यामागेही काहीतरी कारण असणार असं मला सारखं वाटतंय.

तेजस्विनीला या गेट-अपमधे बांधलेले केस जास्त चांगले दिसतायत. परवा पोलिस-स्टेशन सीनमधे तिचे क्लोज-अप्स फारच बटबटीत होते.

तेजस्विनी अंगापिंडाने मजबूत आहे . तिचा चेहरा पसरट आहे . तिच सौंदर्य उग्र आहे . तरी मालिका वेगळी म्हणून चांगली वाटतेय . गणेशाला ( या मालिकेत विकी) निदान आत्ता पर्यंत जो काही पाहिला त्यात तरी भूमिकेचा बाज जमलेला दिसत नाहीये. अर्थात सुधारेल नंतर . तो असा नाक का ओढतो सारखा. स्टाईल फारशी चांगली नाहीये . पुढच्या भागात धनंजय ची बहीण येणार आणि ----
<<नेहा म्हणजे राणी असेल का ?>> नाही. नेहा म्हणजे "आदी" ची प्रेयसी आणि राणी म्हणजे हिरवीण
आणि ब्याग्राऊंड म्युझिक मला आवडलाय . खूप म्हणजे खूपच छान आहे . प्रसंगांना उठाव देणार मस्तच .
शीर्षक गीत जास्त नाही आवडलं पण ब्याग्राऊंड म्युझिक एकदमच झकास Happy

तो असा नाक का ओढतो सारखा. >>>> तो ड्रग्ज घेत असणार. त्याच्या पैशाच्या डेस्परेट गरजेवरुन आणि त्या नाक ओढण्याच्या सवयीवरुन त्यांना अगदीच तेच इंडिकेट करायचं आहे.

मालिकेचं शिर्षक दर दिवशी बदलणार आहे , म्हणजे १०० डेज, ९९ डेज >>> मला असं पुसटसं दिसल्याचा भास झाला ब्रेकनंतर ब्रीफली टायटल दाखवतात तेव्हा. ९९ डेज असं दाखवलं होतं परवा बहुधा. मला वाटतं ते दिवस आपले अ‍ॅक्चुअल दिवस मोजत नसून मालिकेतले दिवस मोजत आहेत आणि त्याप्रमाणे दाखवत आहेत.

ते 24 ची कॉपी करत आहेत बहुतेक.. पण कथेत पाणी घालायला स्कोप ठेऊन आधीच 100 दिवस ठेवलेत Lol

काल ते सगळं काम उरकून आल्यावर तेजस्विनी दारू पीत असताना ग्लास पकडलेल्या चारपैकी तीन बोटांवरचं नेलपेंट गायब फिदीफिदी>> गायब नै कै......हल्ली तशी फॅशन आहे.....एक नख वेगळं/गडद रंगवायची Happy

मधल्या जाहिरातीनंतर सिरियल परत चालू होते तेव्हा आज ९६ डेज असे होते.. रोज एक एक दिवस कमी करत आहेत..

अशा टाईम बाऊंड मालिका असतील तर बर्‍या चालतील... पूर्वी कश्या १३ आठवड्यांच्या मालिका असायच्या तश्या...

साडीत भारी वाटते तिची personality. मला फारशी आवडत नाही ती. पण ह्या रोलसाठी फिट्ट. >>>>> अगदी अगदी.तीमला आवडत नसली तरीही ह्या मालिकेत डौलदार दिसली आहे.

हल्ली नाही खूप दिवस झाले, दोन वर्षापुर्वीच एका सिरीयलमधे एकजण असंच लावायची ५ बोटांना वेगवेगळं किंवा एका बोटाआड सेम कलर, किंवा एक बोटाआड वेगवेगळं नेल डीझाईन.

मुग्धा रानडेची एन्ट्री झाली सिरीयलमधे, चांगलं करते ती काम.

एका बोटाआड सेम कलर, किंवा एक बोटाआड वेगवेगळं नेल डीझाईन. >>>> मला खुप आवडते असे नख रंगवायला नाही तर किमान ईंडेक्स फिंगर्ला तरी वेगळा रंग हवा...

Pages